"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर कुठलाच गुन्ता दिसत नाही, एखादि दुसरी किरकोळ नावची चुक म्हणजे काय फार बिग डिल नाही
, एक मात्र आहे की डावाने रा ला मदत केली पैसे घेतले प्रकरण तिथेच सपलेले दाखव्ता आल असत त्यायोगे ति लिन्क ब्रेक झाली असती मग त्यातल दाखवायची काही गरज नाही पण सिरियलला थोड ड्रामॅटिक केल आहेच पण ते ओढुन ताणुन नाहीये त्याचा फ्लो बरोबर मॅनेज केलाय.
चन्दुदादाच्या जाण्याने रा ला होणार दुख मुक्ताने बरोबर दाखवलय, जगतापला रा भेटली तर सरपोतदार आणी परदेशी दोन्हीविषयी कळेल ,
रा शेवटी मरणार हे नक्की पण तिनेच हे सगळ केलेय हे जगासमोर नाही येणार दडपल जाइल त्यामूळे एका धडाडिच्या पत्रकाराच म्रुत्यु एवढच सत्य समोर येइल अस मला वाटतय.

रुद्रम या आठवड्याचे सर्व भाग आज युवा वर होते, 10 च्या थोडा वेळ आधी लावला तेव्हा कळलं, नेमका शेवटचा शॉट फक्त बघितला.

जगताप ने बरं डोकं चालवलं.. आणि रागिणीला भेटायला बोलवलं. पण मला एक कळत नाही की सुहास ज्या कामात एक्स्पर्ट आहे तेच काम त्याला जमत नाही म्हणतोय..!!
मला वाटतं डावाचा ट्रॅक ओढून ताणून आणला नाही.. पैशांसाठी ह्या फिल्ड मध्ये लोकं काहीही करू शकतात..
आणि रागिणी ह्या सगळ्याला कसं तोंड देते ते दाखवलं..

रुद्रम या आठवड्याचे सर्व भाग आज युवा वर होते, 10 च्या थोडा वेळ आधी लावला तेव्हा कळलं, नेमका शेवटचा शॉट फक्त बघितला.>>>{ दर शनिवारी शुक्रवारचा एपिसोड दाखवतात 9.30ला

बी. एस. खूप खूप धन्यवाद शुक्रवारच्या लिंक साठी, त्यामुळेच मला बघता आला तो भाग.

चंदूदादाने रागिणीबरोबर माझ्याही डोळ्यातून पाणी आणले, फार हेलावून गेले. बरं झालं त्याचे जाणे डायरेक्ट दाखवलं नाही. कि क आणि परदेशी सीन उत्तम झाला. कि क त्याच्या दोन कुक समोर कसं काय सर्व बोलतो परदेशीशी.

बाकी जगताप पासून बघायला मिळाले होते. जगताप मस्त रागिणीला सांगेन म्हणतो ते. चला आता दोन आठवडे आणि दहा दिवस राहिले फक्त.

वंदना ग्रेट खरंच. मुक्ता आणि तिच्या सीन मध्ये ती भारी पडते मुक्ताला नक्कीच. हे मी मागे हॉस्पिटलमध्ये admit केलं तो सीन बघून युवा fb वर पण लिहून आले.

मेन accident मध्ये रागीणीचे कुटुंब गेले त्यानंतर बाबू, छाया, किर्तीकर, त्या मुली, धुरत आणि चंदूदादा या सर्वांचे जाणे फार चटका लावून गेलं. धुरत आणि चंदूदादा शेवटपर्यंत हवे होते, मेन आरोपी कोण आहे कळणे त्यांचा अधिकार होता ते राहून राहून वाटतं.

मोबाईलवर मला बघायला मिळाला पण तो चौकोन मोठा होईना, मी रोटेशन पण बंद केल्यामुळे आडवे मोठे दिसत नसेल कदाचित पण माझ्या ते लक्षात आले नव्हते काल मग मी आज pc वर बघितला. समाधान मिळाले pc वर मात्र, मोबाईल स्क्रीन असाही लहान आहे माझा त्यात अजून लहान बघितलं गेलं.

हो ना, चांदूदादा आणि धुरत चं जाण्याने डोळ्यात पाणी आलं. धुरत च दाखवलं, चांदूदादांचं दाखवलं नाही पण तरी परिणामकारक घेतलं.

10 दिवस. अजून आपल्या माहितीचे ह्या scam मधले परदेशी, सरपोतदार, शोभाताई, की क , समन्वय चेतना मधले कोणीतरी एवढे जिवंत आहेत. की क च्या वर कोणीतरी असावा, नाहीतर आपल्याला रहस्यभेद झालेलाच आहे.

शनिवारी रात्री बारा वाजता गुरूवारचा भाग बघितला. शुक्रवारच्या लिंकवर रूद्रमवर प्ले केल्यावर काळी स्क्रिन येते. लॅपटॅापवर चेक करायला पाहिजे.

फ्रेंड्स या धाग्याने २००० चा टप्पा पार केल्याने रुद्रम चा नवीन धागा ( धागा क्रमांक - २ ) उघडला आहे .
त्यावर आजपासूनची चर्चा सुरु करणार का ? Happy

एका मैत्रीण्नी बरोबर सतत मी चर्चा केली की इतकी मस्त होती ही सिरियल तर तिला आता बघायचीय.
मी तिला वरची लिंक दिलेली(http://expertblogz.com) पण ती म्हणतेय की, नेमके सगळे भाग गायब आहेत सपटेंबर ५ पासून.

अमेरीकेत आहे ती. कोणाला लिंक माहिती आहे का अमेरीकेतील लोकांसाठी जी ओपन होतेय.

Pages