स्वतःशीच बोलायचे राहून गेले ...

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 June, 2019 - 09:52

खूप कमवली धन दौलत
खूप कमवली नाती
खूप जपली माणस आपली
खूप जपल्या आठवणी
खूप मिळाले मित्र नवे
खूप जण साथ सोडून गेले
खूप जगलो सुखात आयुष्य
खूप दुःखही सहन केले
खूप हसलो सुखात
खूप दुःखात रडूनही झाले
पण
पण
या सर्वांशी करार करताना
स्वतःशीच बोलायचे राहून गेले ...
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी खरं.आपण आयुष्यात पुढे जात असताना स्वतःशी दोन क्षणही संवाद साधत नाही.त्यामळे आपण काळाच्या ओघात सर्व सुख पायाशी आणतो पण स्वतःलाच गमावुन बसतो.

Nice