कुलदैवत

Submitted by नंदिनी on 24 February, 2012 - 02:29

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.

लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)

http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...

हा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी
(धन्यवाद आस्चिग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

amacha kuldivat tuljapurchi devi ani balaycha khandoba ahe ...adnav kulkarni ahe... mala hey vicharyacha ahe kuldharma kulachar mhanje nakki kay karaycha asta karan mazya lagna madhe adhatalae yenchya hey karan sangitala ahe please guide kara

घाटपांडे घराण्याचे मूळ गाव भावडी, ता. आंबेगाव, जि.पुणे. पुणे नाशिक रस्त्यावर पेठ घाटा जवळ असलेले गाव. तिथून घाटपांडे लोक जवळपासच्या तालुक्यात जुन्नर खेड वगैरे विखुरले. माझे पणजोबा तिथून बेल्हे ता. जुन्नर इथे स्थलांतरीत झाले. आणि आता मी बेल्हे येथून पुण्यात स्थलांतरीत झालो.
कुलदैवत- जेजुरीचा खंडोबा.
माहितीचा स्त्रोत- घरातील धार्मिक वातावरणात मी अनुभवलेले कुलाचार
अवांतर- गावी बेल्ह्याला आमचे राममंदीर आहे तिथे रामनवमी जोमात व्हायची मग आपले कुलदैवत बदलून राम झाले का? असा प्रश्न मला पडे

अवतार, मारुती सारखे देव, दत्त वगैरे कुलदैवत असत नाहीत असे एका गुरुजी नी साम्गितलेले स्मरते. १००% आठवत नाही दत्त पण येतो का त्यात.
़ खखो देजा

आडनाव : विनोद नवले
गाव : हातखंबा
जात : हिन्दु मराठा कुणबी
कुलस्वामिनि माहित असल्यास लिहा.

नुकतंच 'द रुट्स' वाचल्यामुळे या जुन्या धाग्याकडे आवर्जून लक्ष गेलं. लोकांचे प्रतिसाद वाचताना लक्षात आलं की कुलदेवता हे रुट्स शोधण्या/समजण्यासाठी आणि पूर्वजांशी कनेक्ट होण्यासाठी किती महत्वाचा दुवा आहे. यावरून 'तुंबाडचे खोत' कादंबरीचीही आठवण झाली. परागंदा झालेल्या घराण्यातील पुरुषाचे वंशज, कुलदेवता आणि घराण्याचे रीतिरिवाजावरून घराण्याचा इतिहास शोधून काढतात.

7 पाने आणि 200 प्रतिसादात हरिहरेश्वरचा उल्लेख दिसला नाही. हेच आमचं कुलदैवत.

नमस्कार
माझं सासरचं आडनाव नायडू आहे. (तेलगू) . मूळ गाव हैद्राबाद, आंध्र प्रदेश.
गेल्या ५० वर्षांपासून सगळे पुण्यातच स्थायिक आहेत.
पण आमचं कुलदैवत मात्र तुळजाभवानी माता आणि श्री खंडोबा आहे.
खरं तर ते श्री बालाजी असायला हवं.
मी कुटुंबातल्या वयस्कर आणि जाणत्या व्यक्तीला हे असं कसं विचारलं पण त्यांनाही नाही सांगता आलं.
कोणी यावर प्रकाश टाकू शकेल का ?

माझे आडनाव " *रांगणकर* " आहे. या विषयी कोणाला काही माहीत असेल तर प्लिज share करा ...मला आमच्या कुल दैवते बद्दल काहीच माहित नाही. कुणाला इथे माहित असल्यास कळवावे.

श्री राहुल सदानंद साखवळकर , राहणार सातारा , गोत्र-कुत्स , कुलदैवत-श्री लक्ष्मी नरसिंह , वेलिंग गोवा , पालवी-श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी गोठण , वेलिंग गोवा आणी श्री विजयदुर्गा केरी (फोंडा ) गोवा...

