Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा
दक्षिणा
त्यापेक्षा त्या सगळ्या माडांच्या झावळ्याच रचून ठेवायच्या तिथे.>>>+१ हो ना
पण बेसिन चा नळ चालू राहिल्याचं बरोबर दाखवलं ...
मला पण वाटतंय कि किरण ला आधी राव चा फोन आला असणार (कारण मूर्ती चं काय झालं हा विषय काढल्यावर महत्वाचा फोन यायचाय असा म्हणून राव सटकले )आणि नंतर किरण ने कि. क. ला फोन केला असावा असा अंदाज आहे .
आणि लॅपटॉप सरपोतदार सर मागून घेतायत म्हणजे आता त्यातला डेटा गायब होणार किंवा गुलदस्त्यात राहणार
आणि लॅपटॉप सरपोतदार सर मागून
आणि लॅपटॉप सरपोतदार सर मागून घेतायत म्हणजे आता त्यातला डेटा गायब होणार किंवा गुलदस्त्यात राहणार>>>
हो. किरण सांगतो ना लॅपटॉप काढून घ्या असं
बेसिनचा नळ बंद केलाच नाही
बेसिनचा नळ बंद केलाच नाही धुरत ने, मी सांगत होते की बंद कर रे, बघवत नाहीये पाणी वाया जातंय ते, लोकांना मिळत नाही पाणी.
किरण सांगतो ना लॅपटॉप काढून
किरण सांगतो ना लॅपटॉप काढून घ्या असं>> मी मिस केलं वाटतंय
बेसिनचा नळ बंद केलाच नाही धुरत ने>> ++१ हो ना त्यातले त्यात अजून एक सत्कार्य केल्याचं दाखवता आलं असतं
सरपोतदारांना द्यायच्या आधी
सरपोतदारांना द्यायच्या आधी सदा डेटाचा बॅक अप घेऊच शकतो की.
सरपोतदारांना द्यायच्या आधी
सरपोतदारांना द्यायच्या आधी सदा डेटाचा बॅक अप घेऊच शकतो की.>> हो पण त्यासाठी आधी unlock करायचेत आणि त्यासाठी परदेशातल्या experts ची मदत घेणारेत म्हणे ..unlock व्हायच्या आधीच मागितले आहेत लॅपटॉप
किरण बहुतेक नव्हे नक्कीच
किरण बहुतेक नव्हे नक्कीच विवेकशीच बोलत होता. किरणचा बाॅस माखिजाही असू शकतो >>> : D
किरणचे नाव किरण ठेवल्या मुळे आणी माखिजाचे मुळ नाव किरण असल्यामुळे वाचायला मजा आली.
सदाने ऑलरेडी बोलावले आहेत की
सदाने ऑलरेडी बोलावले आहेत की एक्स्पर्ट्स अनलॉक करायला.
सदाने ऑलरेडी बोलावले आहेत की
सदाने ऑलरेडी बोलावले आहेत की एक्स्पर्ट्स अनलॉक करायला.>> हो का? मला वाटलं काल तो ह्याबद्दल सरपोतदारांशी बोलत होता एक्सपर्टस ना बोलवायला पाहिजे वगैरे तेव्हा साहेब म्हणतो आणून द्या लॅपटॉप ..म्हणजे आधीच (थोडक्यात मी बघतो अनलॉक वगैरे )
नावं बरीच ओरिजनल कलाकारांची
नावं बरीच ओरिजनल कलाकारांची पण त्यांना न देता दुसऱ्याला दिलेली. आशिष, विवेक, किरण, संदीप
सदाला माहीत आहे साहेबांचा गेम
सदाला माहीत आहे साहेबांचा गेम. पण ते आपलाच गेम करणारेत याचा अंदाज येउदे त्याला लवकर.
डावा मूर्ती चा शोध घेत आहे हे
डावा मूर्ती चा शोध घेत आहे हे कोणालातरी कळलं असेल त्या माणसाने पण केला असु शकतो हा फोन.>>
डावाशी डील करताना रागिणीने identity बदलल्ये.. आपल्याला पैसे देणारी बाई म्हणजेच रागिणी देसाई हे त्याला माहीत नाही.. (असं आपल्याला दाखवलंय. पण डावाचा पूर्वेतिहास बघता ही माहिती मिळवणं त्याला कठीण नाही)
त्यामुळे आत्तातरी समन्वय चेतना related च कोणीतरी वाटतंय.
रच्याकने, आज मालिकेचा दिग्दर्शक भिमराव मुडेला फेबु वर search केलं.. 'डावपेच' नावाच्या कुठल्याशा सिनेमाचा दिग्दर्शक आहे तो
Sadhya phar slow jaat ahe
Sadhya phar slow jaat ahe story
मला एक कळत नाही. आईच्या
मला एक कळत नाही. आईच्या अल्झायमर्स वर इतका का वेळ घालवला आज? ऑलमोस्ट ८०% एपिसोड्.
