Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा सिझन आता कोणी आलं तरी फार
हा सिझन आता कोणीही आलं तरी फार उंची गाठेल असं वाटत नाही.
विणा सगळ्या त्यांच्या (
विणा सगळ्या त्यांच्या ( रुपाली -किशोरीच्या गोष्टी ) शिव ला सांगते आणि तो लगेच जाऊन वैशाली आणि केळकरला सांगतो.वीणाला कळत नाही का त्यांच्या गोष्टी त्याला सांगू नयेत असं. पराग पण तेच सांगत होता . तू शिव ला सांगू नको आपल्या कुठल्याच गोष्टी तरी ती ऐकत नाही . बर वैशाली आणि केळकर कसे शिवला विचारून विचारून या ग्रुप च्या गोष्टी काढून घेत आहेत अगदी सुरवाती पासून तशी वीणा " वैशाली काय बोलली -केळकर काय बोलला" हे शिवला विचारते का ? मग काय स्वतःच गेम स्वतः खेळते ?
वैशाली -केळकरांच्या गोष्टी शिव कडून हिला कळत नाहीत . फक्त रुपाली किशोरीच्या गोष्टी शिव कडून वैशाली -केळकरला कळतात. थोडक्यात शिव फक्त केळकर आणि वैशालीच्या बाजूने खेळतोय . त्यांना सपोर्ट करत खेळतोय . येडा बनून पेढा खातोय . वीणाच्या बाजूने आहे असं फक्त दाखवतो . वर वीणा त्यावेळी परागला सांगायची मला काही सांगू नकोस . मला सगळं कळत .काय कळत ? रुपाली वीणाला जे काही बोलते ते चुकीचं नाहीये . वैशाली केळकर येतात का ? त्यांच्या कडे . काही बोलायला ? मग तूच का जातेस ?
मांजरेकर मारे सांगतात टास्क च्या वेळी आम्ही ग्रुप पडतो तेव्हा तुम्ही एकमेकांविरुद्ध . इतर वेळी तुम्ही हसून खेळून मिक्स होऊन वागायचं . केळकर आणि वैशाली येतात यांच्या कडे हसून खेळून वागायला ? दरवेळी किशोरी कशाला जाते . पॅच अप करायला ? फुकटची . वैशाली आणि केळकर जाम हरामी आहेत . आता जे काही गेम मध्ये उरलेत त्यात वैशाली, केळकर , शिव आणि नेहा हे चौघे पहिल्या पाचात नक्की
शिवपण सर्व जाऊन सांगतो तिला.
शिवपण सर्व जाऊन सांगतो तिला. दोघे एकमेकांना सांगतात. परवा ममां पण म्हणाले ना शिव तू असं जाऊन सांगितलंस तिला, हे दोघे बोलत होते ते. तर ती म्हणाली मीपण ऐकलं होतं, मी झोपले नव्हतेच. दोघे एकमेकांना ए टू झेड सर्व सांगतात. त्यांना कंफर्टेबल वाटतं. हे सर्व मागच्या आठवड्यात दाखवलं दोघंही सांगतात ते.
शिवही सगळं सांगताना दाखवलाय, ते तू बघितलं नाहीस का सुजा.
पण आता जास्त दोघांनीही सांगू नये एकमेकांना इथलं तिथलं. मैत्री छान आहे, ती जपावी.
दोघांनाही त्यांच्या ग्रुपमधल्या कोणीही दुसऱ्याला बोलले तर आवडत नाही हेही दाखवलं. त्याला वीणाविरुद्ध सांगितलं तर आवडत नाही आणि वीणाला शिवविरुद्ध बोललेलं आवडत नाही.
ते दोघेही task उत्तम करतायेत आपापला. जेव्हा bb ना वाटेल वीणा शिवच्यात गुंतून task कडे लक्ष देत नाहीये तेव्हा ते बरोबर गेम खेळतील, ते वीणाचा बळी जाऊ देणार नाही. ती कितीही झालं तरी channelची आहे. तिची सिरीयल संपवून तिला आणलं गेलं आहे. सई सारखं तिचे होऊ देणार नाहीत bb.
लोकांना केमिस्ट्री आवडतेय दोघांची.
नशीब हवंच पहिले साथीला पण
नशीब हवंच पहिले साथीला पण कालच्या खोट्या elimination वरून एक गोष्ट लक्षात घ्या, मागे मेघाचे खोटं केलं होतं, परवा वीणाचं. मेघा जिंकली होती. हा आता ह्या सीझनमध्ये मात्र predict करणे अवघड आहे.
