"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळ्या गेटअप मध्ये माणूस ओळखणे कठीण आहे. आपल्याला आधीच माहीत असते त्यामुळे सोपे जाते, >> खरं आहे. आपल्याला या कलाकारांना वेगवेगळ्या गेट अप मधे पहायची सवय आहे म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. आपल्या परिचयातील एखादी व्यक्ती जर गेट अप बदलून आली तर आपल्याला त्याला ओळखणं कठीण जातं.

एवढंच कशाला, रोज ड्रेस घालणा-या बाईला साडीमध्ये पटकन ओळखता येत नाही, गाऊन घालून घरच्या अवतारात तर अजिबात नाही, रोज फाॅर्मल कपडे घालणारा पुरूष जीन्स-टीशर्टमध्ये वेगळाच वाटतो आणि दाढीमिशांची व्हेरिअशन्स तर विचारायलाच नको.

एक शंका आहे. मिठबावकरने सातवच्या बायकोला गाडी चा नंबर कालच कसा काय सांगितला? कारण संदीप डावा च्या माणसाने गाडी तर आज उचलली ना? मग कोणती गाडी असेल हे एक दिवस आधीच कसे काय सांगितले?

अरे ए ते शाॅर्टफाॅर्म बंद करा नायतर सरळ सोपे तरी करा. सिरियलीतली पहिली नाव वापरा की सरळ.

कारण सं डा च्या माणसाने गाडी तर आज उचलली ना>> हे मी भलतंच वाचलं. नि डोक्या गरगरला. Lol

लागत नाहीये टोटल खरंच !!
आणि संदीप डावा च्या माणसाने गाडी उचलायच्या आधीच रागिणी त्याच्या शोरूम मधून मिबा ला फोन वरून निळी गाडी निळी गाडी असा कसं सांगते?आधीच कोणती गाडी हे माहित नसेल तर ?आणि संदीप डावा मात्र त्या ड्राइवर ला सांगतो कि बाहेरची गाडी आण खूप नवी नको खूप जुनी नको etc

एक शंका आहे. मिठबावकरने सातवच्या बायकोला गाडी चा नंबर कालच कसा काय सांगितला? कारण संदीप डावा च्या माणसाने गाडी तर आज उचलली ना? मग कोणती गाडी असेल हे एक दिवस आधीच कसे काय सांगितले?...)))))
हीच चर्चा केली ना काल की किल्ली कशी दिली ते न दाखवता direct मिठबावकर नंबर सांगतो. आणी आजच्या भागात सगळा किल्ली पोचवायचा सीन.

मला एक नाही कळत की आता रागिणीला पैसे का हवेत?
चॅनेल ला 5 लाखाच्या बदल्यात तिनी बातमी दिलीये की
मग का

हीच चर्चा केली ना काल की किल्ली कशी दिली ते न दाखवता direct मिठबावकर नंबर सांगतो>>> अरे होsss ते "समजून घ्यायची गोष्ट " सॉरी सॉरी मी विसरलेच घाबरून डोळे फिरवणारी निळी बाहुली

मला एक नाही कळत की आता रागिणीला पैसे का हवेत?>>>>तिला त्या मूर्ती ला शोधायचं आहे ना अजून

काल मला अगदी बेसिक प्रश्न पडला. मागचं विसरायला होतय. Happy
रागिणीला ह्या सगळ्या प्रकारात सातव आहे हे कळलं कसं ? म्हणजे छाया -> बाबु -> किर्तीकर -> शिवा हे सगळे मरतात. ती चंदूदादाकडे जाते. पण सातवबद्दल तिल कोण सांगतं? मागचे भाग बघत बसायचा पेशन्स नाही परत.

ती शिवाच्या घरी जाते तेव्हा त्याला वाटतं अनुराधा बारचा मालक अभय सातवने तिला पाठवलयं त्याला मारायला. तो सांगतोही तिला तसं. मग तिचं आयकार्ड बघतो न्यूज चॅनेलचं आणि तिचं नाव वाचून तो सांगतो तिला.. अभयने आशिषला मारायची सुपारी दिली होती.

कालचा पाठलाग भारी.... एवढ्या ट्रॅफिक मधे कसं मॅनेज करतात देव जाणे...
जगताप 'सोनु तुला माझ्यावर भरवसा' बघत होता बहुतेक गाडित.... म्हटलं आता ती पांढरी कार निघून जाईल तेव्हढ्यात. हुश्श निघाला पण लगेच.
फारच वटवट करत होता हे करु का ते करू का आणि धुरत शांतपणे ऐकून घेत होता. एवढे पेशन्स ....सलाम Proud

अभयने आशिषला मारायची सुपारी दिली होती. >>>> ते आपल्याला माहीत आहे. ते रागिणीला कळलं कसं आणि कधी हा प्रश्न आहे Happy

शिवाच सांगतो रागिणीला. आणि त्याला वाटतं ती त्याला मारायला आली आहे मग तोच तिला मारणार असतो तेवढ्यात चंदुदादाच शिवाला मारतात.. हुश्श.. Happy

आजचा भाग काहींच्या काही तुफान होता. पटकथा कोणाची आहे ? संवाद गिरीश जोशींचे आहेत .
खूप अभ्यास आहे. लेखकाचा आणि पट्कथाकाराचा पण .आताच बघितलं स्टोरी /स्क्रिन प्ले आणि डायलॉग तिन्ही गिरीश जोशीचंच आहे. सलाम त्यांना . इतकं इंटेलिजंट स्क्रीनप्ले आहे कि बस Happy

आजचा भाग जबरदस्त ! मुक्ता आणि वंदना गुप्तेचे काम एकदम भारी . _/\_
मायलेकींचा संवाद आणि अभिनय केवळ अफलातून !
आता चुपचाप सोमवारची वाट बघत बसायची ! प्रेक्षकांना पण अवघड काम दिलंय Happy
जगताप बडबडा आहे पण तो पण सुखरूप राहायला हवा .
जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या पोलिसांना खरंच सलाम ठोकायला हवा !
खरे रागिणी आणि धुरत ने एकत्र येऊन पैश्याच्या मिशन मध्ये काम करायला हवे होते ...पण रागिणीला सर्व खरे सांगावे लागले असते ना त्यामुळे ते शक्य न्हवते म्हणा !

Pages