भारतातुन परदेशात जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता ?

Submitted by आभा on 4 July, 2019 - 12:39

भारतातुन परत परदेशात घरी जाताना तुम्ही काय काय घेऊन जाता? ह्यात खाद्यपदार्थ, कपडे, औषधे इत्यादी सर्वच गोष्टींबद्दल चर्चा करूयात. हा धागा पहिल्यांदा जाणाऱ्या लोकांना उपयोगी आहेच पण अधिक कालावधीसाठी बाहेर राहिलेल्या लोकांना सुद्धा उपयोगी असेल. शिवाय वर्षभरात आपल्या गावात काही नवीन पदार्थ देखील आले असतील. त्याची सुद्धा इथे माहिती मिळू शकते.
चला लोक्स मग चर्चा करूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे चालला आहात त्यावर अवलंबून आहे. आजकाल लंडन, अमेरिका येथे भारतीय प्रकारचे खाद्य जसे की मसाले, लोणची, पापड, स्वयंपाकातली यंत्रे (कुकर, तवा, मिक्सर, अगदी पोळपाट लाटणं सुद्धा), आटा असं बऱ्याच शहरात मिळतं. केवळ घरगुती खाद्य नेला तरी पुरतं. जर इतर ठिकाणी जात असाल तर मात्र जरुरीचं सगळंच सामान न्यावा लागेल. जिथे राहणार असाल तिथे आंतरजालावर थोडा रिसर्च करून काय मिळते काय नाही एकदा पाहून घ्या आणि तेवढेच न्या जे मिळत नाही किंवा जे भारतात स्वस्तात मिळेल.

मी येथे अनेकदा लोकहो किम्वा लोकानो याऐवजी एक धेडगुजरी शब्द लोक्स वापरलेल वाचले आहे? हा काय शब्द आहे? निदान येथे तरी शक्य तोवर एका भाषेत लिहावे. ही विनन्ति.

चितळे बाकरवडी, आम्बा बर्फी, आमरस मँगो पल्प. साड्या, पैठणी, ड्रेसेस जसे कुर्ते लेगिन्ग व शरारा लहंगे असे भारतीय पद्धतीचे कपडे. भरत नाट्यम व कथकचे कॉस्ट्युमस, आंबे मोहोर तांदूळ, मेतकूट, देव्हारा, देवांच्या मूर्ती, संपूर्ण चातुर्मास पुस्तक. मराठी पुस्तके. मसाला पाकिटे, चटण्या,

प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. वेगवेगळ्या प्रकारची चहा पावडर, लोणचे, पापड, तिखट, मसाले, चित्रपटांच्या कॅसेटस... मुख्य म्हणजे भारताची ओळख दाखवणार्‍या छोट्या भेटवस्तू (मग ते राजस्थानी कोरिव काम किंवा छत्तिसगड मधे तयार केलेली हत्ती/ घोडे/ मुर्ती असेल) हे हमखास असते.

आजकाल जास्त वजन/ सामान पण नेता येत नाही... तिकडे पण लक्ष ठेवावे.

आमच्या कडे कितीही चहा पावडर टाकली तरी चहाला चव येत नाही. मला नेहेमी असे वाटत रहाते आपण वापरत असलेली चहा पावडर आधी वापरली गेली असावी, आणि मग कोरडी करुन अधिक थोडी नावाला नवीन अशी मिलावट केलेली आहे.... दुसर्‍यांदा वापरतो आहोत का? ) तिकट नुसतेच दिसायला लाल असते... म्हणुन खास भारतात गेल्यावर या वस्तू आणायच्या.

भारतात जाताना स्वेटर्स, टोप्या, पुस्तके, multi vitamin/ Cal-Mag च्या गोळ्या...

स्वयंपाकातली यंत्रे (कुकर, तवा, मिक्सर, अगदी पोळपाट लाटणं सुद्धा) >> Happy खलबत्ते, पुरणयंत्र, कातणे अशा कधीकाळी लागणार्‍या गोष्टीही जगभरात मोठ्या शहरात मिळतात. भारतीय दुकान नसेल तर अगदी फक्कडश्या इटालियन भांड्याच्या दुकानात जाऊन फूड मिल (पुरणयंत्र) मागायचं. मिळतं. नाव घालून देत नाहीत. दिलं तर अव्वाच्यासवा फी पडते.