अजून एक शंका रागिणी फारसा वेष न बदलता सदा समोर जाऊन अभय ची गाडी तपासून कानातलं शोधून आली, तिचा विग आणि हॉस्पिटल मध्ये आलेली बाई(अभय ला मारलेली) या दोघीन्चाही विग एकच आहे, त्यावरून तो स्वतः स्केच बनवून का नाही शोध घेत? जगताप ने मिठ च्या माणसाला मारल्याचं ज्या चतुराईने त्याने हेरलं ती चतुराई रागिणी उर्फ अभय सातव ची मारेकरी मारेकरी शोधताना काय केळी खायला गेली होती का?
आणि आजच्या एपिसोडातून सदा आणि जगताप दोघेही गायब?
संदिप डावा बातम्या पहात नाही का? इतकं अंडरवर्ल्ड मध्ये काम केलेली माणसं, शार्प शूटर वगैरे आणि अशा बारक्या बारक्या गोष्टीत कसा काय मार खातात?
का बाकी चॅनल्स वर चाललेली फालतूगिरी पाहून निदान या सिरियल मध्ये घेतली गेलेली सिनेमॅटिक लिबर्टी कितीतरी सहनीय आहे म्हणून समाधान मानायचे?
त्या बाईचे स्केच बनवले गेले,
त्या बाईचे स्केच बनवले गेले, ते टीव्हीवर पाठवून द्या असे धुरत मानेला सांगतोही. पण ह्या गोष्टी कुठे कोणी गांभीर्याने घेते? आपले स्केच टीव्हीवर आले हे रागिणीलाही माहीत नसते. ती त्याच अवतारात अनुराधा सातवच्या घरी व तिथुन धुरतच्या घरी जाऊन आलीय. तेव्हा नशिबाने वाचते.
शांत व्हा दक्षिणाताई. तिचा
शांत व्हा दक्षिणाताई. तिचा विग म्हणजे कोणाचा ते नाही समजलं. डावाला कळलंंय की त्याला कामं सांगणारी बाई दुसरीच आहे (वेषांतर). सदाने नळ बंद केला होता. विवेकचं नाव आधीही एका मुलीने घेतलं होतं म्हणून विवेकवर संशय. राव फोनचा बहाणा करतात कलटी मारण्यासाठी. किरणने कधी सांगितलं लॅपटाॅप काढून घ्या असं. भाग लांबला खरा पण फार ईमोशनल होता. कमळाबाई रडतात शेवटी ते बघून त्यांचा किती जीव होता राच्या आईवर ते कळलं. कितीही पैसे खर्च केले तरी जीवाला जीव देणारी माणसं भेटणं कठीण. एका एपीमध्येच रोगाच्या सातही पाय-या पार करून टाकल्या ते एक बरं केलं.
आजचा एपिसोड प्रचन्ड इमोशनल
आजचा एपिसोड प्रचन्ड इमोशनल होता, काय तुफान अॅक्टिन्ग दोघिन्ची! खुप बारिक सारिक डीटेलिन्ग दाखवले, मला तरी आजचा भाग आवश्यक वाटला, मला वाटत मागचे ३-४ भाग इतके थ्रिलिन्ग होते की मधेच घेतलेला पॉज अस्वस्थ करतो... खुप दिवसानी एखादी मालिका बघताना डोळ्यात पाणि आल.
आजचा एपिसोड प्रचन्ड इमोशनल
आजचा एपिसोड प्रचन्ड इमोशनल होता, काय तुफान अॅक्टिन्ग दोघिन्ची! खुप बारिक सारिक डीटेलिन्ग दाखवले, मला तरी आजचा भाग आवश्यक वाटला, मला वाटत मागचे ३-४ भाग इतके थ्रिलिन्ग होते की मधेच घेतलेला पॉज अस्वस्थ करतो... खुप दिवसानी एखादी मालिका बघताना डोळ्यात पाणि आल.>>>+१
किरणने कधी सांगितलं लॅपटाॅप
किरणने कधी सांगितलं लॅपटाॅप काढून घ्या असं.>>>>
सदा सरपोतदारांकडे मिठबावकरावर धाड घालायची परवानगी मागायला येतो तेव्हा साहेब त्याला उडवून लावतात. तो गेल्यावर ते लगेच किरणला फोन लावतात. किरण म्हणतो की मिबा तसाही स्वतःला शाना समजतोय, त्याला करा आत धुरतच्या हातून. फक्त त्याचे लॅपटॉप ताब्यात घेऊन मला आणून द्या. हे झाले की धुरतला पण नारळ देऊ.
भाग संपताना, डावा रागिणीबरोबर
भाग संपताना, डावा रागिणीबरोबर खुप तुटकपणे बोलला असे वाटले. एरवी प्रेमाने बोललेला दाखवलाय.
बाकी भाग खरंच दु:खी करणारा होता.
सदाने नळ बंद केला होता >>>
सदाने नळ बंद केला होता >>> कधी, मला नाही दिसला.
काल मुक्ता आणि वंदना गुप्ते यांचा एक इमोशनल सीन उत्तम झाला. वंदना गुप्ते यांनी मुक्तापेक्षा छान अभिनय केला तिथे.
