Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुग्धा रानडेनेपण काम छान केलं
मुग्धा रानडेनेपण काम छान केलं.
कित्ती नोकर चाकर घरात, तरी मुलाकडे लक्ष ठेवायला पण बाई. मुलगा गुणी आहे मात्र. हट्टीपणा नाही करत अजिबात. पटत नाही हे फारसं म्हणा.
फार स्लो केली आहे मालिका
फार स्लो केली आहे मालिका
Btw चंदू दादांनी रागिणीला
Btw चंदू दादांनी रागिणीला डावाबद्दल सांगून सावध का नाही केलं अजून?
सुहासचा नक्की रोल काय आहे? करा की लौकर त्याचा वापर!
Btw चंदू दादांनी रागिणीला
Btw चंदू दादांनी रागिणीला डावाबद्दल सांगून सावध का नाही केलं अजून?
>> खरंच की.. मालिका इतकी सुंदर प्रकारे शेवटाकडे आलीये आणि आता का लूज एण्ड्स आणि लूपहोल्स सोडतेय देव जाणे.
मुलगा हट्टीपणा करत नाही कारण
मुलगा हट्टीपणा करत नाही कारण तो अनाथालयातून आलाय. तिकडे कोण बघणार होतं त्याचा हट्ट?
हो साधना बरोबर, उशिरा आलाय
हो साधना बरोबर, उशिरा आलाय बहुतेक यांच्या घरी म्हणून समजूतदार असेल, जाणीव असेल त्याला.
हो, पण बच्चू भारीच क्युट आहे,
हो, पण बच्चू भारीच क्युट आहे, अनाथालयात खुपच चांगला संभाळ झालाय त्याचा.
नुकताच हिंदी मिडीयम सिनेमा
नुकताच हिंदी मिडीयम सिनेमा पहिला...त्यात इरफान खानच्या कामवालीच्या भूमिकेत छाया खताळ होती...
गती मंदावली की मुद्दाम संथ
गती मंदावली की मुद्दाम संथ केली?
आजचा भाग पण गेल्या दोन भागांप्रमाणेच!
काय? आजही रेंगाळली का? तो आबा
काय? आजही रेंगाळली का? तो आबा मिळाला की नाही अजून...त्या धुरतच्या मरणानंतर लेखकाचाही मूड गेला की काय पुढील भाग लिहायचा?
गती मंदावली की मुद्दाम संथ
गती मंदावली की मुद्दाम संथ केली?
आजचा भाग पण गेल्या दोन भागांप्रमाणेच!
>> अगदी अगदी. शिवाय चंदूदादाने रागिणीला संदीप डावाविषयी सावध न करणे पुन्हा नव्याने खटकले :कपाळ बडवणारी बाहुली:
आजचा कुठे रेंगाळला? ती तो
आजचा कुठे रेंगाळला? ती तो flash driveघेऊन आली की घरी. एकदाची.
त्या डावानी काय तिच्याशी दुश्मनी धरलीये समजेना.
काय बोअर करतायत राव. स्तुती
काय बोअर करतायत राव. स्तुती डोक्यात गेली बहुधा.
मुक्ता फक्त मुर्खपणाच करत बसलीये. काय दाखवायचंय हे सगळं करून हेच कळेनासं झालंय.
मुक्ता फक्त मुर्खपणाच करत
मुक्ता फक्त मुर्खपणाच करत बसलीये
>> + १००
इतक्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करणारी मुक्ता किरकोळ चुका करताना दाखवली आहे. आधी तिचं नवखेपण, क्रिमिनल बॅकग्राऊंड नसणं गृहीत धरलं तरीही सिरीयलच्या शेवटच्या टप्प्यावर तरी ती जरा स्मार्ट दाखवायला हवी. डावा बरोबर काम करताना आपण कुठल्या प्रकारच्या लोकांबरोबर डील करतोय याची जाणीव होऊनही ती त्या बाबतीत फार बेसावध का दाखवली आहे कोण जाणे. धुरतच्या खुनाच्या मागे कुणाचा हात असू शकतो याचाही शोध घेण्याची तिला गरज वाटत नाही. जरी जगतापांबद्दल तिला धुरतने सांगितलं होत तरी निदान खरोखर तसंच घडलं का हे तिनं तेव्हाच पडताळायला हवं होत. चंदूदादांनी तिला सावध न करणं हे तर फार खटकलं. आता तर धुरत आणि जगताप हे दोन्ही दुवे जे रागिणी आणि चंदूदादांचं कनेक्शन शोधत होते ते पटावरून गायब असताना चंदूदादांनी डावाला इतकं लाईटली घेणं पटत नाही. सुरवातीपासून इतकी बांधीव असलेली कथा हळूहळू ढासळायला लागल्यासारखी वाटतीये.
