"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरा भाग, पण त्यात मुक्ता नसेल. तिचा बदला संपेल ह्याच भागात.

अशा छोट्या पण उत्कृष्ट मालिका व्हायला हव्यात मात्र रुद्रम सारख्या, ओघवत्या.

पाठीवर गोळी लागून खरंच तो मरेल असं वाटलं नाही. असं वाटलं हॉस्पिटलम्धे नेईल जगताप त्याला. मग खरं काय ते कळेल त्याला. श्या... सगळंच संपलं Sad

चंपा आणि स्वरालीच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन.

जगताप त्याला तिथे येण्यापासून थांबवेल, ते नाही तर नंतर त्याला खरे काय ते कळून तो धुरतवरची गोळी स्वतःवर झेलेल, तेही नाही तर गोळी पाठीवरचा लागली आहे तर त्याला ताबडतोक हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचा जीव वाचेल असं काय काय शेवटपर्यंत राहून राहून वाटत होतं. Sad

अनुराधाला त्या मिळवलेल्या पैशांबद्दल घृणा आहे कारण तिला माहिती आहे नवऱ्याने काळे धंदे करून पैसे कमावले आहेत हे कारण पटण्यासारखे आहे . >>>>>>> +१ अगदी, ज्या मार्गाने ते पैसे मिळवळे आहेत ते तिला कळलयं आणि ती स्वत: एक आई आहे त्यामुळे त्या पैशांची घृणा येणे साहजीकच आहे.

सं पा उद्या कि क च्या घरी दाखवलायं !

धुरत गेलाय हे मान्य... ही मालिका अन्य ऐकीव मालिकांसारखी नाही हे ही मान्य... या मालिकेत अनेक निर्दयपणे खून झाले हे ही मान्य
पण धुरत खरच गेलाय हे मान्य करुनही मन अशी आशा करतं की "अंगावर बुलेट प्रुफ जॅकेट, जगताप आणि त्याने इतर टीम बरोबर खरा गुन्हेगार पकडण्यासाठी रचलेला कट, वगैरे, वगैरे मेलोड्रॅमॅटिक गोष्टी एकदाच या मालिकेत घडवून त्याला परत आणावं." (मी तथाकथित बिनडोक हिंदी मालिका/सिनेमे अथवा साउथ इंडियन सिनेमे यांचा अजिबात फॅन नाही हे नमूद करतो. )
Because He Was Worth It.
(हे होणार नाही हे माहितेय आणि मालिकेचा ढंग पहाता ते करणारही नाहीत... )
पण इतर अनेक निर्दयी खून मान्य केले तरी त्याच्या सच्च्या, मनस्वी कॅरॅक्टरचा विचार करता हा मृत्यू चटका लावून गेला..
बाकीच्या मालिकांची धक्कातंत्र वेगळी असतात, या मालिकेची वेगळी. (आणि त्याबद्दल तक्रार नाही. )

धुरतच्या जाण्याबद्दल "लेकीन ये अॅक्सेप्टेबल नही है बाॅस" अस A Wednesday मधल्या नासिरुद्दीन शहा सारखं म्हणावंसं वाटतं याबद्दल इथले बरेच जण कदाचित सहमत असतील...
आणि हेच त्याच्या कॅरेक्टरच, अभिनेत्याचं आणि लेखक, दिग्दर्शकाचं यश आहे....

संदीप पाठकला कळलंय की क ने किरण ला मारलंय, ह्या माहितीचा तो कसा उपयोग करेल ? तो डायरेक्ट रा ला मदत करू शकेल का ? तसं तो रा ला ओळखतो ह्या केस संदर्भात अस नाही वाटत.

वं गु ला आबा बरोबर ओळखता आला, तरी रा दुर्लक्ष करत होती.

रा ला आता शिक्षा होणार नाही अभय सातव च्या खुनाची कारण धुरत च होता ज्याला डाऊट आलेला होता. तिने कबूल केलं तरच नाहीतर ती वाचेल.

1 2 आठवडे राहिले असतील का मालिकेचे ? 55 भाग झालेत. आता आबा मिळाला आणि फ्लॅश ड्राईव्ह मधला डेटा पहिला की रा माखिजा पर्यंत पोचेल का अजून काही सिक्रेट असेल जे आपल्याला अजून दाखवलं नाहीये ?

