Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचेल, एक अजून गेम करेल
वाचेल, एक अजून गेम करेल किंवा अजून जास्त माझा अंदाज, इलाज नाहीये दुसरा. संपत आली ना आता. शेवटच्या एपिसोडपर्यंत जीव टांगणीला मात्र.
डावाचा माणूस यडचाप पद्धतीने
डावाचा माणूस यडचाप पद्धतीने शोधाशोध करताना दाखवलाय. उरलेले पैसे शोधत होता, बंडल शोधत होता की एखादी नोट तेच कळत नव्हतं. कपबश्यांच्या स्टँडमधला कप उलटा करुन बघितलं. वॉटर फिल्टर चं झाकणसुद्धा उचलून बघितलं येड्याने. जरा डोकं चालवून दाखवा की सीन.
मुक्ता येणारे आता गोत्यात.
अन्जू +999
अन्जू +999
तीची अवस्था या परि स्थितीत
तीची अवस्था या परि स्थितीत अगदी योग्य आहे असे मला वाटते. कारण जो पर्यंत तिला माहित नव्हतं की आपल्या नवर्याचा खून झाला आहे तोवर ती शांत च होती आणि आपलं प्राक्तन म्हणून तिने हे स्विकारलं होतं, मानसिक उलघाल ही छाया खताळ येऊन गेल्यापासून सुरू झाली आणि या मागचे एकेक सुत्र तिच्या हातात येत गेले तशी ती अधिक अधिक अस्थिर आणि अधिर होत गेलेली दाखवली आहे जे अत्यंत स्वाभाविक आहे असं मला वाट्तं.
बाकी मला एक कळलं नाही डावा ला हिच्यात इतका का ईंटरेस्ट आहे? त्याला काम दिलं, त्याने केलं, पैसे मिळाले संबंध संपला असं नसतं का या बिझनेस मध्ये? तो असा वैयक्तिक रस का घेतोय तिच्यात?
आजचा भाग पाहून मुक्ताची काळजी वाटली जाम. त्याला तो व्हिडिओ पण मिळालाय पैसे त्याने अगदी बारकाईने शोधले अगदी फडताळं, कांद्याच्या टोपली पासून टॉयलेट चा फ्लश टॅक वगैरे पण... जिन्याखालचा खण लक्षात नाही आला. सर्वात मजेशीर म्हणजे डायनिंग टेबलाजवळ जो कपचा स्टँड् होता त्यातला एक कप उचलून तो त्याच्या खाली काय आहे ते पाहतो.. आयला करोडो रुपये असे कोणी लपवेल का? कप खाली?
उद्या काय होते याची भयंकर उत्सुकता लागून राहिली आहे.
आडो, दक्षि
आडो, दक्षि
बाकी मला एक कळलं नाही डावा ला
बाकी मला एक कळलं नाही डावा ला हिच्यात इतका का ईंटरेस्ट आहे? त्याला काम दिलं, त्याने केलं, पैसे मिळाले संबंध संपला असं नसतं का या बिझनेस मध्ये? तो असा वैयक्तिक रस का घेतोय तिच्यात?>>>> त्याला वाटतंय ही बाई काहीतरी गडबड आहे. योग्य व्यक्तीला आपण दिले नाहीयेत पैसे असं वाटत असेल.
हो डावा अति करतोय, तुझे पैसे
हो डावा अति करतोय, तुझे पैसे मिळाले ना मग गप की. तुमचा धंदा असा आहे म्हटल्यावर खोटं बोलून कोणी काम करून घेतलं तर तुम्हाला काय त्याचं, उगाच अति चौकशा.
ते ह्या धंद्यात पण उसुल बिसुल असतात असे डायलॉग पिक्चरमध्ये ऐकलेले, त्यावर पोस्ट लिहिलीय , वास्तव काय असतं ते काही मला माहिती नाहीये.
त्या डावाला पैशात इंटरेस्ट
त्या डावाला पैशात इंटरेस्ट आहे.
रागिणी अडकली आता..
उद्या काय होईल.!
बाकी मला एक कळलं नाही डावा ला
बाकी मला एक कळलं नाही डावा ला हिच्यात इतका का ईंटरेस्ट आहे? त्याला काम दिलं, त्याने केलं, पैसे मिळाले संबंध संपला असं नसतं का या बिझनेस मध्ये? तो असा वैयक्तिक रस का घेतोय तिच्यात?>>
डावाला तिच्यात नाही तर तिने दोन बॅग भरून मिळवलेल्या रुपयांत इंटरेस्ट आहे.
चंदूदादाला पण तो सांगतो की ती कोण आणि कुठे राहते वगैरे सांग जी काय रक्कम तिच्याकडे मिळेल त्यातून अर्धे अर्धे घेऊ म्हणून.
