भारतातुन परदेशात जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता ?

Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39

भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फक्त हेच सांगायचे होते . >> मग ते ट्रीट देण्याचे काय म्हणत होतात?

भारत दरिद्री असेल ,लष्करी बाबतीत कमजोर असेल तर तुम्ही किती ही हुशार असला तरी परदेशातील सरकार आणि नागरिक तुम्हाला किंमत देणार नाहीत >> भारतीय एथनिक ग्रूप अमेरिकेत ईतर कुठल्याही देशातल्या नागरिकांपेक्षा खुद्द अमेरिकनांपेक्षा जास्त पगार कमावणार्‍या नागरिकांचा ग्रूप आहे. आणि अमेरिकन सरकारने कशाला किंमत दिली पाहिजे..... भारतीय लोकच अमेरिकन सरकारला बिलिअन्स मध्ये टॅक्स देतात... आता बोला?

समराईझ करायचं तर अमेरिकन्स भारतीयांना कसं ट्रीट करतात यात फारच छान वागवतात ते हडतुड करतात अशी पूर्ण रेंज येईल. >> अशीच रेंज भारतीय लोक अमेरिकनांना कसे ट्रीट करतात यात पण येईल.

भारतातच राहिलेले भारतीय इतर भारतीयांना कसे ट्रीट करतात यात पण हीच रेंज येईल . परप्रांतीयांचे पाय तोडण्याची भाषा मराठी भाषिक नेतेच करत आहेत ना Happy

तुम्ही शोधाल त्या प्रकारची (च) उदाहरणं तुम्हाला दिसतील

आता भारत उगवती आर्थिक शक्ती आहे .
पण जर भारताने अमेरिकेशी व्यापारी संबंध तोडले किंवा अमेरिकन वस्तू न वर खूप टॅक्स लावला तर अमेरिका ग्रीन कार्ड सुद्धा भारतीयांचे रद्द करेल

आता भारत उगवती आर्थिक शक्ती आहे . >> हो त्यांना Emerging Markets म्हणतात. आणि ती तीस वर्षांपासून आहे आणि पुढची अनेक दशके असेल. पण त्याचे काय?

पण जर भारताने अमेरिकेशी व्यापारी संबंध तोडले किंवा अमेरिकन वस्तू न वर खूप टॅक्स लावला तर अमेरिका ग्रीन कार्ड सुद्धा भारतीयांचे रद्द करेल >> वस्तूंवर टॅक्स लावणे आणि ग्रीन कार्ड देणे यामध्ये परस्परसबंध काय आहे जरा डीटेलवारी सांगता का?

उगवती आर्थिक शक्ती हे फक्त बोलायला! गेली २५ -३० वर्षे ऐकतोय. परवाच वाचलं की पाश्चात्य देशात असलेला लोकसंख्यावाढीचा कमी दर ही आता समस्या रहाणारच नाहीये ऑटोमेशन इ. मुळे. इमिग्रेशने कमावती लोकसंख्या भरुन काढायची गरज कमीकमी होत जाणारे.

अमेरिका- चीन टॅक्स गोंधळात चीन मधुन उत्पादक बाहेर पडताहेत ते भारताने कॅश इन करायला हवे होते. ते सगळे व्हिएतनाम, थायलंड, मलेशिआत चाललेत. लोकसंख्या असुन फायदा काय?

जी अमेरिका भारताच्या संरक्षण मंत्री असलेल्या (जॉर्ज फर्नांडिस) ह्यांना अपमानकारक वागणूक देवू शकते ती अमेरिका सामान्य लोकांना (१०/२० कोटी कमावणाऱ्या )कोणतीही वागणूक देवू शकते

बरं विषयावर या आता. राजेश दुसरा धागा काढा ट्रीटमेंटसाठी. दाखविते मग तुम्हाला .कसे ट्रीट करतात ते.

मातीचा जग मिळतो मेक्सिकन मार्केट मध्ये. Capture22.PNG खलबत्ता दगडी मोठा कॉस्ट्कोत मिळतो वर्षातून एकदा. समरमध्ये.
माझ्याकडे आहे. हा असा दिसतो.