शेवट रा आणि धुरत मिळुन करतात अस काही अपेक्षित होत.>> अगदी अगदी . आता संदीप पाठक रागिणीला मदत करेल . तो एकमेवच मदत करणारा जिवंत ठेवलाय . रागिणीला तिच्या नवर्याच्या खुन्यापर्यंत जाण्यात इंटरेस्ट आहे आणि त्या सगळ्यांना शिक्षा होण्यात इंटरेस्ट आहे . तसच होईल आणि मालिका संपेल . माझ्या मते दोन आठवड्यात. जगताप सुटला तर बर होईल कदाचित सुटेल आणि रागिणी सातवच्या बायकोला आणि मुलीला स्वतःच्या घरी घेऊन येईल .

मधल्या मध्ये मोहन आगाशे ( सायकियॅट्रिस )रागिणीच्या केस मध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत . त्यांचं काय करतील ? डावा आणि मिठबावकर मालिकेतून संपल्यातच जमा आहेत . पण सगळ्या कलाकारांची (अगदी छोट्यातल्या छोट्या एकूण एक सगळ्या. छाया सुद्धा अजून लक्षात राहिलेय ) काम उत्कृष्ट होती अतिशय उत्तम सांघिक काम ( लेखक /दिग्दर्शक/ कॅमेरामन/ कलाकार सगळेच सगळेच) जमून आलाय असं फार कमी वेळा घडत असेल आणि म्हणूनच हि मालिका कायम लक्षात राहील Happy

खूपच धक्कादायक होता कालचा भाग. धुरत जायला नको होता. एवढ्या प्रामाणिक आॅफिसर ला असं मरण.! लेकीन ये अॅक्सेप्टेबल नही है बाॅस"...!!
मूर्ख जगताप आणि हलकट सरपोतदार मुळे सदाला जीव गमवावा लागला.. खूप वाईट वाटलं आणि डोळ्यातून टचकन पाणी आलं.. इन्स्पेक्टर सदानंद धुरत.. We will miss you..

धुरत च्या खुनानन्तर त्याच्या बायको आणि मुलानी यायला नको का गावाहून?
nursing home मध्ये एकदा रागिणिला ती आधिची hospital मधली नर्स भेट ते ना?
ती धक्का बसून तिला विचारते "तू? इथे?"
आणि मग सावरून घेते.
त्याचे पुढे काहि झाले नाही ना?
त्या नर्स ला काही शन्का आली नाही.

धुरत चा बळी जायला नको होता.
कदाचित रागिणि जगताप ला भेटेल का जाउन?
तो तिला खरे सगळे सान्गू शकेल. कारण सदा तिला म्हणाला होता कि आमचे भान्डण झाले असले तरी तो माझे इतके वाइट करणार नाही.
त्यामुळे रागिणिही असा विचार करू शकते की जगताप ला वापरून घेतले असू शकते. अ सा च्या बायकोला ही माहित आहे की त्या लोकानि सदा ला कसे वापरले होते आणि त्यामुळे तो किती disturb झाला होता. तसेच जगतापला वापरून घेतले असू शकते. हे तिच्या लक्शात येइल का?
rather यावे.

धुरत च्या खुनानन्तर त्याच्या बायको आणि मुलानी यायला नको का गावाहून? सगळं डिटेलींग दाखवत नाहीत. फक्त जेवढं महत्वाचं आहे तेवढंच..! अनुराधाला ही बातमी कशी कळते हेही दाखवलं नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या.. मला आवडलं हे.. टिपीकल सिरीयल सारखं नाही..एकेकाला बातमी कळणार मग प्रत्येकाची त्यावर रिऑक्शन..!

अनुराधाला ही बातमी कशी कळते हेही दाखवलं नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या.. मला आवडलं हे.. टिपीकल सिरीयल सारखं नाही..एकेकाला बातमी कळणार मग प्रत्येकाची त्यावर रिऑक्शन..! >>>>> करेक्ट.

जसं अनुराधाने हॉटेल विकलं वगैरे काही दाखवलं नाही तसं.

बिएस +१.
सातवच्या मुलीची फारच थंड रिएक्शन दाखवली मामा गेल्याचं कळल्या नंतर ही. आई हमसुन हमसुन रडत होती त्यामानाने मुलगी अगदीच शांत होती.

