"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर होताच पण गरजेचा, लास्ट सीन नको होता. पण नाईलाज होता रागिणीचा. अजून तिला कुठल्या पातळीला उतरायला लागणार ह्याची काळजी वाटते. काही प्रतिकात्मक हवं. अंगावर काटे येतात. डोळे बंद होतात.

जे दाखवलं ते प्रतिकात्मकच तर होतं..

माखिजा वाला एपिसोड.. एवढंच कश्याला? ती अमिता खोपकर तिच्या एंट्रीच्या एपिसोडला नुसत्या डायलॉग्ज मध्ये कोंबड्या कापायच्या फॅक्टरीचं वर्णन करते ते याहून कैक पटीने किळसवाण होतं.

काही प्रतिकात्मक हवं. अंगावर काटे येतात. डोळे बंद होतात.>> हो. पण एक चूक होती. पण तस दाखवलं असतं तर अजून भयानक वाटलं असतं.

त्या बंद बेडरूमचा रहस्य खुलेल का आता याच्या पुढच्या भागात . >>त्यात काही असेल का? त्यात तर ओनर चे सामान आहे ना? रुद्रम इतकी फास्ट आणि रहस्यमय आहे की आपण प्रत्येक गोष्टीत रहस्य शोधतोय Happy

असं काय भयानक दाखवलंय? पेन ड्राईव्हवर त्या मुलींचे व्हिडीओ वगैरे की रागिणी त्या डावाच्या माणसाला मारते वगैरे? आता जाम उत्सुकता वाटायला लागली आहे.

काय दाखवलंत असं भयानक? रा ला गोळी वगैरे लागली का काय? >> नाही. तिला गोळी नाही लागलेली, तिने डावा च्या माणसाला शिताफिने संपवलंय. त्याची विल्हेवाट लावणं आलंच ना मग आता?
रागिणीने माझ्यामते चंदुदादांची मदत घ्यायला हवी होती. ज्या अर्थी पुढिल भागात मध्ये रागिणी डाव्याच्या समोर बसलेली दाखवली आहे त्या अर्थी ती सही सलामत आहे.

पियु तुझ्या पोस्ट शी सहमत एकदम. किक किरण ला मारतो तो एपिसोड् जास्त भयंकर होता, आज जे दाखवलं ते सिम्बॉलिक होतं पुर्ण.

रागिणीने हे सगळं करायच्या आधी चंदूकाकांना फोन केला असता तर जास्त बरं झालं नसतं का? कदाचित काही वेगळा मार्ग सापडला असता.

किक किरण ला मारतो तो एपिसोड् जास्त भयंकर होता >>> हो नक्कीच, तेव्हा पण मी डोळे बंद केले, अंदाज आला होता. शहारा आला होता तेव्हाही.

मला वाटलं होतं फोन हातात घेतल्यावर चंदुदादाला लावेल पण तिने डावाला लावला. अर्थात डावाला केला ती परफेक्ट खेळी होती.

कमाल म्हणजे कमाल अ‍ॅक्टिंग...
डाव्याला तिने ताकास तूर लागू दिला नाही की तिला माहिती आहे तो माणूस त्यानेच पाठवला होता ते.
आता त्याच्याच तंगड्या ती त्याच्याच गळ्यात घालेल.. मग तो (डावा) बसेल दोन्ही हातानी शंख करत.
डाव्याचा माणूस पण माठच होता बहुधा, जिन्याखालचा खण मिस करणे, फ्रिज मधली गन मिस करणे... सुदैवाने रागिणीला फ्रिज मधली गन ऐनवेळी वापरण्याचे सुचले ते बरे झाले.
तिने २ गोळ्या मारल्यावर मी मोठा श्वास घेऊन हुश्श केले Proud

अंगावर काटे येतात. डोळे बंद होतात. >> मी तर केलेच होते नाही बघवत असं काही . तस खूप काही प्रतीकात्मक पण नव्हतं. मला नाही सहन झालं. मुक्ताची एक्प्रेशन्स तर .... काही विचारायचंच नाही Sad
त्या बंद बेडरूमचा रहस्य खुलेल का आता याच्या पुढच्या भागात . >>त्यात काही असेल का? त्यात तर ओनर चे सामान आहे ना? >> काय माहिती ? कि असच काही तरी भयानक लपवलेलं वगैरे. तो ओनर कोण आहे ते पण दाखवलं नाहीये . तो नाहीतर किकच निघायचा Happy

चंदूदादांनी फोन करायचा नाही असं निक्षून सांगितलंय. ती डावावर गन का रोखते. असे तुकडे करून बॅगेत भरले वगैरे आजपर्यंत फक्त मी वृत्तपत्रात वाचलंय, सीआयडी, क्राईम पॅट्रोल वगैरे बघत नाही. ते मशीन कशासाठी वापरतात ते पहिले कळलं नाही आणि रस्सीही. ईलेक्ट्रिक करवतच ती. रा सॅक पाठीला लावून का बाहेर पडते, ट्रॅवलर वाटावी म्हणून का. मालिका परत वेगवान आणि ईटरेस्टींग झाली आहे, पुढचा भाग कधी येतो असं झालंय.

आमच्याकडे अजुनही आला नाहिये भाग! पण बघायचा धिर होइल की नाही अस वाटत्य वरच वर्णन वाचुन, मी मखिजाने किरणभाउला मारले ते सुधा नव्हत बघितल ...इतका रक्तपात बघवतच नाही

अरे बापरे , असं झालाय का आज ! वाचायला पण डेंजर वाटते आहे !ऑनलाईन एपिसोड अजून आला नाही .
कधी येणार कुणास ठाऊक .

Pages