Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खताळ म्हटलं की मला काहीतरी
खताळ म्हटलं की मला काहीतरी केसाळ / गुंतवळ आठवतो
पोलिसात असलीच नावे असतात
पोलिसात असलीच नावे असतात म्हणजे. ठराविक आडनाव असेल तरच नोकरी मिळते का :दिवा घ्या: मीही पहिल्यांदाच ऐकली ही आडनावं.
कोणीच कसं फिरकलं नाही ईकडे. ब
कोणीच कसं फिरकलं नाही ईकडे. ब-याच घडामोडी घडल्या आजही. जगताप त्याला मारून टाकेल आणि दोघांची नोकरी धोक्यात येईल किंवा कसं. रागिणीने मस्त घर बघीतलं. ज्या वेगाने ती पैसे संपवतेय त्यावरून ते पैसे लवकरच संपतील. सातवचा पैसा असा ऊपयोगाला येत आहे हे चांगलेच आहे. अनुराधाचा अभिनय छान. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणेे मिठाला अनुराधा आणि सदाचा हा प्लॅन वाटतोय. मखिजा रागीणीच्या प्रेमात तर नाही ना :अअो: रागिणी डिनरला गेली ह्याचंच आश्चर्य वाटलं.
आत्ता कोणी लिहीत नाही कारण
आत्ता कोणी लिहीत नाही कारण काहीजणांचे बघायचं असतंना. रागिणीने बघितलेला flat मलाही आवडला.
चंपा +11
चंपा +11
जगताप गोत्यात आणणारे धुरतला. एक बंदूक आहे त्याच्याकडे.
फ्लॅट भाड्याने घेतलाय. घरी आई सतत भुणभुण लावते, शांत डोक्याने विचार करायला वेळ नाही. म्हणून घेतला असावा.
माखिजाला रागिणी आवडतेय बहुतेक।
पोलिसात असलीच नावे असतात म्हणजे. ठराविक आडनाव असेल तरच नोकरी मिळते का :दिवा घ्या: मीही पहिल्यांदाच ऐकली ही आडनावं.>>>>>
ते काय माहीत नाही, पण मी दक्षता नेहमी वाचते त्यात अशीच अतरंगी नावे असतात म्हणून म्हटले. बाकी पोलीस दलाशी आपला संबंध फक्त दक्षता आणि सिनेमा यातूनच.
जगताप सतत त्या बंगल्यावर
जगताप सतत त्या बंगल्यावर राहतोय... नोकरीच्या ठिकाणी (पोलीस स्टेशनात) काय एक्स्प्लनेशन देणारे?
जगतापने धरलेला मिठबावकरचा माणूस इतका निवांत दाखवलाय, त्या अर्थी तो पुढे काहीतरी राडा नक्की करणार, त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन नक्की असणार असं मला वाटतंय. कारण तो पैश्यांच्या बॅगा घेऊन निघताना त्याचे आणि मिठबावकरचे जे संवाद होते त्यातून तो जरा नवखा असावा असं दिसत होतं. अशा कामगिरीवर गेल्यावर काय काय करायचं ते मि.ने त्यांना पढवून ठेवलेलं असतं ते तो बोलून दाखवतो. पकडले गेलो तर काय-काय पर्याय वापरायचे ते पण मि.ने त्यांना सांगून ठेवलेलं असणार, असं काल मला वाटलं.
रागिणीच्या आईच्या विस्मृतीचा काल कथानकात प्रथम उपयोग करून घेतला गेला. (नुकतंच कुठेतरी वाचलं होतं, की तुमच्या कथेत सुरूवातीलाच बंदूक दाखवणार असाल, तर कथा संपायच्या आत त्यातून गोळी झाडली गेलेली दाखवायला हवी. थोडक्यात, प्रत्येक बाबीचं कथेत काहीतरी प्रयोजन हवं. त्या अर्थाने)
नुकतंच कुठेतरी वाचलं होतं, की
नुकतंच कुठेतरी वाचलं होतं, की तुमच्या कथेत सुरूवातीलाच बंदूक दाखवणार असाल, तर कथा संपायच्या आत त्यातून गोळी झाडली गेलेली दाखवायला हवी. थोडक्यात, प्रत्येक बाबीचं कथेत काहीतरी प्रयोजन हवं. त्या अर्थाने >> बरोबर. इथेच बर्याच मराठी सिरियल आणी सिनेमे मार खातात. काहि संवाद, प्रसंग तर उगाचच असतात वेळ भरुन काढण्यासाठी गैप ( फिलर ). या सिरियल मध्ये खुप गोष्टींचा उपयोग करुन घेतला आहे चांगल्या प्रकारे.
