Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा सॉलिड एपिसोड!! सदा चा
आजचा सॉलिड एपिसोड!! सदा चा अभिनय भारीच।। 'चायला बायकांची गॅंग दिसतेय' डायलॉग तर अगदी पोलिसी अंदाजात। रागिणीच काय होणार ???!
हो एकदम भारी एपिसोड. तो डावा
हो एकदम भारी एपिसोड. तो डावा पण मस्त काम करतोय, काही टेन्शन नाही असा डायलॉग दिलाय त्याला. त्याच्या समोर बसलेल्या दाढीवाल्याने आणि दुसऱ्याने पण काम छान केलं. छोटासा रोल असला तरी अभिनय छान करणारी निवडून घेतली आहेत, अगदी सहज करतात.
'च्याला बायकांची गॅंग दिसतेय
'च्याला बायकांची गॅंग दिसतेय की काय माहिती... हा आजचा भेष्ट संवाद.
(No subject)
च्याला बायकांची गॅंग दिसतेय
च्याला बायकांची गॅंग दिसतेय की काय माहिती... हा आजचा भेष्ट संवाद. >>> येस्स
पुढील भागातले दाखवले की धूरत
पुढील भागातले दाखवले की धूरत रा ला कॉल करतो तर ते ही पैशांच्या ट्रांझॅक्शनची न्यूज कव्हर करायला तर नसेल ना सांगत!!!
'चायला बायकांची गॅंग दिसतेय'
'चायला बायकांची गॅंग दिसतेय' डायलॉग >>>> भारी होता हा !
एकंदरीत भारी एपिसोड होता आजचा.
पुढच्या भागात जगतापची ऑर्डर
पुढच्या भागात जगतापची ऑर्डर निघणार बहुतेक !
असा काहीतरी झटका बसल्याशिवाय धुरत रागिणीशी हातमिळवणी करायला तयार होणार नाही.
मस्त गेस अगो!
मस्त गेस अगो!
रागिणी एवढी कशी डेरिंगबाज
रागिणी एवढी कशी डेरिंगबाज झाली? एवढ प्लान्निंग करणं, गाडी तिकडून घेऊन निघणं. सामान्य माणसाला असं वागणं शक्य नाही. आता ती पण काळात नकळत एक गुन्हेगार बनत चाललीये. आणि ते मखिजा नि शिपिंग कंपनी मध्ये बोलावलं होतं त्याच काय झालं?
कालचा एपिसोड सुरू होताना मी
कालचा एपिसोड सुरू होताना मी इमॅजिन करत होते की इथे लिहिणारे सगळे आत्ता आपापल्या घरांत टीव्हीवर नजरा खिळवून बसले असतील. आणि एकदम सर्वांसोबत मिळून मालिका पाहत असल्याचा फील आला!
काल ठाण्यातले रस्ते, हायवे, सेलिब्रेशन हॉल वगैरे बघायला मजा वाटली. आऊटडोअर सीन असला की तो ठाण्यातला कोणता भाग असू शकेल हे पाहिलं जातंच. परवा रागिणी आणि चंदूदादा भेटतात तो उपवन तलाव होता. बाकी, त्या सीनमध्ये रागिणीला `संदीप डावा' हे नाव कळतं तेव्हा तिला हसू आलेलं असतं, ते ती कसं कंट्रोल करते ते पाहिलंत का कुणी? केवळ मुक्ता बर्वेच हे करू शकते. (हे काल लिहायचं राहिलं होतं.)
काल रागिणी गाडीत येऊन बसते
काल रागिणी गाडीत येऊन बसते आणि सदा पाठलाग करायला लागतो तेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक सुरू होते आणि पोटात एकदम धस्स झालं.. रागिणीचं काय होणार...! काय टेंशन नाय..
जगताप फोन करुन करुन किती इरिटेट करत होता पण सदा बिचारा वैतागूनही शांतपणे हॅंडल करत होता त्याला..
सदा रागिणीला का फोन करतो.. त्याने ओळखलं असेल का?
पैशांचे ट्रान्स्फर..जबरदस्त
पैशांचे ट्रान्स्फर..जबरदस्त दाखवलंय. बिटकॉईन्स आणि पुन्हा एक्सचेंज.. ट्रान्स्फर..
छान आहे मालिका. उद्याच्या
छान आहे मालिका. उद्याच्या भागात हे पैशाच काम पूर्ण झालेलं दाखवलं की जीव भांड्यात पडेल तरी परत शेवटी काहीतरी भुंगा सोडून शनिवार रविवार छळ करतील ते आहेच.
मालिकेत बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांवर समजून घ्यायला सोडून दिल्या आहेत असं वाटतं, त्याऐवजी व्यवस्थित एक तासाचे एपिसोड बनवले तर इतका गोंधळ उडणार नाही.. नाहीतर शेवटी बरेच धागे जुळवणारे एपिसोड एकापाठोपाठ एक येतील..
परवा धुरतच्या गाडीचा नं
परवा धुरतच्या गाडीचा नं पुण्याचा होता, बहुतेक खबरीला भेटतो म्हणून confused करायला असणार. सिरीयल जबरदस्त पुढे जातेय.
शनिवारी हीच सिरीयल का नाही
शनिवारी हीच सिरीयल का नाही ठेवली काय माहिती, लिमिटेड एपिसोडस आहेत म्हणून की काय. बाकी सर्व आता शनिवारी पण असणार.
पुढच्या भागात जगतापची ऑर्डर
पुढच्या भागात जगतापची ऑर्डर निघणार बहुतेक !
