कुलदैवत

Submitted by नंदिनी on 24 February, 2012 - 02:29

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.

लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)

http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...

हा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी
(धन्यवाद आस्चिग)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे आडनाव : सावंत आणि मुळगाव : कुणकेरी (सावंतवाडी)
मला आमचे कुलदैवत माहित नाही.
कोणाला माहिती असल्यास कृपया कळवावे.

माहेर चे नाव प्रिया पोरे
कुलदैवतः म्हसवड चा सिद्धनाथ
Sidhhanath_and_Jogeshwari.jpg
देवी : यमाई देवी औंध सातारा
aundh_yamai03.JPG

सासर :प्रिया उपकारे
कुलदैवतः जेजुरी खंडोबा
देवी :एकविरा देवी पाथर्डी

माझ्या माहेरचे कुलदैवत कोल्हापूरचा जोतिबा. (बेरडे - ता. शिराळा, जि. सांगली)
सासरचे कुलदैवत पालीचा खंडोबा. (पोळ - ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर)

मझ नाव : विराट पवार
मि ९६ कुली हिन्दु मराठा आहे
मला आमची कुलदेवी माहीत नाही. कुणी जाणकार कुलदेवी कोण व ती सान्गु शकेल का?

आमचे कुलदैवत भैरिभवानि आहे. मुळ्गाव- लान्जा. ( देसाई, ९६ मराट्।आ)
भैरिभवानीची अनेक देवळे आहेत. त्यामधील आमच्या कुलदैवताचे देऊळ कोणते आहे ह्य्यची माहिती कशी मिळेल?

माझे माहेरचे आडनाव 'भावे' आहे. कुलदेव- कोळेश्वर (कोळथरे) आणि कुलस्वामिनी- श्री योगेश्वरी (अंबेजोगाई).

सासरचे आडनाव 'केळकर' आहे. कुलदेव- सोमेश्वर (सोमेश्वर, रत्नागिरी) आणि कुलस्वामिनी- श्री बंदिजाई (ढोकमळे-नेवरे, रत्नागिरी). सासरी पूजेत टाक 'श्री महालक्ष्मी' देवीचा आहे आणि नवरात्र तिचे करतात.

आमच्याकडे गौरी नसतात (वाघाने पळवल्या असे सांगतात स्मित ). पण एक मला लागलेली तर्कसंगती म्हणजे आमची देवी कुमारिका आहे. आणि गौरी हा देवीला माहेरी आणण्याचा सण. मग जिचे लग्नच झालेले नाहीये तिला कसे आणायचे माहेरी? हे कारण असू शकेल>>>>>>>>>>> माधव ....... तुमच कुलदैवत देवी हसोळ(अडिवरे) ची आर्यादुर्गा आहे का???? Happy

छान धागा आहे .
माहेरची आर्यादुर्गा ( हसोळ , राजापूर जवळ ) , धूतपापेश्वर .
धूतपापेश्वर चा परिसर छान आहे. खूप पूर्वी गेले होते .
सासरची माहुरची रेणुका ( रेणुकेचे जुन्नर जवळ निमदरी येथे स्थान आहे . तिथे जातो . )
नळदुर्ग चा खंडोबा ( तिथे अजून कधी गेले नाही. ) कोणाला माहित आहे का कुठे आहे हे नळदुर्ग? बहुतेक south ला आहे.

माहेरचे आड्नाव देशपांडे कुलदैवत मंगेश(प्रियोळ) आणि महालक्ष्मि.(फोन्ड्याजवळ)गोवा.गोवा पर्यटन क्षेत्र त्यामुळे मन्गेशी बहुतेकाना माहित असत. मंगेशकर फॅमिलिमुळेही प्रसिद्ध. फोंडा- पणजि मार्गावर आहे.
सासरचे आड्नाव तिर्थळी तिर्थहळ्ळी या गावाच्या नावावरुन.मुळ आडनाव पै असल्याचे सांगितले जाते.महालसा आणि सींह्पुरुष. दोन्हि म्हार्दळ गोवा. म्हार्दळ फोंडा- पणजि मार्गावर आहे.मंगेशी पासुन चालत जाण्याच्या अंतरावर.आम्ही बहुतेक दरवरषी दर्श्नाला जातो सर्व सोयी छान आहेत. रविवारची पालखी पाहण्यासारखि.

या धाग्याची कल्पना छान आहे.

