प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.
इथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.
लिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)
http://maps.google.com/maps/ms?ie=UTF&msa=0&msid=203739402596125295695.0...
हा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात
नोंद करतांना
(१) नकाशात जागा शोधावी
(२) EDIT वर ई-टिचकी मारावी
(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे
(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)
(५) Title मधे जागेचे नाव लिहावे
(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे
(७) OK वर ई-टिचकी मारावी
(धन्यवाद आस्चिग)
I am sorry pan Aai la ani
I am sorry pan Aai la ani aamchya Annanana ( Aai Baba) pan mahit nahi.Pahilanda Goa la gele Shantadurgechya mandirat tar tikde eka Mavshine sangitale ki bagha Kadachit Shri Shantadurga tumchi Kulswamini asel. Khup confuse aahe dont know what to do with it.
मेघ, तुम्ही कोकणस्थ आहात का?
मेघ, तुम्ही कोकणस्थ आहात का? नसल्यास, इतर कुठल्या कम्युनिटीमधले आहात?
कोकणस्थांचा एक कुलदैवतांची लिस्ट केलेली आहे, त्यामध्ये असलयस बघून सांगता येईल. इतर कम्युनिटी असल्यास मी त्याप्रमाणे चौकशी करेन. कृपया गैरसमज नसावा.
please mala kahi gairsamaj
please mala kahi gairsamaj nahi aahet. Gairsamaj aahet te Deva baddal ani Caste baddal. Acutually aamche baba Tambat kam karyache mhanje Tambya Pitlechi bhandi banvayache. Pan gharat saglya riti bhati bhramnanchya aahet even aamhi saglya including my parents are fair with light brown eyes and still pure vegetarian. Tambat kam karayache mhanun aamchi caste " Tambat" ase kahi jan sangtat. Tambat samajachi Devi Mhanje Shri Mahakali. Tichi hi pooja hote.
Tar asa sagla gondhal aahe. krupa karun kahi prakash taklat tar far barre hoil
माझे माहेरचे अडनाव
माझे माहेरचे अडनाव पाटील
कुलदैवत - जेजुरीचा खंडोबा
कुलदेवी - तुळजापुरची भवानीमाता
सासरचे अडनाव - पवार
कुलदैवत - वामन (विष्णुचा पाचवा अवतार)
७-८ वर्षापुर्वी घरात कुणालातरी काहीतरी त्रास झाला तेव्हा कुलदेवत शोधणे सुरु झाले तेव्हा सासर्यांना माहिती कळली की नगर मध्ये कुणीतरी लांब-लांबचे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे कुलदेव पुजले जातात तेव्हा सगळे तिकडे गेलेले तेव्हा समजले की वामनावतार हा आमचा कुलदैवत आहे. तिथे टपरीवजा एक मंदिर आहे तिथे चांदीच्या प्रतिकृती आहेत त्या पुजल्या जातात दर पाडव्याला सगळे घराणे तिथे पुजेसाठी येते. फक्त एव्हढीच माहिती आहे.
तर वामनावतारचे महाराष्ट्रात मंदिर कुठे आहे हे कुणाला माहित आहे का?
कुलदेवी - सौंदतीची यल्लमा (बेळगाव)
ह्या देवीबद्दलपण मला ४ वर्षापुर्वी समजले. ज्याने सांगितले त्याने स्वतः अंबाबाई व यल्लमाचे मंदिर बांधले आहे त्यामुळे त्याच्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे तरीही मी मनापासुन या देवीची पुजा करते व मला चांगली प्रचितीही आली आहे. आम्ही एकदा सौंदतीला जाऊनही आलोय.
कोणी मला मदत कराल का ?? माझं
कोणी मला मदत कराल का ??
माझं नाव शैलेश आहे आणि आडनाव गांवकर आहे ( ९६ कुली हिन्दु मराठा )
कोकणातला सावंतवाडी मध्ये इन्सुली हे माझे गांव आहे
मला आमची कुलदैवत माहित नाहे ,,तरी विनंती आहे कोणी मदत कराल का ?
कुलदैवता कशी माहित करून घ्येयाची ते ..