तिने एवढे अचाट प्रकार का केले
तिने एवढे अचाट प्रकार का केले ते ड्राईव बाहेर काढायला. मोबाईल विसरले म्हणून आत काय गेली, मग त्या कपाटात काय खुडखुड केली मग बाहेर येऊन मुद्दाम धडपडली काय, हुश्श. एवढं कडक चेकिंंग कशासाठी, मुळात तो बिल्डर, त्याची बायको आणि त्यांची श्रीमंती, सगळी लुटुपुटुची वाटते, खोटीखोटी. डावा आता तिला काही ईजा तर नाही करणार. एवढंं ट्रेनिंग घेतलं चंदूदादांकडून, ते रागिणी सगळं विसरली वाटतं.
शुक्रवार चा भाग स्लो होता पण
शुक्रवार चा भाग स्लो होता पण ठीके ..!
बाकी सरळ सरळ ड्राईव्ह मागून काही मिळाला नसता असेही वाटले .
एव्हड्या खटपटी करून ड्राईव्ह मिळवला खरे पण डावाच्या माणसाने घर पाहिलेच. चंदू दादांनी एकदा तरी मुक्ता ला सावध करायला हवे होते . आता परत रागिणीची काळजी करत बसायची !
हो ना ! चन्दु दादा ने कस सावध
हो ना ! चन्दु दादा ने कस सावध केल नाही तिला? माझ्या आठवणिप्रमाणे राच नेहमी चन्दु दादाना फोन करायची त्यानी केलेला एकदाही आठ्वत नाही.
नशिब ते पत्ते कुटणे एकदाचे
नशिब ते पत्ते कुटणे एकदाचे संपले व तिला हवे ते मिळाले.
फ्लॉश ड्राईव पहिल्यांदा हातात
फ्लॉश ड्राईव पहिल्यांदा हातात आल्यावर मला वाटलं..आता डायरेक्ट रागिणी तिच्या घरी लॉपटॉप वर बघेल काय आहे ते..पण खूपच ताणत आहेत.!
डावा ने तिचं घर बघावं या साटी असेल हा खटाटोप.!
आता सुहास मदत करणार.!
कालचा वेगवान होता पण फार
कालचा वेगवान होता पण फार खटपटी करायला लागल्या मुक्ताला आणि शेवटी डावा बसलाच आहे डोक्यावर. बहुतेक काही पैसे चोरीला जातील तिचे. ती दुसरा वेश घेऊन बाहेर पडेल कामासाठी.
रागिणी अभय सातवच्या बायकोकडे
रागिणी अभय सातवच्या बायकोकडे तिचा 'तो' विग घालून गेलेली असताना केला होता की फोन चंदूदादांनी तिला सावध करायला!
मालिका १९ नोव्हेंबरला नक्की संपणार. झी युवावर २० नोव्हें पासून सोम ते शनी रात्री ९:३० वा नवीन मालिका येणार आहे...कालच अॅड पाहिली. हुश्श झालं. रच्याकने नवीन मालिकेचा प्रोमो पाहून लईच वाईट वाटलं राव ...रुद्रम च्या जागी ही (किळस आणि आश्चर्य वाटणारी बाहुली) मालिका...देवा देवा मराठी प्रतिभा रिटायर झाली काय ??????
का सगळे मालिकेला लगेच बोर
का सगळे मालिकेला लगेच बोर म्हणताय? बाकिच्या सिरियली इतक्या भिकार आहेत त्यात ही कित्तीतरी उजवी आहे.
मला तरी आवडलं जे दाखवलं ते. मुक्ताने ड्राईव्ह ज्या पद्धतीने लपवला आणि परत मिळवला त्याला तोड नाही.
