काव्य प्रकार :- त्रिवेणी

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 June, 2019 - 13:01

त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो.
पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिकेसारखी स्पर्श करते आणि त्याचा सम्पूर्ण विषय बदलून टाकते
अश्याच माझ्या काही त्रिवेण्या इथे आपल्या समोर सादर करतो ....
.
त्रिवेणी
.
1) तू गेल्यावर नयनांची रिपरिप चालू होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठतरी आडोश्याला थांबाव म्हणतोय
.
2) इथे कुणी गुलझार ,
इथे कुणी ग्रेस,
मलाच मीपणा नडतोय
.
3) रडताना पहिलीय माय रात्रभर
बाप बरबाद होताना पाहिलाय
कुणी कविता करायला शिकवाल?
.
4) तेरे प्यार की वजह से जिंदा है हम
तू रुठ जाये तो सास थम जाती है
बस एक रुह की जरूरत है ।
.
5) आंधिया चल रही थी बारीश भी भिगा रही थी
पर वो कम्बखत आने का नाम ही नही ले रही थी
काश पहली बस ना छुटी होती
.
6) अधीर मातीवरी कोसळल्या पावसाच्या सरी
मृदगंध तो भावनांचा पसरला हवेवरी
जाताना ती कविता मात्र ठेवून गेली
.
7) पर्वा नव्हती पाय किती लांब चालले
पर्वा नव्हती मागे काय सोडून आलोय
शेवटी दिसलीच विठोबा माऊली मला
.
8) खूप मन लागल होत
खूप काही कळत होत
पण मधली सुट्टी झाली
.
9) रुसलीय ती मी गजल लिहोतोय तर
बोलत नाहीय ती त्रिवेणी गुंफतोय तर
माझ माझ्या कवितेशी भांडण झालाय
.
10) तस खूप कामाच होत ते
परत वापरायचा विचारही होता
पण ते भंगार मी विकून टाकलं
.
11) मस्त तुझ्या हातात हात घालून
सांजेला समुद्रकिनारी फिरत होतो
उगाच आईने लाथ घालून उठवलं
.
12) खूप दिवसांच्या भेटीने तो पुन्हा आला
अशीच एखादी भेट नशिबी असते
मोदक मात्र आवडले हो त्याला
.
13) पुन्हा एकदा गालात हसून बघ
एकदा स्वतःच स्वतःशी बोल
अस पण वेडीच आहेस तू
.
14) तुझ्या अंगाची लय कमाल होती
बांधाही तसा कमनीय होता
रंगच संपले तुला चित्तारताना
.
15) आजकाल तू कुठे दिसत नाहीस
काय माहीत कुठे हरवलेली आहेस
तसही हल्ली स्वप्न कुठे पडतात
.
16) ती काल खूप जोरात कडाडली माझ्यावर
सोबत तिचा बेस्ट फ्रेंड होताच
या विजेच कळतच नाही मला
.
17) क्षितिजावर थोडासा अंधार पसरला होता
एव्हाना मनात ढगांची रेलचेल सुरू झालती
पाऊस आला होता मला भेटायला तू गेल्यावर
.
18) पाऊसात भिजलेला तो पुरता घाबरला होता
भीतीने थरथर कापत दार वाजवत होता
पण चिऊताईने काय लवकर दार उघडलं नाही.
.
19) तो खूप गोड गाणी म्हणायचा
सतत काहीना काही गुणगुणायचा
पण मुका होता म्हणे तो
.
20) तो पुरता गोंधळलेला दिसत होता
नक्कीच काहीतरी बिनसलं असणार
मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणे
.
21) महिन्यांमागून महिने संपत जातात
त्यात कधीच काहीच नवीन नसत
पण आज नवीन कॅलेंडर आणाव लागल
.
22) मी तिला स्पर्श केला
पण तिला जाणवले नाही
मग मी तो फोटो डिलीट केला
.
23) रंगीबेरंगी रंगी फुगे ,भिरभिरणाऱ्या कागदी चकऱ्या
हे पाहिल की अगदी जुनं आठवायला होत
आजकाल बालपण सिग्नलवर सापडत
.
24) पाच वर्षांच त्यांच रेलशनशिप तुटल
तिला जरा वेळग राहायला आवडायच.
तो म्हणाला, मी आई शिवाय राहू नाही शकत
.
25) काही गोष्टी गुंडाळून ठेवून देता येतात
पण कालांतराने त्यांचा गुंता होऊन जातो
असच काहीस हेडफोन्स च्या बाबतीत घडत
.
26) कुणी समोरून हळूच येत
कुणी मागच्या दाराने जात
मी प्रत्येकावर कविता करत बसतो
.
27) थकलेले हरलेले सगळे जमा होतात
स्वप्नांचा पाठलाग करताना जगण सोडून आलेले
हल्ली सिग्नलवर ट्रॅफिक खूपच जाम असते
.
28) तिच्या उश्याला बसून रात्र रात्र जागतो मी
तिच्या अस्तित्वाच्या खुणा दिवसा जगतो मी
हल्ली माझी कविता दिनरात छळत असते मला
.
29) रात्री वाटा किती सुनसान असतात ना
हातातला दगड पण खूप धीर देतो
तू पण तर दगडच होतीस ना
.
30) तसा तो नेहमीच चुकत नाही
चुकलाच तर त्या चूका सुधारत असतो
आयुष्य पण पेन्सिल ने लिहिता आल असत तर?
.
31) कुणीतरी आतून गळा घोटतय
आता श्वास घुटमळायला लागलाय
मला आता लिहावच लागेल
.
32) तू म्हणे मरणाच्या दारातून परतलीस
नक्कीच काहीतरी विसरल असणार
तुझ्या आठवणी राहिल्यात, घेऊन जा
.
33) तिने मला काल कॉफीसाठी ऑफर दिली
पण आमची पाहिलीच डेट रद्द झाली
तिची मैत्रीण म्हणे चहा प्यायला जाऊया का?
.
34) असंतोषाच्या जखमा भरू लागतात
वास्तविकतेचे काटे बोचने कमी होते
जेंव्हा उदरातून गजल जन्म घेते
.
35) आभाळ अफाट आहे
पण अंगण मात्र रितं रितं
सध्या चिमण्या फारश्या दिसत नाहीत