नाव - विशाल भोसले (९६ कुली
नाव - विशाल भोसले (९६ कुली हिन्दु मराठा) , गाव - किणी , कोल्हापूर जिल्हा
कुलदैवत - खंडोबा पालीचा (सातारा जिल्हा )
बिटेल, कुलदैवत माहीत नसल्यास
बिटेल,
कुलदैवत माहीत नसल्यास :
श्री कुलदेवतायै: नम: ।
हा जप श्रद्धापूर्वक करावा. मनातल्या मनात केला तरी चालतो. बिछान्यात पडल्यापडल्या केला तरी चालतो. केव्हाही केलेला चालतो.
पुढे काहीतरी सूचक चिन्ह मिळतं.
शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
कर्हाडे ब्राह्मण समाज तसेच
कर्हाडे ब्राह्मण समाज तसेच इतर अनेक ज्ञातीतील लोकांचे कुलदैवत असलेल्या पाली-रत्नागिरी येथील श्री लक्ष्मीपल्लिनाथ या देवतेचे नवीन मंदिर पाली पासून 5 किमी, गोवा हायवे वर मठ ,तालुका लांजा या गावी बांधण्यात आलेले आहे . या नवीन मंदिरात श्री लक्ष्मी ,पल्लीनाथ व गणेश मूर्तींचा तीनदिवसीय पंचकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला . दिनानिक 27 ते 29 मार्च दरम्याने प्रतिष्ठापना महोत्सव ,तर दि. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्याने वार्षिक चैत्रोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे.
माझे माहेर चे आडनाव अनगळ आहे
माझे माहेर चे आडनाव अनगळ आहे .कुलदेवता व कुल्देवि चि महिति हावि आहे .
कोक्नस्थ ब्रम्हन असल तर
कोक्नस्थ ब्रम्हन असल तर कुलदैवत - आजित patwardhan yanche pustak aahe ,,, tyat sagali mahiti aahe ...
koknastan chi ... its worth reading ...
jarur wacha
गामा_पैलवान_५७४३२ तुमचे खुप
गामा_पैलवान_५७४३२
तुमचे खुप खुप आभार !
नक्की ..सुरवात करणार ...
माझे माहेर च आडनाव गानू देवी
माझे माहेर च आडनाव गानू देवी मुरुड दापोली ची दुर्गा देवी
सासरचे आडनाव मेहेद़़ळे कुलदैवत लक्ष्मीकेशव कोळीसरे रत्नागिरी
देवी मुसळादेवी मालगुड
अनुस्वार कसा द्यायचा
hi all ,मला एक मदत हवी आहे
hi all ,मला एक मदत हवी आहे .
माझे लग्ना नंतर चे आडनाव ' पांडे '(दे .ऋ .) आहे . साधारणपणे नागपूर किवा अकोला side चे साबां आणि सासरे आहेत पण नोकरी मुळे पुणे मुंबई इथे वास्तव्य.
काही कारणाने किवा कौटुंबिक वादामुळे आम्हाला आमचे कुलदैवत (देव आणि देवी ) माहित नाही
साबा एकदा म्हणतात कि माहूर ची रेणुका देवी ,परत दुसर्या वेळी म्हणतात अमरावती ची आंबा देवी. त्यानंतर परत कोणत्या तरी वेगळ्या देवीच नाव घेतात .
कुलदेव कोण आहे हे पण माहित नाही . आणि कुलधर्म आणि कुलाचार पण माहित नाहीत
इथे कोणी help करू शकेल का ??
केपि, याच पानावर गापैंनी
केपि, याच पानावर गापैंनी दिलेला उपचार करून पाहाणार का कृपया?
योकू , नक्कीच हा उपाय मी करेल
योकू , नक्कीच हा उपाय मी करेल :)प्रतिसादाबद्दल धन्यवाद
पण ,इथे group जर कोणी विदर्भ side असल्यास देव आणि देवी चे संदर्भ मिळाले असते तर अजून बरे झाले असते .
शनिवार-रविवार कुलदेवतेचे
शनिवार-रविवार कुलदेवतेचे दर्शन घेउन आलो...
