कुलदैवत

Submitted by नंदिनी on 24 February, 2012 - 02:29

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.

लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)

http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...

हा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी
(धन्यवाद आस्चिग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणस्थ लोकांचे कुलदैवत आंबेजोगाईची देवी कसे काय ? कारण ती तर इकडे मराठवाड्यात आहे.>> हा प्रश्न मलादेखील पडलाय. Happy

आबासाहेब, साता-याजवळ वाठार नावाचे गाव आहे तिथे आहे मुदाईदेवीचे मंदीर. तुम्ही लिहिलेली मुदाईदेवी हीच का हे मला माहित नाही. तशीही वाठार नावाची दोन गावे त्या भागात आहेत, तशा देवीही असु शकतील.

तशीही वाठार नावाची दोन गावे त्या भागात आहेत >>>>> हो, वाठार स्टेशन आणि वाठार निंबाळकर

माझ्या, आत्याचं सासरच कुलदैवत सुळशीची मुधाइदेवी आहे. नावाशी आणि मंदीराच्या वर्णनाशी साधर्म्यामुळे मी तसं विचारले होते.

आमचे कुलदैवत सांगवडे नरसोबा. देवी तुळजाभवानी.. तुळजापूरला जाणे शक्य नसल्यास म्हमदापूरला गेले तरी चालते. कर्नाटकातील म्हमदापूर... http://wikimapia.org/5422094/Mahalaxmi-Temple-Mamadapur

कोकणस्थ लोकांचे कुलदैवत आंबेजोगाईची देवी कसे काय ? कारण ती तर इकडे मराठवाड्यात आहे.>> हा प्रश्न मलादेखील पडलाय >>>>> मै बताती हुं. Happy साबांनी लग्न झाल्यावर कोकणात न नेता अंबेजोगाईला नेलं, हे ही तिकडच्या देवीचे पीठ आहे म्हणून. चालतं म्हणे. Happy
सासर - कोकणातली एक देवी. (केळशी की काय कोण जाणे. इसरले मी. विचारून सांगीन.)
माहेर - परांजपे - अडिवर्‍याची देवी.

माहेर - सोमण : कुलदैवत - कोकणात , सातारड्याचा उभा रवळनाथ ( साटेली गावा जवळ सातारडे हे गाव आहे . खुपचं छान मंदीर आहे )

सासर - गाडगीळ : कुलदैवत - कोकणात , वेळणेश्वर (हे खुप जणांना माहीती असेल , गुहागर जवळ आहे)

माहेर (वानखेडे), कुलदैवत : श्री बिजासनी माता, सेंधवा (म्.प्र)
सासर (मोरे), कुलदैवत: म्हाळसा देवी, चाळीसगाव, जि. जळगाव आणि जेजुरीचा खंडोबा

माहेरची मुळ देवता श्री विंध्यवासिनी माता, विंध्याचल, उत्तर प्रदेश इथे आहे. परंतु दर वर्षी जाणे शक्य नसल्याने तिची स्थापना मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवरच्या सेंधवा जवळील बिजासन घाटात केली आहे. तीच ही बडी बिजासनी माता.

सासरची कुलदेवता म्हाळसादेवी चाळीसगावजवळील ब्राम्हणगाव येथे एका शेतात स्थापना केलेली आहे. मुलाचे जावळ तिथेच उतरवले.

विंध्यवासिनी>>>> अश्विनी के या देवीबद्दल आई पण सांगत असते, मी लहानपणी गेलो आहे देवळात मस्त शांत आणि सुंदर परिसर

आमची कुलदेवी/कुलदैवत अमजाई लीमजाई निमदारी (जुन्नर)आणि रेणुकामाता याबद्दल देवी बद्दल माहिती मिळेल का ?

अजून एक कुलदैवत आणि कुलदेवी (स्त्री /पुरुष) अस काही असत का ?

आबासाहेब, साता-याजवळ वाठार नावाचे गाव आहे तिथे आहे मुदाईदेवीचे मंदीर. तुम्ही लिहिलेली मुदाईदेवी हीच का हे मला माहित नाही. तशीही वाठार नावाची दोन गावे त्या भागात आहेत, तशा देवीही असु शकतील.>>>
वाठार स्टेशनजवळ देऊर या गावात आहे मुदाईदेवीचे मंदीर. खुप छान आहे.

तशीही वाठार नावाची दोन गावे त्या भागात आहेत >>>>> हो, वाठार स्टेशन आणि वाठार निंबाळकर>> वाठार स्टेशन आणि वाठार किरोली.

ओक : व्याडेश्वर आणि अंबेजोगाई , पण गेल्या वर्षीच मला कळलं कि ओकांची कुलदेवता गुहागरची दुर्गा देवी आहे कुणाला महीत असल्यास सांगा.

