"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलीमराठीवर आला आहे आजचा भाग. आता सुहासचा जीव धोक्यात पडू नये म्हणजे मिळवलं. परदेशी लक्ष ठेवून आहे रागिणीवर आणि ती वेषांतर करून फिरते हेही कळलंय त्याला. संदीप पाठकला शेवटी काही भन्नाट काम असेल तर मजा येईल, नाहीतर उगीच इतकं भारी पात्र उभं करायचे कष्ट घेतले असं होईल. मालिकेच्या शेवटी रागिणी संपणार किंवा पूर्ण वेडी होणार अस दिसतंय.

पाठकला नक्की जबरदस्त रोल असेल शेवटी. तो काही उगाच घुसला नाहीये.

सुटायला हवी शेवटी रागिणी. पण स्वतः सरेंडर होईल किंवा मारून घेईल. कुल सर्व करून सुटली तर आपल्याला आवडेल, भारी वाटेल.

ozee वर झी युवाने असं काय केलं. रुद्रम सोडून सर्व सिरीयलचे भाग टाकले की मग फक्त रुद्रमचे का नाही दोन दिवस.

आपलीमराठी वर आलाय भाग , डावाला भारी उडवले Happy
प्रेक्षक मुक्तासारखे विचार करायला लागले आता ! माखिजा पण लक्ष्य ठेवून आहे Sad माखिजा यात आहे असे समजले तर रागिणी उडवू शकेल असाच त्याला . त्या दिवशीच संदीप पाठक माखिजाचा गेम करू शकला असता ..पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळे सुरु असावे .

शेवटचे दोन भाग अंगावर आले. करवतीने प्रेताचे तुकडे काय आणि सरळ नेम धरून संदीपचा खून काय! ओव्हर द टॉप गेली मालिका. हे वळण पचलं नाही. रागिणीही आता प्रो किलर झाल्यासारखी वागतेय. मूळ रहस्य ज्याकरता हे सगळं चालू आहे ते मागेच पडलंय त्या भरात. आणि मुळात ते रहस्य इतकं भयंकर आहे का ज्याकरता तिने राजरोसपणे खून करावेत? नाही पटलं.
काल वंदना गुप्तेचा एकच सीन होता, तोही एकही शब्द नसलेला! पण काय एक्स्प्रेशन्स दिली! वंदना गुप्ते सीनमध्ये असली की मुक्तालाही खाऊन टाकते. एरवी मुक्ताचा हात कोणी धरू शकत नाही.

कालचा आणि पर्वाचा भाग बघुन सुन्न झालय डोकं...मुक्ता काय काम करतेय यार....
काल ज्या थंड डोक्याने डावा ला मारते ...बापरे..
डावा शी बोलता बोलता मॅगझिन लोड करते,..सायलेन्सर चेक करते....डावा ला कळतही नाही की ही खुप ईझीली पहिल्यांदा हातात दिलेली गन आरामात हाताळते आहे...तिने डावा कडे गन लोड करताना ज्या नजरेने पाहिलं ना तेव्हाच लक्षात आलं की डावा संपला आता...
मुक्ता ने एक सामान्य अशी डीप्रेशन आलेली मुलगी ते थंड डोक्याची खुनी हा प्रवास जबरदस्त साकारलाय...

काल वंदना गुप्तेचा एकच सीन होता, तोही एकही शब्द नसलेला! पण काय एक्स्प्रेशन्स दिली! >> +११

ओझी वर काय प्रॉब्लेम आहे? आज आपली मराठी वर पाहिला भाग. खूप धडधड होत होती बघताना..
पण जे मेन रहस्य आहे ते काही तरी जबर्दस्त असायला हवे आता..ज्यासाठी रागिणी हे सगळ करतेय..ती गुन्हेगार झालीये.!
परदेशी हुशार दिसतो..त्याला कळालं रागिणी वेषांतर करून फिरते..!!
आता शेवट कसा करतात हे बघणं ईंटरेस्टींग असेल.!

https://vid.me/cphfv

हा पहीला पार्ट आहे १५ मिनीटांचा. watch next part असं येईल कोपर्यात.तिथे क्लिक केल्यावर पुढचा पार्ट दिसेल.

कालचा भाग थोडक्यात....
रागिणी बॅग ढकलत गेट बाहेर येते आणि तिच्या डोळ्यावर लाईट्स पडतात, एक पोलिस दुचाकीवरून येऊन तिच्या इथे थांबतो, रागिणी थोडी बावरते पण तो तिची चौकशी करतो की ती कुठे निघाली आहे वगैरे, मग तो तिला बॅग गाडित लोड करायला मदत करतो. मुक्ता एका निर्जन ठिकाणी जाऊन बॅग काढून ठेवते आणि त्यावर पेट्रोल ओतून पेटवून देते.