रागिणीचा फ्लॅट मस्तच आहे. आणि
रागिणीचा फ्लॅट मस्तच आहे. आणि ती वाॅचमन, सीसीटिव्ही बद्दल हुशारीने माहिती काढून घेते. तिला गेटप चेंज करण्यासाठी आणि या संदर्भातील सामान ठेवण्यासाठीच हवाय तो फ्लॅट.
माखिजाने रागिणीला मुलींच्या खून/अॅक्सीडंटच्या बातमीनंतरच शिपींग ऑफिसला बोलावलेलं असतं ना?? कि आधी?? मला नेमकं आठवत नाहिये. नंतर असेल तर ही एडिटींगची पहिली चूक म्हणावी लागेल. कारण मग माखिजा काल तिला त्या बातमीनंतर फोनच न केल्याबद्दल माफी मागताना दाखवलाय.
माखीजा आणी रागीणी एकत्र
माखीजा भारी उभा केलाय किका ने
माखिजाने रागिणीला मुलींच्या
माखिजाने रागिणीला मुलींच्या खून/अॅक्सीडंटच्या बातमीनंतरच शिपींग ऑफिसला बोलावलेलं असतं ना?? >>हो. तसा संवाद मंदार आणि जालगी मधे दाखवला आहे पण ती भेट नाही दाखवली आणि भेट झाली की नाही ते स्पष्ट नाही केलं.
रागिणीचा फ्लॅट मस्तच आहे.>> घरातून दिसणारं कचराळी तलाव आहे ना?
रच्याकने, परवा दाखवलेल्या सर्व नोटा children's bank च्या होत्या हे स्पष्ट दिसत होतं. आश्या नोटांच्या कागदाला ग्लेझ असते ती प्रकाशात दिसत होती.
वेगवेगळे ट्रॅक एकत्र दाखवले
वेगवेगळे ट्रॅक एकत्र दाखवले त्यामुळे मालिकेने परत वेग घेतलाय..फक्त पैशांची दाखवत होते त्यामुळे त्या बातमी नंतरचे परिणाम वैगरे राहिलंच होतं. म्हणून काल माखिजाने फोन केला तेव्हा ते शिपिंग आॅफिस चा उल्लेख राहिला..
मागे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे मिठबावकरला हा सगळा सदा आणि अनुराधाचा प्लॅन वाटतोय.
जगताप सदाला गोत्यात आणेल बहुतेक.
माखिजाला रागिणी खरचं आवडतेय की तिला मुद्दाम जाळ्यात अडकवतोय..!
जगताप सदाला गोत्यात आणेल
जगताप सदाला गोत्यात आणेल बहुतेक. >> मीठबावकर प्रकरण सदाला भोवेल कदाचित.
वेगवेगळे ट्रॅक एकत्र दाखवले त्यामुळे मालिकेने परत वेग घेतलाय >>> बरेच ट्रॅक असल्यामुळे काय दाखवु नी काय नको असे झाले असावे दिग्दर्शकाला.
कालचा संदीप डावा आणि रागिणी
कालचा संदीप डावा आणि रागिणी मधला सीन पण छान होता. काय टेंशन नाय
रागिणी चलाखीने लगेच त्याला दुसरं काम देऊन टाकते. आणि शोले मधला डाय्लॉग.
मला उलट वाटतयं की जगताप चा
मला उलट वाटतयं की जगताप चा नाहक बळी जाईल. मिठ. ने रघूला ट्रेन केलेलं असणार आहे अशी परीस्थिती हाताळायला, त्याने काहीतरी राडा केला तर बिचारा जगताप मारला जाईल.
