Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39
भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुर्ण वर्ष भराचे कपडे जितकी
पुर्ण वर्ष भराचे कपडे
जितकी व्हरायटी भारतात असते कपड्यान्ची तितकी बाहेर नक्की नसते. भारतिय, वेस्टर्न सर्व, पैठणी, जरी साडी वगेरे.
खाण्या-पिण्याचे आधी खूप न्यायचो, आता सर्व मिळते मग उगाच वजन वाढवण्यात काय हशिल ?
मेडिसिन पण आधी न्यायचो, आता नाही नेत एक तर तात्पुरता उपाय होतो,डॉक कडे जावेच लागते, मलम, सितोपलादी, वगेरे नेतो.
बूट, चपला वूडलॅन्ड ब्रान्ड चे नेतो ते वर्ष, २ वर्ष टिकतात.
मिक्सर, कूकर हे खूप महत्वाचे आहेत, ते नेतोच.
लोणचे (घरी घातलेले), तूप
लोणचे (घरी घातलेले), तूप (कढवलेले), भाकरी पिठे, चटण्या, फ्रेश खाऊ, कोकम- असे विशिश्ठ खाद्य नेते.
भारतात असणारी तृण धान्य,कड
भारतात असणारी तृण धान्य,कड धान्य,भाज्या, बटाटा,कांदा, चिकन,
जगातील सर्वच देशात उपलब्ध असतील .
फक्त स्वयंपाक घरी करता आला पाहिजे आणि ती कला असली पाहिजे .
हॉटेल मध्ये तयार पदार्थ आयते हवे असतील तर भारत,पाकिस्तान,बंगला देश सोडून बाकी सर्व ठिकाणी तयार पदार्थ घेवून जाणे,
लोणचे,पापड,मसाला, इत्यादी
आपण Amazon Varun किंवा
आपण Amazon Varun किंवा Flipkart,Alibaba cha vapar Karun जगातील कोणती ही वस्तू मागवू शकतो तर अमेरिकेत cooker, etc magvu शकत नाही का
ती कस्टम दिवटी नाही का भरावी
ती कस्टम दिवटी नाही का भरावी लागणार मग?
'कामवाली बाई/बुवा' आणता येत
'कामवाली बाई/बुवा' आणता येत असेल तर ते बघा, ती मिळत नाही बहुतेक ठिकाणी>>>>>> ही असल वाक्ये डोक्यात जातात. प्रतिसादकर्त्याने मजेत म्हटले आहे हे माहित असूनही.माझी कझन, दरवेळेस/फोनवर मस्करीनेच म्हणायची" हो,आमच्याकडे गंगूबाई नाही ही कामे करायला".दोनदा ऐकले,तिसर्यावेळेला हसत हसत म्हटले"अग एवढेच ना! मग इथे ये बघू.हव्या तेवढ्या बायका मिळतील".परत म्हणून तो सूर आळवला नाही.
रच्याकने,ती स्वतः फिलिपिनो नोकरांकडून साफसफाईची कामे करवून घेते.
अमेरिकेत घरकाम करायला माणसं
अमेरिकेत घरकाम करायला माणसं मिळत नाहीत असे नाही त्यांचे पगार परवडत नाहीत .
भारता मधून जरी नोकर न्यायचा असेल तरी agreement करायला लागते त्या मध्ये तेथील नियमानुसार पगार,कामाचे तास,सुरक्षा,राहण्याची सोय,औषद उपचार हे सर्व मान्य करावेच लागते .
नियमबाह्य काम करून घेतलं जात आहे हे सिद्ध झाले तर शिक्षा सुद्धा होवू शकते
बोलू नये पण तरी सत्य सांगावसे
बोलू नये पण तरी सत्य सांगावसे वाटत .
अमेरिकेत नोकर परवडत नाही म्हणून लाडका पुत्र आणि लाडकी सून
जेव्हा बाळंतपण असते तेव्हा आई का किंवा सासू का मुल sambhalnya साठी अमेरिकेत घेवून जातात गोड बोलून.