अलाई-मलाई-सुलाई अशी पूर्वीची नावे ऐकली होती.. जी आता गायत्रीदेवी-मनुबाई-एकवीरादेवी अशी सांगितली जाताहेत.
मंदीर तापी नदीच्या काठी बोहरे ह्या गावाच्या वेशीवर आहे. हे गाव अमळनेर वरुन १५ किलोमीटर वर आहे. मंदीराच्या बाहेर वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे. आतमधे तीन देवींच्या मूर्ती वर बरोबरीने गणपतीची मूर्ती आहे.. सर्व मूर्ती दगडातील आहेत.
पुण्याहून जाण्याचा मार्ग - पुणे - नगर - शिर्डी - मनमाड - मालेगाव - धुळे - अमळनेर - धार - मारवाड - बोहरे गाव.
गावात काहीही सोयी नाहीत तसेच अमळनेर मध्ये सुद्धा विशेष काही नाही.. जेवणाची व रहायची सोय धुळ्यातच होऊ शकते..
मी माहेरहुन 'देव'
मी माहेरहुन 'देव' (दे.यु.ब्रा) आणी सासरहुन 'दिक्षित' (दे.यु.ब्रा)
कुलदैवत :मोहीनीराज नेवासा( ता.जि. नगर) विश्नुचा मोहिनी अवतार.
भारतात एकमेव मदिर आहे. पण कुलदेवि बद्दल माहीती नाही. कदाचित हे देवाचे स्त्रि रुप असल्याने आसावे.
ता.क. हे कुलदैवत असणारे नाशिक, नगर भागातिल लोक आहेत.
अश्विनी ते मोहिनीराज मंदिर
अश्विनी ते मोहिनीराज मंदिर आम्ही बघितलं आहे. श्रीरामपूरमध्ये होतो तेव्हा गेलो होतो.
@केपि..(केपि न्ची पोस्ट
@केपि..(केपि न्ची पोस्ट जुनीये...उत्तर वाचतील का?असुदे आणख़ी कुणाला उपयोगी पडेल)
पांड्यांन कडे ..माझी १ बहिण आहे..ते अमरावतीचे आहेत.
अमरावती जवळील... मार्कि गावातील मार्किनाथ महाराज हे कुलदैवत व महालक्ष्मी (बहुतेक को.पुर) ही कुलदेवता आहे.
कुळधर्म-कुळाचार माहीती हवी असेल तर..कृपया विपु करावी.
निल्सन, वामनावताराला
निल्सन,
वामनावताराला त्रिविक्रम असे दुसरे नाव आहे. आणि त्रिविक्रमाचे एक मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर येथे आहे. हे एक अतिशय जुने आणि पुरातत्त्व शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे मंदिर आहे. कारण मंदिरबांधणीवर बौद्ध मंदिरस्थापत्याचा ठळक प्रभाव आहे. म्हणजे ब्राह्मणिकल(हे मंदिरशैलीचे एक नाव आहे. जातिवाचक नाही.) मंदिरांचे बांधकाम नुकतेच उदयाला येत होते त्या काळात हे मंदिर बांधले गेले. तेव्हा बौद्ध चैत्य-स्तूप शैली प्रचलित होती. आणि हे विष्णुमंदिर त्याच प्रकारचे आहे.या मंदिरात गाभार्यापाशी अंधार असतो. कारण गाभारा म्हणजे एक मोठा अॅप्सायडल घुमट आहे. असे सांगतात की कोणा राजाच्या नजरेला मूर्ती पडू नये म्हणून मुख्य मूर्तीसमोर एक भिंत बांधली आणि एक छोटी मूर्ती भिंतीलगत अॅप्साय्डल स्तूप आकाराच्या बाहेर ठेवली. नंतर पुढे ती भिंत तोडली. तिच्या खुणा अजूनही दिसतात. कालांतराने हे मंदिर महाकाळाचे आणि कालीचे म्हणून प्रसिद्ध झाले. पण हे प्राचीन असे त्रिविक्रमाचे मंदिरच आहे. आपण नि:शंक मनाने या त्रिविक्रमाचे दर्शन घ्यावे, जरी आज गावकरी त्याला महाकाळ आणि काली म्हणत असले तरी. ह्यात आकाशात पाय उगारलेला भव्य त्रिविक्रम, मस्तक झुकवून बसलेला बळिराजा, डोळा फुटलेले शुक्राचार्य हे सर्व बारकाईने पाहिल्यास दिसू शकते. गावकर्यांना मात्र यातले काहीच माहीत नाही.
trivikram temples टाइप केले तर आणखी काही देवळांचे फोटो गूगलवर दिसतील. बहुतेक दक्षिण भारतातले आहेत.