मला उलट वाटतयं की जगताप चा
मला उलट वाटतयं की जगताप चा नाहक बळी जाईल. >> जगताप , रघु किंवा अनुराधा पैकी कोणतरी जाइल नक्कि
सगळेजण आपापल्या भुमिका अगदि
सगळेजण आपापल्या भुमिका अगदि मस्त वठवत आहेत
ईथे रोज धावणारा बीबी वाचुन
ईथे रोज धावणारा बीबी वाचुन आणि जाउ,बहीण, मैत्रीण सगळ्यानी रुद्रम बघच असा केलेला आग्रह या सगळ्यामुळे कालपासुन रुद्राम बघायला सुरु केलेय..१३ भाग झाले पाहुन..जबरदस्त मालिका आहे.
लवकरच पुढचे सगळे भाग बघते आणि येतेच चर्चा करयला..
मुक्ता जो फ्लॅट घेणार आहे
मुक्ता जो फ्लॅट घेणार आहे त्याचे मालक दुबईत आहेत आणि ती बंद खोली ह्याचं काही कनेक्शन आहे का, हे आपलं उगाच मनात येतंय बहुतेक कारण कितीतरी जण असा मोठा फ्लॅट असेल तर एक खोली आपल्यासाठी राखून ठेऊन बाकीचा भाड्याने देतात.
कि क रॉक्स.
कि क रॉक्स.
खताळ >>>> आमच्या गावाकडे
खताळ >>>> आमच्या गावाकडे म्हसोबा मंदीराच्या पुजेचा मान यांच्याकडे आहे.
@दक्षे, तु तर आडनावांचा धागा वाचलाय ना
अनुराधा नाही जाणार. जगताप
अनुराधा नाही जाणार. जगताप कडे रघुचे पिस्तुल आहे, तो काहीतरी शहाणपणा करायला जाणार आणि रघुच्या हातून तो नाहीतर त्याच्या हातून रघु जाणार. मागेही एक एन्काऊंटर प्रकरणात तो अडकलेला ज्यातून त्याला सदाने सोडवलेय.
इतकी जबरी मालिका आहे की
इतकी जबरी मालिका आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा संशय येतोय.
मिठा. बहुधा अनुराधाला काहीतरी इलाज करणार नक्की.
धुरत ऑफ ट्रॅक होतोय असं वाटतंय का? आपल्या बहिणिच्या नवर्याचा खूनी पकडण्या ऐवजी तो भरकटत चालला आहे. मुली झाल्या, आता मिठबावकर.
बाकी त्या सिडिज ज्या अभय च्या घरात सापडल्या होत्या त्याचं धुरत नी नक्की काय केलं? का विसरला तो ते?
या मालिकेत शोले सारखं प्रत्येक न प्रत्येक पात्र महत्वाचं केलेलं दिसतंय. अगदी छाया खताळ, बाबू, मुर्ती ( जो अजून एकदा पण दिसलेला नाही) पासून ते समन्वय चेतना चे संचालक (राव) मिठबावकर चा हरकाम्या.. सगळेच.
स्मिता - नक्की पहा लवकर लवकर आणि आम्हाला गाठ, मी पण दिड महिन्याचे एपिसोड्स ओझी वर बघून इथे गाठलंय सर्वांना..
धुरत ला आता अभय चा खुनी
धुरत ला आता अभय चा खुनी पकडण्या ऐवजी हे जे धंदे चालू आहेत त्याच्यात इन्वॉल्व्ह असलेल्या सगळ्यांना पकडायचं आहे.
धुरत ऑफ ट्रॅक होतोय असं
धुरत ऑफ ट्रॅक होतोय असं वाटतंय का? नाही. अभयचा वकिल चिठी देतो त्यात मिठबावकर कडे पेसे आहेत असं लिहीलं असतं. आणि मिठबावकरला फोन करते ती बाई,तिच्याकडे अभयचा मोबाईल असतो. तो बरोबर ट्रॅकवर आहे.
बाकी त्या सिडिज ज्या अभय च्या घरात सापडल्या होत्या त्याचं धुरत नी नक्की काय केलं? त्यामुळे कळतं ना त्याला बेसमेंट बद्द्ल. आणि तिकडून सोडवतो तो मुलींना.
