नजर..

Submitted by मन्या ऽ on 25 June, 2019 - 07:03

नजर..

बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ

तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी

उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.

पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!

(दिप्ती भगत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्या
कोण बरोबर कोण चूक हे मला तुमच्याशी डिस्कस करायची आवश्यकता नाही. प्रशासक तुमच्या आदेशानुसार धावतपळत येत असताना माझ्याशी चर्चा करणे हे योग्यही नाही.

तुम्ही मला विपूत येऊन जे सांगितले की धागा न वाचताच प्रतिसाद दिला हे तिथेच त्याच वेळी सांगितले असते तर पुढचे काही घडले नसते असे मला तरी वाटते. तुम्हाला धागा पुन्हा पुन्हा वाचण्याची दोन तीनदा संधी मिळाली. पण तुम्ही चुकीचे प्रतिसाद देणे चालू ठेवावेत याचे नवल वाटते. तुमच्या धाग्यावर गोंधळ सुरू झाल्यानंतर तुम्ही कधीच्या कधी माफी मागितली, ते ही इथे गोंधळ घालू नका अशी ताकीद देऊन. तसेच तुमचा मित्रपरिवार देखील चुकीची बाजू (तुम्हीच म्हणत आहात की चूक झाली ) घेऊन किल्ला लढवत असताना कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण धागा वाचलेला नसताना प्रतिसाद दिले हे ठाऊक असताना तुम्ही तक्रार देखील केली हे थोरच आहे माझ्या मते. हे सगळं चुकूनच झालेलं असावं..

तुम्हाला जसा राडा नको आहे तसेच इतरांनाही वाटत असावे हे माझे वैयक्तिक मत. तुम्हाला तसेच वाटावे असा आग्रह नाही. इतरांच्या धाग्यावर तुम्ही आणि परिवार मिळून गोंधळ घातला तर क्षम्य आहे पण तुमच्या धाग्यावर तो नको असे वाटणे हा तुमचा हक्क आहे. त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.

तुम्ही माझ्या विपूत न आल्यास उपकार होतील. आभार.

मन्या कोणत्या कोतबो मधे गोंधळ घातलेला मला दिसला नाही ? आणि कोणते राजकीय धागे ?
तुमच्या लिखाणात ना कोतबो आहे , ना राजकीय आहे.

इतरांच्या धाग्यावर तुम्ही आणि परिवार मिळून गोंधळ घातला तर क्षम्य आहे पण तुमच्या धाग्यावर तो नको असे वाटणे हा तुमचा हक्क आहे. त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.

तुम्ही माझ्या विपूत न आल्यास उपकार होतील. आभार .
:- यही बात मै कहना चाहता था. आपटे जी आपने बहुत अच्छे तरिके से समझाया है. आपटे आप किरणूद्दीन का डुप्लिकेट आयडी तो नही हो?

खान ९९, आप अज्ञातवासी के ड्युप्लिकेट हो या कल्पेशकुमार के ? या किसी और के ? कृपया मुझे बता दीजीये. आपने अभी अभी जनम लिया है. हो सकता है कि आप कोई और ही हो... मै इसमे जाना नही चाहता. लेकीन एक पक्का की आप मेरे हितैषी तो नही हो .

Pages