Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो जरा सबुरीने. रागीणीला
लोकहो जरा सबुरीने. रागीणीला रंगेहाथ धुरतने पकडले तर मालिका संपेल एका आठवड्यात. अजुन एखादा महिना असेल ना. एवढी चांगली मालिका पटकन संपावी वाटत नसेल तर असे काही प्रसंग सोडुन द्या.
हो बरोबर इतक्यात नाही सापडणार
हो बरोबर इतक्यात नाही सापडणार रागिणी . शेवटच्या दहा दिवसात काय तो केस चा निकाल लागेल
सध्या backlog भरून काढतेय
सध्या backlog भरून काढतेय ,ozee वर.
आजचा भाग म्हणजे परफेक्ट
आजचा भाग म्हणजे परफेक्ट इंटरवल .
शेवटी पण नकोय सापडायला
शेवटी पण नकोय सापडायला
आजचा नाही बघितला. १२ ला असेल
आजचा नाही बघितला. १२ ला असेल तर बघेन नाहीतर ozee झिंदाबाद.
बघितला. पूर्वार्ध सॉलिड.
बघितला. पूर्वार्ध सॉलिड.
माझ्या मनात एक आलं कि क चा
माझ्या मनात एक आलं कि क चा जुळा भाऊ असेल का जिवंत आणि तो कि क च असेल आणि तो मेन असेल, असो काहीही येतं माझ्या मनात
सुहासची मजा आली आज. रागिणीचा
सुहासची मजा आली आज. रागिणीचा विक्षिप्तपणा माहित असूनही तो प्रश्न विचारणं थांबवत नाही. सदाला आता रागिणीचा संशय आल्याशिवाय राहणार नाही कारण रागिणी टीम घेऊन तिथे पोहोचलीही नाही आणि तिने सदाला परत काॅलही केला नाही. दोन बॅगा होत्या हे आईच्या बरं लक्षात राहिलं. मिठबावकर डायरेक्ट सदाच्या घरी जातो आणि अनुराधा त्याला ओळखत नाही पूर्वी भेटलेली असूनसुद्धा. पुढचे एपि थरारक असणार एवढं नक्की.
मिठबावकर डायरेक्ट सदाच्या घरी
मिठबावकर डायरेक्ट सदाच्या घरी जातो >>> धुरतने त्याचा माणुस धरलाय हे त्याला कळले असावे. सातवच्या बायकोने - अनुराधाने डबल गेम केला असावा म्हण्जे ती पोलिसांना सामील आहे आणी त्याच्या माणसाला पकडले असेहि त्याला वाटत असेल. बघु. आज कळेल. कदाचित सातवची बायको जाइल.
मालिकेची लांबी लहान आहे
मालिकेची लांबी लहान आहे म्हणून ठिकाय नाहीतर मिठबावकरच्या माणसाच्या नादात सदाची बदली त्याने स्वतः म्हणून ओढवून घेतली असती.
जगतापच्या हालचाली खूप
जगतापच्या हालचाली खूप संशयास्पद वाटल्या काल.. त्याने रिवॉल्वर का बदलली? तो खरचं सदाला मदत करतोय का?
मिठबावकर सदाच्या घरी कसा पोचला डायरेक्ट..! जरी रघूला पोलिसांनी पकडलं असं समजलं तरी सदाचा आहे हे मिठबावकरला कसं कळेल.. कारण अनुराधाला पैसे मिळाले की नाही हे तो संदीप डावाला पण विचारु शकतो..
रागिणी पैसे पलंगावर ठेवून रेकॉर्डिंग करते तेव्हा सारखी धाकधूक वाटत होती.. तिची आई दार उघडून येते की काय.
आता रागिणी पैसे कसे आणि कुठे जपून ठेवणार काय माहित..
जोपर्यंत राजेश मुर्ती भेटत नाही आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत रागिणीला काही होत नाही
जरी रघूला पोलिसांनी पकडलं असं
जरी रघूला पोलिसांनी पकडलं असं समजलं तरी सदाचा आहे हे मिठबावकरला कसं कळेल.. कारण अनुराधाला पैसे मिळाले की नाही हे तो संदीप डावाला पण विचारु शकतो.. >>>>>> रागीणी जेव्हा अनुराधा म्हणुन मिठबावकरला फोन करते तेव्हा माझा भाउ प्रामाणिक आहे आणी त्याच्यापासुन लपवुन मला पैसे घ्यायचे आहेत असे सांगते. शिवाय तो त्याच्या माणसाला रघुचा शोध घ्यायला पाठवतो त्याच्याकडुनहि काहि माहिती मिळु शकते. सांदिप डावा यात आहे हे मिठबावकरला माहित नाहि.
रागिणी पैसे पलंगावर ठेवून
रागिणी पैसे पलंगावर ठेवून रेकॉर्डिंग करते तेव्हा सारखी धाकधूक वाटत होती.. तिची आई दार उघडून येते की काय.
>> मलापण हीच भीती वाटत होती सारखी. आणि रागिणीने आईला ते घड्याळामधल्या कार्ड विषयी सांगून टाकलं आहे आणि आईने बहुतेक तेही लिहून घेतलेलं आहे त्याचं पुढे काय? आईने सुहासला सांगितलं का काही यातलं?
