साध्वींचे अभिनंदन !

Submitted by किरणुद्दीन on 23 May, 2019 - 10:09

साध्वी जिंकल्या याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याच बरोबर करकरे हरले याबद्दल विरोधी पक्षांनी आत्मचिंतन केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Rofl भक्तमंडळींना एक क्षण आनंदाचा पुरेपूर निर्भेळ मिळालेला नाही. ३०० आणा की ३००० सिट आणा. खोटारडे आणि भामटे असलेल्यांचे सत्य बदलणार नसते. कोंबडे झाकले म्हणजे झाले असे समजणारे उल्लू के पठ्ठेच.

>>कोंबडे झाकले म्हणजे झाले असे समजणारे उल्लू के पठ्ठेच<<

तेच ना!
तुम्ही धाग्यांवर धागे काढून कितीही कोंबडे झाकायचा प्रयत्न केलात तरी सूर्य उगवलाच २३ मे ला
आता बसतायत चटके.... त्यामुळे तडतडणाऱ्या लाह्या झाल्यात तुम्हा लोकांच्या Rofl

भक्तमंडळींना एक क्षण आनंदाचा पुरेपूर निर्भेळ मिळालेला नाही.

विजयाच्या आनन्दा पेक्शा चाटून्ची तडफड बघायला जास्त मजा येतेय!

पूर्ण हरलेल्या व्यक्ती किंवा पक्षाला काही किंमत नसते आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याला विजेते बांधील नाहीत .
जिथे ह्यांना जनतेत काही किंमत
नाही त्यांच्या मताला जास्त किंमत नसते

नवीन Submitted by Rajesh188 on 25 May, 2019 - 20:16>>> असं काही नाही आणि असू नये. जेत्यांनी माज न करता जबाबदारीची जाणीव जास्तीतजास्त बाळगून व सर्वांना सोबत घेवून पुढे जायला हवं. विरोधक कुणी परके नाहीत, आपलेच आहेत हे भान सोडू नये. जनतेने पुन्हा एकदा दाखवलेला विश्वास तोडू नये. आणि विरोधकांनी बदला म्हणून हैदोस घालण्याच्या हेतूने वागू नये, सरकारला निव्वळ जेरीस आणण्यासाठी जनतेमध्ये असंतोष निर्माण करायला बघू नये. जनतेने तिला काय हवं ते सांगितलं आहे.

तुम्ही लोकं पण आता बास करा की! झाले ४८ तास आता रिझल्ट डिक्लेअर होवून. आता वेडंवाकडं बोलणं आणि वेड्यावाकड्या बोलण्यावर react करणं थांबवा. नाहितर पुढची ५ वर्षं तेच चालू. ती energy channelize करायला भरपूर चांगले उपाय सापडतील Happy

अरेच्चा ! हरलेल्यांनी जिंकलेल्या उमेदवाराचं अभिनंदन ही करू नये काय !!!
हा कायदा ठाऊकच नव्हता.

आम्ही आपलं १९८४ ला एका पक्षाचं नव्हतं केलं अभिनंदन .. म्हटलं .. जाऊ द्या

तुमच्याच जिंकलेल्या उमेदवाराचे अभिनंदन केले म्हणून किती हा चडफडाट !!!
वाटलं नव्हतं पण शंभरी ओलांडली धागाने....

किती प्रश्न तरी..
नेमक्या याच उमेदवाराचे का केले ?? याला उत्तरही दिलेले आहे. आणि या उमेदवाराचे अभिनंदन करण्याने अडचण काय झाली हे पण विचारले आहे.

अद्याप उत्तर नाही बघा.

आता म्हणतात खोटे आरोप होते म्हणून उमेदवारी दिली. >> द्या ना ... तुम्हाला नको म्हटलेय का ? पण अभिनंदन केल्यावर का चिडता ?

मालेगावच्या त्या बारा मुस्लीमांना पण देणार असतील मग उमेदवारी. ते तर १६ वर्षे खितपत पडल्यावर निर्दोष होते म्हणून सिद्ध झालेय. असे बरेच आरोपी आहेत. या सगळ्यांना उमेदवारी देणार असतील बहुतेक...