आणि मुल मोठी झाली की परत कधीच त्यांची आठवण काढत नाहीत
राजेश १८८, हा तुमचा अनुभव आहे
राजेश १८८, हा तुमचा अनुभव आहे का? नसल्यास जनरलाईज्ड स्टेटमेंट्स करु नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.
ती स्वतः फिलिपिनो नोकरांकडून
ती स्वतः फिलिपिनो नोकरांकडून साफसफाईची कामे करवून घेते. >> मोठ्ठा पाळणा तयार करून फिलिपिनो बाई/बुवाचं नाव गंगूबाई ठेवून द्यायचं... घे म्हणावं गंगूबाई... हाय काय नि नाय काय...
फिलिपिनो बुवाला गंगाराम्/गंगूबाई मधला फरक कळत नसल्याने धकून जाईल.. 
तुम्ही कुठे राहता त्याच्यावर
तुम्ही कुठे राहता त्याच्यावर पण आहे . शिकागो मध्ये आम्हाला देसी कूक मिळाली होती - तासाला बारा डॉलर घ्यायची
तासा दीड तासात चपात्या भाजी भात बनवून भांडी घासून किचन साफ करून जायची .
जिथे देसी कूक मिळत नाहीत तिथे मेक्सिकन हेल्पर मिळतात आणि त्यांना इंस्ट्रक्शन देऊन घरकाम करून घेता येते.
सिंगापुर, मलेशिया मध्ये
सिंगापुर, मलेशिया मध्ये भारतातुन पुर्ण वेळासाठी घरकामासाठी मदतनिस आणु शकतात. त्यासाठी मिनिमुम पगाराची अट नाही. सरकारला मात्र मेड लेव्ही द्यावी लागते. पुर्वी ती मेड ३६५ दिवस काम करत असे पण मागच्या काही वर्षापासुन कायद्याने रविवारी सुट्टी द्यावी लागते.
अमेरिकेत एडिसन नावाच्या नगरीत भारतिय कुक/मदतनिस मिळतात. त्या अमेरिके शॉर्ट टर्म साठी (आठवडा/ जास्तित जास्त महिना) अमेरिकेत कुठेही जाण्यासाठी तयार असतात. कायद्याने जो पगार आहे तो आणि जर दुसर्या स्टेट मध्ये जायचे असल्यास ट्रॅव्हल चा खर्च द्यावा लागतो.
वरचे वाचून विशिष्ट प्रांतीय
वरचे वाचून विशिष्ट प्रांतीय अमेरिकन लोकांना आता भारत आणि अमेरिकेत फारसा फरक वाटत नसेल असे वाटतेय, फक्त रस्त्यावरचे खड्डे व हवेतील प्रदूषण सोडल्यास.

मूळ धाग्यात 'परत परदेशात जाताना' असा उल्लेख आहे, म्हणजे धागाकर्ती भारतात फक्त कुटुंबभेटीसाठी येते असे वाटते. अश्या वेळी जाताना मिक्सर, कुकर, लाटणे, पोळपाट, नोकर-चाकर काय करायचे? हे सल्ले देणारे धागे याआधी निघालेत.
काहीतरी हटके जे इथे असताना लक्षात येत नसतील पण तिथे गेल्यावर वाटते की 'अरे, हे घ्यायला पाहिजे होते' असे काही सुचवले तर जास्त उपयोगी पडेल असे वाटते.
म्हणून नेहमीच्या यादीसोबतच काहीतरी हटके भेटवस्तू ज्या तिकडे नाविन्यपूर्ण वाटतील, इकडे आलेल्या काही नव्या गोष्टी, ज्या परदेशस्थ लोकांना माहीत नसतील वगैरे बाबींचीसुद्धा चर्चा करा हो मंडळी.
सिंगापुर ला परत आले आहे आणि
सिंगापुर ला परत आले आहे आणि घरी गंगुबाई असल्याने सामान सुद्धा पटापट लावून झाले आहे. धन्यवाद. @साधनाताई, बरोबर आहे तुमचा मुद्दा. भारतात सतत बरेच काही चांगले बदल होत असतात. नवीन सुविधा उपलब्ध होत असतात. उदा. मिंत्रा / ऍमेझॉन ची उत्तम
सर्विस विरुद्ध पुण्यातलं अतिघाण ट्रॅफिक वगैरे जे बऱ्याच परदेशस्थ लोकांना माहिती नसते किंवा खात्री नसते.