मराठी लोकांमध्ये कुलदैवत आहेत, त्यांची उपासना होते, माहिते असते, मला प्रश्न आहे सिंधी लोकांना ना गाव
ना त्यांचं मूळ ठिकाण भारता मध्ये, मग त्यांची कुलदैवत कोण असेलं, जर कोणाला माहित असेलं तर जरूर सांगा, आमच्या घरी सासूबाई दर पूर्णिमेला सत्य नारायणाची पूजा करायच्या मग ते कुलदैवत समजायचं का
जाणकारांनी माहिती दिली तर बरं होईल

@dodo14. >>>
काही सिंधी लोकांचे कुलदैवत हिंगलाजमाता असते. सध्या बलुचिस्थानात आहे. तिथे दरवर्षी यात्रा असते. पाकिस्तानातील काही हिंदू तिथे जातात. विजा मिळाल्यास भारतिय जाऊ शकतात. भारतातही काही स्थाने आहेत, त्या दृष्टीने चौकशी करा. पण पाकिस्तानमधलं ते मूळ स्थान.

सगळ्याच प्रांतांमध्ये, समाजांमध्ये कुलदैवत हा प्रकार नसतो. सिंधी लोकांत कुलदैवत नसावंही.

@dodo14. >>>
काही सिंधी लोकांचे कुलदैवत हिंगलाजमाता असते. सध्या बलुचिस्थानात आहे. तिथे दरवर्षी यात्रा असते. पाकिस्तानातील काही हिंदू तिथे जातात. विजा मिळाल्यास भारतिय जाऊ शकतात. भारतातही काही स्थाने आहेत, त्या दृष्टीने चौकशी करा. पण पाकिस्तानमधलं ते मूळ स्थान.>>>>माझेमन, बघते site वर काही मिळत का, thank you

सगळ्याच प्रांतांमध्ये, समाजांमध्ये कुलदैवत हा प्रकार नसतो. सिंधी लोकांत कुलदैवत नसावंही.>>>जसे मुसलमान लोकांना नसतं need to search

हिंगलाज माता किंवा हिंगुळजा देवी ही राजपूत खत्री, लोहाणा, भावसार, भानुशाली, सोनार वगैरे प्रामुख्याने गुजराती राजस्थानी समाज गटांची कुलदेवता आहे. यात काही महाराष्ट्रीय लोकसमूहही येतात. मरुतीर्थ हिंगलाज ही एक प्रवासावर्णनात्मक कथा बंगाली वाङ्मयात एकेकाळी लोकप्रिय होती. त्यावर याच नावाने एक चित्रपटही निघाला होता. मकारान किनाऱ्याजवळचा प्रदेश वैराण आहे. तिथले म्हणजे मरुभूमीतले तीर्थ(क्षेत्र) म्हणून मरुतीर्थ. हे स्थान बावन्न शक्तिपीठानपैकी एक समजले जाते.

'हिंगलाज मे तुही भवानी,
महीमा अमित न जात बखानी'
या ओळी वाचलेल्या/म्हटलेल्या आहेत. कोणत्यातरी चालीसेतील आहेत बहुतेक.

आमचे कुलदैवत भंकाळ हे आहे. पण हे देवस्थान कुठे आहे याची माहिती नाही.
आडनाव कोलगे, गोत्र कश्यप. कुणाला देवस्थानाची माहिती असल्यास मार्गदर्शन करावे

Hi, Maze sasarche naav Anjali Malap. Gaav - nivaliphata, ratnagiri, mala aamchi kuldaivat mahiti nahi. Kripa karun margdarshan karal ka. Gharat mothe ase sangnaare koni nahi. Evdhe ch mahiti aahe ki nivaliphata, ratnagiri he aamche mul gaav nahi . Aamhi malvanatun ithe stayik zalot. If any information , pl reply me ASAP.

Pages