पण एकंदरीत शिव जास्त बेटर वाटतो मला तिच्यापेक्षा. पण तिचे जिंकायचे चान्सेस आहेत.
सध्यातरी नशीब नेहाच्या बाजूला वाटतं आणि bb त्यांचा उदो उदो करतायेत.
वर वीणा त्यावेळी परागला
किशोरीताई आणि केळकर बोलत होते तेव्हा सर्वांनी केळकरला आत बोलाऊन घेतलं. खरं काही गरज नव्हती, बोलू द्यायचं ना. मग तोही भडकला होता, मला ठरवूदे मी कसं वागायचं ते.
किशोरीताईतरी कशाला फार सांगायला जातात काय माहिती.
हेच तर बरेचदा शिव, वैशाली केळकरला सांगत असतो. मी तुमच्या टीममध्ये असताना taskमध्ये तुम्हाला धोका न देणार नाही पण वीणाशी बोलायचंकी नाही किंवा कसं वागायचं हे मला ठरवूद्या.
अडकून पडताना सोबत म्हणून
अडकून पडताना सोबत म्हणून वीणा रूपाली नी एकमेकांना निवडलं कारण आमचं बाँडिंग आहे, आम्हांला एकमेकांच्या मनातलं न सांगता कळतं.
काही वेळ आधी दोघीही आपलं कम्युनिकेशन होत नाही यावरून भांडत होत्या. किशोरीला कोणीच निवडलं नाही.
लहान ग्रुपमध्ये भांडण होतंय म्हणता म्हणता मोठ्या ग्रुपमध्येच झालं. गंमत - मांजरेकरांनी नेहा आणि अ.के.ला बोलवून सांगितलेलं की किशोरी तुमच्यात फूट पाडणार - तसंच झालं. या ग्रुपमध्ये आपण लीडर व्हावं असं सम जणारे किमान तिघे आहेत आणि नेहा दुसर्या कोणाला लीडर म्हणून स्वीकारणार नाही.
किशोरीला सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणायला हवंय, रादर आपल्याबद्दल वाईट बोलायला नको. कोणी तसं केलं की लगेच तसं काही नाही हे पटवायला जाते
गंमत - मांजरेकरांनी नेहा आणि
गंमत - मांजरेकरांनी नेहा आणि अ.के.ला बोलवून सांगितलेलं की किशोरी तुमच्यात फूट पाडणार - तसंच झालं. >>> scripted
अडकून पडताना सोबत म्हणून वीणा रूपाली नी एकमेकांना निवडलं कारण आमचं बाँडिंग आहे, आम्हांला एकमेकांच्या मनातलं न सांगता कळतं.
काही वेळ आधी दोघीही आपलं कम्युनिकेशन होत नाही यावरून भांडत होत्या. >>> लय भारी, मस्त निरीक्षण.
Shiv's black sparrow on Voot
Shiv's black sparrow on Voot https://voot.app.link/WKZkcv2SZX हा video नक्की बघा... खूप comedy आहे.>>>>>> नाही दिसत कुठला particular video, voot च उघडलं जातय>>>धनुडी, voot वर unseen मध्ये Shiv mediates, hilarity enuses असं heading असलेला video बघा.. खरच तुफान hilarious आहे
कालचा भागाच्या स्क्रिप्ट मधे
कालच्या भागाच्या स्क्रिप्ट मधे बहुतेक असं लिहून आलं होतं की आता ३ वि.७ असे पडलेले २ ग्रुप्स तोडायचे आहेत, तेव्हा आज फक्त भांडा ! मग KVR बाया आपापसात भांडल्या, हिना शिवशी भांडली, केळ्या नेहाशी भांडला ! आता यातून बिबॉ सांगतील तसे नवे ग्रुप्स तयार झाले तर त्यात काही नवल नसावं !
कालचा दिवस मात्र शिवचा होता. हिना ने बळंच काहीतरी खुसपट काढून भांडायला सुरुवात केली होती, तिला व्यवस्थित उत्तर दिलं. परत हम तुम एक कमरे में बंद हो टास्क मधे हुशारीने सुरेखा पुणेकर आणि हिना चं नाव घेतलं. जेव्हा हिना ने वाद घातला तेव्हा जुनं सगळं दाखवून तिला परत गप्प केलं ! नंतर त्या प्रगतीपुस्तक टास्क मधे टीम ए ने माती खाऊन गुणांची उधळण केली तेव्हाच समजलं होतं की टीम बी किरकोळ गुण देऊन बोळवण करणार.. त्या वर शिवने प्रामाणिकपणा ह्या मुद्द्यावरुन टीम बी ची केलेली कोंडी लाजवाब होती. सगळ्यांची तोंडं बंद केली त्याने.