वरच्या सगळ्या पोष्टीना अनुमोदन आज मला ४४ न्यू पोष्टी होत्या तेव्हाच कळलं कि सगळ्यांना वाईट वाटतंय धुरत गेल्याच . मला पण वाटत होता कि एवढं सहज मरण नाही येणार .. पण जाऊदेत आता Sad
नै त काय कसला तो जगताप आरामात फसवला गेला पिस्तूल हातात घेऊन ठसे दिलेन पुरावा सहज मिळायला शिवाय रेकॉर्डिंग वगैरे चालूच होते म्हणा .

अजून बऱ्याच गोष्टींचा clues ची जुळवाजुळव व्हायची आहे लगेच नको संपायला.
सं पा काय करणार ? मिबा ला आता सोडवतील मला वाटतंय सरपोतदार, अडवायला कोण नाही, ना जगताप ना धुरत. सुहास च्या स्कील चा रा उपयोग करून घेते का नाही ,त्याच्या बाबांचं काय ?का ते एवढे नाही आता महत्वाचे? जस्ट सुहास ची परिस्थिती दाखवायला होते ? डावा ला अजून रा कोण आहे ते कळायचं आहे ...
नवीन किरण (परदेशी ) ने २ महत्वाची कामे(शोभा ,अन धुरत ) झटपट करून किक चा विश्वास चांगलाच संपादन केला म्हणायचा

आयला एक लक्षात आलं का? या सिरियल मध्ये धुरत, वंगु आणि काही मोजके कलाकार सोडल्यास बाकी सगळे ऑलमोस्ट गुन्हेगार आहेत Proud
रा ने अभय ला मारले
चंदुदादा ने शिवाला
शिवाने बाबू ला
किक ने किरण ला
जगताप ने रघू ला
परदेशी ने धुरत ला
शोभा मुलिंना देशोधडीला लावतेय
संदिप ने तर अनेकांना मारलेय (आकडा लक्षात नाही)
बाकी राव सर, विवेक, मानसी हे ही छोटे मोठे गुन्हेगार आहेतच Proud

सं पा काय करणार ? माखिजाला मारणार बहुतेक. .त्याच्या एवजी दुसरा मारेकरी आणला ना..!
@ दक्षिणा ..अगदी बरोबर..! Happy

आता रागिणीला जगतापला भेटूनच काहीतरी clue मिळेल.
मखिजाबद्दल तिच्या मनात soft corner आहे त्यामुळे तिला एवढ्यात त्याच्यावर संशय येईल असं वाटत नाही.
आज आबा कुठेय ते कळणार..

आज आबा कुठेय ते कळणार..> हो का ?हे दाखवलं का पुढील भागात ?
चिप मधून डेटा मिळेल कि कुठली मुलगी/मुलगा कुणाकडे दत्तक गेली/गेला आहे? ऍड्रेस काय ? ते पालक काय करतात etc? किंवा अजून त्याचे प्लॅन्स आणि माहिती जी रा च्या नवऱ्याने (नाव विसरले )१st news channel च्या कीर्तिकर sir ना देण्यासाठी ठेवली होती .. ते काहीतरी १० भागांचा progeamm करणार होते ना . अजून रा ला तिच्या नवऱ्याचा लॅपटॉप पण नाही ना मिळालाय Sad किंवा त्याबद्दल माहिती

माखिजाला मारणार बहुतेक. .त्याच्या एवजी दुसरा मारेकरी आणला ना..!>> पण तो माखिजा च्या सांगण्यावरून का ?okay जुना किरण फोन वर सांगतो कि संदीप पाठक च काय खरं नाही आपल्याला दुसरा बघावा लागणार etc

मखिजा ला मारण्याचा अधिकार रागिणीला द्यायला हवा. पाठक ने कि क ला भेटण्याऐवजी रा ला भेटून सर्व दाखवायला हवं होतं.

पाठक रागिणीला फक्त पत्रकार म्हणून ओळखतो, आणि तो न्यूज चॅनेलवर माहिती द्यायला आला तर त्याचा गेम होणार हे त्याला माहितेय, त्याने स्वतःच कित्येकांना उडवलंय।। तो बरोबर योग्य माणसाकडे आलाय.