श्री करंजेश्वरी देवी

आडनाव : पटवर्धन
कुलदैवत : श्री करंजेश्वरी, चिपळूण

DSCN4159.JPG

चिपळूण हे मुंबई-गोवा हायवेवरील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिपळुणला परशुरामाचे पुरातन काळी बांधलेले मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात भगवान परशुरामांच्या भूमीत वाशिष्ठी नदीच्या तिरी गोविंदगडाच्या पायथ्याशी गोवळकोट येथे श्री देव सोमेश्वर व देवी करंजेश्वरीचे भव्य मंदिर आहे. अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी म्हणून करंजेश्वरी देवी प्रसिद्ध आहे. चिपळूण पासून जवळ सुमारे 4 किलोमीटरवर असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान असून मंदिर अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे . गोवळकोट किल्ल्यामध्ये रेडजाई देवीचे स्थान आहे. देवीच्या समोर सोमेश्वर महादेवाचे स्थान आहे. पटवर्धन, दीक्षित आडनावाच्या लोकांची ही कुलदेवता आहे. तर गुहागर येथील व्याडेश्वर कुलदैवत आहे.

कथा : करंजेश्वरीचा शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठी गर्दी असते. जागृत व पवित्न देवस्थान म्हणजे श्री देवी करंजेश्वरी. शहरातील पेठमाप गोवळकोट भागातील ग्रामस्थांचे हे ग्रामदैवत आहे. पूर्वीच्या काळी एका करंजीच्या झुडपात ही देवी प्रकट झाली. म्हणून तिला करंजेश्वरी असे नाव पडले. ती ज्या झुडपात प्रकाट झाली, तेथील जागेला शिंगासन असे म्हटले जाते. प्रकट झाल्यानंतर देवीने एका कुमारिकेला हळद-कुंकू आणण्यास सांगितले. कुमारिका हळदी-कुंकू आणण्यास गेल्यानंतर देवी अदृश्य झाली. ती पुन्हा गोवळकोट येथे प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन तिने सांगितले की, करंजीच्या झुडपात नाकातील मोती अडकला आहे. तो घेऊन या. त्यानुसार तेथे मोती सापडला. ही घटना 300 ते 350 वर्षांपूवीर्ची आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे या देवीचे कुलभक्त आजही करंजीचे तेल वापरत नाहीत.

किल्ल्यात सध्या वस्ती नाही. सागराकडून येणारा व्यापारी मार्ग या खाडीतून येत असल्याने चिपळूणला बंदर म्हणूनही महत्त्व प्राप्त झालेले होते. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी खाडीच्या मुखावर अंजनवेलचा गोपाळगड तर खाडीच्या आतील भागात चिपळूणचा गोवळकोट हा किल्ला उभारला गेला. गोवळकोट खाली बहुतांश मुस्लिम वस्ती आहे. उत्सवात सोमेश्वर व करंजेश्वरीच्या पालख्या मशिदीजवळ जातात. तेथे मुस्लिम समाजातील मानक:यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते. त्यानंतर होळी लावली जाते. पालखी गोविंदगडावर रेडजाई देवीच्या भेटीसाठी जाते. तेथे जगताप यांच्या हस्ते देवीची पूजा होते. हजारो महिला खणा-नारळाने देवीची ओटी भरतात आणि नवास बोलतात. नवसाला पावणारी देवी असा करंजेश्वरीचा लौकिक आहे. येथे राहण्याची सोय आहे. फक्त नवरात्रत जागा उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करूनच मुक्कामाला जायला हवे. शक्यतो नवरात्रत जागा मिळणो कठीण असते.

चित्पावन ब्राह्मण घराण्यांमध्ये जास्तीत जास्त घराण्यांचे कुलदैवत हे गुहागर येथील समुद्रतीरी श्री क्षेत्र व्याडेश्वर होय. व्याडेश्वरला शंकराचे मंदिर आहे. गुहागर गावामध्ये बस स्टँडचे जवळच हे मंदिर आहे. देवळाभोवती प्रशस्त व स्वच्छ जागा आहे. येथे निवासाची सोय आहे. या मंदिराचे वार्षिक उत्सव हे त्रिपूरी पौर्णिमा व महाशिवरात्र आहे. मंदिराच्या मागे पाच मिनिटांवर समुद्रकिनारा असून नारळी पोफळीच्या बागा आहेत.

अधिक फोटो : http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_14.html

कोणाला माहित आहे का कुठे आहे हे नळदुर्ग? बहुतेक south ला आहे.>> एक नळदुर्ग सोलापुरच्या पुढे आहे.
बहुद्धा, आंध्रप्रदेश मध्ये येत असावे. तिथे भुइकोट किल्ला आहे.

