चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
बहुतेक त्या रॉबर्ट वाड्राला
बहुतेक त्या रॉबर्ट वाड्राला या 'चिनूक' व 'अपाचे' हेलिकॉप्टर्स खरेदीतून मिळणार्या कमिशनमधे, राफेल फायटर प्लेनच्या तुलनेत जास्त रस नसावा, नाहितर त्या वाड्राने त्याच्या मंदबुद्धी मेव्हण्याला व त्याच्या पाळीव भाटांना सांगून ह्या खरेदी व्यहारात देखील भाजपा सरकारने घोटाळा केला अशी बिनबुडाची राळ देशभर उडवून द्यायला सांगितली असती.
इश्श! आतापर्यंत मंत्र
इश्श! आतापर्यंत मंत्र उच्चारून शत्रूला भस्म करायचे.>>
इश्श! आतापर्यंत मंत्र
इश्श! आतापर्यंत मंत्र उच्चारून शत्रूला भस्म करायचे.
Submitted by भरत. on 26 March, 2019 - 12:50
<<
आतापर्यंत सर्व मिळत होते मात्र त्या खरेदीच्या आडून स्वत:च्या बापजाद्यांची पोटे कशी भरतील याची सोय देखील कॉंग्रेस करत होती.
बोफोर्स घोटाळा.
ऑगस्टा वेस्टलॅंड चॉपर घोटाळा.
सैनिकी जीप खरेदी घोटाळा.
असे अनेक घोटाळे, सैनिकी शस्त्रात्रे खरेदीत कॉंग्रेसने केले व आपल्या पुढच्या पिढ्यांची फुकट खायची सोय करुन ठेवली.
राफेल बद्दल झालेले आरोप
राफेल बद्दल झालेले आरोप चांगलेच झोम्बलेले दिसत आहेत. अजून आग होत आहे का?
कोणी तरी म्हणे कि कर नाही तर डर कशाला...
कोन्ग्रेस ने केली पण
कोन्ग्रेस ने केली पण भाजप्यानी केली नाही असे म्हणता का? कोणत्या आधारावर?
मला बातम्या चांगल्या आठवते
मला बातम्या चांगल्या आठवते आहे 7 दिवस पुरेल इतका सुधा दारूगोळा लष्कराला उपलब्ध नव्ह्ता .तो samplyavar तीर कामटे चे वापरायला लगले असते
आता किती आहे रजेश१८८ ?
आता किती आहे रजेश१८८ ?
ते सैनीकांच्या शवपेट्या
ते सैनीकांच्या शवपेट्या खरेदीत्लं घोटाळा प्रकरण विसरले का..?? मढ्याच्या टाळुवरचं लोणीसुद्धा सोडलं नाही की हो भाजपेयिंनी..
मला बातम्या चांगल्या आठवते
मला बातम्या चांगल्या आठवते आहे 7 दिवस पुरेल इतका सुधा दारूगोळा लष्कराला उपलब्ध नव्ह्ता .तो samplyavar तीर कामटे चे वापरायला लगले असते
नवीन Submitted by Rajesh188 on 26 March, 2019 - 13:01
<<
लष्कराच्या दारुगोळ्यासाठी ठेवलेला पैसा, कॉंग्रेसने "राष्ट्रीय दामाद" रॉबर्ट वाड्राला जमिन खरेदी घोटाळे करण्यासाठी दिला होता. म्हणूनच त्यांच्या सरकारकडे राफेल विमानेच काय पण दारुगोळा खरेदी करण्याकरता देखल्ल पैसे नव्हते.
बोफोर्स घोटाळा. >> कोणाला
बोफोर्स घोटाळा. >> कोणाला शिक्षा झाली??
बाकी मोदीने अनिल आणि गौतमला दत्तक घेतले काय?
तुमच्याकडे वाड्राविरोधात
तुमच्याकडे वाड्राविरोधात भरपूर पुरावे दिसतात. पटकन सीबीआयला द्या बरं.
शिवाय पैसे कोठून कसे गेले, हे पण माहीत आहे तुम्हांला.
की तुम्ही इडीमध्येच कामाला आहात?
ज्या वेगाने भारतात बेरोजगारी
ज्या वेगाने भारतात बेरोजगारी पसरते आहे, त्याला अनुषंगुन मोदीने प्रत्येकाला 'चौकिदार' बनवले असावे, आज virtual, उद्या real!
ते सैनीकांच्या शवपेट्या
ते सैनीकांच्या शवपेट्या खरेदीत्लं घोटाळा प्रकरण विसरले का..?? मढ्याच्या टाळुवरचं लोणीसुद्धा सोडलं नाही की हो भाजपेयिंनी..
नवीन Submitted by DJ. on 26 March, 2019 - 13:05
<<
तुम्हाला कदाचीत माहिती नसेल म्हणून सांगतो.
२००४ मधे वाजपेयी सरकार गेल्यावर तात्कालिन संरक्षण मंत्री ए.के. अॅंटोनी यांनी संसदेत हे मान्य केले होते की जॉर्ज फर्नांडीस संरक्षण मंत्री असताना असा कोणताही घोटाळा झाला नव्हता. ज्याप्रमाणे आता मंदबुद्धी रागा ज्या तथाकथित राफेल घोटाळ्याची बिनबुडाची राळ उडवत आहे तशीच बिनबुडाची राळ त्यावेळच्या मंदबुद्धी कॉंग्रेसी नेत्यांनी लीवली होती.
मनाचे श्लोक्स सांगु नका इथे..
मनाचे श्लोक्स का.. ?
