Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तिलापण काढायला हवं खरंतर.
तिलापण काढायला हवं खरंतर. प्रचंड irritate करते.
त्या बिचुकलेला हायकोर्टात जामीन मिळाला तर आणतील परत त्याला, अतिशय चुकीचं होणार आहे हे मात्र.
बिचुकले ला आता परत आणू नये
बिचुकले ला आता परत आणू नये त्या एवजी आणी एक्स्ट्रा वाइल्ड कार्ड आणले तरिही चालेल. अजुन 1महिना च झालाय आणी तो सोफा किती रिकामा वाटतो सगळे बसल्यावर.
काल ते इमर्जन्सी अॅलर्ट
काल ते इमर्जन्सी अॅलर्ट टास्क बोरिंग होते. इतकं काय घाबरल्या बाया?! वीणा तर टिपिकल लाडाची लेक वाटत होती सगळे आप्ले तिला मिठीत घेतायत उगी उगी करून.
ते मार्क देणे हा प्रकार तर फालतू टास्क, क्रिएटिव टीम ची दिवाळखोरी! तरीही किशोरी ग्रुप ने ८,९ वगैरे मार्क द्यायचे कशासाठी? अर्थात काहीही केले तरी दुसर्यांदा खेळणारी टीमच जिंकणार होती.
बिबॉ चाप्टर आहेत. ते मुद्दाम एखाद्या ग्रुप ची निगेटिव साइड दाखवतात असे दिसते. नेहा, वैशाली कधीही काही पॉजिटिव करताना दाखवत नाहीत. बाप्पा, अभिजीत वगैरे वैशालीबद्दल इतके चांगले बोलतात ते ती कधी दाखवते असेच वाटते. नेहा पण सतत भांडताना, खुन्नास ने बघताना मुद्दाम कॅमेरा अँगल मारतात.
बिबॉ चाप्टर आहेत. ते मुद्दाम
बिबॉ चाप्टर आहेत. ते मुद्दाम एखाद्या ग्रुप ची निगेटिव साइड दाखवतात असे दिसते. नेहा, वैशाली कधीही काही पॉजिटिव करताना दाखवत नाहीत. बाप्पा, अभिजीत वगैरे वैशालीबद्दल इतके चांगले बोलतात ते ती कधी दाखवते असेच वाटते. नेहा पण सतत भांडताना, खुन्नास ने बघताना मुद्दाम कॅमेरा अँगल मारतात. >>>>
बिंगो. जो हम देखते हैं, जरुरी नहीं कि वो वैसाही हो.
शेवटी आपण चोवीस तासांत घडणाऱ्या 'एडिटेड' घटना बघत असतो. नक्की काय,कुठे आणि कसे एडिट केले गेले आहे ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे, त्या एक तासावरुन एखादी व्यक्ती 'चांगली' किंवा 'वाईट' आहे हे ठरवणे चुकीचे नाही का?
(मैत्रेयी, तुमची पोस्ट रेफरन्ससाठी घेतली असली तरी नंतर लिहीलेले तुम्हांला उद्देशून नाही. )
वीणा तर टिपिकल लाडाची लेक
वीणा तर टिपिकल लाडाची लेक वाटत होती सगळे आप्ले तिला मिठीत घेतायत उगी उगी करून. >>> हो ना डोक्यात गेलं ते फार.
एकंदरीत हा सिझन गळपटायला
एकंदरीत हा सिझन गळपटायला लागला आहे, महिना नाही झाला तोच.
किशोरी, रूपालीला इतक्या लवकर काढताच येणार नाही बिबॉसला ,त्यांना काढल तर वीणा ,शिव एकत्र येतील,आणि वैशाली ,केळर पण जॉईन होतील त्यांना,मग भांडण फार लावता येणार नाहीत ना,माधव फार भांडत नाही,आणि नेहा लगेच काही यांच्याशी भांडणार नाही,मग बिबॉस भांडण कोणामध्ये करणार
इन जनरल bb बोअरचं. हिंदी
इन जनरल bb बोअरचं. हिंदी मराठीत तेच तेच टास्क्स.
त्यात कोण चतुर आहे हे समजायचा task नाही. विपरीत परिस्थितीत कोण मार्ग काढू शकतो हे समजणे आवश्यक आहे जसं ते उशा task वेळी समजलं. स्मिताने दोरा मिळाला नसून उशा शिवायचा मार्ग काढला आणि नंदकिशोर यांची शिवण मस्त होती. सईची टीम ह्या दोघांना घ्यायला धडपडत होती.