बॅग पेटवून मुक्ता आईकडे येते, एकही संवाद नव्हता... आईच्या आवडीचे नेलपॉलिश ती लावून देते आणि आईचा हातात हात घेऊन तिथेच बसल्या बसल्या झोपते. इतकी मेहनत केल्यावर झोप येणारच नाही का?
मध्यरात्री उठून कुठेतरी जाते.. एका फ्लॅट मध्ये दोन माणसं तिच्या बॅग्ज आणि काही खोकी आणून ठेवतात, मुक्ता पैसे देते आणि घराची पाहणी करते (खिडक्या वगैरे उघडून पाहून इ.)
पण इथे मला एक प्रश्न पडला की मुक्ता इतक्या रात्री नव्या फ्लॅट मध्ये शिफ्ट होते का? Uhoh
दुसर्‍या दिवशी इकडे डावा पुन्हा शामराव चा फोन ट्राय करतो पण ऑफ येतो तितक्यात रागिणीचा त्याला फोन येतो, ती त्याला सांगते की ती त्याच्याकडे येतेय.. डावाने ४-५ गन मागवून ठेवलेल्या असतात. रागिणी आल्यावर तो केबिन चे पडदे वगैरे लावून घेतो ते रागिणिच्या पथ्यावर पडते. वेगवेगळ्या गन्स, त्यांचे मेक, उपयोग, रेंज इ बद्दल सांगताना एक गन रागिणीला पसंत पडते... त्याला सायलेन्सर ही असतो. रागिणी गन पहिल्यांदाच हातात घेतेय असं सांगते डावा ला... त्यामुळे गन चे मॅगझिन कसे उघडायचे, कसे लोड करायचे इ. सहजगत्या सांगतो, रागिणी सर्व तसे तसे करते. आणि डावाला टेबलवरचा ग्लास बाजूला करा म्हणजे फुटला तर आवाज होणार नाही असे सांगते तरिही डावाला तिचा संशय येत नाही (याचे आश्चर्य वाटले) डावा ग्लास उचलून ठेवतो, रागिणी खुर्ची मागे घेऊन दोन्ही पाय ताणते, आणि डावावर गन रोखून दोन गोळ्या झाडते, एक व्यवस्थित कपाळात, नो चर्चा... विषय संपला.
वर कुणितरी डिटेलिंग चा उल्लेख केला आहे... खरंच उत्तम डिटेलिंग... डावाच्या कपाळात गोळी शिरल्यावर आजूबाजूचा भाग फुगिर झालेला आणि त्यातून आलेलं दाटसर रक्त.. अ‍ॅक्चुली श्लेमल ... नाकावरून ओघळते आणि तो टेबलवर पडताना ते व्यवस्थित दिसले...
मुक्ता ती गन व्यवस्थित पुसून टेबलावर समोर ठेवते, बाकी गन्स ची ब्रिफकेस उचलून बंद करते आणि टॉक टॉक करत बाहेर पडते. दुकानातली एक बाई तिच्याकडे पाहून हसते. रागिणी थंड पणे दुकाना बाहेर पडते...

आणि चंदुदादाना फोन करते वेगळ्याच नंबरवरून. आणि विनंती करते की तुम्ही काही दिवस बाहेरगावी जा.. कारण तिने डावा आणि त्याच्या माणसाला मारले आहे. आणि ती चंदुदादाच्या रेफ ने डावा कडे गेली होती त्यामुळे डावा चे लोक नक्की चंदुदादांना शोधत येतील तिचा (रागिणीचा) शोध लागावा म्हणून. पण चंदुदादा तिला सांगतात की मी कुठेही गेलो तरी जगाच्या अंतापर्यंत ते लोक त्यांचा माग काढतील, आणि लंगडा पाय घेऊन ते आतापर्यंत खूप पळाले आहेत.

एपिसोड संपला... (एखादं दृश्य राहिलंय का? मला आठवत नाहिये, कालचा एपिसोड मी ऑन अ‍ॅन्ड ऑफ पाहिला)
पुढच्या भागात मध्ये दाखवलं की... परदेशी कि क ला सांगतोय रागिणी एक कॉम्प्लेक्स बाई आहे, त्यावर कि क सांगतो की मला साध्या लोकांत रस नाही, त्यावर परदेशी सांगतो की ती वेष बदलून फिरत असते...

मला प्रश्न पडला की हि रागिणी तिच आहे का जिला डावा सांगतो की तो प्रेताच्या डाव्या हाताचा अंगठा की करंगळी कापून घरी प्रिझर्व्ह करून ठेवतो (ठेवलेत) ते ऐकून तिला उलटी होते... तीच रागिणी इतक्या सफाईने शामरावच्या शरिराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावते.