शिवाय काल रागिणीने पुन्हा आबाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटलं की तिला एव्हाना तिला क्लिक / स्ट्राईक व्हायला हवं होतं खेळण्याचं. एवढी स्ट्रीट स्मार्ट ती नक्की झालीये आता. आणि या विषयावर तिने बराच वेळ विचारही केला असावाच ना?
या विषयावर तिने बराच वेळ
या विषयावर तिने बराच वेळ विचारही केला असावाच ना?. हो ना मलाही वाटलं .. ती एखादा चान्स घेईल आबा नावाच खेळणं बघेल.. पण बहुतेक हे रहस्य तिला मुर्ती कडूनच कळेल..
सांदिप डावा यात आहे हे मिठबावकरला माहित नाहि. ..त्या दोघांनी प्लॉनिंग करुन पेसे ट्रांन्स्फर केलेत. सांदिप डावा म्हण्तो रागिणीला मिठबावकर कसा आहे माहित आहे ना.!
मुक्ताने आणलेल्या बॅगा घरून
मुक्ताने आणलेल्या बॅगा घरून परत नेताना प्रोमोत दाखवलं ना? म्हणजे ते आज असेल ना? कि काल झालं?
मिठबावकर ला कसं कळलं अनुराधा कुठे राहते ते? आणि नकळत तो धुरत च्या घरी आलाय. अन्जाने मे खुद के पैर से शेर के गुंफा मे प्रवेश
रागिणी कसली बिन्धास्त दाखवली आहे, सुहास ला सरळ करोडो रुपये आहेत असं सांगतेय त्यात.
मला वाटते हा सुहास प्रेमात पडणार रा च्या..
आणि सुहासने जेव्हा घरात
आणि सुहासने जेव्हा घरात विचारले या बॅगांमध्ये काय आहे हे तु मला बाहेर का नाही सांगितले ?
तेव्हा मी मनात बोललो कि आता ही म्हणेल मला सुचलचं नाही तेव्हा !
ती ही या पुढे जाऊन म्हणाली ही थाप सुचली नाही
शिवाय काल रागिणीने पुन्हा
शिवाय काल रागिणीने पुन्हा आबाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटलं की तिला एव्हाना तिला क्लिक / स्ट्राईक व्हायला हवं होतं खेळण्याचं. एवढी स्ट्रीट स्मार्ट ती नक्की झालीये आता. आणि या विषयावर तिने बराच वेळ विचारही केला असावाच ना?>>>
एका जुन्या भागात ती आबा कोण असा विचार करत असते तेव्हा तिची आई म्हण्ते सुधा की आबा म्हणजे खेळण असेल
मिठबावकर सदाच्या घरी कसा
मिठबावकर सदाच्या घरी कसा पोचला डायरेक्ट..>> हे कधी झालं? मी ozee वर पाहिला भाग. पुढच्या भागात आहे का?
पुढच्या भागात आहे का? हो.
पुढच्या भागात आहे का? हो.
Actually आई स्पष्ट सांगते
Actually आई स्पष्ट सांगते मुक्ताला, आबा म्हणजे खेळणे ते, तरी मुक्ता लक्ष देत नाही.
कालचा अर्धा भाग सॉलिड होता,
कालचा अर्धा भाग सॉलिड होता, उरलेला अर्धा ok. डावाच्या planning ची कमाल होती.
अम्ब्युलन्स येण्या अगोदर
अम्ब्युलन्स येण्या अगोदर मुक्ता ने आपला खेळ खलास झाल्याच्या अविर्भावात जो अभिनय केलाय त्याला तोड नाही.
जगतापचा संशय आला का कुणाला?
जगतापचा संशय आला का कुणाला? त्याने रिवॉल्वर बदलली. नक्की काय विचार आहे त्याचा..
बदलली का? मला वाटलं त्या रघू
बदलली का? मला वाटलं त्या रघू कडून काढून घेतलेली त्या ड्रॉव्हरमध्ये ठेऊन दिली फक्त.
त्या डावाला समहाऊ संदीप हे
त्या डावाला समहाऊ संदीप हे नाव शोभत नाही. पाठकलाच शोभतंय ते
जगताप ने ज्या माणसाला पकडलंय तो पण कसला भारीये.... एकदम बेरकी.
आणि पोलिसांनी याला उचलून
आणि पोलिसांनी याला उचलून सुद्धा हाच निगोशिएट करतोय त्यांच्याशी.
माझं लाईफ संपलंय हे मला माहित आहे हे किती कूलली सान्गितलं त्याने.
तो खरंच तोन्ड नाही उघडणार मग धुरत आणि जगताप ला सिरियसली त्याला मारावे लागेल बहुधा.
धुरत आणि खताळ
धुरत आणि खताळ
कसली वेगळीच आडनावं आहेत ना ही? मी पहिल्यांदा ऐकलीत आयुष्यात. कुठून शोधून काढत असतील?
पराग.. बरोबर. त्या रघूकडुन
पराग.. बरोबर. त्या रघूकडुन बंदूक काढून घेतली हे लक्षात नाही राहीलं. उगाच संशय घेतला जगतापवर..
पोलिसांत असलीच नावे असतात.
पोलिसांत असलीच नावे असतात.
Pages