आता परत हॉटेल टास्क असणार आहे, त्यासाठी सई- पुष्कर-स्मिता येणार आजच्या भागात. मागच्या वेळी ओम शिंदेनी मस्त शाळा घेतली होती सगळ्यांची. त्यालाच परत आणला तरी चाललं असतं.
हेच तर बरेचदा शिव, वैशाली
हेच तर बरेचदा शिव, वैशाली केळकरला सांगत असतो. मी तुमच्या टीममध्ये असताना taskमध्ये तुम्हाला धोका न देणार नाही पण वीणाशी बोलायचंकी नाही किंवा कसं वागायचं हे मला ठरवूद्या.> पण वीणाशी बोलू नको याकरता ते जास्त आडकाठी पण करत नाहीत . कारण तिच्याशी बोलल्यानंतरच त्या दोंघांना त्याच्या कडच्या बातम्या कळत असतात. . पण वीणा त्यांच्या बद्दल शिवला काहीच विचारत नसल्याने तिला त्यांच्याकडच्या बातम्याच समजत नाहीत त्यामुळे फायदा पण होत नाही किंवा करून घेता येत नाही
अडकून पडताना सोबत म्हणून वीणा रूपाली नी एकमेकांना निवडलं कारण आमचं बाँडिंग आहे, आम्हांला एकमेकांच्या मनातलं न सांगता कळतं.काही वेळ आधी दोघीही आपलं कम्युनिकेशन होत नाही यावरून भांडत होत्या. >> माझ्या मते वीणाच माहिती नाही पण रुपालीला वीणाशिवाय करमत नाही . तिला वीणा हवीच असते म्हणून ती कितीही तिच्यावर चिडली -भांडली तरी तिला तीच पाहिजे . तिच्यावर चिडणं भांडण पण " तू आमच्यात काही ठरवायचं असेल तर येतच नाहीस " यावरूनच होत .
प्रगतीपुस्तक टास्क मधे टीम ए ने माती खाऊन गुणांची उधळण केली तेव्हाच समजलं होतं की टीम बी किरकोळ गुण देऊन बोळवण करणार >> टीम बी ला सगळ्यात आधी गुण द्यायला सांगायला हवं होत . त्यांनी कमीत कमी दिले असते तर टीम ए ने पण तसंच केलं असत.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/groups/1045250475509232/permalink/2577687605598...>>>>>>funny tiktok video
आजच्या भागात पुष्कर,स्मिता,सई
आजच्या भागात पुष्कर,स्मिता,सई येणार आहेत,पण खर सांगायच तर आता त्यांनाही बघण्यात फारसा इंटरेस्ट राहिलेला नाही.
ऋतुजाच येण अफवा असावी.
मला वाटत बिचुकलेच येतील परत.
कालचे कसले फालतु टास्क दिले होते,कसली विक झाली आहे बिबॉसची क्रिएटिव्ह टीम.
ती भांडण पण आता पाहवत नाहीत,ऐकवत नाहीत.
100दिवसांच्या ऐवजी 80 दिवसाऔच करण्याच बिबॉसला का सुचत नाही?
काल कोंडून ठेवायच्या
काल कोंडून ठेवायच्या टास्कमध्ये भ़ाडणं लावण्याचा हेतू होता.
कोण नको त्याबाबत. हीना, नेहा आणि सुरेखा यांनीच भांडणं केली.
मग गुणपत्रिकेतही. पण लोक भांडून थकलेले दिसतात.
शिव बाकी महेश मांजरेकरांचे शब्द त्यांना गिळायला लावणार.
वळू त्याला म्हटलं तर त्याच्यापेक्षा डेंजर मारक्या म्हशी आल्या.
तुला काही कळत नाही म्हहटलं तर तोच सगळ्यात जास्त सेन्सिबल बोलतोय.म्हणजे तो आधघ निरागस असण्याचा अभिनय करीत होता किंंवा त्याला सेट व्हायला वेळ लागला. मला दुसरं वाटतंय. शिवाय मोठ्या लोकांसमोर तो जास्त बोलत नाही, असं दिसतंय.