सातवचा खुनी पकडायचा तर पूर्ण
सातवचा खुनी पकडायचा तर पूर्ण रॅकेट खोदायला पाहिजे हे त्याला माहित आहे पण काहीच धागेदोरे हाती नाहीयेत. Cc टीव्ही मधली बाई सापडली नाही, मुली मारल्या गेल्या, अल्बममधली माणसांची केस साहेबांनी बंद केली, छाया खताळची केस अजून ओपन आहे पण साहेब काही त्याला हात लावायला देणार नाही त्या केसला. रागिणीच्या घरी जाऊन आलाय, तिला काहीतरी माहिती आहे पण नक्की किती याचा त्याला अजून अंदाज नाही आलाय. तो करणार तरी काय. म्हणून मग फोल्लो द मनीचे सूत्र पकडून तो मिठबावकरमागे लागला.
हा प्रश्न मलाही पडला की सदा
हा प्रश्न मलाही पडला की सदा कसा काय जगतापला सांगतो अजून दोन तीन दिवस तुुला ईथेच रहावं लागेल. आॅफिस म्हणजे पोलीस चौकीत विचारत नाहीत का. शोलेचा डायलाॅग मस्त. मुक्ता बिनधास्त ईतक्या डेंजरस लोकांबरोबर वावरते. आधी डावाबरोबर पान आणि मग डिनर किक बरोबर. रघु किती कुल आहे ईतक्या मोठ्या गुन्हयात सहभागी असूनही. डावाला बघितल्यावर अनंत जोग यांचा भास होतो. पहिले मला वाटलं की डावा मोबदला म्हणून अनैतिक गोष्टीची मागणी करेल रागिणीकडून, पण काय टेंन्शन नाय
सातवचा खुनी पकडायचा तर पूर्ण
सातवचा खुनी पकडायचा तर पूर्ण रॅकेट खोदायला पाहिजे हे त्याला माहित आहे पण काहीच धागेदोरे हाती नाहीयेत. Cc टीव्ही मधली बाई सापडली नाही, मुली मारल्या गेल्या, अल्बममधली माणसांची केस साहेबांनी बंद केली, छाया खताळची केस अजून ओपन आहे पण साहेब काही त्याला हात लावायला देणार नाही त्या केसला. रागिणीच्या घरी जाऊन आलाय, तिला काहीतरी माहिती आहे पण नक्की किती याचा त्याला अजून अंदाज नाही आलाय. तो करणार तरी काय. म्हणून मग फोल्लो द मनीचे सूत्र पकडून तो मिठबावकरमागे लागला. >> अगदी परफेक्ट मांडलंय तुम्ही साधना....
धुरत एकदम 'तत्वं' पक्की असलेला माणूस आहे, काम झालं म्हणून मिठबावकरच्या माणसाला मारून टाकायचं (त्याच्याच भाषेत - आपण त्याचा खून करू शकत नाही) हे त्याला पटतं नाही आणि त्याच्या सहकाऱ्यालाही तो तसं करू देणार नाही.
बाकी रागिणीला अजून 'आबा' म्हणजे तो बाहुला हे अद्याप कसं क्लिक झालं नाही, हे आश्चर्यजनक आहे. ते कळलं लवकर तर तिचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील की!
ते कळलं लवकर तर तिचे सगळे
ते कळलं लवकर तर तिचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील की! >>>तिचे प्रश्न चुटकीसरशी सुटुन कसं चालेल? मग मालिकाच संपेल ना! तेव्हा प्रश्न चिघळवूनच संपायला हवेत.
रा ला पैसे आणि इतर सामान -
रा ला पैसे आणि इतर सामान - पिस्तूल - वगैरे लपवायला घर हवं असेल.
बाकी रागिणीला अजून 'आबा'
बाकी रागिणीला अजून 'आबा' म्हणजे तो बाहुला हे अद्याप कसं क्लिक झालं नाही, हे आश्चर्यजनक आहे. ते कळलं लवकर तर तिचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील की! >> आबामध्ये काहितरी सणसणीत रहस्य असेल म्हणजे त्याच्या पेन ड्राइव्ह मध्ये - मोहन आगाशे, किका, रागीणीची आइ, शेजारचे दारु पिणारे काका - त्यामुळे आत्ता दाखवणार नाहित. मात्र तसे नसेल आणी फुसके असेल तर माहित नाहि
पण एवढ्या चांगल्या सिरियलचा शेवट फुसका असु नये अशी आशा आहे
Pages