"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त काम करतो तो माणूस. मला लईच आवडायला लागलाय.
काल तो घरी आल्यावर थकल्यासारखा दिसत होता पण अनुराधाने मिठबावकरचा माणूस येऊन गेला म्हटल्या बरोब्बर तो जो काही अ‍ॅलर्ट होतो... त्या अभिनयाला तोड नाही. एका क्षणात तो असा काही सावध झाला... अफाट जमलं त्याला ते.

रागीणीच्या डोळ्यात हल्ली सटल खुनशी झाक दिसते. तिला पैशाबद्दल अजिबात आसक्ती नाहीये. फक्त माध्यम म्हणून बघते पैशाकडे. बिनधास्त पायाने आत ढकलते ती पैशाची बॅग. डिटेलिंग मस्त आहे.>>> +१00

काल तो घरी आल्यावर थकल्यासारखा दिसत होता पण अनुराधाने मिठबावकरचा माणूस येऊन गेला म्हटल्या बरोब्बर तो जो काही अॅ लर्ट होतो... त्या अभिनयाला तोड नाही. एका क्षणात तो असा काही सावध झाला... अफाट जमलं त्याला ते. >>> अगदी अगदी
खरं...

ते आंधळे वेटर प्रकरण फार संशयास्पद वाटतं आहे. किक रागिणिला दाखवतो तेव्हडा साधा नाही असं वाटतं.

मला वाटत होतं की अनुराधा, रघु किंवा जगतापपैकी कोणतरी काल मरणार !

तिला पैशाबद्दल अजिबात आसक्ती नाहीये. फक्त माध्यम म्हणून बघते पैशाकडे. बिनधास्त पायाने आत ढकलते ती पैशाची बॅग. डिटेलिंग मस्त आहे.>>> +१00 हेच मनात आलं होतं

ते आंधळे वेटर प्रकरण फार संशयास्पद वाटतं आहे. किक रागिणिला दाखवतो तेव्हडा साधा नाही असं वाटतं. --> +++११११ अगदी. अजिबातच साधा नाहिये तो. त्याचे डोळे सारखे अंदाज घेत असल्यासारखे फिरतात.
किकु बेष्ट अभिनय करतोय... रादर सगळेच.

मला तर आता शंशव येऊ लागलाय की इस सब के पिछे कही रागिणी ही तो नही? Proud

गॅलरीच्या बाहेर बांधलेल्या निळ्या पिशव्यांमध्ये पैसेच असावेत कदाचित
. illegal गोष्टींसाठी ते रेस्टॉरंट वापरत असेल तो.. अक्खा स्टाफ अंध असण्याचं दुसरं काय लॉजिक असेल...>>बरोबर असच वाटत

आज त्या धुरत च्या साहेबांना ( सरपोतदारांनां ) किरण शी बोलताना दाखवलाय त्यामुळे आता एक एक कडी सुटत जाणार नक्की . एक एक करून या सगळ्या कड्या सुटत प्लॅन मध्ये अडकलेले सापडत जाणार आणि सगळ्यात शेवटी बॉस दाखवणार . ते सरपोतदार कायमच धुरत ला काहीच करू देत नव्हते त्यावरून ते या सगळ्या प्लॅन मध्ये आहेत असं समजत होतच पण आज खर स्पष्ट झालं . मला तर ते डॉक्टरच सूत्रधार असेल असं वाटायला लागलंय . ते रागिणी कडून काढून घेत आहेत तू खून केला आहेस .तू खून केला आहेस . आधी पण ते सूत्रधार असतील कि काय असा संशय होताच. संदीप पाठक रागिणीला मदत करेल Happy

spoiler alert>>>>
जबरी डिटेलिन्ग! जगताप ये तुने क्या किया? जिसका डर था वहि हुवा!

मला तर ते डॉक्टरच सूत्रधार असेल असं वाटायला लागलंय . ते रागिणी कडून काढून घेत आहेत तू खून केला आहेस .तू खून केला आहेस . आधी पण ते सूत्रधार असतील कि काय असा संशय होताच,>>>>>>>>

हे सगळे सुरू व्हायच्या आधीपासून रागिणी त्यांच्याकडुन उपचार घेतेय. हल्ली कुठे दाखवलंय की ते रागिणीकडून खुनाची कबुली घेताहेत म्हणून? तेव्हाही रागिणी मी खून केला असे समजा म्हणते. शेवटच्या भेटीत रागिणि त्यांना मी परत येणार नाही सांगून निघून येते.