हीना फूटेजसाठी शिवला लक्ष्य करतेय. कारण आता बिचुकले नाहीत.
अ के आणि माधव अभिनेते असूनही फिटनेसवर लक्ष नाही. अ केची डबल चिन दिसतेय. पाण्यात माधवचं पोट दिसत होतं आणि त्याला चालवतही नव्हतं.
या सगळ्या मुली पंधराव्या वर्षषापासून कशी काय घची जबाबदारी उचलू लागल्या? शिवानी, रूपाली आणि बहुतेक हीनाही. शिवानी फेकत होती ते दिसलंच.
खरच काय फालतु बिचिंग आणि
खरच काय फालतु बिचिंग आणि टास्क्स !
शिव -वीणा निर्विवादपणे हिरो होत चालले आहेत आणि इतर सगळेच जेलस , निगेटिव दिसतायेत.
आपत्कालीन परिस्थितीत कोणाबरोबर रहायला आवडेल आणि आवडणार नाही उत्तरामुळे नेहा सारख्या सुडो फेमिनिस्ट एक्स्पोझ झाल्या आणि शिव सारखा माणुस हिरो बनला !
सुरेखाताई नकोत कारण त्या विक आहेत/कोलमडतील हे नेहाचं उत्तर आणि शिवचं उत्तर ‘सुरेखाताई’ बरोबर असलेल्या आवडतील, कारण त्यांना माझा आधार वाटतो’ ,त्यांना आधार देईन, उत्तरानी जिंकून घेतलं प्रेक्षकांना, देऊन टाका ट्रॉफी या उत्तरावर शिवला
एकाही सो कॉल्ड ‘मी स्ट्राँग आहे‘ म्हणणार्या बाईला हे उत्तर देता आलं नाही कि मी स्ट्राँग आहे, मला आधाराची गरज नाही पण दुसर्यांना आधार द्यायला आवडेल
शिवने शेवटी जे लॉयल्टीवरून झाडलं केळ्या अँड कंपनीला , ते पण टाळ्या घेणारं उत्तर होतं.
मॅडी सुध्दा माणूस म्हणून प्रामाणिक वाटतो, नेहा मैत्रीण असून तिला सुध्दा झापलं आणि वीणा आवडत नसून तिच्या टास्कला दाद दिली.
सुरेखाताईंची आजची शिवी ‘थोबाडवाशीयांनो ’
नेहाच कोणाशीच पटत नाही . तिला
नेहाच कोणाशीच पटत नाही . तिला असं वाटत ती ज्या काय स्ट्रॅटेजीज आखते त्या बरोबर असतात. आणि बरोबरच आहे ते . त्या फेल्युअर पण जात नाहीयेत .त्यामुळे परागला जरी ती म्हणत असली "तुझ्या माणसात तू जा . तरी ती स्वतः पण कम्फर्टेबल स्वतःच्या माणसांमध्येच असते .
सगळ्यात जास्त महा धूर्त लबाड आणि हरामी ती वैशाली . लबाड कोल्हा . बेडवर पडल्या पडल्या शिव कडून समोरच्या गोटातल्या सगळ्या बातम्या काढून घ्यायच्या गोड गोड बोलून त्याला पढवायचं आणि फायदा करून घ्यायचा . कितीही आवडत नसेल तरी विनर व्हायचे खूप जास्त पोटेन्शियल तिच्याकडेच आहेत .
बाकी तो मार्क्स द्ययाचा टास्क
बाकी तो मार्क्स द्ययाचा टास्क काय फालतु होता, ऑबव्हियस्ली दुसरी टिम कमीच मार्क्स देणार आधीच्यांपेक्षा ! निदान सिक्र्र्ट्ली तरी द्यायला सांगायचे मार्क्स !
तो भांडणं लावण्यासाठीच होता.
तो भांडणं लावण्यासाठीच होता. दिलेल्या मार्कांवर वाद घाला असंहघ सांगितलेलं.
टीम ए गांधीगिरी करत होती.
केळ्या आणि वैशाली लैच पोचलेले
केळ्या आणि वैशाली लैच पोचलेले आहेत..... काल तो आप्तकालीन परिस्थितीचा ड्रामा चालला होता तेंव्हा पण ते एकमेकांत हसत होते.... परवा पण वीणा जाणार नाही हे त्यांना पक्के माहित होते..... खुपच अभ्यास करुन आलेत!