एपिसोड संपला... (एखादं दृश्य राहिलंय का? मला आठवत नाहिये, कालचा एपिसोड मी ऑन अ‍ॅन्ड ऑफ पाहिला) >>
हो...पुढे रागिणी चंदुदादाला फोन करुन सांगते की तिने नुकतच डावा ला मारलय आणि त्याच्या एका माणसाला पण मारलय. चंदुदादाच्या रेफ. ने ती डावा ला भेटली होती सो आता डावा ची माणसे चंदुदादाला त्रास देतील तर त्याने काही दिवस तिकडुन निघुन जावे,
चंदुदादा या गोष्टीला नकार देतो आणि म्हणतो की तो कुठेही जाणार नाही.

मुक्ता इतक्या रात्री नव्या फ्लॅट मध्ये शिफ्ट होते का? दुसर्या दिवशी होते शिफ्ट.
निधी. Happy

समन्वय चेतना दाखवत नाहीयेत..मूर्ती भेटल्यानंतर.!

मला प्रश्न पडला की हि रागिणी तिच आहे का जिला डावा सांगतो की तो प्रेताच्या डाव्या हाताचा अंगठा की करंगळी कापून घरी प्रिझर्व्ह करून ठेवतो (ठेवलेत) ते ऐकून तिला उलटी होते... तीच रागिणी इतक्या सफाईने शामरावच्या शरिराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावते. >> कदाचित हेच दाखवायचय ग दिग्दर्शकाला की परीस्थितीमुळे ....कोण होतीस तू काय झालीस तू...असं झालय रा च...आणि रा ने हे सगळे बदल काय मस्त दाखवलेत.,..ती कुठे चुकुन भेटली मला आयुष्यात तर तिला आधी नमस्कार घालेन मी एक...आणि मग एक घट्ट मिठी मारेन Wink

हो कालचा एपी एकदम च डेंजर !! कसली pose घेते रा खुर्ची मागे सरकवून काही कळण्याच्या आत डावा खल्लास ! काम तमाम !
यातली कमी बोंब मारणारी बंदूक कोणती असा विचारते रा !! Lol
आपली मराठी ने १ नोव्हे चा एपी अपलोड नाही केला सो काल पूर्वसूत्र बघताना लक्षपूर्वक पाहिलं ( दक्षिणा च्या detailed पोस्ट ची आठवण झाली )
आता इथून पुढे सगळेच भाग महत्वपूर्ण असणार आहेत. होप कि सगळे एपी वेळेत आणि रोज अपलोड होतील

एक प्रश्न:- रा चंदू दादांना फोन करते कि मी डावा ला संपवलंय etc सांगायला तेव्हा मोबाइल मध्ये ७:०४ वाजलेले दिसले (चंदुदादा फोन ठेवतात तेव्हा )
ते केव्हाचे असावेत ? सकाळचे का संध्याकाळचे ? बाहेर तर बऱ्यापैकी उजेड होता संध्याकाळचे ७ वाटत नव्हते.
आणि :- रा पैसे वगैरे दुसरीकडे हलवते ते अजून तिसऱ्याच फ्लॅट मध्ये का ?

मला प्रश्न पडला की हि रागिणी तिच आहे का जिला डावा सांगतो की तो प्रेताच्या डाव्या हाताचा अंगठा की करंगळी कापून घरी प्रिझर्व्ह करून ठेवतो (ठेवलेत) ते ऐकून तिला उलटी होते... तीच रागिणी इतक्या सफाईने शामरावच्या शरिराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावते. >>> मम.

तिच्यातल्या माणुसकीचाही ऱ्हास होतोय कुठेतरी पण तिचा नाईलाज आहे आणि हे तिने मनाने स्वीकारलं आहे. आपण मात्र थक्क होत जातो पण त्या विकृत डावाला मारले तिने ते मला परफेक्ट वाटलं. डावाच्या माणसाचे मात्र सर्वच विल्हेवाट लावेपर्यंत मी सहन करू शकले नाही. अजून रागिणीला कुठल्या पातळीला उतरलेलं बघायला मिळणार १५ दिवस काय माहीती पण कि क ला हाल हाल करून मारायला हवं अगदी चुनचुनके बदला घ्यायला हवा असं मात्र मला वाटतंय, कदाचित मी बघू नाही शकणार पण as a chara कि क फार विकृत दाखवला आहे.

as a chara कि क फार विकृत दाखवला आहे. +१ कसं मारतो किरण्भाऊला..!
आणि रागिणी मध्येही त्याला ईंटरेस्ट असेल असं वाटत नाही..

कि क विकृत आहे ते पहिल्या भागापासून जाणवत होतं पण माझं मन मानायला तयार नव्हतं. तो positive वगैरे दाखवावा असं मनातून वाटत होतं, डोक्यात मात्र तोच असेल मेन असं होतं पण मनाला नको तो असं वाटत होतं.

मोबाइल मध्ये ७:०४ वाजलेले दिसले (चंदुदादा फोन ठेवतात तेव्हा )
ते केव्हाचे असावेत ? सकाळचे का संध्याकाळचे ? बाहेर तर बऱ्यापैकी उजेड होता संध्याकाळचे ७ वाटत नव्हते. >> अन्जली सेम पिन्च..

Pages