बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कालचा भाग म्हणजे "होस्टेलमधली मुले जशी सिनिअर्सनी केलेल्या रॅगींगचा वचपा पुढक्या वर्षी नवीन येणाऱ्या ज्युनिअर्स ना छळून काढतात" तसले भाव होते या गेस्टच्या चेहऱ्यावर काल! +१ अगदीच हेच आलं डोक्यात !
कालचा भाग एकंदरीत बोरींग...
बाकी कोणी-कोणी वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून यायला तयार झालं नाही, त्यामुळे कदाचित सईला आणलेलं दिसतंय Wink तिला KVR ग्रुप मधे टाकतील, कारण या तिघींचं प्लॅनिंग वगैरे म्हणजे आनंदच आहे सगळा. एकटा शीव किती सांभाळणार..
सईला खोटं खोटं चिडल्याची अ‍ॅक्टिंग करायला जमत नाही, हे सीजन १ मधे दिसलं होतं, कालही जाणवलं. नेलपॉलीश लावून घेताना चिडल्यासारखं करत होती, पण स्मितहास्य केल्यासारखंच वाटत होतं.
तेवढ्यात किशोरी ने बाथरुम साफ केल्याबद्दल आणि मायकल जॅक्सन डान्स बसवून दिल्याबद्दल दोन स्टार्स कमावले.
वैशाली जाम शातीर दिमाग आहे आणि तितकीच लकी देखील. कालही सगळ्यांचं रॅगिंग होत असताना ही एकटी वाचली. कदाचित खाण्याच्या पदार्थांवरुन आज होईल तिचं रॅगिंग..
शिवचा साडीची घडी घालण्यावरुन झालेला गोंधळ मजेशीर होता..
आपल्याला जाहिरातीत दाखवताना, खुदा जाने ची रेकॉर्ड वाजवली, पण नंतर खरं दाखवायची वेळ आली तेव्हा वीणा गात होती Uhoh

वैशाली खूप भोचक आणि कुचकट आहे . आयडीयाज डोक्यातून काही येत नाहीत अगदी आलीच तर दुसऱ्यावर थुंकण्याची घाणेरडी आयडिया फक्त डोक्यात आलेली . सदैव बेड वर झोपून झोपून बिग बॉस चा विनर होण्याची खूप मोट्ठी शक्यता मला दिसत आहे . तशी ती खूप लकी पण आहे . तस जर झालंच तर सतत बेडवर झोपून सुद्धा बिग बॉस चा विनर होता येत हा मस्त संदेश आगामी संभाव्य स्पर्धकांना मिळेल . त्याकरता तिला ओब्सर्व केलं पाहिजे फक्त त्यांनी Happy

आपल्याला जाहिरातीत दाखवताना, खुदा जाने ची रेकॉर्ड वाजवली, पण नंतर खरं दाखवायची वेळ आली तेव्हा वीणा गात होती >>> तिला गायला लावलं जळवण्यासाठी. पण शिवला स्वतःलाच हिनाबरोबर नको होती. तो वीणा, वीणा करत होता.

शिव आणि वीणाला वेगळं नका रे करु. दाखवू नका जास्ती त्यांचं हवं तर. पण क्युट पेअर त्यांचीच वाटते खरंतर आणि मागच्यावेळेसारखं नाहीये की दोन्ही पेअरमधे एकाचं लग्न झालेलं, मुलं होती. ती हिना नको शिवबरोबर.

दोन वेगळ्या टीम्स असून आपल्या टीमबरोबर गद्दारी न करता त्यांच्यात चांगली मैत्री असेल अगदी स्पेशल तर असूदेकी. मला आवडते त्यांची जोडी.

मला वाटलेलं अर्चना निपाणकरला आणतील वाईल्ड कार्ड एन्ट्री, राधा प्रेमरंगी रंगलीची व्हिलन. जबरद्स्त व्हिलन होती, टोकाची निगेटीव्हीटी त्या कॅरॅक्टरमधे होती. तिने काम सुपर्ब केलं पण इतकी निगेटीव्हीटी मला बघवत नाही म्हणून मी सिरीयला राम राम ठोकलेला.

ती नेहा एकवेळ परवडली पण वैशाली आणि केळकर इतके टोकाचे कुजकट वृत्तीचे आहेत हे आता आता पाहिलेल्या भागावरून पण दिसते.
वैशाली तर भरपुर रीयालिटॅ शो केलेली त्यात ते पण सूर्वातीलाच हिमेशच्या ग्रूपमधून आलेली त्यामुळे ड्रामे करण्यात पटाईत वर तशी परसानॅलिटी मुळात आहे वाटते.

पराग गेला हेच उत्ताम होते त्यासाठी. अश्या वातावरणात, तो हिंसक बनला असता नाहितर नैराश्याच्या गर्तेत. शिव हेच बोललेला बरोबर होतं.
शिव म्ह अजे, येडा बनके पेढा खानेवाला आहे. लोकांची भावनिक नस कधी पकडायची, दोन्ही बोटीत कसा पाय ठेवायचा ते हि ईमेज सांभाळून.