मला सुरुवातीच्या दोन आठवड्यात हे दोघे मिसफीट वाटलेले या शो साठी पण हे तर पक्के खिलाडी निघाले
काल त्या बंद रुमच्या टास्कमध्ये "डिप्लोमॅटीक उत्तरे देवू नका" या सूचनेमुळे अनेक जणांची उत्तरे बदलली असावीत
नेहा ने हीना चे नाव घ्यायला पाहिजे होते असे वाटले कारण माधवला नेहाच्या सपोर्टची किम्मत नाहीये असे दिसतेय.... खरतर नेहा मुळे तो कॅप्टन बनलाय पण मग नंतरच्या भांडणात तो तिच्यावर जोरजोरात ओरडताना दिसला..... नेहा ने आता सुट्टी द्यावी त्याला! (पण तिला दुसरा भक्कम सपोर्ट मिळेपर्यंत ती जमवून घेईल त्याच्याशी)
रुपाली ने किशोरीचे नाव न घेतल्याने नक्कीच ती दुखावली असणार
हीनानेही आता शिव च्या जास्त मागे मागे न करता आपला गेम खेळावा
बाकी ते दुसरे गुण देण्याचे टास्क दुसरी खेळणारी टीमच जिंकणार..... ते आयसोलेशन मध्येच घ्यायला पाहिजेल होते टास्क.... तरच त्यात मजा होती
त्या टास्क मध्ये नेहा आणि टीमने कारण नसताना खत्रूडपणा केला..... शिव म्हणाला तसे दोन चार गुणांचा डिफरन्स ठेवूनही जिंकता आले असते की!
आता तेच परत एकदा हॉटेलचे बोरींग टास्क
त्यातल्या त्यात ही जुनीजाणती मंडळी यावेळच्या स्पर्धकांना काही टीप्स देतायत का हीच काय ती उत्सुकता!
शीव वीणा ने संगितले ली
शीव वीणा ने संगितले ली प्रत्येक गोष्ट केळकर ला जाऊन सांगातो ते त्याने बंद केले पहिजे. काल चा मार्क देण्याचा गेम काहीतरीच होता . जास्त advantage हे टीम b लाच होते. वैशाली आणी केळकरला वीणा आपल्या ग्रुप मध्ये हवी आहे . तो शिवला बोलत होता ना वैशाली तू वीणा मी चौघांचा ग्रुप करुया. नेहा आणी केळकर चे सुरवाती पासूनच पटत नाही पण नाईलाज म्हणून एका ग्रुप मध्ये आहेत. रुपाली आणी विणा ने एकमेकिला खुश करण्यासाठी एकमेकांची नावे घेतली .
काल त्या बंद रुमच्या टास्कमध्ये "डिप्लोमॅटीक उत्तरे देवू नका" या सूचनेमुळे अनेक जणांची उत्तरे बदलली असावीत >> शिवने सुरेखा ताईं बरोबर रहायला आवडेल हे उत्तर मला तरी डिप्लोमॅटीक वाटले.
वीणाने केळकर ला नॉमिनेट केलं
वीणाने केळकर ला नॉमिनेट केलं आहे हे त्याला कळलं तर
वीणापण कच्ची खेळाडू वाटत नाही हा. माधव तिचे जबरदस्त कौतुक करत होता task बद्दल, खरंच आहे ते. मी लिहिलं होतं तसं, ती हारून जिंकली. परत माधव जवळ हारही कबूल केली, त्यामुळे तो तिला प्रामाणिक म्हणाला. तिचे आणि माधवचं पटत नाही पण एकमेकांचा रिस्पेक्ट करतात. नेहाने पण कबुल केलं की मी हिला खूप त्रास दिला. का कुणास ठाऊक पण माधव मला त्या चौघांत बरा वाटतो.
वीणाने शिवला जे सांगितलं दोघींबद्दल ते शिवने केळकरला सांगायला नको होतं मात्र. हे सर्व माझं काल मिस्ड. मी नंतर voot वर बघितलं.
वीणाने किशोरी आणि रुपालीला पण थोडा वेळ द्यावा मात्र. त्या grp मध्ये राहिली तरच तिची हुशारी उठून दिसेल. बाकी ठिकाणी तिच्यापेक्षा अतिशहाणे आहेत त्यामुळे झाकोळून जाईल ती.