मनाचे श्लोक्स का.. ? Proud
मनाचे श्लोक्स का.. ? Proud
नवीन Submitted by DJ. on 26 March, 2019 - 13:18
<<
दुसर्याचे लेख ढापून,
स्वत:च्या नावावर खपवणार्या, तुमच्यासारख्या लोकांना असे वाटते ह्यात आश्चर्य ते काय !
लेख ढापला आहे असे वाटत असेल
लेख ढापला आहे असे वाटत असेल तर पोलिसांत जाऊन तक्रार द्या.. त्यानंतर न्यायालयात भेटुच..!!
एक नंबर बोक्याशेठ
एक नंबर बोक्याशेठ
थापाला थपडांची भाषा समजते
थापाला थपडांची भाषा समजते
बोफोर्स , कुणाला शिक्षा झाली
बोफोर्स , कुणाला शिक्षा झाली ?
बोफोर्स , कुणाला शिक्षा झाली
बोफोर्स , कुणाला शिक्षा झाली ?
नवीन Submitted by BLACKCAT on 26 March, 2019 - 13:38
<<
'जब सैंया भये कोतवाल तो डर काहे का' !
लेख ढापला आहे असे वाटत असेल
लेख ढापला आहे असे वाटत असेल तर पोलिसांत जाऊन तक्रार द्या.. त्यानंतर न्यायालयात भेटुच..!! Proud
Submitted by DJ. on 26 March, 2019 - 13:30
<<
या अश्या लोकांमुळेच
"चोर तो चोर, वर शिरजोर" या म्हणीचा उगम झाला असावा.
मागच्या पाच वर्षात कोतवाल कोण
मागच्या पाच वर्षात कोतवाल कोण होतं, i mean चौकीदार चौकीदार...?
विश्वनाथ प्रताप सिंग यांनी
विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफोर्सच्या. मुद्द्यावर संरक्षणमंत्रीपद सोडलं, कॉंग्रेस सोडली, निवडणुका लढवल्या, पंतप्रधान झाले.
पुढे काय झालं?
त्यांनी मंडल आयोग आणला.
त्यांनी मंडल आयोग आणला. >>
त्यांनी मंडल आयोग आणला. >> आणि भाजप माजला
भाजपवाले ज्या काश्मिरी
भाजपवाले ज्या काश्मिरी पंडितांच्या नावाने फक्त रडतात, त्यांचे पलायनही व्ही पी सिंग यांच्याच राज्यात झाले ना?
चोर तो चोर >> मला माबोवरील
चोर तो चोर >> मला माबोवरील चोर्टाकस .. आपलं स्पार्टाकस आयडी आठवला
चोर तो चोर ---- लुक हु इज
चोर तो चोर ---- लुक हु इज ताल्किंग ....
चोर के दाढी मे तिनका
चोर के दाढी मे तिनका
भाजपाने सोमवारी लखनऊमधील
भाजपाने सोमवारी लखनऊमधील आपल्या एका नेत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. भाजपाच्या या नेत्याने पक्षाचं नेतृत्व गुजरातचे भामटे करत असल्याचं म्हटलं होतं. तसंच भाजपाने प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री अशीही टीका केली होती. भाजपाचे माजी प्रवक्ते आयपी सिंह यांनी एकामागोमाग एक ट्विट केले आहेत. ट्विटमध्ये आयपी सिंह यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आझमगढ येथून निवडणूक लढवत असल्याबद्दल कौतूक केलं असून प्रचारासाठी गरज असल्यास कार्यालय म्हणून आपल्या घराचा वापर करु शकता असं सांगितलं आहे.
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आयपी सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सहा वर्षांसाठी आयपी सिंह यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे. आयपी सिंह यांनी केलेल्या ट्विट्सनंतर ही कारवाई कऱण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे एकीकडे भाजपाचे सर्व नेते ट्विटरवर नावापुढे चौकीदार लिहित असताना आयपी सिंह यांनी ‘उसूलदार’ असं लिहिलं आहे.
‘मी आदर्शवादी क्षत्रिय कुटुंबातील आहे. आपण शांत असताना गुजरातचे दोन भामटे गेल्या पाच वर्षांपासून हिंदी भाषिक लोकांची फसवणूक करत आहेत’, असं आयपी सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘आमच्या उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था गुजरातपेक्षा सहा पटीने मोठी आहे. उत्तर प्रदेशचं आर्थिक उत्पन्न पाच लाख कोटी असून गुजरातचं फक्त एक लाख 15 हजार कोटी आहे’, असं सांगताना आयपी सिंह यांनी अशा परिस्थितीत ते काय खाणार आणि काय विकास करणार असा टोला लगावला.
पुढच्या ट्विटमध्ये आयपी सिंह यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हटलं की, आपण प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री ? देशाचे पंतप्रधान टी-शर्ट, चहाचे कप विकताना चांगले दिसतात का ?. भाजपाने आपल्या विचारसरणीने लोकांच्या ह्रदयात जागा निर्माण केली आहे. मिस्ड कॉल आणि टी-शर्टने कार्यकर्ते उभे करणं अशक्य आहे असंही आयपी सिंह यांनी म्हटलं.
निलंबन झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आयपी सिंह यांनी आपण गेल्या तीन दशकांपासून पक्षासोबत आहोत. सत्य बोलणंदेखील पक्षात गुन्हा आहे. पक्षाने आपली विचारसरणी गमावली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदीजी मला माफ करा, मी तुमच्यासारखं डोळ्यावर पट्टी ठेवून चौकीदाराचं काम करु शकत नाही असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
हेला : कसलं जालिम औषध ओतलंत..
हेला : कसलं जालिम औषध ओतलंत... नमोरुग्णांची फार तडफड होणार बघा आता..?
Pages