सगळ्यात माठ किशोरी आणि रुपाली. किशोरी सारखी कन्फ्युज्ड. अरे जस्ट बी युवर्सेल्फ. काय इतका डोक्याला शॉट द्यायचा. डोक्याने खेळा जिथे हवे असेल तिथे.
आता ब्रेक घ्यायला पाहिजे हे बघण्याची सवय लागायच्या आधी. काही स्पोटक असेल तर लिहा मगच बघेन भाग.

शिवने स्वतंत्र गेम खेळावा कारण वैशाली केळकर बरोबर सतत राहीला तर ह्या दोघांमुळे votes कमी मिळू शकतात त्याला. त्या दोघांबद्दल आणि नेहाबद्दल प्रचंड राग आहे सो मि वर. दोन खुनशी आणि एक खुन्नस देणारी सतत.

काल पण मी उशिरा लावलं, माधव आणि वीणात काही वाजलं का. नंतर माधव स्पष्टीकरण देत होता त्यावरून मी अजून confused. एकतर माधव बोलत नाही जास्त आणि जेव्हा काही बोलतो तेव्हा खूप फाफटपसारा लावतो. पण चौघात तो बरा आहे.

फार काही नाही झालं. बँडएडचा स्टॉक हीनाने स्वतःच्या ताब्यात ठेवलेला. वीणाने त्याला सांगितलं की तो कॉमन जागी हवा. असं तिला सांग.
यावर तो म्हणाला मी टपाल पोचवणार नाही. त्याने हीनाला बोलवून वीणाच्या समोरच सांगून सॉर्ट आउट केल.

तर टपाल पोचवण्यावरून वीणा भडकली. (तिला ट्रिगर हवाच असतो).
मग मा धवने स्पष्टीकरण दिलं की माझी सांगायची पद्धत चुकली.

आता पाहुणे इतके अपमान करताहेत ते हे लोक हसतमुखाने सहन करताहेत, पाहुणे गेले की एकमेकांवर राग काढतील. म्हणजे यांना मान अपमान बाजूला ठेवून डोकं शांत ठेवणं जमतं. बिग बॉस पाहुण्यांकरवी ट्रेनिंग देताहेत.

पराग गेला हेच उत्ताम होते त्यासाठी. अश्या वातावरणात, तो हिंसक बनला असता नाहितर नैराश्याच्या गर्तेत. >>> हिंसक केलाच ना त्याला. त्याचं badluck, त्यावेळी संयम ठेवला असता तरी पूर्ण बाजी जिंकला असता.

असं झालं काय, thank u भरत.

ती नेहेमी निरोप दुसऱ्याकरवी का पोचवते, सांगना समोर. बघेन जमलं तर voot वर. तो एक शॉट पण परत बघायचा आहे. पराग उद्या भेटेल का विचारलं आणि नेहाला ऐकवलं श रा ने तो.

अंजू, आणखी हिंसक हे म्हणायचे होते. लोकं कशाला बोलावताहेत त्याला.. काहीही.
काही दम नाहिये ह्या बीबॉ.
आधी वेळ नाही घालवला ते बरं..

माधव कितीही फाफटपसारा लावत असला तरी काल एक वाक्य तो एकदम टू द पॉइंट बोलला..... "जशी पपई गेली तसे टॉवेल/नॅपकीन गेले"...... सुरेखाताई चूप्प!

केळ्या गायला लागल्यानंतर पुष्की जो सारखासारखा उठुन जात होता त्यामुळे केळ्या इरिटेट व्हायच्या ऐवजी उलटा हसत होता..... त्याने पुष्कीचाच पचका झाला!

माझ्या मते टीम A हा टास्क जिंकणार.... त्यामुळे टीम B मधले कोण कोण दोन सदस्य पुढच्या आठवड्याच्या इलिमिनेशन साठी सरळ सरळ नॉमीनेट होणार.... मारा गेस!

जर टीम B नेच ते ठरवायचे असेल तर नेहा, माधव आणि हिना ने मिळून केळ्या आणि वैशालीचे नाव द्यावे तरच हे तिघे वाचू शकतात..... नाहीतर या तिघांच्यातले दोघे (बहुतांशी हीना आणि नेहा) नक्की नॉमीनेशनमध्ये!

नाहीतर या तिघांच्यातले दोघे (बहुतांशी हीना आणि नेहा) नक्की नॉमीनेशनमध्ये! >>> नेहा लकी आहे, नाही होणार nominate.

पण कशावरून वीणा टीम जिंकेल. नेहाची पण जिंकू शकते. वीणाची जिंकलीच तर सुरेखाताई, किशोरीताई आणि आई नावामुळे जिंकू शकते. इमोशनल tacts त्या टीमने छान प्ले केले. एक star सुरेखाताईनच्या गाण्याला मिळाला पण वैशालीच्या नाही.

"जशी पपई गेली तसे टॉवेल/नॅपकीन गेले"...... सुरेखाताई चूप्प! >>> हो तो डायलॉग मस्त होता माधवचा.

