Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बिचुकलेला उच्च न्यायालयात
बिचुकलेला उच्च न्यायालयात जामीन मिळवून देऊन आणणार असतील. बाहेर गुन्हे करून आत आलेले चालते नाही धावते, आतमध्ये सुधारणा होते त्यात . बाहेरचे चांगले आत जाऊन गुन्हेगार होतात या वातावरणात.
>>>बाहेरचे चांगले आत जाऊन
>>>बाहेरचे चांगले आत जाऊन गुन्हेगार होतात या वातावरणात.<<<
सॉरी पण हसायलाच आले.. आत मध्ये गुन्हेगार वाचुन...
काल दोन्ही टीमची कॅप्टन्सी
काल दोन्ही टीमची कॅप्टन्सी नॉमीनेशनची प्रोसेस बघितली तर त्या दोन्ही ग्रूपमधला फरक अधोरेखित होतो
एका टीमने already दोघांना संधी मिळालीय म्हणून उरलेल्या दोघींत यावेळी मी पुढच्या वेळी तू अश्या मांडवलीवर कॅप्टनशीप साठीचे नॉमीनेशन ठरवले तर दुसऱ्या टीमने कुणाला या आठवड्यात limelight मिळालाय, कोण बाहेर राहून टास्कमध्ये जास्त आयडीया लढवू शकते, कुणाला इम्युनिटीची गरज आहे हा सगळा विचार करुन कॅप्टन्सी साठीचा दावेदार दिला (त्यातही केळ्याचे मी मी चाललेलेच होते)
आणि नंतर त्यांच्या नशिबाने असे निकष आले की माधव वाचला नाहीतर या सगळ्या निकषावर माधव नक्की नॉमीनेशन मध्ये असता!
कालचे टास्क मस्त होते..... इतका वेळ त्या बार ला धरुन उभे रहायचे म्हणजे चेष्टा नाही
नेहा परत एकदा मस्त युक्तीने खेळली.... लिक्वीड सोप आणि हेअर ऑईल ने बार निसरडा करुन विरोधी प्लेयरला तिथे उभे रहाणे अवघड करायचे यात गेमच्या नियमाविरुद्ध काहीच नव्हते तरी विरोधी पार्टीने आरडाओरडा केल्यावर संचालिकांनी नेहा शी झटापट सुरु केली
त्यांचे ते "मला शनिवारी ओरडा बसतो" वगैरे फारच फनी होते
माधव आणि वीणा दोघेही मस्त खेळले.... माधव पण घाईला आला होता!
टास्कमधले टास्क मध्ये सोडून नंतर डायनिंग टेबलवर सगळे एकदम खेळीमेळीने वागत होते ते बघून बरे वाटले!
बाकी ते घराबाहेर पडण्यासाठीच्या नॉमीनेशनचे निकष बघता नॉमीनेशन मध्ये आलेली नावे अगदीच अपेक्षित होती
उरलेल्यात माधव वगळता सगळे फिनालेचे दावेदार आहेत!
सुरेखा पुणेकर बाहेर पडतील बहुतेक यावेळी.... त्यांचा आणि बिचुकलेंचा पीआर एकच आहे असे मागे एकदा म्हणालेल्या त्या!
आता तो पीआरच काय ते त्यांना घराबाहेर पडण्यापासून वाचवू शकतो!
प्रतिसाद आटले. टीआरपी घटला.>>
प्रतिसाद आटले. टीआरपी घटला.>>
काल १० मिनिटे बघितलं . मग बोअर झालं. मग टीव्ही बन्द करुन टाकला.
ईथे वाचुन पण फार काही घडलय असं वाटत नाहिये.
लवकरात लवकर १-२ चांगले वाईल्ड कार्ड आणा आता.
सॉरी पण हसायलाच आले.. आत
सॉरी पण हसायलाच आले.. आत मध्ये गुन्हेगार वाचुन... >>> हम्म्म झालंना दुर्दैवाने असं, पेशन्स नाही ठेवला की होतं हे.
