"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुरतचं ऑपरेशन फेल होणार, इतके channel वगैरे बोलावून ठेवलंय त्याने. जगताप आणि धुरतचं वैयक्तिक काही असो, धुरतला कमीपणा दाखवण्यासाठी जगतापने इतक्या खालच्या थराला नाही जायचं, इथे इगोचा प्रश्न नव्हता. एक मोठा गुन्हा घडलाय आणि त्याला पाठीशी घालायचं का केवळ धुरतने अपमान केला म्हणून.

धुरत हे सर्व बॉस च्या परमिशन शिवाय करतोय का, कारण बॉस तर पोचलेला आहे त्याचा. ही केस त्याला पूर्णपणे handle करायला दिली आहे का, तो इझी ऑपरेशन करायला जातोय.

शेवटचे काही मेसेज वाचत नाहीये मी. पण माखिजा आहे हे कळलेच बुधवारचा एपिसोड बघितला असल्याने.

तर मला एक शंका आहे. मोठी माणसे इन्व्हॉल्व्ह आहेत, वर पर्यंत पोच आहे वगैरे म्हणत असताना मोठे रॅकेट मंत्री वगैरे अपेक्षीत होते पण एक दत्तक एन्जीओ एक पार्लर एक हँडलर व एक मुली पुरवणारे हॉटेल एवढा छोटाच सेटप आहे की यात. इथे थोडी निराशा केली असे वाटत आहे. (जर एवढेच असेल तर)

एकुण मालिका जबरी आहे यात वादच नाही. काय लेखन आहे काय डायरेक्शन आहे का तुकडे मस्त जोडलेत काय तुफान कलाकार आहेत हॅट्स ऑफ!! अनेक वर्षांनी एखाद्या प्रायव्हेट चॅनलवर उत्तम मालीका बघायला मिळाली.

मधे सोनीवर 'बंदी युध्द के' ही पण अप्रतिम मालीका बघितली होती. कुठे इपीसोड मिळाले तर जरुर बघा.

काल धुरत ला बघून आठवण झाली ..कि त्या मिबा चं काय झालं पुढे ???? तो अजून आताच आहे तर मग त्याच्याकडून माहिती का नाही मिळवत आहेत रागिणी का जात नाही त्याला भेटायला i mean पत्रकार म्हणून ...
हल्ली एपी खूपच लेट अपलोड होत आहेत आणि आपलीमराठी वर तर सगळं आवाज आणि चित्र मागे पुढे आवाज आधी आणि नंतर खूप वेळाने चित्र दिसतं
(रागाने लाल झालेली बाहुली )

मिठबावकर चं काय झालं पुढे ते दाखवलं नाही.
सदा एवढा हुशार आहे. प्रत्येक वेळी बरोबर शोधून काढतो सर्व. अभयच्या खुनी शोधताना पण बरोबर पोचला होता रागिणी पर्यंत.! पण तो रागिणी वर विश्वास ठेवतो आणि पुढे काही तपास करत नाही.!!

अरे इथे लिहिलंय कोणीतरी की डावाला रागिणीबद्दल खरं कळतं वगैरे.. तर तो भाग कोणता?? मला तर फक्त तो तिची माहिती काढायला सांगतो आणि ती नंतर फ्लॅटवरून वेश बदलून मूर्तीला भेटायला जाते. नंतर तर डावा-रागिणीचा काही सीनच नाहीये. तुम्ही कुठे पाहिलं???

नाही खरं नाही कळत पण संशय येतो म्हणून पाळत वगैरे ठेवायला सांगतो
पण अजून त्याला हे उलगडलं नाहीये कि रागिणी हीच ती बाई आहे वगैरे ..

मोठे रॅकेट मंत्री वगैरे अपेक्षीत होते पण एक दत्तक एन्जीओ एक पार्लर एक हँडलर व एक मुली पुरवणारे हॉटेल एवढा छोटाच सेटप आहे की यात. इथे थोडी निराशा केली असे वाटत आहे. (जर एवढेच असेल तर)>>>>>>
मलाही मंत्री वगैरे असतील वाटलेले कारण पोलिसांना खुश ठेवण्यासाठी फक्त पैसे नाही तर प्रीमियम पोस्टिंगस लागतात.

ह्याचा सेटअपही मोठा आहे, अनुराधा बार धाड प्रकरणानंतर किरण म्हणालेला की आपले हे एकच दुकान नाहीये, भरपूर आहेत. काल जो बाबा किरणची जागा घ्यायला आलाय तो ट्रान्सपोर्ट मध्ये आहे. ते ट्रान्सपोर्ट मुलींचे असणार.

डावाला फक्त संशय आला की ही बाई जसे दाखवतेय तशी नाही. त्याला नाक खुपसायचे काही कारण नाहीय पण उत्सुकता असेल. आपली हिरोईन घरी गेल्यावर वेष बदलून बाहेर पडते. डावा तेव्हा त्याच्या माणसाला शिव्या देऊन परत बोलवतो.

पूर्ण एपिसोड आत्ता पाहिला. एक बाई आपल्याला ताकास तूर लावू न देता काम करवून घेऊन गेली हे डावास झोम्बलेय बहुतेक. आता तो चंदूदादांना गाठणार.

जगताप कामाचा माणूस असला तरी मूर्ख आहे. असला माणूस कामात कितीही चांगला असला तरी पदरी बाळगणे व जबाबदारी टाकणे ह्या गोष्टींसाठी खूप धोकादायक आहे. धुरतने थोडी हुशारी दाखवत त्याला ह्या मिशनपुरते ठेवायला हवे होते. असली माणसे खूप काळजीपूर्वक हाताळायला लागतात.