हा task bb ला कुठली टीम जिंकवायची असेल आज त्यासाठी, nominate कोणाला जास्त करायचं आहे त्यासाठी. परवा kvr ला हरवायचं होतं. आज जिंकवायचं आहे का ते समजेल.

सोमि म्हणजे सोशल मिडिया होय. धन्स अंजु. माझी अगदी किशोरी शहाणे झालीय. जराही डोकं लाव,ए नाही मी.
मलावाटले, आणखी कुठला तरी चॅनेल असेल सोमि म्हणजे.

माझं पण डोकं एरवी नसतं चाललं, इथेच वाचलेला आणि अर्थ समजलेला शब्द आहे, अशाच कुठल्यातरी सिरीयल चर्चेत. पहिल्यांदा मलाही सो मि म्हणजे काय वाटलेलं Lol

हाहा. मी एकंदरीत टीवी , सोशल मिडिया ( सोमि) डिटॉक्स मोड आहे आजकाल.
त्यामुळे कमीच कळते. घरी हसतात मला सर्वजण. असो.

पण बिबॉ मधले लोकं, रात्री १२:३० वगैरे स्वः यपाक करताना दिसतात. काल, रात्री १२:३० किशोरी शहाणे बटाटा वगैरे किसत होती.
जेवतात तरी कधी?
झोपतात ३ ,४ ला पहाटे, पुन्हा सकाळी काहितरी ९:०० उठतात. तब्येत खराब होणार. पोटं पुढे येणार..
भयानक जीवनपद्धती आहे. छ्य्या, आपण नसतो गेलो.

पण आधी स्वत: सांगायचं, नाही ऐकलं तर कॅप्टन आहेच.

ह्यावेळी समजा वीणा टीमला जिंकवले bb नी तर दुसरं असं की माधवला त्यांना पुढे न्यायचं आहे कारण कॅप्टन असल्याने तो नसणार नॉमिनेशन मध्ये.

त्याला, वीणाला आणि नेहाला bb सपोर्ट असेल तर शिवची वाट बिकट आहे मात्र. फायनलमध्ये असेल पण जिंकण्यासाठी म्हणतेय मी. त्याला, मेघाला मागच्यावर्षी होता तेवढा सपोर्ट बाहेर नाहीये.

जोडीने झाले एकत्र तरी चालेल, सुजा. >> हो ग

काल काय झालं बँडेज जे सगळ्यासाठी होत ते हिना ने स्वतःच्या ड्रॉवर मध्ये ठेवल म्हणून वीणाला राग आला. तिने ते माधव कॅप्टन होता म्हणून त्याला सांगितल कि "ते सगळ्याकरता आहे त्यामुळे स्टोअर रूम मध्ये ठेवायला सांग हीनाला ". तर माधव म्हणतो मी टपाल आहे का ? असं काही तरी समथिंग ( नक्की काय म्हणाला ते आठवत नाही ) . तू तिला समोरासमोर बोलून सॉर्ट आऊट कर असं माधवच म्हणणं पण विणा म्हणाली " नाही तू कॅप्टन आहेस त्यामुळे मी तुला सांगणार तुझं काम आहे तिला सांगून जी गोष्ट चुकली आहे ती दुरुस्त करण्याची " . मला तरी वीणाच बोलण पटल. माधवच्या हि तस त्याच्यापरीने चुकल नाहीये पण वीणाच जास्त पटल .
शाळेतल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एकाद्या दोस्ताबद्दल आपली काही कम्प्लेंट असली तर आपण टीचर ला सांगतो ना ? समोरासमोर मारामारी करून सेटल करत नाही ना ? किंवा करू नये अशी टिचरची अपेक्षा असते . तसच वीणाने कॅप्टन ला सांगितलं . तो शाळेतल्या टीचर सारखा वागून मॅटर सॉर्ट आऊट करेल अशी वीणाची अपेक्षा जी रास्त होती माझ्या मते Happy

हो मी आत्ता बघितलं सुजा. वीणा जास्त योग्य होती म्हणून नंतर माधव माफी मागायला आला.

श रा आणि बाकीचे सुनावताना बघितलं. नेहाला योग्य बोलली श रा असं वाटतं मला. आपल्याला दाखवतात त्यापेक्षा नेहा जास्त बोलत असेल तर bb ने तिच्याकरवी सुनावलं. तो स्टाफ उद्यापर्यंत बघायला मिळायला नको असं वक्तव्य केलं श रा ने परागबद्दल. मला उलटं वाटलं आधी. खरं तर परागबद्दल बोलायची गरज नव्हती कोणाला कारण शिव्या आत्ता घरात आहेत ते देतात कि, वैशाली जास्त देते.

काल मी लिहिलं होतं manager पैकी एक सतत बडबडते आणि एक इथूनतिथून उड्या मारते असं म्हणाली श रा पण ती एक सतत बोलते आणि एक उड्या मारत बोलते ज्यात त्यात असं म्हणाली, आत्ता परत बघताना नक्की समजलं.

Pages