नाव घालून भांडी हवी असतील तर भारतातून भांडी घ्यावी आणि नाव इंग्रजीतून घालून घ्यावे. नाहीतर मराठीत नाव घातलेली वाटी कुठल्या हिब्रू/हैतियन शेजारणीकडे जाईल तर तिला गल्लीतल्या कुठल्या भारतीयाच भांड ते तसंही समजणार नाही. Wink

माझी एक कझन, आंबा पल्प,मा.मसाला,कडवे वाल,काळे वाटाणे, घेऊन जाते.त्यावर बंदी आहे हे माहित आहे,तरी नेते कशी ते तिला माहित.दुसरी,भरपूर सोडे,सुके मासे, मसाला नेते.साड्या,ड्रेस हे कॉमन आहेच.

<<< नाव घालून देत नाहीत. दिलं तर अव्वाच्यासवा फी पडते. >>>
मुळात भांड्यांवर नाव घालायचेच कशाला? तुम्ही घरातल्या सगळ्या वस्तूंवर, कपडे, पडदे, चादरी, टॉवेल यांच्यावर पण नाव टाकता का?

<<< भारतातून भांडी घ्यावी आणि नाव इंग्रजीतून घालून घ्यावे >>>
काय लॉजिक आहे? परदेशातील शेजारचे लोक तुमची भांडी उसनी नेतात काय?

बाकी वस्तू कपडे पदार्थ ठीक आहे, पण कुत्र्याचं काय? नवऱ्याला 4 वर्षांसाठी युरोप ( झेक रिपब्लिक) किंवा US ला जावं लागणार आहे. घरात एक सव्वा वर्षाचा लाडोबा आहे. अति टोकाचा लाडवल्यामुळे एकदाही आम्हाला सोडून राहिला नाही. एवढी टोकाची परिस्थिती आहे की त्याला आमच्याबरोबर यायला परवानगी नसेल तर मला नवऱ्याला सोडून भारतात रहावं लागणार आहे, जे की 4 वर्ष असल्यामुळे आम्हा दोघांसाठी अवघड आहे.

अशी वेळ कोणावर आली आहे का? तुमच्या पेटला नेऊ शकता का? मला लवकरच शोधाशोध करून काही पेपरवर्क असेल तर चालू करायचे आहे.

देवकी, खूप खूप आभार. अजून काही माहिती असेल तर खरंच कळवणार का? अजून काही महिने आहेत, त्यामुळे सावकाश कळवलं तरी चालेल. लिंक वरवर वाचली. रात्री घरी वेळ असल्यावर पूर्ण वाचेन.

विक्रमसिंह, तुमची माहिती मला खूप उपयोगी पडणार आहे. पुढे मागे मी माझा कॉन्टॅक्ट देईन. मला डिटेल मध्ये बोलायला आवडेल. रादर मला गरजच आहे त्याची. आता तरी आम्ही दोघे खूप नर्व्हस आहोत. पण जाण्याची वेळ काही महिने दूर करता येणं शक्य आहे, त्यामुळे थोडा माहिती गोळा करायला वेळ मिळाला आहे.

प्रवासात कार्गो आणि क्रेट वगैरे ऐकून धडकीच भरली आहे. तुम्ही ब्राझील म्हणजे फारच मोठा पल्ला पार पाडला. वेळ असेल तर त्या अनुभवाबद्दल प्लिज थोडं लिहा ना.

अमेरिकेत जात असाल तर काहीहीघेऊन जायची आवश्यकता नाही गुजराती लोकांनी भारतीय ग्रॉसर्री स्टोर उघडून ठेवले आहेत , सगळ्या गोष्टी भेटतात तिथे .

<<< भारतातून भांडी घ्यावी आणि नाव इंग्रजीतून घालून घ्यावे >>>
काय लॉजिक आहे? परदेशातील शेजारचे लोक तुमची भांडी उसनी नेतात काय? >> Happy पूर्ण वाक्य असं होतं - "नाव घालून भांडी हवी असतील तर भारतातून भांडी घ्यावी आणि नाव इंग्रजीतून घालून घ्यावे." आता ज्याची त्याची आवड असते. कुणाला आवडत असेल भांड्यांवर नाव आणि मग परदेशात त्याची बक्कळ फी पडली तर वाईट वाटेल की त्यांना. पडदे, चादरी, टॉवेल इ वर पण नाव घालून घेणारी मंडळी आहेत. त्या सर्व्हिसेसना मोनोग्रॅमिंग म्हणतात. ज्याची त्याची हौस असते. हौसेला लॉजिक असेलच असे नाही.

