Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52
बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लोल- वैशाली जिंकली तर मी माबो
लोल- वैशाली जिंकली तर मी माबो सोडून देईन...
वीणा विनर असेल- माझं वोट
वीणा विनर असेल- माझं वोट तिलाच...
ती नीट खेळली, तर चॅनेलचं मत
ती नीट खेळली, तर चॅनेलचं मत तिच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. शिव जास्त परफेक्ट वाटतो मला. वीणामुळे 2 टास्कस जिंकलेत हेही खरं. हे दोघेही टास्कस चांगला खेळतात.
बाकी टास्कमध्ये डोकं चालणारी म्हणजे शातीर दिमाग प्लस नशीबवान तिसरीच व्यक्ती आहे सध्या
तिथल्या 2000 पोस्ट्स
तिथल्या 2000 पोस्ट्स व्ह्यायच्यात अजून आणि नवीन धागा आला.
बाकी टास्कमध्ये डोकं चालणारी
बाकी टास्कमध्ये डोकं चालणारी म्हणजे शातीर दिमाग प्लस नशीबवान तिसरीच व्यक्ती आहे सध्या ... कोण नेहा का ?
ते smily कसे येते.
वीणा चांगल खेळत आहे पण जरी
वीणा चांगल खेळत आहे पण जरी नाही खेळली तरी चँनेल घेउन जाईल तिला शेवटपर्यंत.पण विनर शिव होईल.
हो नेहा Amupari. स्मायली दोन
हो नेहा Amupari. स्मायली दोन उभी टिम्ब म्हणजे : आणि मोठा D त्याला लागून अशी द्यायची.
UP आमेन. ही दोघेच सध्या allover विचार केला तर आवडतायेत मला.
(No subject)
thank you अन्जू
मला वाटले काही इमेज वगेरे अपलोड करावी लागते का कारण स्माइली वर क्लिक केल्यावर सगळे इमेज चेच ऑप्शन येत होते.
वेलकम. सर्व स्मायलीजची आहे
वेलकम. सर्व स्मायलीजची आहे माहिती इथेच कुठेतरी.
नेहा टॉप 5 मध्ये असेल
नेहा टॉप 5 मध्ये असेल
वीणा शीव नेहा असणार आहेत टॉप
वीणा शीव नेहा असणार आहेत टॉप 5मध्ये. वैशाली पण वाटते असेल म्हणून . पराग पण वाटत होता पण त्याने एन्वेळी माती खाल्ली.
चिडण्यापेक्षा रडला असता तर बरे झाले असते ढकललेम्हणून
Lol..
Lol..
हिंदीमध्ये होत असेल अस
हिंदीमध्ये होत असेल अस टास्कच्या नावाखाली,म्हणूनही त्यांनी केल असेल ,म्हणून मराठीतपण लोकांनी ते बघाव हेच चुकीच आहे.हिंदी लोकांना ते चालत असेल,पण मराठी लोकांना नाही चालणार,हाच फरक आहे हिंदी आणि मराठीमध्ये.
जर हिंदीचच अनुकरण करायच असेल,मग मराठी बिबॉ कशाला,तसही मराठी लोक हिंदी बिबॉ बघतातच ना,मग कशाला परत मराठी?>> +111
हिंदीमध्ये जे चालत ते कौतुकास्पद आणि आदर्श अस नाहीच आहे.
तिथे तस होत म्हणून इथेही लोकांनी बघा,हीच मानसिकता बदलायला हवी.मराठी कंटेस्टंटनीही हे लक्षात ठेवायला हवे,बळाचा वापर म्हणजे इंन्स्टिगेट करण नाही >>> exactly
>>>>>>>>>>
हिच ती घाणेरडी मानसिकता कारणीभुत आहे झाल्या प्रकाराला. गेम आहे म्हणजे चालवुन घ्या.
इन्स्टीगेट करणं म्हणजे इजा करणे/ बळ वापरणे न्हवे. जे असे समजतात व म्हटतात की हाच गेम, त्यांनाच गेम समजला नाही.
उगाच मग रुल्स मध्ये बुद्धिचातुर्य वापरा आणि बळ “नाही“ असे ठळकपणे सांगितलं.
नेहाला उगाच का आत बोलावलं? कुठेतरी ते अनफेअर गेम खेळणे सुरु आहे दिसले म्हणूनच ना वारनिंग दिली.
आणि जे दुसरीकडे घाण ( हिंदी बिग बॉस्स) चालतं, ते इथेही चालवुन घ्या हा अट्टाहास वा अपेक्षा कशाला?
हिंदीतला शो तर पंधरा मिनिटापेक्षा कधीच बघवला नाही तो पहिलाच सिझन आणि नंतरही कधीही पहाणे नाही शक्य.
वसवसून अंगावर येणे , गलिच्छ बोलणे, म्हणजे खेळणे न्हवे. कित्येक खेळाडु ( वेगवेगळ्या खेळातील) बाद झालेत त्यांच्या अश्या वागण्यामुळे. वैशाली काहितरी ओठावरुन थुक्का लागला नाही का काय बोलली. ह्याचा अर्थ मला कळला सुद्धा नाही आणि मग म.मा सांगताना कळला. खुप गलिच्छ भाषा बोलते ती.