शिवाय नवीन दुकाने / रिसॉर्ट्स इत्यादी ची देखील माहिती होईल असा उद्देश होताच. पण बाहेर राहात असताना काही गोष्टी विसरल्या जातात सो त्याही लक्षात राहण्यासाठी हा एकत्रित धागा.
ज्यांनी इथे लिहिला आहे त्यांचे मनापासून आभार. मला माझे सजेशन सुद्धा लिहायचे आहेत ते लवकरच लिहिते.
आणि आता सुट्टीच्या मोसमात बरेच लोक भारतवारी करतील त्यांना ह्या धाग्याची मदत होईल अशी अपेक्षा
म्हणून नेहमीच्या यादीसोबतच
म्हणून नेहमीच्या यादीसोबतच काहीतरी हटके भेटवस्तू ज्या तिकडे नाविन्यपूर्ण वाटतील, इकडे आलेल्या काही नव्या गोष्टी,>>>>>> +१.
मला भारतातून परत जाणार्या मंडळींचे मनापासून कौतुक वाटते.इकडच्या नातलगांसाठी भेटी आणताना तसेच त्यांच्याकडून भेटी नेताना,परत स्वतःची(मित्रमैत्रिणींसकट) केलेली वेगळी खरेदी हे सारे ओझे कसे नेतात हे तेच जाणोत.जादूच्या बॅग असल्यासारख्या सर्व काही नेतात.ओझे नेण्याबद्दल हेवा वाटतो.
कामवाली बाई/बुवा' आणता येत
कामवाली बाई/बुवा' आणता येत असेल तर ते बघा, ती मिळत नाही बहुतेक ठिकाणी>>>>>>
अमेरिकेत रहाणारे लोक भारतातल्या मोलकरणींना का बरं miss करतात? हा प्रश्न मला नेहमी पडतो.
भारतापेक्षा अमेरिकेत घरात धूळ बरीच कमी येते. त्यामुळे घर, बाथरूम वगैरे रोज स्वच्छ करावे लागत नाही.
रोज दुधाचा रतीब नसल्याने दूध तापवण्याचे काम नसते.
नळाला २४ तास गार आणि गरम पाणी येत असल्याने, पाणी भरून ठेवावे लागत नाही.
भांडी विसळणे/ स्वच्छ करणे हे काम, गरम पाण्यामुळे सोपे होते. पाहुणे आले किंवा घरी पार्टी असली, तर disposable ताट-वाट्या सहज मिळतात.
वेळी-अवेळी पाहुणे येत नाहीत. आले तरी त्यांची चारी-ठाव जेवणाची अपेक्षा नसते किंवा ते आपणहून मदतीला पुढे सरसावतात.
काही वर्ष अमेरिकेत काढली की आपणही शॉर्टकट मील किंवा वन-डिश मील बनवायला/ खायला लागतो. त्यामुळे स्वयंपाकाचे कामही बरेच कमी होते.
थोडक्यात काय तर, अमेरिकेत घरकाम हे भारतातल्यापेक्षा कमीच असते.
तरीही फार काम पडते असे वाटलेच, तर फिलीपिनो किंवा मेक्सिकन cleaning ladies/ gardeners मिळू शकतात.
त्याउलट, हल्ली भारतात कामवाल्या बायकांना सांभळणे/ manage करणे ही एक डोकेदुखीच बनत चालली आहे. त्या वेळेवर येत नाहीत. पैसे वाढवून मागतात. आपल्याला खरचं गरज असेल (पाहुणे वगैरे येणार असतील), तर हमखास बुट्टी मारतात.
सोहाची पोस्ट एकदम सोने पें
सोहाची पोस्ट एकदम सोने पें सुहागा! एकदम सही!
हल्ली भारतात कामवाल्या
हल्ली भारतात कामवाल्या बायकांना सांभळणे/ manage करणे ही एक डोकेदुखीच बनत चालली आहे. त्या वेळेवर येत नाहीत. पैसे वाढवून मागतात. आपल्याला खरचं गरज असेल (पाहुणे वगैरे येणार असतील), तर हमखास बुट्टी मारतात.