ओहह निधी, मला वाटलं, खरी ओळख
ओहह निधी, मला वाटलं, खरी ओळख काढण्यासाठी त्याने लालूच दाखवली चंदू दादाला.
आज पैशाचा शोध मधे फार वेळ
आज पैशाचा शोध मधे फार वेळ घालवला डाव्याच्या माणसाने , कुठेहीशोधत होता पैसे, घर काय मस्त आहे ते
तीची अवस्था या परि स्थितीत
तीची अवस्था या परि स्थितीत अगदी योग्य आहे असे मला वाटते.>>
+१०० तिचे अधीर होणे स्वाभाविक आहे , कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते याची तिला कल्पना आहे , म्हणून लवकरात लवकर drive मधली माहिती मिळवणे तिच्या साठी अत्यंत महत्वाचे आहे .
कॅमेरा लपवून ठेवायला हवा होता .नको त्याला अधिक माहिती मिळाली !
पुढील भागात काय दाखवणार आहेत?
पुढील भागात काय दाखवणार आहेत? ओझी वर दिसत नाही..
कोणीतरी येऊन सोडवेल नाहीतर रा
कोणीतरी येऊन सोडवेल नाहीतर रा काहीतरी चपळाई करेल अशी आपण आशा करूयात, पण कोण ते कळत नाहीये कारण हे घर कोणालाच माहीत नाहीये.
डावाचा माणूस अंमळ मठ्ठ आहे
डावाचा माणूस अंमळ मठ्ठ आहे असंच दाखवायचं असणार...
तो 'पुढील भागात' मी डावासाठी काम करतो म्हणून सांगताना दाखवलाय. त्यावरून मला असं वाटलं, की रागिणी ऐनवेळी काहीतरी युक्तीवाद करून डावा अँड पार्टीला आपल्या बाजूला वळवून घेईल. धुरत आणि चंदूदादाच्या अनुपस्थितीत उत्तम नेटवर्क असलेला तिच्या माहितीतला आता डावाच आहे. तसंही तिला त्या पैश्यांत वैयक्तिक रस नाही. या कामासाठीच ती त्याचा वापर करतेय. ती डावाला ऑफर देईल - मला मदत कर, त्यातली निम्मी रक्कम तुला देते.
बाकी, ते कारच्या तळाला सेलोटेप वगैरे थिअरॉटिकली कितीही भारी युक्ती असली तरी प्रॅक्टिकली ते शक्य नाही. आपल्याकडे गाड्यांच्या तळाला किती माती, चिखल, धूळ असते; असा सेलोटेप पक्का चिकटणं शक्यच नाही
तो पेनड्राइव्ह मिळवण्यासाठी तिने इतकी उठाठेव केली त्यामागे त्या बिल्डरच्या घरच्या कुणालाही कुठलाही संशय येऊ नये हाच उद्देश असणार. नंतरही कुणी चौकशी केली, तरी असं काही घडलेलं असेल हे कुणाच्या डोक्यातही येणार नाही. पण तरी ते जरा लांबवलंच.
निम्मी रक्कम तुला देते.
निम्मी रक्कम तुला देते.
बाकी, ते कारच्या तळाला सेलोटेप वगैरे थिअरॉटिकली कितीही भारी युक्ती असली तरी प्रॅक्टिकली ते शक्य नाही. आपल्याकडे गाड्यांच्या तळाला किती माती, चिखल, धूळ असते; असा सेलोटेप पक्का चिकटणं शक्यच नाही>>> ते तर आहेच. आणि सेलोटेप निघून जाणार नाही याची तरी काय गॅरन्टी होती. सगळंच मुसळ केरात गेलं असतं मग.
मला एक कोडं पडलंय की डावा चा
मला एक कोडं पडलंय की डावा चा माणूस जेव्हा रागिणिचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचला, त्यानंतर रागिणी बाहेर पडलेली त्याला कशी काय दिसली नाही? डाय्रेक्ट ती सुहास च्या हापिसात दाखवली आहे.
वंगु सध्या समाधीअवस्थेत का?
साधारणत: धुरत मेल्यानंतर
साधारणत: धुरत मेल्यानंतर डायरेक्टर ची पकड संपत चालल्यासारखी वाटते.
दिसली असेल पण कळलं नसेल ना की
दिसली असेल पण कळलं नसेल ना की हिच ती खेडवळ बाई आहे. हा माणूस हुशार असल्याने त्याने घर बघून ठेवलं होतं, आधीच्याने माती खाल्ली होती. आजचा भाग उत्कंठावर्धक होणार तर. जसा धुरत ला मारल्याचा झाला होता. आता अजून १३ भाग आहेत शिल्लक.
डावाच्या माणसाने रागिणीचं
डावाच्या माणसाने रागिणीचं पूर्ण फुटेज पाहिलं का?
चित्रपट बघावा तसा?
