"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१,२,३,४...........४३,४४,४५ ............हुश्श....पहिले सगळे एपि. मी...मी पण आता तुमच्यासोबत चर्चा करायला मोकळी... Happy
मागचे ३-४ दिवस अक्षरशः रोलर कोस्टर राईड होती माझ्यासाठी...काय दमछाक करणारी सिरीअल आहे ही..अगदी छोट्यात छोटा सीन असुदेत, एखादा १ शब्दाचा डायलॉग असुदेत, कितीही छोटं पात्र असुदेत प्रत्येका मागे काहीना काही कारण आहे..अज्जीबात फालतूपणा नाही....मस्त मस्त मस्त...
आता आज काय होतं बघु..
Submitted by स्मिता श्रीपाद on 9 October, 2017 - 14:51
>>>>
वेलकम स्मिता जी

कि क जर मेन असेल तर मुक्ता शेवटी टपकवणार त्याला. नसेल तर तो वाचवेल मुक्ताला सगळ्यातून शेवटी. हल्ली कि क चा चेहेरा फार सुजलेला आणि डोळे बटबटीत का वाटतायेत, मुद्दाम तसं दाखवतायेत का त्याला.

आजचा एपिसोड मागल्या काही एपिसोड मधले राहिलेले तुकडे जोडुन केल्यासारखा वाटला, धुरताना जगतापावर सन्शय आलाच आहे.

माखिजा इज हिटींग ऑन रागिणी याची खात्रीच वाटतीय. लग्न केलं नाही वगैरे बहुमोल माहिती पुरवतो आणि विशेष म्हणजे ती कुठे असेल (याचा अंदाज घेऊन )बरोबर तिथे टपकतो.

माखिजा स्वतः च्या हाफीसातून निघत होता.

मालिका थोडी पसरतेय. रागिणी सावरतेय हे दाखवण्यासाठी माखिजा व ब्लू व्हेल. छान बोलली ती आत्महत्यांबद्दल.

माखिजा रागिणीच्या मनात soft corner निर्माण होईल याची पुरेपूर काळजी घेतोय.. म्हणजे पुढे जेव्हा रागिणीला माखिजाच्या विरोधात जायची वेळ येईल तेव्हा ती गडबडून जाईल..
धुरत सुंदर acting करतो .. जगतापच्या जखमा बघून आधी काळजीचे आणि नंतर संशयाचे expressions मस्तच दाखवले

ब्लू वेल बद्दल रागिणीने एक्स्प्लेनेशन दिलं की माखिजाला. दुसऱ्यांसाठी काही करता येईल का यासाठी तिने माहिती काढून शो केला. दुसऱ्यांचा विचार माखिजाही करतोय.. अंध व्यक्तींना काम दिलय म्हणून ती इंप्रेस झाली आहे.
माखिजा चं गूढ कायम आहे. तो नेमका तिथे येतो आणि तिला लिफ्ट देतो. स्वतःबद्दल माहिती देतो. नेमकं काय आहे त्याच्या मनात?
सदा नेहमी प्रमाणे मस्तच! जगताप पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये सांगतो रघु पळून गेला तेव्हा जे बघतो त्याच्या कडे.. नजरच सांगते की त्याला जगताप च्या थापांवर विश्वास नाही. त्याच्या घरी जेवायला येतो तो सीन पण मस्त झाला.
सत्य कळाल्यावर जगतापला काय करू शकणार? अन आॅफिशियल तपास होता.!
रागिणी ची आई खरचं मारत असेल का कमळाबाईंना.? तिचं वागणं संशयास्पद वाटतयं. की आजारपणामुळे चिडचिड होत आहे?
पुढील भागात समन्वय चेतना दाखवणार आहेत. रागिणी आता दुसर्‍यांचा विचार करतेय खरचं. अल्झायमर च्या पेशंट साठी काही तरी करावं असं वाटतंय तिला. मालिकेमध्ये सामाजिक प्रश्न पण हाताळतायत.. ब्लु वेल, अल्झायमर वगैरे..

सोमवार खरंच आवडायला लागलाय! Happy
ब्लु व्हेल ला एवढं फुटेज social cause म्हणून की काय?! Awareness creation?! मला रागिणीच्या आधीच्या बातम्यांच्या मानाने ही 'ब्लु व्हेल' वाली ठीक ठीक वाटली. म्हणजे अर्थात सगळेच डिटेल्स दाखवत बसले नसणार - सुचित केले की इम्प्रेसिव्ह प्रोग्रॅम केला तिने!
खूप दिवसानी ती अभय सातवची मुलगी पण दाखवली काल. त्याच व्हल्नरेबल वयोगटातली. तिचं आणि त्या ब्लु व्हेल गेम चं काही कनेक्शन दाखवणार की काय??

ब्लु व्हेल चा वापर >> माझा अंदाज असा वाट्टोय कि काही जण ब्लु व्हेल मुळे मेलियेत अस नुसत सांगितलय , खर कारण वेगळ असु शकतं , जस की ड्रग्ज किंवा आणि काही जे रागिणि शोधेल...