'कामवाली बाई/बुवा' आणता येत असेल तर ते बघा, ती मिळत नाही बहुतेक ठिकाणी (आफ्रिकेत मिळतात), बाकी आपले आवडते कपडे बॅगेत टाका आणि निघा....
. पुस्तके , व्हिडियो, गाणि वगैरे सगळे इंटरनेट वर असते.
. वाण सामान विकायला गावोगावी गुजराती / मारवाड्यांची दुकाने आहेत.
. तवे , भांडी, कप बश्या, कुकर, मिक्सर सगळे उपलब्ध आहे.
. काही किलो बरोबर आणलेले तांदूळ, डाळी किती दिवस पुरणार आहे?
लागत असतील तर काही औषधे आणि परदेशात रहताना लागणारा Civic Sense घेऊन यावा... तो दिसत नाही फारसा लोकांकडे. Happy

मी मराठी पुस्तकं आणायचे. अर्थात आता आॅनलाईन देखील मिळतात. आमचं इं.ग्रो. फार जुनं सामान ठेवतो शिवाय मसाले हळद वगैरे भारतात बनवताना आमचा विचार करून बनवतात म्हणून ते तिथुन आणतो शिवाय मुलांना आवडणार्या आणि आठ पंधरा दिवस टिकणार्या मिठाया थोडे फ्रेशर स्नॅक आयटम्स येतात. आमच्याकडे फार कमी महिन्याचा उन्हाळा त्यामुळे मी शक्यतो कपडे आणत नाही. अगदीच गिफ्ट्स वगैरे असतील तेच येतात. थोडी अॅसिडिटी इ.ची आयुर्वेदिक औषधेदेखील आणायचो.

कुठे चालला आहात त्यावर अवलंबून आहे. >> हेच डोक्यात आले. हा प्रश्न थोडा "मी कार कोणती घेउ?" सारखा वाटला Happy आणखी संदर्भ दिल्याशिवाय फारच जुजबी माहिती मिळेल.

अमेरिकेत चालला असाल तर किमान दहा ठिकाणे अशी आहेत की जेथे काहीही अडणार नाही, जे न्याल ते बोनस.

कोहंसोहं ह्यांच्या अख्ख्या पोस्ट्शी सहमत. अमेरिकेत आणि त्यातही न्यूजर्सीत येत असाल तर काहीही आणायची गरज नाही. इकडे झाडून सगळं मिळतं. आता आईच्या हातची थालिपीठाची भाजणी, गोडा मसाला वगैरे नाही मिळायचा तेव्हा असे काही ठेवणीतले पदार्थ नक्कीच आणतात लोकं.

<<< काहीही आणायची गरज नाही. >>>
एक राहिलं. एक राहिलं.
आम्ही (आदरार्थी, पण रोख दुसरीकडेच) सोन्याचे दागिने आणतो. भारतासारखी व्हरायटी कुठेच मिळत नाही (म्हणे). Happy

'कामवाली बाई/बुवा' आणता येत असेल तर ते बघा, ती मिळत नाही बहुतेक ठिकाणी (आफ्रिकेत मिळतात), बाकी आपले आवडते कपडे बॅगेत टाका आणि निघा.... >> मी घाई गडबडीत, कामवली बाई/बुवा बॅगेत टाका आणी निघा वाचले. परत परदेसाईंची पोस्ट होती तर उभ्या उभ्या नवा बिझनेस कि काय Lol

आजकाल लोक बुटीकवाले कपडे आणून इथे विकताना पाहिले आहे.

ती मिळत नाही बहुतेक ठिकाणी >> अनेक जागी विशेषतः मोठ्या शहरात "टास्क रॅबिट" मिळतात. पैसे मोजले की कामं होतात.
भारतात अनेकवेळा मदतनीसांना घरचे लोक असल्याप्रमाणे वागवले जाते उदा: भांडीवाल्या मावशीला जाता जाता तेवढं दळण टाक असं बिनदिक्कत सांगतात. तसच कधीमधी तिच्या मुलांना शाळेसाठी जूनमध्ये उसने/आगाऊ पैसे/ भेट ही दिल्या जातात. असे संबंध परदेशात पटकन जुळत नाहीत.

मीरा, तुम्हाला माहिती द्यायला आवडेल. पण प्रत्येक देशाचे वेगळे नियम असतात. त्याची माहिती असणे आवश्यक. देश ठरवताना चाॅईस असेल तर आधी तुमचा पेट नेण्यास परवानगी आहे ते आणि असेल तर कितपत किचकट आहे ते बघा.