नेहा परत एकदा मस्त युक्तीने
नेहा परत एकदा मस्त युक्तीने खेळली.... >>> ती कशीही वागली तरी bb चा पाठींबा आहे हो, काळजी करू नका तीच जिंकणार आहे . नो डाऊट झोकून देऊन ती task करते, शातिर दिमाग. शेवटी तर काय काय घालत होते पण कौतुक वीणाचे जास्त. अजून थोडी टिकली असती तर माधव हरला असता. जास्त विपरीत परिस्थितीत वीणा टिकली. माऊथ फ्रेशनर तोंडात घेतो तर चेहेऱ्याला काय त्रास होतो. शिवला उगाच ओरडले bb. रूपालीचे चुकले तळणीच्या तेलाचे. शिवने bb चं नाही ऐकलं तेही चुकलं.
वीणा अशीच खेळत राहिली आणि शेवटी वीणा नेहात निवडीची वेळ आली तर मात्र पब्लिक आणि channel दोघेही वीणाला निवडतील हे नक्की.
सध्यातरी शिव बेस्ट आहे.
>>ती कशीही वागली तरी bb चा
>>ती कशीही वागली तरी bb चा पाठींबा आहे हो, काळजी करू नका तीच जिंकणार आहे Wink
मागच्या सीझनमध्ये पार अगदी रेशम बाहेर पडेपर्यंत बरेच लोक रेशमबद्दल असेच म्हणत होते.... असो!
>>आणि शेवटी वीणा नेहात
>>आणि शेवटी वीणा नेहात निवडीची वेळ आली तर
आमेन!
दोघीही आवडत्या आहेत!
या दोघीतले कुणीही जिंकले तरी आपल्याकडून पार्टी
रेशम task वगैरे फार करायची
रेशम task वगैरे फार करायची नाही हो, लोळत पडायची. नेहा करते हा फरक आहे.
काल पावसामुळं पूर्ण भाग दिसला
काल पावसामुळं पूर्ण भाग दिसला नाही.
शिव नेहाला तोडीस तोड उत्तरं देताना, तेही न चिडता, पाहून मजा आली. थोबाडवर नेहाचा कॉपीराइट दिसतोय.
>>रेशम task वगैरे फार करायची
>>रेशम task वगैरे फार करायची नाही हो, लोळत पडायची. नेहा करते हा फरक आहे.
मुद्दा तो नाहीये!
मुद्दा हा की अमकातमका चॅनेलचा माणूस आहे किंवा अमूकतमूक होस्टचा लाडका आहे आणि म्हणूनच तोच किंवा तीच जिंकणार असा जो काही काही लोकांचा समज असतो तसे दरवेळी घडतेच असे नाही!
आणि नेहा ने कलर्स (रादर तेंव्हा ते ई टीव्ही होते बहुतेक) वर ५-६ वर्षापूर्वी एक शो केला होता.... त्यातही ती फक्त एक स्पर्धक होती आणि त्यातही ती जिंकली नव्हती असे असताना तिला का बरे पाठिंबा असेल बिग बॉसचा किंवा चॅनेलचा?
>>काल पावसामुळं पूर्ण भाग
>>काल पावसामुळं पूर्ण भाग दिसला नाही.
आमच्याकडे पण!
तुमच्याकडे पण videocon DTH आहे का?
तुम्ही पण सिन्हगड रोड भागात रहाता का?
>>थोबाडवर नेहाचा कॉपीराइट दिसतोय.
बहुतेक
नाही. पण काल आमच्याकडे दहा
नाही. पण काल आमच्याकडे दहा वर्षांतला रेकॉर्डब्रेक पाऊस होता.
तसंही काल फार काही इंटरेस्टिंग वाटलं नाही.
आणि नेहा ने कलर्स (रादर
आणि नेहा ने कलर्स (रादर तेंव्हा ते ई टीव्ही होते बहुतेक) वर ५-६ वर्षापूर्वी एक शो केला होता.... त्यातही ती फक्त एक स्पर्धक होती आणि त्यातही ती जिंकली नव्हती असे असताना तिला का बरे पाठिंबा असेल बिग बॉसचा किंवा चॅनेलचा? >>> वाटतो आत्तातरी. पराग घटनेवरून नाही म्हणत मी. तिने काही केलं तरी तिला नाही फार बोललं जात. परवा हिनाला तरी बोलले पण नेहाही बीभत्स वागत होती शिवशी.