इथे काय ह्याने हे मिक्स करून फेकलं मग मी ते फेकणार.
तुमचा धागा काढायचा चान्स गेला
तुमचा धागा काढायचा चान्स गेला Lol कटपां नी खुप
लवकर धागा काढला. >>>>>>>>>
भूमिकेची अदलाबदल, वीणा राधा म्हणून आलेली मागच्यावर्षी सचित बरोबर गेस्ट म्हणून. >>>>>>> हो.
हा मागच्या सीझनमधला व्हिडिओ:
https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/welcome-to-the...
एकंदरीत हा सिझन गळपटायला लागला आहे, महिना नाही झाला तोच.
किशोरी, रूपालीला इतक्या लवकर काढताच येणार नाही बिबॉसला ,त्यांना काढल तर वीणा ,शिव एकत्र येतील,आणि वैशाली ,केळर पण जॉईन होतील त्यांना,मग भांडण फार लावता येणार नाहीत ना,माधव फार भांडत नाही,आणि नेहा लगेच काही यांच्याशी भांडणार नाही,मग बिबॉस भांडण कोणामध्ये करणार >>>>>> दोन तीन जबरदस्त वाईल्ड कार्डस आणावी लागतील तेव्हा कुठे बिबॉची गाडी ताळयावर येईल.
शिव तर दिवसेदिवस आवडू लागलाय.
सुरेखाताईंची आजची शिवी ‘थोबाडवाशीयांनो ’ >>>>>>>>> आउ आठवल्या. 'थोबडवीन'
एका बाजुला बिचुकले आणी दुसर्या बाजुला पराग escort करत तिला करत घेउन जाणार फिनालेला . पण ती आल्यावर एका आठवड्यात बिचुकले गेले आणी दुसर्या आठवड्यात पराग. आता कोण घेउन जाणार हिला >>>>>> शिव आणि माधव/ केळकर आहेत ना. पण ती फिनालेपर्यन्त तरी टिकायला हवी ना.
शिव खुर्ची टास्कमध्ये हिना त्याच्या माण्डीवर बसली हे चुकीच होत अस आता म्हणतोय तिला. हे तेव्हाच का नाही सान्गितल त्याने?
किशोरी शहाणेच्या नवर्याच्या पहिल्या लग्नाबद्दल पहिल्यान्दाच कळल. हे आधी माहित नव्हत मला.
वीणा तर टिपिकल लाडाची लेक वाटत होती सगळे आप्ले तिला मिठीत घेतायत उगी उगी करून. >>> हो ना डोक्यात गेलं ते फार. >>>>>>> हिना तिच्याबद्दल करेक्ट बोलली होती की कुठलीही अडचण आली तर विणा पटकन घाबरते. कमजोर पडते. म्हणून तिला विणा आपत्कालीन स्थितीमध्ये तिच्याबरोबर नकोय.
इथे काय ह्याने हे मिक्स करून
इथे काय ह्याने हे मिक्स करून फेकलं मग मी ते फेकणार.>>>
मला फार हसु येतं या
मला फार हसु येतं या युट्युअबरचं ‘कौन है वैशाली माडेका अगला शिकार’ , मला जुनुन मधला राहुल रॉय डोळ्यासमोर आला
https://youtu.be/6DkgWL20rW4
पण काही म्हणा पहिल्याच आठ्वाड्यात , जेंव्हा वैशाली फार दिसायचीही नाही तेंव्हाच या चॅनलनी वैशाली माडे खरी मास्टरमाइंड आहे आणि रिअल गेम ती खेळतेय असं यानेच प्रेडीक्ट केलं होतं, इतरांच्या वाईट गोष्टी एन्करेज करायच्या , इमोशनली विक करायचं आणि त्यांना गेममम्धून बाहेर करायचं असं काहीसं या चॅनलनी म्हंटलं होतं.
Sai wild card entry म्हणून
Sai wild card entry म्हणून आली आहे
बिबॉ कैच्याकै दाखवत आहेत.माझी
बिबॉ कैच्याकै दाखवत आहेत.माझी सख्खी मावसबहीण लग्नापूर्वी ओबेरॉयसारख्या होटेल मध्ये होती.हे अस कठेही नसत.कुठल्याही अशा स्टाफला साडीची घडी घालून दे,डान्स करा ,लावण्या करा अस नसत.
अर्थात हे ओबेरॉय नाही,बिबॉसका घर है,सबकुछ चलता है
पण तरी शमा जरा अतिच करत होती.
