विजयी पताका घेऊन रणांगणावर धावणाऱ्या कर्णा, तुला वाटल होत का रे तूच तयार केलेल्या रक्ताच्या चिखलात म्लान होऊन तीच धरती, जिने आजवर तुझा दिग्विजय पाहिला, हो तीच तुझ्या रथाच चाक जागेवर गिळंकृत करेल? तू अतोनात प्रयत्न करशील पण तुझ्या बाहुत असलेल सगळ सामर्थ्य पणाला लावून देखील ते चाक निघणार नाही? तुला वाटल होत कारे जेंव्हा समोर साक्षात मृत्यू उभा असताना तू इतक्या कसोशीने मिळवलेली विद्या तुला दगा देईल? या शाप अभिशापाच्या खेळात तू फक्त एक कवडी बनून जाशील? खरच जर तू त्या दिवशी सूर्यास्ताला फक्त ते कवच कुंडलांच दान दिल नसतस ना आज इतिहास वेगळा असता रे...ज्या आईने तुला वाळीत टाकल तू तिच्यावर दया न करता ते वचन दिले नसतस तर किती बर झाल असत नाही. असो नियतीचे खेळ.
माझही असच होतय रे, माझ्याकडे नाही राहिली आता कुणाला दान देण्याची दानत, ना कुणावर दया करण्याइतपत दया शिल्लक आहे. मी तुझ्यासारखाच लढतोय रे, एकटा, रोज, अविरत....खरच ते गुंतलेल चाक तुला काढता नाही आल आणि मलाही जमत नाहीय रे. आता वाट बघेल एका कंठभेद करणाऱ्या बाणाची....
कर्णा ssss!
Submitted by प्रतिक सोमवंशी on 16 June, 2019 - 10:37
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Apratim lihilay...
Apratim lihilay...
नटसम्राट
नटसम्राट
सुंदर लिहिलंय!!
सुंदर लिहिलंय!!
ही सर्व दाने कर्णाने दिली
ही सर्व दाने कर्णाने दिली नसती तर खरच आज इतिहास वेगळाच असता पण त्यात कर्णाचे नाव नक्कीच नसते.
खुप सुरेख लिहिले आहे.
सर्वांना मनस्वी धन्यवाद
सर्वांना मनस्वी धन्यवाद
खुपच सुंदर लिहिलंय.आवडलं.
खुपच सुंदर लिहिलंय.आवडलं.
नियतीने उत्तमोत्तम
नियतीने उत्तमोत्तम गुणवैशिष्ट्ये दिलेली असतानाही आयुष्यात अखेर सपशेल हार स्वीकारायला का लागली ह्याचा विचार करण्यासाठी कर्ण ह्या व्यक्तिमत्वाचे उत्तम उदाहरण आहे. चुकीच्या गोष्टींची साथ दिली की हे असेच होणार ! कर्ण असो की रावण .. ते किती विद्वान् किती शुर ह्याला काही अर्थ नसतो. जो श्रीरामाच्या / श्रीकृष्णाच्या विरोधात गेला त्याचा पराजय नक्कीच ठरलेला आहे. त्यामुळे ही कथा वाङ्मय म्हणून ठीक पण कर्णाचे उदात्तीकरण होण्यापेक्षा बोला फक्त... जय श्रीराम !
खुपच सुंदर लिहिलंय.
खुपच सुंदर लिहिलंय.
माझही असच होतय रे, माझ्याकडे नाही राहिली आता कुणाला दान देण्याची दानत, ना कुणावर दया करण्याइतपत दया शिल्लक आहे. मी तुझ्यासारखाच लढतोय रे, एकटा, रोज, अविरत....खरच ते गुंतलेल चाक तुला काढता नाही आल आणि मलाही जमत नाहीय रे. आता वाट बघेल एका कंठभेद करणाऱ्या बाणाची....>>>>sagche ashen hote maybe apn struggles eke karts pn
Success sagala sobat celebrate karto
हिटलरच एक वाक्य आहे,
हिटलरच एक वाक्य आहे,
When you are walking in dark, your shadow also leave you.
जगसुद्धा उगवत्या सूर्याला प्रणाम करत, मावळत्या नाही, मग तो सुर्यपूत्र का असेना!
आवडलं
आवडलं
कर्णाविषयी कितीही वाचलं तरी कमीच
मस्त लिहिलंय... मी लहानपणी
मस्त लिहिलंय... मी लहानपणी आवडीने महाभारत बघायचो आतापण बघतो.मला स्वप्नपण महाभारताचीच पडतात. मीसुद्धा कर्णासारखाच दानी आहे. शाळेत असताना वाढदिवसाच्या दिवशी मी सगळ्यांना चॉकलेट्स दान करचो, कॉलेजात असताना २ रुपयांचे कितीतरी पेन मी दान केलेत.आता कंपनीतपण मी महिन्याच्या शेवटी सढळ हाताने पगार दान करतो. त्यामुळे कदाचित गतजन्मी मीच कर्ण असेल.
गतजन्मी तुम्ही कर्ण नावाच्या
गतजन्मी तुम्ही कर्ण नावाच्या आयडी ने होता का बोकलत?
कर्ण
कर्ण
आवडलं >+११
आवडलं >+११
प्रतिक छान च लिहिलं आहे
प्रतिक छान च लिहिलं आहे तुम्ही !!
शिर्षकात फक्त एक बदल सुचवु का ? ते नुस्तं कर्णा च्या ऐवजी जर त्या पुढे अवग्रह आणि उदगारवाचक चिन्ह देता आलीत तर जास्त छान वाटेल.
कर्णाss !! असं कही सं नाही तर नुसतं कर्णा म्हनजे तो ग्रामोफोन चा असतो ना तो वाटतोय.
कर्णाss !! असं कही सं Wink
कर्णाss !! असं कही सं Wink नाही तर नुसतं कर्णा म्हनजे तो ग्रामोफोन चा असतो ना तो वाटतोय. >>>> किंवा मग कॉन्व्हेंटची मुलं मराठी नाव वाचताहेत अस वाटतं.