आडनाव : देसाई
मूळ गाव : गोळवण
कुलदैवत : लक्ष्मीनारायण, वालावल
देवी : माउली, वालावल

हि दैवतं म्हणे बहिणभाउ. मोठ्या बहिणीने धाकट्या भावाला स्वयंपाकासाठी तळ्यावर पाणी आणायला पाठवला. भाउसाहेब तळ्याजवळ कोणीतरी बटाटेवडे करत होते त्या वासाने रमले. बहिणाबाई रागावल्या आणि भावाला तिकडेच रहायला फर्मावलं. म्हणून आधी माउलीचं दर्शन घ्यायचं आणि मग नारायणाच्या दर्शनाला जायची पद्धत आहे. Happy

माझ्या माहितीप्रमाणे कोळिसरेला काणे/विचारे आणि शांडिल्यगोत्रोत्पन्न जोशी यांचे कुलदैवत आहे. मी पुन्हा एकदा कन्फर्म करते मात्र. भावे घराण्याचे कुलदैवत लक्ष्मीकेशव असेल पण दुसर्‍या गावातील असेल. कर्ले, फणसोप अशा गावात देखील लक्ष्मीकेशवाचे मंदिर आहे. मी तरीदेखील पुन्हा एकदा कन्फर्म करते. >>>>

करेक्ट नंदिनी.. जाम कंफ्युजन झालं माझं. आमच भाव्यांच कुलदैवत कोळथरेला असलेला कोळेश्वर आहे.

मी माहेरची शांडिल्यगोत्र जोशी आहे. पण माझ्या आतेसासुबाईंनी सांगितल्याप्रमाणे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. त्या पण शांडिल्यगोत्र जोशीच आहेत. लक्ष्मीकेशव की लक्ष्मीनृसिंह ह्यात अजुन कंफ्युजन आहे मात्र. Happy

महेश, नंदिनी,

>>>> कोकणस्थ लोकांचे कुलदैवत आंबेजोगाईची देवी कसे काय ? कारण ती तर इकडे मराठवाड्यात आहे.>> हा प्रश्न मलादेखील पडलाय. >>>>>

साक्षी१,

>>>>ओक : व्याडेश्वर आणि अंबेजोगाई , पण गेल्या वर्षीच मला कळलं कि ओकांची कुलदेवता गुहागरची दुर्गा देवी आहे कुणाला महीत असल्यास सांगा. >>>>>

मंदार्_जोशी,

>>>> कोकणस्थ लोकांचे कुलदैवत आंबेजोगाईची देवी कसे काय ? कारण ती तर इकडे मराठवाड्यात आहे.>> हा प्रश्न मलादेखील पडलाय >> मला वाटतं गोत्र वेगळं असेल तर असं असतं. >>>

याचे ऊत्तर असे आहे - मुळ देवी गुहागर येथील दुर्गा देवी. जीला कुमारिका मानतात. बर्‍याच कोकणस्थ लोकांची ती कुलदेवता आहे. ती कुमारिका असल्यामूळेच बहुदा तीला इतर देवींना साडी-चोळी नेसवतात तशी न नेसवता परकर-पोलके देण्याची पद्धत असावी. दुर्गादेवी लग्नानंतर सासरी अंबेजोगाईला गेली असे म्हणले जाते. म्हणून दोन्हीही देवी या कुलदेवता मानतात.

आमचे कुलदैवत - गुहागरचा व्याडेश्वर व कुलदेवता - चिपळूणची करंजेश्वरी, गोवळकोट (आडनाव - पटवर्धन)

Vyadeshwar.jpegKaranjeshvari.jpg

कोकणस्थांची देवी मराठवाड्यात कशी? तर परळीवैजनाथ येथील देवाशी देवीचं लग्न ठरलेलं असताना अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणुन देवी रुसुन बसली. Happy देवी बद्दल अधिक माहिती इथे मिळेल. Happy

माझ्या माहेरची... आडनाव -पितळे....देवी-- एकविरा..कार्ला,लोणावळा. देव्--जेजुरीचा खंडोबा.
सासर....आडनाव- क्षीरसागर..देवी--डहाणुची महालक्ष्मी.

कोकणस्थांची देवी मराठवाड्यात कशी? तर परळीवैजनाथ येथील देवाशी देवीचं लग्न ठरलेलं असताना अंबेजोगाई येथे नवरा पसंत नाही म्हणुन देवी रुसुन बसली >>>>>>. करेक्ट.. Happy

माहिती करता चांगला उपयोग होऊ शकेल. हे पुस्तक सापडले. कसे आहे कल्पना नाही. अजुनही अशे स्त्रोत असतील. वर कोणी माहिती संकलीत केली तर बरे होईल. एखाद्या नकाशावरही सर्व स्थाने टाकता यायला हवी.

http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%A7...