आजही मला स्मिताच आवडली,माझ्यासाठी तेव्हाही विनर तिच होती.
आच कधी नव्हे ते शमा नेहाला बोलली ते नाही आवडल ,तुम्ही तिथे गेस्ट म्हणून गेला आहात की बिबॉसचे प्रेक्षक म्हणून.
उलट मला पहिल्यांदा वीणाने लावणी करायला नकार दिला ते आवडल.कुठला मँनेजर गेस्टला नाचून दाखवतात
शेवटी इथेही बिबॉसच्यि क्रिएटिव्ह टीमने माती खाल्लीच.
वेगळी न्यूज ,पण तेजश्री
वेगळी न्यूज ,पण तेजश्री प्रधानच्या चाहत्यांसाठी खुशखबर,तुपारे संपून 22जुलै पासून ती आणि निवेदिता जोशीची सासु सून ,नाव इसरले,मालिका सुरु होत आहे.
वेगळी न्यूज ,पण तेजश्री
वेगळी न्यूज ,पण तेजश्री प्रधानच्या चाहत्यांसाठी खुशखबर,तुपारे संपून 22जुलै पासून ती आणि निवेदिता जोशीची सासु सून ,नाव इसरले,मालिका सुरु होत आहे. >> वा
सई २ दिवस आली असेल, हर्षदा
सई २ दिवस आली असेल, हर्षदा खानविलकरसारखी स्पर्धकांना आरसा दाखवायला !
सई २ दिवस आली असेल, हर्षदा
सई २ दिवस आली असेल, हर्षदा खानविलकरसारखी स्पर्धकांना आरसा दाखवायला !......बरोबर.पण मग ममां कशासाठी आहेत?
सई ह खा सारखी आलीय की श रा
सई ह खा सारखी आलीय की श रा सारखी, काय माहिती.
श रा एकदम फटकळ मूडमध्ये.
वीणा गोड गोड हसत होती अगदी, शिवला वीणा बरोबर डान्स करायचा होता तर हिनाबरोबर करायला लावला. शिव वीणा चा नंतर दाखवलाच नाही डान्स, त्यांना वेगळं करायला पाठवलं का bb ने तर तसे नको. हिना आवडत नाहीये बाहेर, जबरदस्ती शिव हिना जुळवू नका.
नेहाला जबरी सुनावलं श रा ने, bb ने सर्व पढवून पाठवलं असणार. मला आज बरेच येता जाता बघायला लागलं, हा शॉट voot वर बघेन, त्यात ती गेलेला स्टाफ उद्या येणार आहे का, मला भेटायचं आहे असं म्हणाली का, मला ऐकल्यासारखं वाटतं, हे पराग बद्दल होतं.
सगळ्यात स्मिता ग्रेसफुल आणि cute दिसत होती, तिला मात्र जमत नव्हतं तुसडेपणाने वागणं, किशोरीताईंनी बाथरूम साफ केलं, तिला वाईट वाटलं. नंतर श रा पण किशोरीताई नको, वीणाला करू दे म्हणाली, ते उद्या दाखवतील.
कर्मा हिट्स back असं श रा वीणाला म्हणाली पण मागच्यावर्षी वीणा नव्हती तुसडेपणाने वागली, सचित पण नव्हता एवढा तो ओम शिंदे वागलेला. वीणा नव्हती वागली कारण ती सामान्य घरातून आलेली, माणुसकी जपणारी राधा म्हणून आलेली.
सुरेखाताईंना मान देत नाहीत त्यावरुन पण सुनावलं.
दोन manager पैकी एक सतत बडबड करत असते आणि एक इथून तिथून उड्या मारत फिरत असते असं श रा म्हणाली तेव्हा मात्र हसू आलं पटकन.
शिवला साडीची घडी घालायला सांगितली श रा ने, मला एकीकडे हसू येत होतं, एकीकडे वाईट वाटत होतं, बिचारा. ती खूप खडूसपणा करत होती, नंतर पुष्कर. सई स्मिता नाही एवढ्या.
दोन manager पैकी एक सतत बडबड
दोन manager पैकी एक सतत बडबड करत असते आणि एक इथून तिथून उड्या मारत फिरत असते असं श रा म्हणाली तेव्हा मात्र हसू आलं पटकन. कोण आहेत मैनेजर.
एक नेहा एक वीणा
एक नेहा एक वीणा
असे टास्कस bb पढवून पाठवलेले
असे टास्कस bb पढवून पाठवलेले असतात. तुमचं काय बाहेर आवडत नाहीये हा छुपा संदेश. शिव आवडतोय म्हणून उगाच त्याला काहीतरी करायला लावलं.