बाकी शिव तर दिवसेंदिवस rocking.
वीणाने noamination ची बातमी
वीणाने nomination ची बातमी कुठून आणली काय माहिती परवा फक्त शिव तिच्यासमोर बोलला की मी सुरेखाताईना केलं मग केळकर सांगत होता हे तू वीणासमोर उगाच बोललास, असं करू नकोस परत.
त्या गिल्टमधेच शिव म्हणाला असणार, कि मला सुरेखाताईबरोबर राहायला आवडेल. बाकी लोकांना खरं उत्तर दिलेलं राग येईल किंवा वाईट वाटेल म्हणून शिव वीणाने एकमेकांचे नाव नाही घेतलं पण त्यांना एकमेकांबरोबर राहायला आवडेल सांगायला आवडलं असतं.
शिव लाडका आहे सुरेखाताईंचा आणि वीणा डोळ्यात खुपते पण त्या गेल्या यावेळी तर त्यांना कळेल कि शिवने आपल्याला nominate केलं, वीणाने नाही तर shock बसेल पण शिव योग्य होता. त्यांनी संचालक म्हणून चांगलं काम केलं नाहीच.
खरतर नेहा मुळे तो कॅप्टन
खरतर नेहा मुळे तो कॅप्टन बनलाय पण मग नंतरच्या भांडणात तो तिच्यावर जोरजोरात ओरडताना दिसला. >>> सगळेच चिडलेले नेहावर तर नेहाने पण विचार करावा ना. सतत dominate करू नये. मी बाई कित्ती हुशार, मलाच कळते सर्व हा attitude सोडावा.
ती हे वीणासाठी म्हणाली होती पण आता सो मि वर हे तिलाच बोलतायेत लोकं की मी बाई कित्ती हुशार.
माधव स्वतःचा गेम नीट खेळला तर
माधव स्वतःचा गेम नीट खेळला तर त्याला पुढे जायचे चान्सेस आहेत कारण त्यालाही channel आणि म मां चा सपोर्ट आहे. त्याला आडून आडून म मां सुचवतायेत आणि त्याचं कौतुक करत असतात.
वैशाली आणी केळकरला वीणा
वैशाली आणी केळकरला वीणा आपल्या ग्रुप मध्ये हवी आहे . तो शिवला बोलत होता ना वैशाली तू वीणा मी चौघांचा ग्रुप करुया. नेहा आणी केळकर चे सुरवाती पासूनच पटत नाही पण नाईलाज म्हणून एका ग्रुप मध्ये आहेत. >>> voot अनसीन अनकट मध्ये बघितलं. वैशाली, केळकर, शिव, रुपाली, किशोरी, वीणा मस्त गप्पा मारत होते.
वैशालीला यावेळी कमी मार्क्स असले तरी घालवणार सुरेखाताईन्नाचं. वैशालीसारखी dangerous लोकं हवीच असतात bb ना.
ती हे वीणासाठी म्हणाली होती
ती हे वीणासाठी म्हणाली होती पण आता सो मि वर हे तिलाच बोलतायेत लोकं की मी बाई कित्ती हुशार.>>>>> किती गं बाई मी हुश्शार
ते लाईट वगैरे गेले होते
ते लाईट वगैरे गेले होते तेंव्हा वैशाली इतकी का पळत सुटलली
बरोबर धनुडी , कित्ती ग बाई मी
बरोबर धनुडी , कित्ती ग बाई मी हुशार.
माधव स्लो अँड स्टेडी पुढे
माधव स्लो अँड स्टेडी पुढे चाललाय .
माधव स्लो अँड स्टेडी पुढे
माधव स्लो अँड स्टेडी पुढे चाललाय . >>> जाणार तो बहुतेक. स्मिताला कसं confused म्हणत होते तसे त्याला म्हणतात. स्मिता कशी सुमडीत पुढे गेली, दिग्गज मागे राहिले. इथे तसं होण्याची शक्यता आहे. नेहा नाही मागे राहायची, पण केळकर वैशाली राहू शकतात मागे.
असेच आठवले हीना entry च्या
असेच आठवले हीना entry च्या वेळी बोलली होती. एका बाजुला बिचुकले आणी दुसर्या बाजुला पराग escort करत तिला करत घेउन जाणार फिनालेला . पण ती आल्यावर एका आठवड्यात बिचुकले गेले आणी दुसर्या आठवड्यात पराग. आता कोण घेउन जाणार हिला .
Pages