Submitted by प्रतिक सोमवंशी on 25 June, 2019 - 03:00
व्हेंटिलेटरवर ती
इसीजी चा टूनग, टूनग आवाज
उरात भीती, घश्यात अडकलेले श्वास
वातावरणात पसरलेला औषधी वास
“वाचेल का हो ?” -मी
.
व्हेंटिलेटरवर - ती
फाटलेले ओठ , रक्ताळलेल शरीर
असंख्य जखमा घेऊन, खचलेला धीर
तशी ती चुरगळुन बिरगळुन टाकलेली
रस्तावर कचऱ्याच्या ढिगाच्या काठी
पण खरच कुणी नाही आज तिच्या पाठी
.
व्हेंटिलेटरवर ती
“डॉक्टर प्लिज वाचवा ना तिला” -मी
कस घडल? कुणी केल? तू कोणते कपडे घातले होतेस?
किती पिलेली होतीस? वगैरे वगैरे
एक इंटरव्ह्यू पाहिजे मला फक्त
थोडा वेळ बोलली तरी चालेल
तेवढाच माझा TRP वाढेल
बाकी रेप बीप काही नवीन नाही
TV वर पाहणाऱ्यांची पण कमी नाही
.
व्हेंटिलेटरवर ती
इसीजी चा टूनग, टूनग आवाज
उरात भीती, घश्यात अडकलेले श्वास
“शीट, आता बॉस घोडे लावणार मला,
आजही वूमन'स डे वरच लिहाव लागेल
©प्रतिक सोमवंशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्रद्याला घरं पाडणारं काव्य..
ह्रद्याला घरं पाडणारं काव्य..
No words for this writing...
No words for this writing...
विवच्छेदक, भेदक
व्यवच्छेदक, भेदक
छान. इथला टीआरपी नक्कीच वाढेल
छान. इथला टीआरपी नक्कीच वाढेल. अशाच कविता लिहा. शुभेच्छा.
धन्यवाद
धन्यवाद
विदारक सत्य. कविता आवडली असं
विदारक सत्य. कविता आवडली असं तरी कसं म्हणू?
लिहित रहा अजून. _/\_