संदीप रागिणीला ती या केसशी संबंधित पत्रकार आहे म्हणून माहिती देण्याची शक्यता आहे.

जे लोक अंध असूनही व्यवस्थित हॉटेल चालवत आहेत त्यांना तिथे काही अवैध म्हणजे त्यांच्या दृष्टीने जे घडणे अपेक्षित नाहीत ते घडत असल्यास कळणार नाही म्हणणे त्या सक्षम अंधांना कमी लेखण्यासारखे आहे. माखिजा असली रिस्क घेणार नाही. सातव सारखे अजून कितीजण पैशांसाठी आरामात असली कामे करतील.

जगताप ने धुरत साठी केस अजून कॉम्प्लिकेटेड करून ठेवली . पण रघु चे पळून जाणे धोकादायक होतेच !
मालिका लांबवण्यासाठी ब्लू व्हेल आलेला दिसतोय . संदीप पाठक चे काम भारी झालेय.
माखिजा यशस्वी पणे गूढ वाढवतोय .बरेच प्रश्न निर्माण करून मालिका संपते रोज .

आजच्या भागात का पुढच्या भागात डॉकटर बोलताहेत कि " आणि तू खून केलास " . माझ्या मते सातव चा खून केल्यानंतर किव्वा ती हॊस्पिटलमध्ये सातवचा शोध घ्यायला जात होती त्याच वेळी ती डॉक्टरची ट्रीटमेंट घेत होती. फार सुरवातीच्या भागातच दाखवलाय ती ट्रीटमेंट ला सुरवात करते असं . असं आपलं मला आठवतंय . त्यातून जरा मागचे भाग जाऊन बघितले पाहिजेत

आणि त्या निळ्या पिशवीत ( दोन्ही ) तिने पैसेच ठेवले असावेत आणि मुद्दामून ते गॅलरीत टांगून ठेवलेत . मिठबावकर पैसे शोधायला म्हणून तिच्यापर्यत जरी पोचला तरी त्याला फक्त घरातलेच पैसे मिळतील . असे गॅलरीत कुणी पैसे बांधून ठेवले असतील असं कोणाच्या मनात सुद्धा येणार नाही

मालिका लांबवण्यासाठी ब्लू व्हेल आलेला दिसतोय >> माझ्या मते नसावं . रागिणीला अभय सातव ने ब्लू व्हेल खेळता खेळता स्वतः च स्वतःच्या गळ्यावर सूरी फिरवून आत्महत्या केली असं कोर्टात सांगायचं असेल बहुतेक . त्याकरता हा गेम काय आहे कसा आहे समजून घेतेय ती

मला आत्तापर्यंत कि क पॉझिटिव्ह नाही बुवा वाटलेला >>> दाखवा positive असं सांगतेय मी. निगेटिव्ह दाखवला तर काही मजा नाही लोकांनी आधीपासून गृहीत धरलंय तोच मेन असं.

आज त्या धुरत च्या साहेबांना ( सरपोतदारांनां ) किरण शी बोलताना दाखवलाय - >>>>> माखिजाशी बोलला तो? >>> नाही सातवच्या वरचा त्याचे नाव बहुतेक किरण. तो सातव ला orders देत असतो ना तो.

ह्यात विवेक, किरण, संदीप अशी नावं घेतली आहेत पण जे खरे त्या नावाचे आहेत त्यांची नाहीत ती नावं. दुसऱ्या charactorsची आहेत.

भारी झाला कालचा भाग. जगताप काय उत्तर देणार धुरत ला आता ? अचानक रा डॉ कडे का जाते ? ब्लू व्हेल शी संबंधित शो करणार आहे त्याची काही माहिती काढायला ? मनःस्थिती कशी होते गेम खेळणाऱयांची हे विचारायला ?

Ok, पुढच्या भागात जाते परत डॉक्टरकडे. शेवटच्या भेटीत ती स्वतःच बोललेली खुनाबद्दल. डॉक्टरनी टीव्हीवर पाहिले असणार तिला नंतर. त्यांच्याकडे तिचे रेकॉर्डिंग आहे, पण त्याच वेळी प्रोफेशनच्या नियमाप्रमाणे ते कोणालाही तिच्याबद्दल काही सांगु शकणार नाही बोललेले. बघू पुढे काय होते. असे कित्येक डॉक्टर समाजात असतील ज्यांना स्वतःचे पेशंट बाहेर असे अतरंगी काहीतरी करताना बघावे लागत असेल व त्यातला धोका ओळखून बिचारे अस्वस्थ होत असतील.