असा काहीतरी झटका बसल्याशिवाय धुरत रागिणीशी हातमिळवणी करायला तयार होणार नाही. >>>>> कळलं नाही. कि क ऑर्डर काढणार असं का ?
आज ओझी वर भाग बघताना सुद्धा धाकधूक वाटत होती.
रा ने गाडी गॅरेजला सोडली आहे का ?
रा ने गाडी गॅरेजला सोडली आहे
रा ने गाडी गॅरेजला सोडली आहे का ? हो.
पुढच्या भागात जगतापची ऑर्डर निघणार बहुतेक ! मला वाटतं की तो यशस्वी होईल बहुतेक. त्या माणसाकडून काहीतरी माहीती मिळवेल.
तो जगताप किती बडबड करत असतो.
तो जगताप किती बडबड करत असतो.
तेव्हा तिला हसू आलेलं असतं,
तेव्हा तिला हसू आलेलं असतं, ते ती कसं कंट्रोल करते ते पाहिलंत का कुणी? केवळ मुक्ता बर्वेच हे करू शकते.>> अगदी अगदी!
आणि खेडवळ बाईचा गेटप अन बोलणं तर तिचा हातखंडा! इतकी मोठी गॅंग, त्यात इतके धोके, तरी हिचा वावर बिनधास्त!
'अग्निहोत्र' मधलं तिचं काम आठवतंय ना? तमासगीर मुलगी होती त्यात ती. जबरदस्त डिटेलिंग करते ती प्रत्येक पात्राचं. आपल्याकडे इथे मुक्ता बर्वे फॅन क्लब असा बाफ आहे ना? काढा तो वर!
मुक्तासाठी मम.
मुक्तासाठी मम. अग्निहोत्रमध्ये सॉलिड केलं तिने. बघायला हवी परत hotstar वर.
मुक्ता डावाच्या आॅफिसात जाते
मुक्ता डावाच्या आॅफिसात जाते बहुतेक पैसे घेऊन कारण तिला संशय आला असेल की कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. फोनच्या लोकेशनवरून सदाला कळेलच की ती त्यावळी तिथेच होती. तिला माहितीये की तो तिचा नंबर ट्रॅॅक करतो. असं रिस्की काम करताना नाही घ्यायला पाहिजे होता तिने फोन. बायकांची गॅंग
कालच्या भागात उगाच मला असं
कालच्या भागात उगाच मला असं वाटत होतं की हे सगळं ट्रायल असेल कि काय म्हणजे त्या बॅग्स मध्ये पैसे नसणारच वेगळच काहीतरी असणार
किराणा सामान किंवा तत्सम (general मालिकांमध्ये लगेच बॅग मध्ये कोणीतरी शेवटची पैशांची थप्पी टाकून बॅग बंद करून देतंय type scene हमखास असतो. )... सो दॅट कोणी पकडतंय का किंवा मागावर आहे का किंवा प्लॅन फुटतोय का याची ट्रायल ..पण कथेचा वेग पाहता असा timepass करतील असं वाटत नाही
धुरत ने अजून रा ला समोरून पाहिलं नाहीये समोरून ,नाहीतर चेहेरपट्टीवरून त्याला संशय आला असता
हो ना तो जगताप किती बडबड करत होता.
धुरत भेटलाय की रा ला एकदा घरी
धुरत भेटलाय की रा ला एकदा घरी नशेत, एकदा होटेल मधे शुध्दीत.
एकदा पुरावे द्यायला.
एकदा पुरावे द्यायला.
हो मुक्ता फोन उचलते, ती
हो मुक्ता फोन उचलते, ती कुठल्या एरियात आहे ते कळणार.
धुरत भेटलाय की रा ला एकदा घरी
धुरत भेटलाय की रा ला एकदा घरी नशेत, एकदा होटेल मधे शुध्दीत>>> ते झालच पण काल रा साडी नेसून निळी कार चालवण्यासाठी ती आली तेव्हा धुरत ने तिला पाठमोरी बघितली असं म्हणतेय . आधी भेटलाच आहे अर्थात कैक वेळा
वेगळ्या गेटअप मध्ये माणूस
वेगळ्या गेटअप मध्ये माणूस ओळखणे कठीण आहे. आपल्याला आधीच माहीत असते त्यामुळे सोपे जाते, त्यात आपल्यावर हिंदी चित्रपटाचे संस्कार आहेत जिथे एक मोठ्ठा तीळ लावला की झाले वेषांतर. खऱ्या जीवनात हे इतके सोपे नाही.
ती शहराबाहेर निघालीय पाहून मला ती समन्वय मध्ये जाते की काय वाटलेले. पण प्रोमोत ती कुठल्या तरी हाफीसात आणि ट्राफिक मध्ये अडकलेला धुरत फोनवर पाहून तिने त्याला चकवले असे वाटतेय. पण आता त्याची खात्री पटेल की हीचा मोठा रोल आहे म्हणून.
धुरत ने अजून रा ला समोरून
धुरत ने अजून रा ला समोरून पाहिलं नाहीये समोरून ,नाहीतर चेहेरपट्टीवरून त्याला संशय आला अस>>>>>>
गाडी घेऊन जाणाऱ्या स्त्रीला त्याने पाठमोरे पाहिले, समोरून पाहिले असते तर कदाचित संशय आला असता असे म्हणायचंय.
'च्याला बायकांची गॅंग दिसतेय
'च्याला बायकांची गॅंग दिसतेय की काय माहिती >>
हो घरी पण खूप हसलो .
Pages