ज्यास आपली कुलदेवता माहीत
ज्यास आपली कुलदेवता माहीत नाही त्याने आपल्या पूर्वजांची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी करून आपल्या कुळाचे दैवतांविषयी माहिती देण्याची कळकळून प्रार्थना करावी. कुठून ना कुठून तरी माहिती मिळेल. कदाचित स्वप्नात पण मार्गदर्शन मिळेल. आपल्या पूर्वजांना आपल्याला मार्गदर्शन करणे नक्कीच आवडते. कारण तुम्ही त्यांचेच अंश आहात.
(No subject)
माझं सासर देवगड तालुक्यातील
माझं सासर देवगड तालुक्यातील मुणगे,सासरचे पूर्वज इथे कधी राहायला आले माहित नाही,दोन ते तीन पिढ्या गेल्या असतील,आता जिवंत असलेल्यांपैकी कोणालाच ही माहिती नाही,गावच्या घरात जुनी कागदपत्र सापडली त्यात आमच आडनाव गुरव आहे,ते कोणी कधीपासून आणि का बदललं तेही कोणाला माहित नाही,आता आमच नाव परब आहे,मुळ गाव नाहित नाही,त्यामुळे कुलदैवत माहित नाही,,शोध कुठुन आणि कसा करायचा माहित नाही,पूर्वजांपैकी काहीजण दुसर्या गावात राहायला गेली असं सांगतात,जर त्यापैकी कोणाला हा मेसेज वाचण्यात आला तर त्यांनी किंवा इतर कोणाला ह्याविषयी काही माहिती असल्यास त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं
ज्यांना कुलदैवत माहित नाही
ज्यांना कुलदैवत माहित नाही त्यांनी अंबाबाई कुलदैवत मानावी. अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी.... आदिमाता. हिच्यातच सर्व दैवतं विलीन झालेली आहेत. किंवा तिचंच रूप सप्तशृंगीही आहे.
माझं गाव : नरडवे.
माझं गाव : नरडवे.
तालुका : कणकवली
जिल्हा : सिंधुदूर्ग
आमचे कुलदैवत : श्री विजयादुर्गा, केरी फोंडा, गोवा.
फोटोंसाठी येथे पहा.: http://www.maayboli.com/node/34276
तुम्ही गावाच नाव नरवडे लिहिलं
तुम्ही गावाच नाव नरवडे लिहिलं पण तुमचं आडनाव नाही लीहीलं,कसं समजायचं कोणाची कुलदेवता आहे,
तुमचं आडनाव नाही लीहीलं,>>>>>
तुमचं आडनाव नाही लीहीलं,>>>>>>>>.मुंडले!
आभारी आहे
आभारी आहे
आडनाव :पात्रुडकर
आडनाव :पात्रुडकर
मूळगाव :बार्शी जिल्हा सोलापूर
कुलदैवत :श्री लक्ष्मी नृसिंह श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूर नीरा भीमा संगमस्थान
कुलदेवी:तुळजाभवानी तुळजापूर
आमच्या बार्शी कडे अनेक लोकांचे हेच कुलदैवत आहे
माझ्या माहेरचे (कुलकर्णी
माझ्या माहेरचे (कुलकर्णी ,काश्यप गोत्र ) कुलदैवत श्री खंडोबा - मैलार, खानापूर जवळ , कर्नाटक आणि
सासरचे (सुकळीकर / कुलकर्णी, भारद्वाज गोत्र ) कुलदैवत श्री नृसिंह - धर्मपुरी , तेलंगणा
माझे माहेरचे मूळ गाव मुक्रमाबाद , नांदेड जिल्हा , आणि सासरचे सुकळी वीर , हिंगोली जिल्हा
Pages