रागिणीने इतक्या खटपटीने
रागिणीने इतक्या खटपटीने रागिणीने ड्राईव्ह मिळवला , पण आता यातल माखिजाला काही सांगू नये म्हणजे झालं
ड्राइव्ह मधल्या नावांचा उलगडा
ड्राइव्ह मधल्या नावांचा उलगडा झाला की मग तिला एक-एक करुन सगळ्या गोष्टी उलगडतील. माखीजावर ठेवलेला विश्वास भोवणार तिला!
खरेतर आता तिला पुढे तिच्या कामात कोण मदत करेल ते बघायचे आहे कारण धूरत मेला,चंदूकाका आता अॅक्टिव्ह नाही म्हणजे जरा हा गुंता सोडविणे अवघडच आहे. शेवटच्या आठवड्यात भराभर गुंडाळतील (की सोडवतील) मालिका.
रच्याकने नवीन मालिकेचा प्रोमो
रच्याकने नवीन मालिकेचा प्रोमो पाहून लईच वाईट वाटलं राव ...रुद्रम च्या जागी ही (किळस आणि आश्चर्य वाटणारी बाहुली) मालिका...देवा देवा मराठी प्रतिभा रिटायर झाली काय ?????? >> का ग? एवढी भीषण कुठली मालिका येतेय
२० नोव्हेंबर ला दुसरी मालिका म्हटलं तरी आजचा दिवस पकडून १४ दिवस आहेत मालिका संपायला
सुजा अगं भीषण म्हणजे महाभीषण
सुजा अगं भीषण म्हणजे महाभीषण मालिका आहे. देव म्हणे स्वर्गातून खाली येतो जीन्स घालून . काहिच्या काही दाखवतात राव !!!!
आणि जो देव झालाय तो पण कसला
आणि जो देव झालाय तो पण कसला टमाटा आहे.
सौरभ शुक्ल ला तरी विचारायचं. कृष्ण! कृष्ण!
संदीप डावा आणि त्याच्या
संदीप डावा आणि त्याच्या माणसाचा परस्पर गेम होईल असं वाटतंय,मे बी चंदूकाका किंवा सं पा कडून.मेन प्लॉट नीट उलगडला तर मजा येईल पाहायला,उगीच गुंडाळून टाकू नये
कठीण दिसतय रा चं वाचण. डावा
कठीण दिसतय रा ची ईझीली सुटका होणे.. डावा ची टफ फाईट. बघायला मजा येईल. पु भा प्र
आता त्यांच्या कडे
आता त्यांच्या कडे दाखवण्यासारखं फार कमी राहिलेले दिसतंय त्यामुळे आज पूर्ण टायटल सॉन्ग दाखवलं . परत तो डावा चा माणूस किती तरी वेळ पैशाची शोधाशोध करताना दाखवलाय. पण त्याला बरोबर पैसे मिळाले नाहीतच आणि कमाल म्हणजे त्याला आरशासमोर ठेवलेले विग पण दिसले नाहीत
त्याने रागिणीवर पिस्तुल रोखलंय खरं पण आयत्या वेळी कोण तरी टपकेल आणि मुक्ताची सुटका होईल . मागे दत्यासमोर चंदू दादांनी येऊन तिची कशी सुटका केली तसच काहीं तरी . रागिणी नाहीतरी मानसिक पेशंटच आहे पण तिची सगळ्याच गोष्टीत घाई घाई बघून आजकाल चक्क तिचा राग यायला लागलाय. त्या सुहास च्या किती मागे पडते आत्ताच काम कर म्हणून . अरे त्याला त्याच्या ऑफिस ची काही काम आहेत कि नाही. का तिचंच पर्सनल काम दिवसभर करत बसणार ? एखाद्याला कितीही रागिणीबद्दल सहानभूती किव्वा प्रेमही वाटत असेल तरी तीच हे असं घाई घाईच वागणं बघून ती मनातून उतरू पण शकते. सुहासने "नाही करत जा तुझं काम "असं सांगावं असं वाटलं आज तर. . ती पेशंट आहे तरी ती मानसोपचार तज्ज्ञाला सुद्धा वेळोवेळी भेटत नाहीच . तिला जेव्हा वाटेल तेव्हा . तिचा जेव्हा मूड असेल तेव्हा. अर्थात मानसिक रुग्णाच्या स्थितीतून तीच वागणं बरोबर हि दाखवलं असेल.
Pages