©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू गेल्यावर नयनांची रिपरिप चालू होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठतरी आडोश्याला थांबाव म्हणतोय.

तो खूप गोड गाणी म्हणायचा
सतत काहीना काही गुणगुणायचा
पण मुका होता म्हणे तो

असंतोषाच्या जखमा भरू लागतात
वास्तविकतेचे काटे बोचने कमी होते
जेंव्हा उदरातून गजल जन्म घेते

सगळे लिखाण अप्रतिम. पण कोट केलेल्या कविता मनात उतरल्या.

- माझ्या माहिती प्रमाणे त्रिवेणी हा गुलजारांनीच निर्माण केलेला कवितेचा नवा प्रकार. पुढे नारायण सुर्वे, गदिमांच्या पण त्रिवेणी प्रकारच्या कविता आहेत.

अशा रणरणत्या उन्हातही एकटा नव्हतो मी
एक सावली माझ्या आगे-मागे धावत होती सारखी
तुझ्या आठवणीने एकटे राहूच दिले नाही मला.

- हि माझी आवडती गुलजारांची एक हिंदी त्रिवेणी मराठी भाषांतर शांता शेळके यांनी केलं आहे. माझा आवडता काव्य प्रकार आहे म्हणून आवर्जून ईथे पोस्ट करते ही .

मला हा काव्यप्रकार कधी भावला नाही. कदाचित तीन ओळी वाचणे जमत नसावे.
प्रत्येक त्रिवेणीचा अर्थ मात्र थेट पोचला. खूप सुंदर.

तिने मला काल कॉफीसाठी ऑफर दिली
पण आमची पाहिलीच डेट रद्द झाली
तिची मैत्रीण म्हणे चहा प्यायला जाऊया का?>>> हे हे! चालेल की. Wink