काल नेहा किती साबण वापरत होती
काल नेहा किती साबण वापरत होती वीणासाठी पण तो लिक्विड सोप होता म्हणून चाललं bb ला, तसाही सॉफ्ट कॉर्नर दिसला bb चा तिच्याबाबत, सुरेखाताईनी तक्रार करून काही बोलले नाहीत.
रुपालीचे चुकलंच तेल आणलं तिने तळणाला use केलेलं. पण शिवने माऊथ फ्रेशनर् आणला तो चालत नाही का त्वचेला, त्याला पण बोलले bb. नंतर ताकीद देऊनही शिवने तेच केलं मग disqualified, ok. पण समोर वाटेल तसे सोपं मारा वीणा वर करत होते ते योग्य होतं का.
वीणा पण सॉलिड टिकली, तिचे कौतुक जास्त. तिची वाटचाल योग्य स्व:हिमतीवर सुरू आहे, चॅनेलच्या जीवावर फक्त उड्या मारत नाही ती.
संचालिकेचं कोणीही ऐकत नव्हतं. हिनाला नेहाने सोपं आणायला सांगितलं, तेव्हाही अडवलं सुरेखाताईनी, आधी नेहाला ओतायला सांगितला. तरी तेच सुरू होतं. समोरून पण तेल अंडी नी माऊथ फ्रेशनर मग संचालिका कंटाळून कोणाला सांगायला आल्याचं नाहीत.
शिव एकटा बोलण्यातही नेहाला आणि वैशालीला पुरून उरतो, त्याला बोललेलं काही समजत नाही असं उगाच म मांना वाटतं.
वीणावर तर शेवटी डिटर्जंट, शेविंग क्रीम पण टाकतायेत असं दिसलं पण bb गप्प. नेहाची आयडिया, वैशाली आयडिया चालतात. ट्रॉफी देऊन टाका दोघींपैकी एकीला, नेहालाच देतील. एवढ्या सर्व गोष्टीत वीणा टिकली, हे ग्रेट खरंच. ती हारून जिंकली काल.
शिवला भाषेवरून चिडवते नेहा पण
शिवला भाषेवरून चिडवते नेहा पण काल स्वतः ला अखत्यारीत शब्द नीट उच्चारता आला नाही.
वैशाली अत्यंत धुर्त व
वैशाली अत्यंत धुर्त व पाताळयंत्री वाटते. शेवटपर्यंत टिकेल व विनर सुध्दा होऊ शकते.
आज ऋतुजाला आणतायेत की काय, ती
आज ऋतुजाला आणतायेत की काय, ती आली तर तिने छोटा grp जॉईन करावा. तिघीच राहिल्यात.
नेहा ला बेडकी, वैशाली ला
नेहा ला बेडकी, वैशाली ला कावळीन, kalundri हे मनोवृत्ती साठी म्हणताय? ..>>>>>>>>>
बेडूक जसा कर्कश आवाजात सारखा ओरडत असतो तशी ती आपल्या कर्कश आवाजात मनात द्वेष ठेवून सर्वांवर मोठमोठ्याने ओरडत असते. त्या द्वेषवृत्तीमुळे तो आवाज जास्तच irritating वाटतो म्हणून तो शब्द.
भैंसने गाणे गाताना छान गायिल्यासारखे दाखवते, पण तिची वागणूक भाषा मुद्दाम दुसऱ्यांच्या जखमांवर टोचा मारत असल्यासारखी हलकी, बॅडमाऊथ, शिवराळ आहे म्हणून तो दुसरा शब्द.
काळुंद्री हा शब्द वापरलेला नाही.
म्हैस जशी एकदा बसली की उठत नाही, तशी भैंसने केव्हाही बघा पलंगावर पडून असते, कुठली कामे करीत नाही, ऐदी आहे म्हणून तो शब्द वापरला. श्रीज्ञानेश्वरांनी cunning, हलक्या वृत्तीच्या धृतराष्ट्राला उद्देशून असा शब्द वापरला आहे.
मायबोलीचा प्रथमच वापर करीत
मायबोलीचा प्रथमच वापर करीत आहे. अडचण येते. पोस्ट गहाळ होतात. पुन्हा टाईप करावे लागते. कसे वापरायचे ते फारसे समजत नाही.
शिकाल हळूहळू. पण शक्यतो
शिकाल हळूहळू. पण शक्यतो चांगले लिहा.
मायबोलीचा प्रथमच वापर करीत
मायबोलीचा प्रथमच वापर करीत आहे. अडचण येते. पोस्ट गहाळ होतात. पुन्हा टाईप करावे लागते. कसे वापरायचे ते फारसे समजत नाही.>>>>> practise ने जमेल हळुहळू. मलाही मराठीत नीट लिहणे जमत नाही. खुप वेळ लागतो.
संचालिकेचं कोणीही ऐकत नव्हतं.
