"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच किती बेरकी आहे तो सरपोतदार.. राग राग.... परदेशी ची आणि मीठबावकर ची जेल मध्ये भेट घडवून आणतो, आणि कोणत्याच दुसऱ्या पोलिसाला हि गोष्ट खटकत नाही??? एवढं साधं सरळ असत का ?

हो ना कालचा भाग मला पण उगाचच लांबवला अस वाटलं ..पण यामुळे शेवटचा वीक सगळं भराभर गुंडाळून टाकू नका म्हणावं ..
उद्याच्या भागात काय दाखवलं?

त्या बिल्डर कडे किती नोकर आहेत...!!! प्रत्येक कामाला वेगळे वेगळे..! मजा आहे त्या सुजयच्या आईची..
तो सुजय खूप क्युट आहे..
बाकी एपिसोड बद्द्ल नो कमेंटस.. एवढा नाही आवडला भाग. उगीच ताणत आहेत..

हो ना, भरपुर रिकामा वेळ असल्यामुळेच ती वास्तुशास्त्र, numerology, taro card एवढच करत बसली आहे.काल नवरा पण वैतागला की तिचा.
क्रिस्तिनाच्या नावाची बेरीज पण करते लगेच, हि मुलासाठी योग्य आहे का नाही बघण्यासाठी..
तो flower pot ऊत्तरेला ठेवायचा नाही सांगितलं होतं ना.. Lol

मुग्धा त्या रोल मधे सुट होत्ये, तिच्या चेहर्‍यावर कायम आठ्या असतातचं.

काल मला वाटत होतं बॉल खेळताना रा चा विग पडतो की काय Lol

रा ने आत्ता पर्यंत जे बेअरिंग घेतलं होतं ग्रामीण बाई, अभय सातव ला भेटताना मॉडर्न मुलगी ते थोड्या वेळा साठी होतं. हे जरा उगाच वाढवलयं.

आता धुरत गेल्यामुळे हॅपनिंग गोष्टी कमी झाल्या म्हणून आबाचा शोध लांबवत आहेत की काय. डेटा मधली माहीती कदाचित कि क कडे पोचवणार असेल रा ला.

डेटा मधली माहीती कदाचित कि क कडे पोचवणार असेल रा ला. होप सो असचं असलं पाहिजे.नाहीतर हा जो वेळ घेत आहेत आबा शोधण्यासाठ त्याला काहीच अर्थ नाही..!

आबा मध्ये समन्वय चेतना ची सर्व खरी माहिती आहे शिवाय विवेकच्या काँप्युटरमधला काही अतिरिक्त डेटाबेस पण आहे. पण गौप्यस्फोट वगैरे काही आता राहिला आहे असं मला वाटेना झालंय. अनलेस किका हा मुख्य नसेल आणि अजूनच कुणी तिसरा असेल तर... रहस्यभेद झाल्याचा आनन्द. अन्यथा कथा तशी उलगडली आहे.
किक हाच मिठबावकर (पैशाची अफरातफर) शोभा माकन च्या मदतीने मुलिंना भजनी लावणे. लहान मुलांना दत्तक दिल्याचे भासवून विकणे, त्यावर चौकशी होताना दिसली कि लोक संपवणे इ. करतोय असं आता तरी दिसतंय.
फक्त कथा फुलवली आहे मस्त.. आणि मुक्ता आणि धुरत अप्रतिमच एकदम.

कालचा भाग खरच बोर होता. उगीच कॉंप्लिकेटेड केलं ! मुक्ताला अजून एक वेष घेता यावा याची सोय वाटली. तिने काम चांगलच केलं अर्थात.

बोअर एपिसोड. फक्त एक आवडलं मला सातवच्या मुलीने फार छान काम केलं, तो एकच सीन आवडला. बाकी कंटाळा आला. पहिल्या 5 मिनिटांत सांगण्याजोगी गोष्ट रागिणीने एपिसोड संपला तरी नाही सांगितली.

पहिल्या 5 मिनिटांत सांगण्याजोगी गोष्ट रागिणीने एपिसोड संपला तरी नाही सांगितली.----- अगदी बरोबर... उगाच पाल्हाळ लागल्यासारखं!

काय बोर मारून राहिले राव. आज पूर्णवेळ तेच. मालिकेला गालबोट लागलंच. मुक्ताच्या अभिनयाला पुरेपूर वाव मिळावा म्हणून का हा खटाटोप? पण ती प्रत्येक भूमिका उत्तमच करते, छोटी असो किंवा मोठी. मुगो रमेश भाटकरची बहिण दाखवलेली गेल्या मालिकेत पण ईथे शोभते खडूस भूमिकेत. पत्ते खेळणं म्हणजे जुगार असं वाटतं का तिला, बदाम सात वगैरे कधी खेळलीच नाही वाटतं. नाथाला बघून भीती वाटली. अनुराधा आणि सायलीचे संवाद छान.

बोअर करताहेत हा आता मात्र. ते खेळणं मिळवण्यासाठी इतकी वाकडी वाट? रुद्रम कडून हि अपेक्षा नव्हती.
उद्याच्या भागापासून गाडी रुळावर येईल अशी आशा

काय पिळ मारला आज ! पुढचे तीन आठवडे काढण्यासाठी हे असे एपिसोड घालवतायत वाटतं.

पत्ते खेळणं म्हणजे जुगार असं वाटतं का तिला, बदाम सात वगैरे कधी खेळलीच नाही वाटतं >>>>> आमच्या लहानपणी एका मित्राची आई पत्ते खेळलं की ओरडायची. विद्यार्थ्यांनी पत्ते खेळायचे नाहीत म्हणे. त्याचीच आठवण झाली मुगोची चिडचिड बघून Happy

नाथा म्हणजे माळी दाखवलाय तो. राखेचा मध्ये नाथा होता.

पहिली तीन कार्डस काढली तेव्हाच रागिणी सांगू शकली असती की तुम्ही मुलाचे आवडतं toy काढून घेतलंय असं दिसतंय त्यामुळे वाईट वेळ, ते सांगायला अख्खा एपिसोड घालवला आणि परत ते सोमवारी सांगणार. Too much ताणींग.

इथे कदाचित त्या हवालदार ची entry असावी. 5lakh चा उपयोग दाखवलाच नाहि पुन्हा.
धुरत च्या पछ्यात कोनीतरि खबर देनर हवेच आहे.

1800...

Pages