फेरफटक, सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.

सासरचे आडनाव 'केळकर' आहे. कुलदेव- सोमेश्वर (सोमेश्वर, रत्नागिरी) >>> अन्जू, कधी कुलदैवताला आलात की आमच्याकडे अवश्य या. आमच्या घरापासून फार जवळ आहे हे मंदिर. याचे फोटो मिळाले तर इथे टाकले. अगदी शांत आणि जुन्या पद्धतीनं बांधलेलं सुंदर देऊळ आहे. आम्ही बर्‍याचदा जात असतो.

सासरचे आडनाव 'केळकर' आहे. कुलदेव- सोमेश्वर (सोमेश्वर, रत्नागिरी) > अन्जू हे राई चे सोमेश्वर मंदीर का? आमचे ही कुलदैवत तेच आहे. देऊळ खरोखर सुंदर आहे.

नंदिनी धन्यवाद, सध्या तू चेन्नईला आहेस ना.

राई हे गावाचं नाव आहे का सामी? आमच्या कुलदेवाचे सोमेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील 'सोमेश्वर' नावाच्या गावातच आहे.

सोमेश्वर गावातच एका झाडाखाली भैरीदेवी आणि आमची कुलदेवता बंदिजाईपण आहे असे म्हणतात आणि ढोकमळे येथे मंदिर आहे बंदीजाईचे. सर्व मूळ केळकर हे सोमेश्वर आणि ढोकमळे येथील आहेत मग ते कुठे कुठे गेले असे म्हणतात.

आमच्या कुलदेवाचे सोमेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील 'सोमेश्वर' नावाच्या गावातच आहे.> अच्छा. कारण मी सांगितलेले सोमेश्वर मंदीर राई या गावात आहे. तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. भातगावच्या पुलावरून जावे लागते.

माझे माहेरचे नाव कुलकर्णी. कुलस्वामिनी तुळजापुरची तुळजाभवानी आणि कुलदेव जोतिबा.
सासरचे आडनाव जोगदेव (मुळ बर्वे). कुलदेव- कोळेश्वर (कोळथरे) आणि कुलस्वामिनी- श्री योगेश्वरी (अंबेजोगाई)

कुलदैवत :- श्री ज्योतिबा उर्फ दक्षिण केदार, श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी, जिल्हा कोल्हापुर

कुलदेवी :- श्री यमाई, संस्थान औंध, जिल्हा सातारा

माझ माहेरच आडनाव 'मायी ' कुलदैवत ' त्र्यंबकेश्वर ' कुलस्वामिनी ' माहुरची ' रेणुका माता '. सासरच आडनाव ' देशपांडे ' कुलस्वामिनी ' पैठणची देवी. ही खांबातुन प्रगटली आहे. फारच तेजस्वी आहे. जाग्रुत देवस्थान आहे.

मेघ तुम्ही कुठल्या गावचे आहात हे ठाउक आहे का तुम्हाला? माझ्या माहेरचे आडनाव दांडेकर आहे.. कुलस्वामिनी ही दापोलीजवळील मुरुड येथील दुर्गादेवी आहे आणि कुलस्वामीच्या बाबत थोडा संभ्रम आहे.... काही दांडेकरांच्या मते आपला कुलस्वामी हा कोळिसर्‍याचा लक्ष्मीकेशव आहे तर काहींच्या मते आसुदजवळील केशवराज हा आपला कुलस्वामी आहे.. माझ कोकणातल माहेर दापोलिजवळील गुडघे या गावी आहे..

Actually we are confused for both " Kuldaiwat" and our Surname because the surname " Dandekar" is common in both Konkanasth and other community. So anybody please help and do write for "Dandekar".

मुग्धा तुमच्याकडे कुलस्वामी तर आमच्याकडे सासरी केळकर कुलस्वामिनीच्या बाबतीत नक्की काय ते कळत नाही म्हणजे सोमेश्वरला झाडाखाली भैरीदेवीबरोबर आमची कुलस्वामिनी बंदिजाई आहे असं कोणी म्हणते तर बरेच जण ढोकमळे गावात तिचं मंदिर आहे तिथे ती विष्णूच्या पायाशी बंदी झालीय ती मानतात.

गावाला आमच्या पूजेत मात्र कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा टाक आहे त्याचे नवरात्र करतात.

त्यामुळे मी मध्यम मार्ग काढलाय, मी माहेरची देवी म्हणून योगेश्वरी तसेच सासरची म्हणून महालक्ष्मी आणि बंदिजाई सगळ्यांचेच करते.

Pages