कालाच्या भागात फार काही घडलं नाही असं अत्तातरी वाटतय...ब्लु व्हेल चं कनेक्शन अजुन कळत नाहिये...इतका फोकस का केलाय त्यावर..
रागिणी ची आई नाटक करतेय असं का कोण जाणे पण वाटतय...अल्झायमर चं पुस्तक तिला हे नाटक करताना मदत मिळावी म्हणुन वाचतेय...पुस्तक वाचुन तसं वागायचा प्रयत्न करतेय म्हणजे तिला अल्झायमर झालाय खरच असं लोकांना वाटावं . असं असु शकेल का ?
धुरत बेस्ट ..कालचे संशय आल्याचे भाव मस्त होते...

जगताप ने माती खाल्ली आणि सदाने पकडली. कसला पहात होता तो. जबरी!
रा ने ब्ल्यु व्हेल ची बातमी छानच दिली. बातमीचा एन्ड जबरी केला...
त्यातून ती काहीतरी सुचित करत असल्यासारखं वाटतं, काहीतरी शोधत असल्यासारखं सुद्धा..
किक चे पात्र फार गुढ, कधी चांगला तर कधी फार धुर्त वाटतो...

रागिणी ची आई नाटक करतेय असं का कोण जाणे पण वाटतय...अल्झायमर चं पुस्तक तिला हे नाटक करताना मदत मिळावी म्हणुन वाचतेय...पुस्तक वाचुन तसं वागायचा प्रयत्न करतेय म्हणजे तिला अल्झायमर झालाय खरच असं लोकांना वाटावं . असं असु शकेल का ?>> अगदी अगदी. काल मलाही असंच वाटलं. त्यामुळेच ती कमळाला मारत असावी असं वाटतंय.
किंवा मग आपल्याला अल्झायमर झालाय तर म्हणून ती पुस्तकातल्याप्रमाणे वागत असावी. Proud (असं एक उदाहरण पाहण्यात आहे. आजार वेगळा आहे. )

दुसऱ्या बाजूने विचार केला तर,
माखिजा खरंच रागिणीचा आदर करत असावा, असं मला वाटतंय. तो खूप पैसेवाला असल्याने तोच म्हणतो तशी सतत लाळघोटेपणा करणारी माणसं त्याच्या आजूबाजूला असणारच. त्याची नजर तयार आहे त्यामुळे रागिणी त्या लोकांच्यात मोडणारी नाही हे ओळखून त्याने रागिणीला परत बोलावले. पुढे हार द्यायच्या निमित्ताने तिच्याबद्दलचा समज तपासून पाहिला. त्याने तसं बोलूनही दाखवलं. कालही लग्न न केल्याची माहिती तो सहज देतो विषय निघाला म्हणून, असं वाटतं. तो रागिणीला मदत करणारा असावा, असंच मला वाटतंय.
माखिजा जर मेन व्हिलन असेल तर सगळाच फुसका बार ठरेल. कारण तेच पहिलं प्रेडिक्शन आहे. Happy

माखिजा जर मेन व्हिलन असेल तर सगळाच फुसका बार ठरेल. कारण तेच पहिलं प्रेडिक्शन आहे +१
तसही माखिजा सहजासहजी रागिणीला का सोडेल जर तो सगळ्यात वरचा असेल तर. तो केव्हाच तिचा काटा काढू शकतो..

एक्झाक्टली, मी तेच सांगतेय सारखी की कि क ला व्हिलन नका दाखवू, ते तर तो यायच्या आधीपासून म्हणतायेत सगळेच इथे.

हो निधी परवा मुलाखतीत पण कि क वाटला तसाच पण स्क्रीनवर जास्तच वाटतो ग. काय होता दिसायला, मी एकदम फिदा होते, अजूनही आवडतो पण जाऊदे.

निधी, एक वाजून चौदा मिनिटांची पोस्ट मस्त आहे.

वयोमानानुसार लोक बदलणारच की.
एकेकाळी तो हृषिकेश कामेरकर (गायक) माझा क्रश होता. परवा सारेगमप लिटल चॅम्प्स मध्ये पाहिला. थोडा जाड झालाय. अर्थात वय वाढलं.

मखीजा व्हिलन असणार असं सर्वांना वाटणार त्यामुळे मखीजा व्हिलन नसणार असं दाखवू असं लेखकांना सुचलं असेल पण ते उलटंही सगळे गेस करणार त्यामुळे मखीजाच व्हिलन असणार Proud

कालचा भाग बोर होता. किक आणि रागिणीतला संवाद पाल्हाळ वाटला.
रागिणीची ब्लू व्हेल स्टोरीपण उगीच मधे घातल्यासारखी वाटली.

हृषिकेश कामेरकर >>> मलाही आवडायचा, मला भेटायचा पण चान्स होता, नवरा गेला होता ना ताक धिना धिन मध्ये. पण मला शक्य नव्हतं, असो अवांतर लिहिलं.

मला पण कालचा भाग बोर झाला . पण धुरत ने बरोब्बर पकडलंय जगताप ला कि हा सांगतोय त्यात काहीतरी गोची आहे .
आता आज त्या मिबा चं काहीतरी दाखवायला पाहिजे कारण "आज रात्री आपण आपल्याच घरी जेवणार" असं म्हणाला होता . (सुटतोय का अडकतोय )
ती रात्र आता झाली आहे (जगताप आणि धुरत बसलेत जेवायला ).

धुरतला जगतापचा संशय आल्यामुळे त्याने मुद्दामहून त्याला जेवायले बोलावलं का???

तो मिठबावकर एकदम कबीर बेदी कॅटेगरीतला व्हिलन आहे. भारी पर्सनॅलिटीवाला. Wink

Pages