की दिलीये ऑलरेडी ?

की दिलीये ऑलरेडी ? >>>

छान विचार आहे.

तुम्ही काँग्रेस वा आप कडे शिफारस करून पहा. काँगेस व आप हे दोन्ही पक्ष उपटसुंभ लोकांचं ऐकतात असं मी एकदा कुठेतरी ऐकलं होतं.

माफ करा हं... जेवण आणि फिरायला गेलो असल्याने जरा वेळ गेला

मग करायचं का सुरू आता ?

माफ करा हं
तुम्हाला क ला काना का, क ला उकार कु असे सांगावे लागते ते लक्षातच राहत नाही अधून मधून..
वेळ मिळाला की सांगेन हं. घाई असेल तर ज्यांना समजलेय त्यांना विचारा ( तुमच्या ड्यु ला नको, त्याचीही परिस्थिती सेमच असेल ना ?)

अहो एका तरी प्रश्नाचे धड उत्तर द्या हो.... सगळीकडे कसा पळपुटेपणा करता?
आणि जर नाहीच आहे अंगात हिम्मत जो हेतू आहे तो कबूल करायची तर खा मग टपल्या लोकांच्या Proud

कुठला प्रश्न ?

मला वाटलं साध्वींचे अभिनंदन केले तर काय अडचण आहे हा प्रश्न होता ना ?

एका तरी म्हणजे कुठल्या प्रश्नाचे हो ? आणि पळापुटेपणा कसला आलाय त्यात ?

साध्वींचे अभिनंदन केले. यात तुम्हाला काय खटकले एव्हढेच सांगा.
हे उत्तर धरून मी या धाग्यावर एकुण ४८ वेळा हेतू लिहीला आहे.

आकलनाचा प्रॉब्लेम आहे हे सांगितले असते तर बरं झालं असतं.

बरं मी आता झोपायला चाललो आहे.
कुठेही जाऊ नका. कधीही परत येऊ शकतो.

तुम्ही अर्धी रात्र या या आयडीने आणि उर्वरीत त्या आयडीने इथेच पहारा द्या म्हणजे ताण येणार नाही.
शुभरात्री !

>>३०० प्लस खासदारांपैकी फक्त साध्वींच्या अभिनंदनाप्रित्यर्थ धागा काढावा वाटतोय हे कसल्या मानसिकतेचे लक्षण म्हणायचे?

Submitted by खरा पुणेकर on 24 May, 2019 - 19:33
<<

हा साधासरळ प्रश्न होता.... अजुन उत्तर आलेले नाही!

आकलनाचा प्रॉब्लेम !!!
त्याच्या पुढेच उत्तर होते.
रात्रभर पुन्हा वाचा. सकाळी आहेच मी मदतीला.

(कुठल्या आयडीने असणार सकाळी ते सांगून ठेवा. नाहीतर समजायचे नाही रात्री कोण, सकाळी कोण )

>>साध्वींचे अभिनंदन केले. यात तुम्हाला काय खटकले एव्हढेच सांगा.
हे उत्तर धरून मी या धाग्यावर एकुण ४८ वेळा हेतू लिहीला आहे.<<

हे उत्तर नाही..... याला प्रतिप्रश्न म्हणतात

उठताबसता दुसऱ्याचे आकलन काढल्याने स्वताचे शहाणपण सिद्ध होत नाही!

असो.... लोकांच्या टपला खाउन दमला असाल दिवसभर..... आराम करा!

नाठाळांच्या माथी काठी हाणायला बसलेलोच आहे... या विश्रांती झाली की"

>>नाठाळांच्या माथी काठी हाणायला बसलेलोच आहे... या विश्रांती झाली की"
Rofl
या कंपूने खरे तर वेग वेगळ्या नावाने इथे ईतके धोबी तलाव ऊपलब्ध कऊन दिलेत की मंडळी अगदी यथेच्छ धोपटून घेत आहेत. Proud

वाचकांना धागालेखकाने हा धागा का काढला याचे उत्तर हवेय आणि त्यासाठी त्यांचा बराच आटापिटा चाललेला दिसतोय. परंतु त्यांनी लेखकाची अडचण समजून घ्यायला हवी.

हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून, त्यात निरापराध्यांना गोवून, पोलीस अधिकाऱ्यांना त्या निरापराध्यांना मारहाण करायला लावून केस उभी करणे व हिंदूंना बदनाम करणे या फसलेल्या कटाच्या सुत्रधारांचा धागालेखक कट्टर समर्थक!. त्या कटातील दोन बिनीचे पुढारी निवडणुकीत सपशेल आपटले. तेही त्यांनी ज्यांना आरोपी म्हणून गोवले होते त्या व्यक्तींसमोरच. ही खरं तर एक प्रचंड नामुष्की आहे...लेखकासाठी बरनोल मोमेंट आहे...

परंतु अशा कठीण समयीही, लेखकाने खिलाडूवृत्तीचा व भक्तिमार्गाचा अंगीकार करून साध्वीचे अभिनंदन केलं आणि आर्त भावाने विचारणा केली की "मी अभिनंदन केलं तर इतरांना राग का यावा?".

लेखकाचे साध्वीवर आरोपांचे शिंतोडे उडविणे वा तिची बदनामी करणे हे या धाग्याचं उद्देश्य नाहीय (ते उद्देश्य असणारे आधीच बेरोजगार झालेत), तर साध्वीचे गुणगान करून पुढील कालक्रमणा सत्याची कास धरून करावी म्हणून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न चालवलेत. हे अभिनंदन त्याचाच एक भाग आहे.

परंतु, या सर्व गोष्टी उघड म्हणण्याचं धैर्य सध्यातरी लेखकाकडे नाही, कारण बेरोजगार झाले असले तरीही त्या राष्ट्रव्यापी कटाचे सूत्रधार अजूनही मायबोलीवर येऊन त्यांच्या गुलामांचे काम कसे चालले आहे ते पाहत असतात. लेखकाला त्यांचीच भीति असल्याने स्वतःचे विचार तो सुस्पष्टपणे मांडू शकत नाही ही अडचण कृपया ध्यानात घ्या.

माझं असं मत आहे की आपण या साध्वीच्या नवभक्ताच्या आतापर्यंतची सर्व फालतुगिरीला माफ त्याचं कौतुक करायला हवं. कारण धडधडीत तोंडघशी पडल्यावर लगेच अशा प्रकारचे धागे काढण्यास व स्वतःच्या बॉसची नाराजी ओढवून घेण्यासाठी जी छोटी हिम्मत लागते, ती या लेखकाकडे आहे.

म्हणून आपण सर्वांनी यापुढे " धागलेखकाला उपरती होऊन साध्वीचे अभिनंदन केल्याबद्धल लेखकाचे कौतुक" एव्हढीच प्रतिक्रिया देऊया.

बरं , साध्वींवर अन्याय झाला असेल तरीही

त्यांचे अभिनंदन लॉजिकल नाही का ? त्यांचे अभिनंदन हा इथल्या थयथयाटकुमारांना ठसठसणारा गळू का वाटतो ?
साडेतीनशे खासदारांमधून नेमके यांचेच का असा प्रश्न विचारण्यातच यांचे नको होते करायला असा यांचा सूर जाणवतो. तो चुकीचा आहे का ?

नसेल तर
साध्वींचे अभिनंदन केल्याने एव्हढा गदारोळ का बरे व्हावा ?
याच पक्षाच्या विजयी उमेदवार आहेत त्या.

अगदी कट झाला आणि कटाचा सूत्रधार स्वतः धागालेखक आहे हे बिनबुडाचे आणि हास्यास्पद आरोप मान्य केले तरीही

अभिनंदन केल्याने आदळ आपट का ?

हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रश्नाला प्रतिप्रश्न अनेक झाले आहेत,. पण उत्तर मिळत नाहीये.

Pages