त्यामुळे त्या माणसाचं किंवा डावाचं मतपरिवर्तन होण्याचे काही चान्सेस आहेत का (अत्युच्च सिनेमॅटिक लिबर्टी) ?
रागिणीला मारतील का सिरियलच्या शेवटी?
तसेही तिच्यामागे रडणारे कोणी नाही.. आईची व्यवस्था लावलेली आहे.. खून बिन झाला तर मोठ्ठ्या रकमेचा इंश्युरांस आईच्या उपचारात ती जिवंत असेपर्यन्त कामी येईल.
कोणीतरी म्हटलं की तो pendrive पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. तो पासवर्ड "रुद्रम" असेल का?
Pendrive मध्ये नक्की काय आहे? वर कोणीतरी म्हटलंय तसं प्रेक्षकांना माहीत नसलेलं काही असेल तर जास्त मजा येईल. नाहीतर सगळ्यांना रहस्य माहीत आहे.. आता फक्त उलगडा कसा दाखवत आहेत ते बघणे एवढंच करावं लागेल.
कपाखाली शोधण्याबाबत: काही लोक असे कपाखाली एखाद्या सिक्रेट फडताळ्याची किंवा तिजोरीची किल्ली लपवून ठेवतात. त्यासाठी बघत असावा तो. अर्थात.. मी कालचा एपिसोड मिसल्याने मला फार बोलता येणार नाही.
सगळ्या पोस्ट्स ना अनुमोदन..
सगळ्या पोस्ट्स ना अनुमोदन..
रागिणी डावा ला ऑफर देईल--- खरंच असं झालं तर बरं होईल, नाहीतर अजून एखादा खून होईल रागिणीच्या हातून...
Btw त्या पेन ड्राईव्ह चा पासवर्ड रागिणी मूर्ती ला का विचारत नाही, त्यानेच लपवला होता ना तो आबा मध्ये!
अरे सर्वानो, त्या माणसाला
अरे सर्वानो, त्या माणसाला जिवंत ठेवणे धोक्याचे आहे, त्याने सर्व बघितलं आहे. त्याचा गेम करायला हवाय.
Btw त्या पेन ड्राईव्ह चा
Btw त्या पेन ड्राईव्ह चा पासवर्ड रागिणी मूर्ती ला का विचारत नाही, त्यानेच लपवला होता ना तो आबा मध्ये! >>> करेक्ट.
हो ना मला पण कळलं नाही की
हो ना मला पण कळलं नाही की मूर्ती ला का विचारत नाही ही पासवर्ड ?हो कपखाली चावी वगैरेसाठी बघत असणार.
पण त्या रा च्या घरात एक बेडरूम कायम बंद करून ठेवली आहे ती नाही दाखवली.(i mean त्याला दिसली नाही नाहीतर त्याने ती पण ओपन करायचा प्रयत्न केला असता!)
आजचा भाग hopfully फास्ट दाखवतील काल परवा पासून फारच निवांत चाललीये मालिका
रागिणी डावा च्या माणसाला
रागिणी डावा च्या माणसाला मारेल नक्कीच. किंवा चंदुदादा ऐनवेळेला येऊन त्याचा गेम करतील. (आणि असंच व्हावं अशी प्रार्थना वगैरे करते मी देवाला :फिदी:)
मला एक कोडं पडलंय की डावा चा
मला एक कोडं पडलंय की डावा चा माणूस जेव्हा रागिणिचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचला, त्यानंतर रागिणी बाहेर पडलेली त्याला कशी काय दिसली नाही >> कारण खेडवळ बाईचा गेट अप बदलून ती तिच्या नॉर्मल पेहरावात बाहेर पडलेय . त्यामुळे त्याला समजलच नाही कि ती तीच होती . तसाही तो थोडा माठ च दाखवलाय . मी डावा चा माणूस आहे असं बोलून दाखवतो . पण माझ्या मते मालिका पुढे सरकण्यासाठी त्याने मी डावाचा माणूस आहे असं सांगितलं असावं.
त्या बंद बेडरूमचा रहस्य खुलेल का आता याच्या पुढच्या भागात .
मी डावा चा माणूस आहे असं
मी डावा चा माणूस आहे असं बोलून दाखवतो>> हे कधी दाखवलं. मी तर तो व्हिडीओ बघत खाली बसतो तेवढच पाहिलं. पुढील भागाच्या प्रोमोत आहे का?
हो ऊद्याच्या भागात दाखवलं.
हो ऊद्याच्या भागात दाखवलं.
यातला तो दोन भागातला नवा
यातला तो दोन भागातला नवा मारेकरी संभाजी मध्ये नेताजीच्या भूमिकेत आहे.
रागिणी गेटप बदलुन गेल्याचा
रागिणी गेटप बदलुन गेल्याचा शॉट दाखवला नाही त्यामुळे मलाही एक मिनिट कळल नाही पण ते त्यानी ग्रुहित धरल
Pages