दुसरीकडे bb ची नीतीही असू शकते ह्यांना पाठींबा देत बसून पब्लिक पाठींबा शिव, वीणासाठी वाढवावा. काय माहिती काय. होऊ शकतं असंही. कोणीतरी हा मुद्दा लिहिलेला बहुतेक भरत यांनी का. पार्शल मुद्दाम होत असतील कारण मग पब्लिक विरोधात जाईल.
किशोरी, रुपाली,हिना, सुपु आणि
किशोरी, रुपाली,हिना, सुपु आणि वैशाली नॉमिनेट झाल्यात, यात बिबॉ चा अंदाज सुपु जातील असा असावा. पण सध्या वैशालीवरचा लोकांचा राग पहाता तीही जाऊ शकेल म्हणून माधव ला कॅप्टन म्हणून काहीतरी प्रिविलेज देतील की काय अशी शंका काल येऊन गेली मला. अजूनही येतेय. एकाला सेफ करा आणि एकाला नॉमिनेट करा वगैरे. तसेही सोमवारीच कॅप्टन आणि नॉमिनेशन दोन्ही झालेय. आता उरलेले दिवस काय करणार
काल रुपली आणि किशोरी परत एकदा महा मंद वाटत होत्या टास्क मधे. तसेही आता त्यांच्या ग्रुप ला काही अर्थच उरला नाहीये.
>>पार्शल मुद्दाम होत असतील
>>पार्शल मुद्दाम होत असतील कारण मग पब्लिक विरोधात जाईल.
तेच तर ना!
Dont get fooled by the channel
दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ !
"तिने ते केले त्याचा राग नाही आला पण मग ती चुकीची असुनही मांजरेकर तिला बोलले का नाहीत.... मांजरेकर पार्शल आहेत म्हणून मला ती आवडत नाही" असली अर्ग्युमेंट जेंव्हा लोक करतात तेंव्हा मला गम्मत वाटते
तुमचे मत तुमचे मत असू द्या ना!
>>माधव ला कॅप्टन म्हणून
>>माधव ला कॅप्टन म्हणून काहीतरी प्रिविलेज देतील की काय अशी शंका काल येऊन गेली मला. अजूनही येतेय. एकाला सेफ करा आणि एकाला नॉमिनेट करा वगैरे.
Point आहे!
ऐसा हो सकता है!
कालचे टास्क चांगले होते, फिट
कालचे टास्क चांगले होते, फिट असलेला माणूसच करु शकणार हे टास्क, सुरेखाताई कायमच्या संचालिका बनु शकतात अशा टास्क्स मधे.
आता अशीच टफ होत जाणारी आणि अंगचटीला न जाता खेळता येणारी टास्क ठेवली तर बरं होईल.
मलाही वाटतय कि धोका वैशालीला आहे, पण किशोरी आता हारल्यासारखी, खचल्यासारखी दिसतेय, ती गेली तर गुड फॉर हर !
तुमचे मत तुमचे मत असू द्या ना
तुमचे मत तुमचे मत असू द्या ना! >>> हो बरोबर. मला ती आधीपासूनच आवडत नाही. झुंज मधे पण भांडायची जाम. मेघा पण, मेघाने मात्र स्वतःमधे खुप बदल घडवला, ती नावडती आवडती झाली. हिच्याबाबत मात्र मला नाही तसं वाटत पण ती टास्कसाठी डेडीकेटेड असते याबाबत मी तिचं आधीही कौतुक केलंय आणि आताही करेन. पण आदरवाईज मला नाही आवडत ती.
सुरेखाताई जायचे चान्सेस जास्त
सुरेखाताई जायचे चान्सेस जास्त. पिकनिकसाठी आलात का असं ममां डायरेक्ट बोलले ना त्यांना परवा.