परदेशात परत जाताना किंवा आताही कधी जाताना मी नेहमी दोन गोष्टी नेतो. एक म्हणजे सिल्कचे टाय , पेंटिंग्ज वा स्कार्फ आणि काजू कतली. कुणालाही भेट द्यायला एकदम क्लास. सगळ्यांना आवडतेच.
मी आता मला अशा सवयी लावल्या आहेत की काहीही चालते. त्यामुळे स्वतःसाठी काहीही नेत नाही. ब्राझीलला एकदा 5 किलो तूर डाळ कस्टमने काढून घेतल्यापासून कानाला खडा. Happy

माझी भारतातुन परत सिंगापुर la जातानाची लिस्ट. हसु नका लोकहो पण 20 वर्ष भारताबाहेर राहिल्यानंतर देखील बऱ्याच गोष्टीत जीव अडकतो आहे ;
ग्रोसरी
आंबोळी / भाजणी / नाचणी / तांदूळ / भाकरी पीठे
चटण्या / मेतकुट / आंबापोळी फणस पोळी
कोकम सरबत, आगळ,आमसुलं
गोडा / मालवणी / सावजी मसाला
थोडाफार खाऊ (तिखट / गोड)
भारतीय उत्तम कॉटन सिल्क चे कपडे
प्रेस्टिज प्रेशर पॅन
ह्यातील बऱ्याच गोष्टी तिथे मिळतात पण वेका म्हणाली तसं बरेचदा माल जुना असतो. भारतीय कपडे मात्र भारतातच उत्तम आणि वाजवी किंमतीत मिळतात

मी फॅब इंडिया चे साबण आणते नेहमी. तिथले दुपट्टे/ स्कार्फ पण इथे कोणाला भेट द्यायला छान असतात. ज्यूटच्या छोट्या बॅग, पैठणी किंवा रेशमी कापडाच्या छोट्या पर्सेस, चंदनी वस्तू, चंदनाचे खोड, ऑस्टर मिक्सरला फिट होणारे छोटे जार, रक्त चंदन, अष्टगंध , उटणे, सुगंधी वाती, उदबत्त्या, ज्येनांसाठी पॅरॅसिटँमॉल, बर्नॉल, बेट्नोव्हेट , आयोडेक्स इत्यादी हे सर्व पण लागेल तसे आणत असते.
वेगवेगळ्या प्रांतीय पाककृतींची पुस्तके, इथल्या मित्र मैत्रिणींना द्यायला म्हणून मिसळवण्याचा डबा, फोडणीची पळी, रवी, वगैरे पण कधी कधी आणलं आहे

शेवया, सांडगे पापड, तिखट, मेतकुट, लोणची हे सगळे पदार्थ घरी बनवलेले असतात म्हणुन आणते. उद्या जर हे पदार्थ आई/साबा/मामी/आत्या/काकु लोकांनी करायचे बंद केले तर इथेच विकत घेईन.
साड्या वगैरे आणते. पण आजकाल इथे पण साड्या सुरेख मिळतात. त्यामुळ इथून पण बर्‍याचदा घेते.
बाकी लाडु,बर्फी वगैरे घरची बनवलेली असते ते घेवून येते.
ऑफिस मध्ये द्यायला ,कोल्हापुरहून चांदीचे दागीने उत्तम मिळतात. बारीक मॉडर्न कानातले वगैरे घेवून येते. अत्यंत आवडतात. बाया दुसर्‍या दिवशी घालून मिरवत येतात आणि पाच वर्ष झाली तरी अजुनही घालतात त्या अर्थी मनापासून आवडले अस्सावे.

आभा, मला पण भारतातले कॉटन किंगचे कपडे आवडतात, शिवाय पंचे.
भारतीय पदार्थांच्या चवी साफ विसरलो आहे - इथे जे मिळते तेव्हढेच फार क्वचित खातो. चवीढवीचा सेन्सच नाही.
शेवटी बसलेला घसा, ताप, उन्हाचा त्रास घेऊन येतो.
जेट लॅग वगैरे थेरं करायला वेळ नसतो.

<<'कामवाली बाई/बुवा' आणता येत असेल तर ते बघा, >>
सावधान! सहा महिन्याने तिने आठ्च तास काम, मिनिमन वेज नि हेल्थ इन्शुरन्स मागितला तर, शिवाय वि डोन्ट डू विंडोज सारखे लफडे काढले तर! आपली कामे आपण करावी! हे खरे स्वावलंबन, स्वातंत्र्य!
भारतातले स्वातंत्र्य म्हणजे एकहि काम स्वतः करायचे नाही, घास भरवायला नोकर, लग्न करून आल्यावर बायकोला मुले हवी असतील तर तिने नोकर ठेवावे. आम्ही ऐटीत बसून, जगाला शहाणपणा शिकवणार नि गोर्‍या लोकांचे बूट चाटणार नि आपल्या लोकांवर हडेलहप्पी करणार!

Pages