या मताशी सहमत. माझ्या काकूने तिच्या कामवाल्या बाईला एकदाच सुनावले होते पैसे वाढवून मागीतले तेव्हा, परत काही मागितले नाहित वाढवून. काकूने दिलेले उत्तर..... साबण आमचा, पाणि आमच, घासणी आमची, भांडी आमची, घरातील माणसं तेवढीच, तु येउन फक्त भांडी घासणार, सारखे पैसे वाढवून मिळणार नाहीत. जर हवेच असतील तर दर वेळी साबण संपला तर साबण आणि घासणी तूच आणायचे.
आता धाग्याचा विषय. मोजकेच दिवस परदेशात राहिला आलो असल्याने आम्ही अजुन तरी भारतात येउन परत परदेशात आलेलो नाहीत. पण असे झालेच तर येतान औषधे,थालपीठ भाजणी, मसाले, उन्हाळी पदार्थ घेउन येउ.
अर्थातच प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असणार.
घरकाम करणारी बाई हे तिचे काम
घरकाम करणारी बाई हे तिचे काम नोकरी म्हणूनच करते.आणि ती तिचे श्रम विकत असते साबण नाही.
नोकरी करणारे सर्वच pvt sector मध्ये किंवा सरकारी त्यांचा पगार वाढतोच ना आणि तशी मागणी नेहमी ते करतात ना .
त्यांचे काय काम वाढलेले असत उलट काम कमी झालेलं असते तरी पगारवाढ मागतात .
मोलकरीण नी पगार वाढ मागण्या पेक्षा आपणच तिला काही दिवसांनी ठराविक पैसे वाढवून द्यावेत
अमेरिकेत घरकाम हे
अमेरिकेत घरकाम हे भारतातल्यापेक्षा कमीच असते. <<< हा संपूर्ण गैरसमज आहे... घर चालवायला बरेच काही लागते..
अमेरिकेत घरकाम नाही म्हणुन बसून राहिलेले ग्रूहस्थ / ग्रूहिणी फारशी पाहिलेली नाहीत..
कपडे धुणे/वाळवणे/इस्त्र्या करणे/जागेवर लावणे /मुलाना पोहोचवणे /आणणे.. त्यांची वेळापत्रके संभाळणे असली हजारो कामे असतात (२ मुली वाढवून आणि २५ वर्षे राहून झाल्यावर सांगतोय).
भारतात कामवाली बाई आली नाही म्हणून संसाराचा पूर्ण गाडा अडकलेली माणसे पाहिलेली आहेत....
'तुमच्या मुलीला स्वयंपाक येतो? आमच्या मुलीला चहा सुध्दा हाता द्यावा लागतो. कशाला शिकायला हवे, कामवाली करून देईल की' हे स्वतः ऐकले आहे. माझी ती पोस्ट अश्या लोकांसाठी (च) होती...
भारतात कामवाल्या सहज मिळत
भारतात कामवाल्या सहज मिळत असल्या तरी त्यांना टिकवून ठेवणे तेवढे सोपे काम नाही. वर सोहाने लिहिलेल्या गोष्टी भारतात असत्या म्हणजे धूळ नाही वगैरे तर मी बाई ठेवलीच नसती. भारतात वरकामाला ठेवलेल्या बाया 'आपल्याला रोज तेच ते काम पडू नये, थोडा जास्तीचा वेळ मिळावा' यासाठी असतात. त्यांनी केलेले काम जितक्यास तितके असते. बाकी जेव्हा घर काही खास प्रसंगी चकाचक हवे असते तेव्हा आपल्यालाच कंबर कसून बाईसोबत उभे राहावे लागते. भांडी घासणे, कपडे धुणे, सैपाक करणे इत्यादी बाबतीतही असेच आहे. सगळी कामे आपण करतो तशी करणाऱ्या बाया विरळा.
पगारवाढीबद्दल राजेश188 शी सहमत.
निर्झरा, तुम्ही किंवा तुमच्या
निर्झरा, तुम्ही किंवा तुमच्या घरचं कोणी नोकरी करतं का? तेच काम करत असूनही इन्क्रीमेंट मिळते का? महागाई भत्ता असतो का?