धुरतला संशय आहेच परवानगी मिळाल्याबद्दल. जगतापने रघुच्या मृत्यूचे सांगितले तर कदाचित तो प्लॅन कॅन्सल करेल. त्यामुळे साहेबांचा प्लॅन बॅकफायर होईल. अजून किरणचा बॉस दाखवला नाही.

बेनामी मरेकऱ्याने काल अफाट काम केले.

मालिका लांबवण्यासाठी ब्लू व्हेल आलेला दिसतोय >>> नाहि. रागीणीच्या मनात नक्कि काहि तरी आहे. ती मोठा स्टाफ मागुन घेते त्यांचा तीच्या तपासात उपयोग करुन घेण्यासाठी तीने मागीतला असावा ब्लू व्हेल च्या नावाखाली.

सातवच्या वरचा त्याचे नाव बहुतेक किरण. तो सातव ला orders देत असतो ना तो. >>> तो सरपोतदारचा फोन झाल्यावर कोणाशी बोलतो ( माझ्या अंदाजाप्रमाणे तो मिठच असावा)
मग परत सरपोतदारला फोन करुन धुरत ला मिठच्या मागे सोडायला सांगतो. किरण डबल गेम करत असावा नाहितर मिठ आणी किरण मिळुन सरपोतदारला पुर्ण न सांगुन धुरतला अडकवत असावेत.
धुरतला तसेहि जगताप ने गोत्यात आणले आहेच.

जगताप ने धुरत साठी केस अजून कॉम्प्लिकेटेड करून ठेवली . पण रघु चे पळून जाणे धोकादायक होतेच !>>> पहिली गोळी त्याच्या पायाला लागली होती.. जगताप त्याला त्यानंतर सहज पकडू शकला असता.. पण त्याने गोळी घातली. धुरत म्हणतो तसं जगतापने मारायचा विचार करूनच रघुला उचललं.
रच्याकने, आता समन्वय चेतना दाखवायला पाहिजे परत

आज त्या धुरत च्या साहेबांना ( सरपोतदारांनां ) किरण शी बोलताना दाखवलाय -माखिजाशी बोलला तो? >> @ सुनिधी किरण हे मालिकेतलं नाव आहे त्या कलाकाराचं ( खर नाव माहित नाही ) . किरण करमरकरच मालिकेतलं नाव माखिजा आहे . Happy

मालिका लांबवण्यासाठी ब्लू व्हेल आलेला दिसतोय >>> नाहि. रागीणीच्या मनात नक्कि काहि तरी आहे. ती मोठा स्टाफ मागुन घेते त्यांचा तीच्या तपासात उपयोग करुन घेण्यासाठी तीने मागीतला असावा ब्लू व्हेल च्या नावाखाली.>> हो या आधीच्या प्रतिसादात मी तसाच लिहिलंय. रंगिणीला ब्लु व्हेल खेळणाऱ्याची मानसिक स्थिती काय असते हे जाणून घ्यायचं आहे. आणि त्या प्रमाणे तिला कोर्टात असं सांगायचं आहे कि अभय सातव ब्लु व्हेल खेळत होता . त्या गेम मध्ये त्याला आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली गेली म्हणून त्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . तो त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला . त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि तो हॉस्पिटल मध्ये शुद्धीत आल्यावर त्याने परत गळ्यावर स्वतःच स्वतः चाकू फिरवून आत्महत्या केली. तिला त्या खुनाच्या गुन्हयांतून सुटायचं असेल तर तिला असच कोर्टाला सांगितलं पाहिजे किव्वा भासवलं पाहिजे . आणि म्हणून ती हे सगळं ( ब्लु व्हेल वगैरे ) जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय

जगतापणे मात्र धुरत ची सगळ्याच बाजूने कोंडी केली बिचाऱ्याची .
त्याला कुठेच तपशिलात किव्वा खोलात शिरायला मिळत नाहीये

मी आणि इतरही अनेक जण ही मालिका ozee वर पाहतात. (युवा ने दिवसा रिपिट टेलीकास्ट ठेवलाच नाही.) तर प्लीज कुणीतरी 'पुढच्या भागात' यात काय दाखवलं हे रोज लिहा ना.

Pages