माहेरची देवी सप्तश्रिंगी. वणी, नाशिक (कुलकर्णी)

हे ठिकाण गडावर असल्याने पायर्‍या भरपूर आहेत आणि अशी आख्यायिका आहे की एकदा चढायला सुरवात केली की मागे वळून पाहायचे नाही. माकडेही या ठिकाणी खूप दिसतात. प्रसाद वगैरे पळवतात फार. शक्यतो हातात त्यामुळे काही ठेवू नये.

सासरचे कुलदैवत - लक्ष्मी-नरसिंह शूर्पाली, कर्नाटक (बादरायणी)

इथे जायला नदी पार करावी लागते. उन्हाळ्यात गेलात तर पाणी आटलेले असते मग चालत पण पलीकडे जाऊ शकतो. या देवाचे सोवळेओवळे भयंकर कडक असते. तुम्ही साडी, उपरणे देवासाठी जे द्याल ते पहिल्यांदा गुरूजी धूतात, उन्हात वाळवतात आणि मग देवाला नेसवतात. अभिषेक करतात. तिथे जेवण वगैरे तिथे पुरुष आचारी बनवतात आणि वाढतातही. इथे मिळतो तो भात आणि भातच. भाजी भात, ताक भात, कोशिंबीर, गव्हाची खिर असा साधारण प्रसाद मिळतो.

वडिलांचे आडनाव - राऊळ
गाव - सांगेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
कुलदैवत - गिरोबा आणि सातेरी देवी. गिरोबा देवाची आख्यायिका आहे- दरवर्षी होळीला/ शिमगाला फणसाच्या झाडाच्या बांधापासून देव बनवतात आणि जुना देव मागे देवळाच्या रानात ठेवतात. दुसर्या दिवशी जाऊन देव मोजले की २१ देव असतात. दरवर्षी हि संख्या कायम राहते. एक देव काशीला जातो अशी आख्यायिका आहे.

आईचे आडनाव - गावडे
गाव - चौकुळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
कुलदैवत - सातेरी देवी.

बायकोच्या वडिलाचे आडनाव - परब
गाव - वराड, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
कुलदैवत - वेताळ

बायकोच्या आईचे आडनाव - सांवत
गाव - कट्टा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग
कुलदैवत - सातेरी देवी

आमचं कुलदैवतः
१. श्री सप्तकोटेश्वर - नार्वे, गोवा. (छ. शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला)
२. श्री महाकाली - आडिवरे, राजापुर, रत्नागिरी. (देवळाच्या आवारात पुर्वजांनी उभारलेलं तुळशी वृंदावन आहे)

आजोळ: रावराणे - सांगुळवाडी, जिल्हा बहुतेक कोल्हापुर किंवा सिंधुदुर्ग. कुलदैवत आठवत नाहि; कोणी सांगु शकेल का?

आस्चिग, तुझी आयडीया आवडली. कुणाला असे स्थाने मार्क करणे जमेल का? एक डाटाबेस तयार करून ठेवावा.

वरदा, प्लीज एखाद्या घराण्याचे कुलदैवत कशावरून ठरत असावे हे सांगू शकशील का?

अमृता, मी आज कोळिसरेला फोन लावून चौकशी करणार होते. Proud नशीब, तू पोस्ट टाकलीस.

जे कोकणस्थ कोकणातून बाहेर पडून घाटावर गेले व तिथेच स्थायिक झाले त्यानी अंबेजोगाईला आपले कुलदैवत मानले असे मला समजले आहे. नक्की माहित नाही. पण पूर्वीच्या काळच्या वाहतुकीच्या सोयी बघता आणि कोकणात उतरणे अवघड असल्याने हे खरे असू शकेल.

अशीच एक गंमत सांगते. रत्नागिरीमधे मिर्‍या म्हणून एक गाव (मिर्‍या बंदरदेखील आहे) आहे. त्या गावातले सावंत भगवतीला आपली कुलदैवत मानत होते. मात्र, त्यांच्यापैकी एकाच्या घरामधे जुने काही कागदपत्रे सापडले. त्यानुसार ते कर्नाटकातील बदामीच्या जवळपासच्या गावातून कोकणात काही शतकापूर्वी आले. व त्यांच्या कुलदैवता बदामीची बनशंकरी आहे असे समजले. त्यानंतर त्यानी दरवर्षी बदामीला जाण्याचे ठरवले. व ते जातातदेखील. तसेच ते भगवतीला आणि बनशंकरी दोघानाही आपले कुलदैवत मानतात.

नंदिनी, हा दूवा मी तयार केला आहे:
http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...

इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी

नमुन्यादाखल मी केश्विनीच्या अंबेला पहिला नंबर दिला आहे.

(वरदा, असेच नकाशे इतर गोष्टींकरता बनवायला हवे - मदत हवी असल्यास सांग)

Pages