माझ्या मनात अनेक शंका येत
माझ्या मनात अनेक शंका येत असतात, समजा परागला माफ करावं नेहा आणि वैशालीने असं bb ना वाटत असेल आणि त्यांनी ते केलं नसेल तर bb योग्य वेळी बदला घेऊ शकतात दोघींचा. एकीकडे डोक्यावर चढवून उतरवतील कधी ते कळणार नाही, हे खरं असेल तर शेवटपर्यंत नेऊन नेहाला जिंकू देणार नाहीत.
कोणीही स्वत:ला मोठं समजू नये, bb कब किसीके साथ खेलेंगे पताभी नही चलेगा.
मागच्यावेळी मेघाला कसा उत्स्फूर्त प्रतिसाद आधीपासून होता, न भूतो न भविष्य:ती तसा यावेळी कोणालाच नाहीये.
बीबी असे मुद्दाम करतात वाटत
बीबी असे मुद्दाम करतात वाटत की लोकांना जी टीम आवडत नहिये त्याला जास्त सपोर्ट करायचा. म्हणजे दुसर्या टीम ला लोकांचा पाठिंबा जास्त मिळतो. एका टीम ला वाईट बनवायचे आणी एका टीम ला चांगले ,शोशिक असे. मग शेवटी चांगल्या टीम ला votes मिळून त्यातले कोणितरी जिंकलेकी . बूराई पे अच्छाई की जीत केल्याचा लोकांना आनंद.
अन्जू किती त्या शंका
अन्जू किती त्या शंका
हो ना कारण कोणालाच काढायचं
हो ना कारण कोणालाच काढायचं नव्हतं bb ना आणि असं घडल्याने त्यांच्यावर डाव उलटलाय ना सध्या.
आजच्या प्रोमो मध्ये उगीचच
आजच्या प्रोमो मध्ये उगीचच लाईट वगैरे घालवून वाइल्ड कार्ड एंट्री आणणार आहेत. ऋतूजा कशी खेळेल काय माहिती मागच्या सीज़न ला पण खुप लेट ऐक्टिव झाली होती ती त्या चोर पोलिस टास्क नंतर. आधी चुपचाप च असायची.
बिचुकलेन चा फोटो अजुन ही कलर्स च्या fb page वर तसाच आहे .
Channel ने अजुन पण आशा सोडलेली नाहिये .
ऋतुजाच वाइल्ड कार्ड एन्ट्री
ऋतुजाच वाइल्ड कार्ड एन्ट्री आहे हे नक्की का? बाया खूप आहेत ऑलरेडी तिथे. कुणी मेल कन्टेस्टन्ट्स मिळत नाहीत का यांना ? तो मागच्या वेळी एक भारी अॅटुट्यूड दाखवणारा गेस्ट म्हणून आला होता हॉटेल च्या टास्क च्या वेळी ओम शिंदे असे नाव होते बहुतेक. चांगला वाटला असता कन्टेस्टन्ट म्हणून.
खर तर मेल कन्टेस्टन्ट्च हवा
खर तर मेल कन्टेस्टन्ट्च हवा बायका खुप आहेत. तो ओंम शिंदे कलर्स च्या लक्ष्मी सदैव मंगलम मध्ये आहे. त्याचा पुढच्या वर्षी नम्बर लागेल.
माहिती नाही ऋतुजाचं नक्की,
माहिती नाही ऋतुजाचं नक्की, डीजे ने इथे सांगितल्यावर youtube वर पण बघितलं होतं, ऋतुजा येणार असं.
ती सिरीयल संपली ना, आता खऱ्या
ती सिरीयल संपली ना, आता खऱ्या लक्ष्मीची सिरीयल आली.
ती सिरीयल संपली ना, आता खऱ्या
ती सिरीयल संपली ना, आता खऱ्या लक्ष्मीची सिरीयल आली
>>हो का मी वूट वरच बघते त्यामूळे माहिती नव्हते मला.
म तोही यायला काही हरकत नाही.
मागच्या सीज़न ला किती वाइल्ड कार्ड आणलले 2 ना फक्त नंद्कीशोर आणी शर्मिश्ठा
Pages