मी अमेरिकेत कामवाल्या बायांना
मी अमेरिकेत कामवाल्या बायांना अज्जिबात मिस केले नाही कधी. उलट आता सुट्टीला घरी जाते तेव्हा त्या ३-३ बायांचा त्रासच जास्त वाटतो.
इकडे घर, लाइफस्टाइल मेन्टेन करायला स्वतःला भरपूर काम पडतेच पण घरातल्यांनीच ते फटाफट एफिशियन्टली करायची सवय होऊन जाते आणि मग तेच बेस्ट वाटते. उलट भारतात ( माझ्या अनुभवात) कामवाल्या बाया आणि निरनिराळ्या सर्विसेस/ सोयी देणार्या माणसांवर अवलंबून राहिल्याने वेळेचा अपव्यय फार होतो असेच माझे मत झाले आहे! असो. अवांतर पोस्ट झाली.
अमेरिकेत घरकाम हे
अमेरिकेत घरकाम हे भारतातल्यापेक्षा कमीच असते >> आं ?
वेगळे असते म्हणू शकता, कमी कटकटीचे म्हणु शकता पण डायरेक्ट कमी ? मी कुठल्या तरी वेगळ्याच अमेरिकेत रहात असणार मग.
दूध दारावर येत नाही, इस्त्रीवाला प्रकारच नाही , दारावर येणे दूर! भाजीपाला , वाण सामान हे आता आता ऑनलाइन मागवता येतंय. पण ती सर्व्हिस सगळीकडे नाही. दारावर किंवा कोपर्यावर भाजी , फळे , मासे असं काही मिळत नाही.
ट्रॅश टाकणे स्वतः करावे लागते. लॉन मोइंग, स्नो रिमूव्हल हे स्वतः करा किंवा कोणाला तरी पैसे द्या.
मी वर लिहिल्याप्रमाणे ही घटना
मी वर लिहिल्याप्रमाणे ही घटना माझ्या काकूची आहे. माझी स्वताहाची नाही. आमच्या कामवालिला आम्ही स्वताहून पैसे वाढवून देतो. पण एक जाणवते.... पुर्वी सारखं नीट काम आजकाल केल जात नाही. वर वर उरकल जात काम. हे फक्त आमच्या घरातल नसावं. काही असतील अपवाद, पण सत्य हेच आहे कि पैसे वाढवून द्यायला हरकत नाही. त्या प्रमाणे कामही दिसायला हवं.
वर विचारल्या प्रमाणे इन्क्रीमेंट देताना सुद्धा फईल मधे काय शेरे आहेत ते बघुनच ते किती द्यायच हे ठरवल जात. आपल्या अपेक्षेनुसार नक्कीच आपल्याला हवी तेवढी ती रक्कम मिळत नाही.
मला ही अमेरिकन किंवा वेस्टर्न
मला ही अमेरिकन किंवा वेस्टर्न आपले काम आपण पद्धत फार आवड ते व जमेल तोवरी मी तसे करेनच.
हे अवांतर आहे. :
कामवाल्या बाईच्या वावराचा वैताग येतो हे ही खरे. आमची चांगली आहे पण नेमकी दुपारी झोपेच्या वेळेस येते. मग आम्ही तिला आता काम करू नका म्हणून वाटेला लावतो व नंतर उठून स्वतःच करून टाकतो. किंवा दुपारचे जेव ण झाले की डोअर बेलच बंद करतो. त्या कधी कधी फार भोचकपणा ही करतात. एका बाईने पंधरा दिवसाच्या कामाच्या जोरावर तुमचे वय किती विचारल्यावर मी लगेच तिथेच तिला सॅक करून ओटी भरून पाठवून दिले.