जी अमेरिका भारताच्या संरक्षण मंत्री असलेल्या (जॉर्ज फर्नांडिस) ह्यांना अपमानकारक वागणूक देवू शकते ती अमेरिका सामान्य लोकांना (१०/२० कोटी कमावणाऱ्या )कोणतीही वागणूक देवू शकते >> संरक्षणमंत्री असण्याचा , १०-२० कोटी कमावण्याचा आणि अपमानकारक वागणूक मिळण्याचा परस्पर संबंध काय आहे काही कळत नाही बुवा.
अमेरिकन्स तर त्यांच्या बिलेनिअर- सेलिब्रिटी- मोस्ट पावरफूल मॅन ईन द वर्ल्ड- असलेल्या प्रेसिडेंटला पण चांगली वागणूक देत नाहीत पण मग त्याचे काय?

दगडु तेली मसाला (पुर्वी आइ करुन द्यायची मसाला)
हा कशासाठी वापरतात? फारच मजेदार नाव आहे.>> हा नाशिकचा १२५ वर्श जुने दगडु तेली चान्द्वडकर मसालेवाले चा मसाला आहे, पुर्वी जुन दुकान होत आता मस्त मोठ दुकान आहे जुन्याच नाशकात, ही वेबसाइट http://dagduteli.com/

बिलेनिअर- सेलिब्रिटी- मोस्ट पावरफूल मॅन ईन द वर्ल्ड- असलेल्या प्रेसिडेंटला पण चांगली वागणूक देत नाहीत >> Rofl हे बाकी खरं.

परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांना भारता विषयी भारता विषयी किती प्रेम आहे ह्याची झलक कमेंट वाचून झालीच असेल .
न्यूझीलंड मध्ये भारतीय नागरीक वर हल्ला,अमेरिकेत भारतीय नागरीक वर हल्ला असल्या न्यूज भारतीय मीडिया का देते?
आणि आपण भारतीय म्हणून भारत सरकार संबंधित देशाच्या सरकार ला कारवाई करण्याचा आग्रह का करते .विचार करण्यासारखी गोष्ट आहे ..
प्रगत देशात राहणारे भारतीय स्वतःला भारतीय म्हणून घेणे कमी पानाचे समजतात त्यांचा अभिमान आपण का बाळगावा तिथे सुनीता William असू ध्या नाही तर आणि दुसरे कोनही
विचार करण्या सारखी गोष्ट आहे

अगदी बरोबर आहे तुमचे. खरोखर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत.
पण आत्ता ईथे आपण सगळे परदेशात परततांना कुठल्या गोष्टी न्याव्यात त्याबद्दल विचार करतो आहोत की नाही मग तो विचार आपण पूर्ण करून घेऊ यात.
मग त्यानंतर अमेरिकन भारतीयांना देत असलेल्या ट्रीट ह्या विषयावर विचार करूयात.
मग भारतीयांना मिळत असलेल्या अपमानकारक वागणूकीवर
मग त्यांना भारताविषयी वाटणारे प्रेम
मग भारतीय असण्याबद्दल वाटावयाच्या अभिमानाबद्दल
असे क्रमाक्रमाने विचार करूयात....
एकदम सगळ्या विचारांची भेळ नको.... मंजूर?

@सीमा
मस्त आहे खलबत्ता! -
@प्राजक्ता
धन्यवाद. नक्की ट्राय करणार हा मसाला!

Rajesh188
सुनीता विलियम्स अमेरिकन आहे. तिचे वडील भारतीय आहेत. आई दुसऱ्या कुठल्यातरी एथनीसिटीची आहे. म्हणजे ती अर्धीच भारतीय आहे.
नक्की किती पिढ्यांनी भारतीय असल्याचा अभिमान बाळगायचा असतो?

असो. आता परदेशात न्यायच्या यादीत अभिमानही घालायला हवा. :p

>>न्यूझीलंड मध्ये भारतीय नागरीक वर हल्ला,अमेरिकेत भारतीय नागरीक वर हल्ला असल्या न्यूज भारतीय मीडिया का देते?

बरं, भारतात भारतीय नागरिकांवर हल्ले होत नाहीत? भारतात सर्व भारतीय लोकांना चांगली आणि सम वागणूक मिळते?

धागा भरकटतोय. इथे राजकारण आणू नका. दुसरा धागा सुरू करा. आणि तिथे जे लिहितील त्यांनी कृपया केवळ वर्तमानपत्रे वाचून बनवलेली मते छापू नका, स्वतः जे अनुभवले ते लिहा. मीडियातली चित्रे खरीच असतात असे आता उरले नाही.