रागिणीला आबा भेटणार.

मी आता गेले तीन भाग बघितले.
धुरत मेला ते वाईटच झालं पण ही सिरियल रागिणीची आहे व त्यामुळे आता फक्त तिचा लढा दाखवणार असावेत. धुरतचं जाणं रागिणीलाही चटका लावून गेलंय.
धुरतला पाठीवर बरोबर डावीकडे हृदयाच्या ठिकाणी गोळी लागलेली/ घातलेली दाखवलीय त्यामुळे तो लगेचच मेला.

किरणपेक्षा परदेशी काम चांगलं करतोय. पण इतक्या लगेच तो या सगळ्यात मुरल्यासारखा काम करतोय ते ओव्हर वाटतंय.

किरणपेक्षा परदेशी काम चांगलं करतोय. पण इतक्या लगेच तो या सगळ्यात मुरल्यासारखा काम करतोय ते ओव्हर वाटतंय. >>> तो ह्याच धंद्यातला असतो फक्त खालच्या लेव्हलला असतो. माखिजाने त्याला किरणच्या जागी पारखूनच घेतलं असणार ना....

किरणपेक्षा परदेशी काम चांगलं करतोय. पण इतक्या लगेच तो या सगळ्यात मुरल्यासारखा काम करतोय ते ओव्हर वाटतंय. >>> मला नाही वाटत तसं कारण transportवाला म्हणजे मुली आणि drugs दोन्ही transport करत असणार तो. त्यामुळे मुरलेला असणार फक्त मुख्य फ्रेममध्ये नव्हता तो एवढंच.

अनुराधाला ही बातमी कशी कळते हेही दाखवलं नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या.. मला आवडलं हे.. टिपीकल सिरीयल सारखं नाही..एकेकाला बातमी कळणार मग प्रत्येकाची त्यावर रिऑक्शन...>> मला पण हेच आवडलं. जास्त फापट पसारा नाही . धूरत ची फ़ॅमिली येऊन सगळे दिवस-वार झाल्यानंतर परत गावाला गेली असेल असं आपण समजायचं त्यानंतर मग अनुराधा आणि तिची मुलगी घर सोडायचा विचार करताहेत . जास्त डिटेलिंग दाखवण्याची गरजही नाहीये

जगताप ने रघू ला मारलाय पण जगताप गुन्हेगार नाहीये . म्हणजे त्या गॅंग मधला. खर तर गुन्हेगारांची गॅंग उघड करणारीच ( त्यांचे काळे धंदे उघड करणारी ) मालिका आहे ना . मग बरेचसे गुन्हेगार असणारच Happy

गिरीश जोशी ...रसिका जोशींचा नवरा कथा पटकथा संवाद त्याचेच आहे ...राजवाडे ला पाहून तोच ह्या सिरियलचा दिग्दर्शक असावा असं वाटलं होत...पण दिग्दर्शक कोणी वेगळाच आहे. पात्रांचे संवाद खूप प्रभावी आहेत ....छान वाटतात ऐकायला....किरण करमरकर मेन व्हिलन असावा हे सुरुवातीलाच मला वाटलं होत आणि तेच झालं.... मुक्ता बर्वे सोबतच धुरत आणि चंदू दादा वंदना गुप्ते आणि त्या आधीची छाया खताळ ह्यांची अकटिंग जबरदस्त ... गिरीश जोशी चा एक डाव धोबीपछाड हा सिनेमा पण छान होता....वेगळी आणि छान आहे मालिका

सातवच्या मुलीची फारच थंड रिएक्शन दाखवली मामा गेल्याचं कळल्या नंतर ही. आई हमसुन हमसुन रडत होती त्यामानाने मुलगी अगदीच शांत होती.>> हो ते मात्र अगदी जाणवलं. तिच्या ऍक्टिंग वर आणखीन लक्ष द्यायला पाहिजे होत . त्यामानाने आधीच्या काही प्रसंगात तिने व्यवस्थित काम केलं होत

हो ना, एकदम थंड reaction बघून हिला बरंच वाटलं की काय असं वाटलं, की मामा आता बाबांचं सत्य शोधणार नाही कारण तिचा बाबा तिच्यासाठी परफेक्ट होता. अर्थात घरी तो मायाळू रूप दाखवत होता.

Pages