हो बीबी ने सांगितल्या
हो बीबी ने सांगितल्या प्रमाणेच वागतात गेस्ट. लास्ट टाईम हा task थोड्या लेट होता . ह्या सीज़न मध्ये सगळे लवकर आहे.
कदचित ऋतूजा पण अशीच येणार असेल गेस्ट म्हणून.
https://youtu.be/BUeVHXEB8yo
https://youtu.be/BUeVHXEB8yo
पराग चा audio इंटरव्हयू... आजच्या हॉटेल टास्क मध्ये पराग was missing..its his territery
सोमी वर #bringbackparag नावाने treanding करणे चालू आहे
कर्मा हिट्स back असं श रा
कर्मा हिट्स back असं श रा वीणाला म्हणाली पण मागच्यावर्षी वीणा नव्हती तुसडेपणाने वागली, सचित पण नव्हता एवढा तो ओम शिंदे वागलेला >> मला वाटतं की वीणा ने शरा ला दोनदा पोहे करायला लावले होते..पहिल्यांदा शरा ने त्यात साखर घातली होती मग वीणा साखर नाही आवडत पोह्यात असं म्हणाली होती. सो परत बनवले होते...म्हणुन आज शरा म्हाणाली की उद्या पोहे पाहिजेत.. आणि तेच कर्मा हिट्स back च
श रा ला कशाचा माज आहे ?
श रा ला कशाचा माज आहे ? लुजर मागच्या सिझन ची ..
तिला वागायला लावलं हो तसं.
तिला वागायला लावलं हो तसं. स्वतःच्या मनाने थोडीच असेल. भूमिका आता माहिती नाही पूर्वी खडूस दाखवायचे तिला सिरीयलमध्ये.
वीणाने दोनदा पोहे करायला लावलेले का मग बरोबर श रा चं.
एकंदर प्रचंड बोअर भाग आजचा.
शर्मिष्ठापण स्वतःला दिलेला टास्कच करतेय की.
एकंदर प्रचंड बोअर भाग आजचा.
सई फॅन्स खुश होतील, मला आवडत
सई फॅन्स खुश होतील, मला आवडत नव्हती ती फार. काही टास्कस अप्रतिम केलेत मात्र तिने.
ती वैशाली सारखी लोळत असते, तिला ही जॉईन होतेय का. सई टास्क असेल आणि कॅप्टन झाली की उत्साहात एरवी आजारी किंवा लोळत पडलेली असायची, आळशी एकदम.
आता एक बघायला मजा येईल, सगळे धडपडतील, बाहेर कोण आवडतंय, काय म्हणतायेत ऐकायला तिच्याकडून. ती तेवढंच सांगणार जेवढं सांगायला bb चा आदेश असेल.
जितके दिवस असेल तितके दिवस तिने छोट्या grp ला जॉईन व्हावं, असं वाटतं.
नेहाने बैठकीची लावणी केली,
नेहाने बैठकीची लावणी केली, तेव्हा पण मला चेहेऱ्यावर नजरेत थोडा का होईना खुन्नस दिलेला दिसला, बाकी कोणाला जाणवला नसेल तर मग माझ्या नजरेत दोष असेल.
वीणाच्या टीमला स्टार्स मिळत
वीणाच्या टीमला स्टार्स मिळत होते तेव्हाही खुनशीपणेच बघत होती नेहा.
सई हर्षदासारखीच आली असावी असं मलाही वाटतंय..
पण यावर्षीचं बिग बॉस एवढं predictable झालंय already .. ते ब्रेक करायला आणलंही असेल खरंच शेवटपर्यंत राहायला..
तसंही मला वाटतं की सई मागच्या सिझननंतरही काही काम न मिळालेली एकमेव स्पर्धक आहे..
बाकी सगळेच कुठे ना कुठे दिसत असतात
कालचा भाग म्हणजे "होस्टेलमधली
कालचा भाग म्हणजे "होस्टेलमधली मुले जशी सिनिअर्सनी केलेल्या रॅगींगचा वचपा पुढक्या वर्षी नवीन येणाऱ्या ज्युनिअर्स ना छळून काढतात" तसले भाव होते या गेस्टच्या चेहऱ्यावर काल!
अरे छळताना तरी जरा कल्पकता दाखवा!
डान्स काय अन गाणी म्हणा काय?
कधी गेला होतात की नाही ५ स्टार हॉटेलात रहायला?
Pages