कोण कोणाला कसे ट्रीट करतो म्हणजे वागवतो हे तो माणूस म्हणून कसा आहे यावर ठरते हे माझे व्यक्तिगत अनुभवांवरूनचे मत. माणूस माणूस म्हणून कसा आहे जे त्याच्या जात धर्म प्रांत देश इत्यादी बाह्य शिक्क्यांवरून ठरत नाही हे उमगणारे कित्येक अनुभव वाचनातही आलेत.

असो. मूळ प्रश्न ट्रीटचा होता, तो मराठीतून 'वागणे की वाढणे' कसे असा विचारला असता तर बरे झाले असते. मी आपला वाढणे असा अर्थ घेऊन अमेरिकन लोक काय काय खातात हे वाचायला मिळेल या आशेत होते. पण वाढण्यावर फक्त 1 प्रतिक्रिया व बाकी सगळ्या वागण्यावर ... निराशा....

माठाला हलका नका समजु, यावर्षी माठ घ्यायचा होता म्हणुन अमॅझॉनवर पहिला तर डिझायनर माठ १२५$ ला दिसला. त्यामुळे फारेन्ड नवा धागा काढुन भारतातुन माठ सुरक्षितपणे घेऊन यायच्या सुचना लिही बरे. Happy

आम्ही भारतातुन डिझायनर भारतीय कपडे जास्त आणतो.
२-३ वर्षापुर्वी ५० लोकांसाठी वाट्या असलेली ताटं, जेवण्या आधी खायला छोट्या ताटल्या , चमचे, पेले, छोट्या वाट्या आणले. त्याने एकदा वापरुन फेकायचा कचरा आमच्याकडुन निर्माण होणे बंद झाला व ते २ ते जास्तीतजास्त ३ डीश्वॉशरच्या सायकलमधे धुवुन निघते. लोक भाड्यानं मागुन राहिलेत. Happy

इथे स्टील च्या अश्या भांड्याना (ताट, वाट्या, प्लेट्स) भाड्याने देण्याचा व्यवसाय बऱ्याच बायका करतात.

जिरा हे एक टूल आहे.. आपण कोणते task/ticket वर काम करतो त्याचा हिशोब तिथे estimates/work log च्या स्वरूपात द्यायचा असतो.. client/boss तुम्हाला ticket assign करतात.. थोडक्यात it वाले लोक काय काम करतात ते इथे ट्रॅक होते

अरे परदेश वासियांचे सोडा. काल मला टेस्को मध्ये आंबे मोहोर तांदूळ असे लेबल लावलेला पॅक दिसला तर मी तो लगेच उचलून आणला. व गरम
गरम शिजवून वास घेउन खाल्ला पण तुपाशी. आपल्या जडण घडणीत दडलेले असे क्षण आपण परदेशात कामासाठी, जगायला गेलो म्हणून कसे न ष्ट होतील. ते तसेच राहतील. त्यामुळे असे पदार्थ, वस्तू एकदम एव्हर ग्रीन असेल.

बाकी माठ, खल बत्ता डिस्कशन एकदम बेस्ट.

इथे (बंगळुरात) जीरा राईस नावाचा आंबेमोहोरासारखा तांदूळ मिळतो. ( याचा जिरा या टूलशी अर्थातच संबंध नाही Wink ) आपल्याकडे जिरगा तांदूळ म्हणतात तो हाच असेल. सुंदर वास येतो भाताला.

जिरगा तांदूळ म्हणतात >>>> जिरेसाळ की काहितरी पण असतो ना?

भारतातून नाव घालून आणलीत का भांडी >>>> ५० चा सेट म्हटल्यावर घातलीच असणार. आणि भारतात इवलीशी नैवेद्याची वाटी घेतली तरी हवं असेल तर फुकटात नाव घालून मिळते, मग ह्यावर तर घालून दिलंच असेल.

मी सांगितली नव्हती पण दुकानदाराने आपणहुन घातली नावे सगळ्यावर. ते त्याने घरपोच आणुन दिली म्हणुन सुरक्षिततेसाठी घातली असेल. चमच्यांवर काही पाहिले नाही. Lol मात्र चारही चेकईन बॅगमधे फक्त स्टीलची ही सगळी भांडी होती. थोडे नवे कपडे. बास. एक चकली पण आणु शकले नाही तेव्हा. वजन थोडे जास्त झाले पण सोडले त्यांनी तसेच. Lol

Pages