संचालिकेचं कोणीही ऐकत नव्हतं. हिनाला नेहाने सोपं आणायला सांगितलं, तेव्हाही अडवलं सुरेखाताईनी, आधी नेहाला ओतायला सांगितला. तरी तेच सुरू होतं. समोरून पण तेल अंडी नी माऊथ फ्रेशनर मग संचालिका कंटाळून कोणाला सांगायला आल्याचं नाहीत.>>>>> संचालिके ला दोन्ही साइड हून एकायला लागते . बोलले तर स्पर्धकांचे आणी नाही बोलले तर मांजरेकर सरांचे . पण बिग्ग बॉस ला कसेही वागलेले चालते आणी नियम मोडलेले चालतात म्हणून संचलीके चे काही एकून घेत नाहित .शनिवारी जरासि बोलणी खाऊया आता तरी जिंकतो ना असा attitude झाला आहे .
लास्ट सीज़न ला पण आऊ चे कोणी एकायचे नाही.
हिंदीतला शो तर पंधरा
हिंदीतला शो तर पंधरा मिनिटापेक्षा कधीच बघवला नाही तो पहिलाच सिझन आणि नंतरही कधीही पहाणे नाही शक्य.
वसवसून अंगावर येणे , गलिच्छ बोलणे, म्हणजे खेळणे न्हवे. >>>> हिन्दी बिग्ग बॉस मध्ये पण बहुतेक सलमान खान एकदा बोलला होता की आरडा ओरड करणे मोठमोठ्या ने भांडने करने याची काही गरज नसते पण कधी तरी कुणितरी याची सुरुवात केली आणी इतर लोकांना वाटले की असे केल्याने बिग्ग बॉस मध्ये आपण पॉपुलर होतो footage मिळते. म सगळे स्पर्धक अनुकरण करु लागले. आणी तसाच पायंडा पडला हिन्दी बीबी मध्ये. हे सांगून त्याने हितेन तेजवानी चे खुप कौतुक केलेले की तो असे न करता न भांडता आणी चांगली भाषा वापरुन खुप पुढे गेला.
पहिल्या सिझनला राहुल रॉय
पहिल्या सिझनला राहुल रॉय जिंकला, तो ही कधीच आक्रमक नव्हता, वाईट बोलायचा नाही. कुल होता, फार आठवत नाही पण कांड करणारे बाहेर पडलेले लवकर राखी सावंत वगैरे. तो कोण एक भोजपुरी हिरो पण चांगला होता, मराठी छान बोलायचा. जिंदगी झन्डवा, फिरभी घमंडवा हा डायलॉग त्याने फेमस केलेला. मी 2 सिझन follow केले, नंतर नाहीं विशेष.
मग अति भांडणे, मारामाऱ्या सुरू झाल्या तिथे. सोडून दिलं.
हितेन तेजवानी जिंकला का मग?
हितेन तेजवानी जिंकला का मग?
माझा पेशन्स संपतो जेव्हा कोणी ओरडून आणि अर्वाच्य शिव्या देतो.
शिव्या न देता समोरच्याला गार करणं खेळ आहे इथे सुद्धा( बिबॉ)
माधव बोलतो की शांतपणे, तर
माधव बोलतो की शांतपणे, तर त्याला टोमणे मारतात मांजरेकर.
त्यामुळे आवाज चढवण्याशिवाय पर्याय नाही ही धारणा झाली तर त्यात चुकीचं नाही काही.
वैशाली नॉमिनेटेड आहे. परागचं जे काही झालं त्याचा राग व्होटर्सने तिच्यावर काढला, तर ती जाईल. जावी. सुरेखाताई बर्या, पण ती नको.
सुरेखाताई कमी बोलतात, पण जे बोलतात ते एकदम इर्रेफ्युटेबल असतं! त्या एव्हेन्च्युअली जाणार आहेतच, पण त्यांच्या आधी वैशाली जावी.
हितेन तेजवानी जिंकला का मग? >
हितेन तेजवानी जिंकला का मग? >>> त्याला उलट काढला बाकीच्यांनी मिळून असं ऐकलं होतं. बघितलं काहीच नव्हतं.
प्रतिसाद आटले. टीआरपी घटला.
प्रतिसाद आटले. टीआरपी घटला.
परागचे fans बघणार नाहीत कोणी
परागचे fans बघणार नाहीत कोणी आता बहुतेक.
ऋतुजा धर्माधिकारीची जर
ऋतुजा धर्माधिकारीची जर एंन्ट्री होणार असेल.तर ती गेस्ट म्हहणून असण्याची शक्यता आहे जस गेल्या वेळी हर्षदा खानविलकरला आणल होत आठवड्याभरासाठी राजेशला झापायला,तस असेल तर हिला नेमक काय काम देऊन पाठवल आहे बिबॉसने ते माहित नाही
कदाचित तोपर्यंत बिचुकलेंचाक्षसोक्षमोक्ष लागून जमल्यास त्यांना आणता येईल.
अर्थात हा अंदाज आहे.
Pages