रागिणीने प्रत्येक वाक्याचा, घटनेचा विचार केला तर तिचा तिलाच बराच उलगडा होईल. माखिजा 'असे परत होणार नाही' म्हणतो, एवढ्या वाक्याचा जरी तिने विचार केला तरी बरेच कळेल तिला.

मला वाटते ती परत मखिजाला भेटेपर्यंत तिला बराच उलगडा होईल. तिला काय कळलेय हे मखिजाला सांगायची गरज राहणार नाही .

संपादक व मंदार सिन खूपच विनोदी होता, विशेषतः संपादकाचे पहिलेच वाक्य!! Happy Happy
हल्ली अपलोड खूप उशिरा करतात. कालचा तर आज सकाळी केला.

हल्ली एपी खूपच लेट अपलोड होत आहेत आणि आपलीमराठी वर तर सगळं आवाज आणि चित्र मागे पुढे आवाज आधी आणि नंतर खूप वेळाने चित्र दिसतं>>>>>> हो ना काल चिडचिडच झाली फार यामुळे... .त्यामुळे शेवट काही कळला नाही. काय दाखवलं.... त्या हॉस्पिटल मायलेकी सिन नंतर?
वंगुमधे आता वेडसरपणाची झाक का वाटतेय? ती लोकं अशी होतात का नंतर?

तोच शेवट होता बहुतेक. वेडसरपणा म्हणता येईल का माहीत नाही, बहुतेक सेलेक्टिव्ह मेमरी म्हणता येईल. मुलीबद्दल सगळे माहितेय पण तिचा चेहरा आठवत नाही अशी स्थिती. उद्या रागिणीला ओळखेल पण ती काय करते ते आठवणार नाही, कॉलेजातून लवकर घरी का आलीस म्हणून ओरडेल. कथेला ह्या सगळ्याची काय मदत हे मला अजून कळलेले नाही.

डॉक्टर आगाशेनी रागिणी पूर्ण हातातून गेलीय हे निदान केलेय. ती खरे बोलतेय हे त्यांना खरे वाटत नाहीय.

पेशंटला काही कळत नाही पण जोडीदार/मुले किती वाईट अवस्थेतुन जात असावीत.

डॉक्टरांना रागिणी वर संशय येणं सहाजिकच आहे.. ती संदिग्ध बोलते. सगळं सांगत नाही.. मी टिपीकल मध्यमवर्गीय बाई नाही असही सांगते आणि आता तर तिच्या वर हल्ला झाला असही म्हणाली. मग आता डाक्टर काय करणार आहेत?

आजचा भाग पण छान.
रागिणी मुळे सदा अपयशी होणार. सगळं सांगण्याची तिची सवय तिलाच नडली.! बिचारा सदा... आता तर त्याची आॅडर निघाली. !! आता फक्त जगताप काय करतो ते बघायचं. थोडी जरी माणूसकी असेल तर सदाला सगळं खरं सांगेल..
नवीन आलेला माणूसही छान काम करतोय.

रागिणी स्वतःचया आईलाही काही सांगत नव्हती व आता नको त्याला सगळे सांगायची बुद्धी होतेय.

धुरतचा गेम करणारे पण जगताप वाचवेल, धुरत मरावा ही इच्छा नाहीय त्याची व मोठे साहेब काय आहेत हेही नीटसे माहीत नसेल.

डावा लालची निघाला. चांदुदादाना शक होताच.

आपल्याला माहित आहे म्हनुन राचा राग येतो पण चॅनेलचे मालकच समोर बसलेत आणि विचारतायत काय बातमी, अर्थात तिला ते घुमवता आल असत पण रा फार ओपन झाली माखिजा समोर एवढा विश्वास कसा वाटला ते कोडच वाटत

आपण जी माखिजाची काळी कृत्यं पाहिली आहेत , त्यातलं काहीच रागिणीला माहित नाहीये. तिला तो फक्त तिचा बॉस, अंधांना मदत करणारा वगैरे असा माहित आहे. त्यामुळे त्यांच्याच चॅनेलवर दिस्णार्‍या सनसनाटी बातमीबद्दल ती त्याच्याशी विश्वासानी बोलली तर नवल ते काय? थोडक्यात आत्ता तरी ती माखिजाच्या सापळ्यात अडकली आहे. नकळत.
आता संदीप डावा काय करतो आणि चंदूदादा त्याला कसा शह देतो ते बघायला मजा येईल.
तसंच, पार्लरमधे काही सापडलं नाही तर धुरतला जगतापचा संशय येईल, (कारण आधीच्या एपिसोडमधे तो तसं बोलून दाखवतो )आणि त्यांच्यातला संघर्ष आणखीनच वाढेल. धुरत ते कसं हँडल करेल? हे ही आवडेल बघायला.

मलापण रा चा खूप राग येतोय. सदासाठी वाईट वाटतंय.

पण वरचं सगळं वाचल्यावर राच्या अँगल ने आणि डायरेकटरच्या अँगल ने पण पटतंय जराजरा. एवढ्यात सगळं ओपन झालं तर मालिका संपेल इथेच.

बाय द वे "उद्याच्या भागात" म्हणून काय दाखवलं?

प्लीज कोणी इथे हेही लिहिण्यावर बंदी आणू नका राव. "उद्याच्या भागात" हा असा टिझर असतो ज्यातला सस्पेन्स झी स्वतः फोडते. तर मग ज्यांनी "उद्याच्या भागात" पाहिलंय त्यांनी इथे ओपन केलं तर काय हरकत आहे?

Pages