मी जगातून कुठूनही कुठे ही जाताना चितळे आंबा बर्फी अर्धा किलो. खोबर्यची बर्फी पावकिलो. नॉट टु बी शे अर्ड विथ एनिवन एव्हर. बेसिस वर आणी अर्धा किलो बाकरवडी इतकेच नेते. बाकी जगात काही वर्थ नाही नेण्याजोगे माझ्या साठी. जागा असलीच तर इंटरनॅशनल मधून पुस्तके. ज्या वस्तूशी आपले भावनिक बंध आहेत त्या नेणारच की लोक. आयर्न मॅन थ्री सिनेमात त्याचे घर दाखवले आहे. तिथे बसून समुद्राकडे बघत मराठी पुस्तक वाचावे व बाकरवडी, चहा आंबा बर्फी खावे असे मला नेहमी वाट्ते. आयर्न मॅन पहिला ह्या सिनेमात त्याचा चोर मॅनेजर त्याला न्युयॉ र्क मधून पिझा घेउन येतो हे मला जाम पटलेले. हैद्राबादेसून येताना लोक बिर्याणी घेउन येतात ते ही बेस्ट नाहीतर डॉलर युरो कमवायचे कश्याला मना जोगे जगता येत नसेल तर. गिफ्टा वगैरे मी नाही नेत कोणासाठी. मीच गिफ्ट. हवे तरघ्या नाहीतर बझ ऑफ.
परदेश असो की भारत उपलब्ध वेळ,
परदेश असो की भारत उपलब्ध वेळ, पैसा आणि कामाची आवड ह्यानुसार मदतनीस ठेवावे लागतात. कर्जत ते चर्चगेट किंवा ट्रेसी ते सॅनहोजे किंवा लंडन ते सफोक इ इ रोज अप-डाऊन करणार्या व्यक्तीचा वेळ मदतनीस वाचवतात. उच्चपदस्थ व्यक्ती जर तासाला ४००-५०० डॉलर मिळवत असेल तर ते स्नो साफ करण्यात किंवा चहा करण्यात कशाला वेळ घालवतील. असे काम मदतनीसाला देणे बरे असा विचार घडू शकतो. त्यात चूक काही नाही.
मी लगेच तिथेच तिला सॅक करून
मी लगेच तिथेच तिला सॅक करून ओटी भरून पाठवून दिले. >>
सेवरंस पॅकेज काय?!! 
आमच्या इथे आहे इस्त्रीवाला!
आमच्या इथे आहे इस्त्रीवाला! दारावर येत नाही पण ऑफिसजवळच आहे त्यामुळे इझिली पिक अप ड्रॉप करता येतं. घरी धुवून ऑफिस फॉर्मल्स तिथे इस्त्री करून घ्यायचे. तिथेच ड्रायक्लीन पण सोय आहे आणि हे गोरे लोक आता साड्या कुर्ते वगैरे ड्राय क्लीन करण्यात एक्सपर्ट झाले आहेत. (अमच्याइथे भरपुर भारतीय आहेत हे सांगायला नकोच!).
मला पण कामवाली बाई नाहीये ते बरंच वाटतं कारण आता चटचट काम हातावेगळ करायची सवय झाली आहे. शिवाय सगळं मीच माझ्या पद्धतीने करणार हे ओसीडी मॅनेज करायला बरं पडतं. पण ओळखीत आणि नात्यात आता अनेक भारतीय स्पेशली मराठी बायका आहेत ज्यांच्याकडे स्वयंपाकाला बाई, मुलांसाठी बेबीसीटर असतातच अगदी इंडियातल्या सारखंच.
मुळात आपण सर्व भारतीय लोकांना
मुळात आपण सर्व भारतीय लोकांना स्वतःची कामे स्वतः करायची सवय नसते ..आर्थिक परिस्थिती चांगली नसते तेव्हा नाईलाज म्हणून करावी लागतात हे सत्य आहे (तरी बायकोने सेवा करावी ही इच्या असतेच)
आर्थिक स्थिती चांगली असेल तर घरकाम करणे किंवा बाकी कामे करणे ही लाजीरवाणी गोष्ट आपण समजतो मग ती काम करणारी लोक ही गरज बनते .
ऑफिस मध्ये शिपाई नावाचा सेवा देणारा व्यक्ती असतो त्याचा पुरेपूर फायदा आपण घेतो ऑफिस चे काम सोडून आपली वयक्तिक कामे सुधा त्याच्या कडून करून घेतो .
पण हीच लोक जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा बरीच काम स्वतः करतात हा बदल कसा घडतो .
Pages