वंदना गुप्ते फार भारी काम
वंदना गुप्ते फार भारी काम करते आहे. एकदम पर्फेक्ट आई! चेहर्यावरचे भांबावल्याचे, घाबरल्याचे भाव, नावं न आठवणं, चमत्कारिक बघणं- बेस्ट डिटेलिंग.
आईचा कारस्थानात काही हात असेल असं मला वाटत नाही. रागिणीच्या आयुष्यातला आणखी एक दु:खदायक कोपरा म्हणून तो ट्रॅक असावा असं मला वाटतं. रागिणी आईबद्दल कॅमेरासमोर बोलते ते एकदम टचिंग! आई, वडिल, नवरा, मुलगा कोणीच राहिलं नाही, आहे ते केवळ एक ध्येय. तेही साध्य झाल्यानंतर काय करावं तिनं? पिशवीभर पैसा असला तरी अशावेळी तो काय कामाचा?
असो.
आदल्या रात्री जगतापने रघूला
आदल्या रात्री जगतापने रघूला मारलं; दुसर्या रात्री सदा एकटा बंगल्यावर पोचला; म्हणजे २४ तास बेसिनचा नळ सुरू होता? आणि पाणी वाहत होतं? दुनिया में ऐसी कोई टंकी नहीं जो २४ घंटे नल खुला रहनेपर भी खाली न हो!
कुंड्या नेऊन ठेवणे हा जगतापचा खरंच मूर्खपणा होता.
कालचा एपिसोड जबरी वाटला. आईच्या अल्झायमरचा परत एकदा सटली उपयोग केलेला दिसला. (एक जिला प्रयत्न करूनही काहीही आठवत नाही; आणि एक अशी जी कितीही प्रयत्न केले तरी काहीही विसरू शकत नाही.)
एक आजारामुळे जगापासून तुटलेली; दुसरी या सार्या प्रकरणाचा छडा लावेपर्यंत इतके शत्रू निर्माण करून ठेवेल, की त्यापायी जगापासून तोडून राहण्याची वेळ तिच्यावर येऊ शकते.
किरणच्या डोक्यावर / या सार्या प्रकरणामागचा मास्टरमाइंड कोण आहे ते समोर येईल तेव्हा 'ज्वेल थीफ'मध्ये व्हिलन कोण आहे हे कळल्यावर जेवढा धक्का बसतो किमान तेवढा तरी बसायला हवा अशी माझी अपेक्षा आहे.
वन्दना गुप्ते खरेच भारी.
वन्दना गुप्ते खरेच भारी.
डोळ्यात पाणी आणले काल त्यानी.
फारच भावनाप्रधान भाग होता कालचा.
वर कोणीतरी शंका काढली की
वर कोणीतरी शंका काढली की चंदूकाकांवर पोलिसांच लक्ष असायला हवं - तर जिथे पोलिसातले लोक बाबूला मारतात, त्याच्या बायकोला माहीती आहे म्हणून तिला मारतात ते कशाला लक्ष ठेवतील आणि खराखुरा तपास करतील ह्या प्रकरणाचा ? सदाने लक्ष ठेवायला हवं होतं मान्य आहे, पण तो तरी कुठे कुठे पुरा पडणार.
आणि आधी त्याचा फोकस होता अभय चा मारेकरी पकडण्याचा, तो नंतर शिफ्ट झाला त्या मुली सापडल्या वगैरे प्रकरणामुळे. त्यामुळे आता त्या बाईचं चित्र टीव्ही वर दाखवणे वगैरे तो कशाला करेल ? अभय ची बायकोही मारेकर्याला पकड हे पूर्वी जितक्या तीव्रतेने म्हणत होती तितकीच आता अलूफ झाली आहे.
अभयवर हल्ला झाला तेव्हा त्याला मुक्ता दिसते ती हार्ड्ली ५ मिन्स, तेव्हा त्याची मनःस्थिती काय असणार, आपल्या तरी एवढी कुठे लक्षात राहतात माणसं >? अर्थात तो पोलिस आहे, पण तरी.
कालचा भाग खूप टचिंग होता. हॅरी पॉटर मधे कसं एकेक करून सगळे जातात आणि हॅरी एकटा लढतो तसं मुक्ताचे सगळे आधार जात चालले आहेत.
रागिणी फारसा वेष न बदलता सदा
रागिणी फारसा वेष न बदलता सदा समोर जाऊन अभय ची गाडी तपासून कानातलं शोधून आली, तिचा विग आणि हॉस्पिटल मध्ये आलेली बाई(अभय ला मारलेली) या दोघीन्चाही विग एकच आहे, त्यावरून तो स्वतः स्केच बनवून का नाही शोध घेत?
>> ती कानातल्याचा शोध घ्यायला तिच्या नेहेमीच्या साध्या पत्रकारांच्या कपड्यात गेली होती कारपाशी. असा शोध घेणारी, नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सदाला प्रश्न विचारणारी, सातवच्या घरी आणि नंतर धुरतच्या घरी ती गेली तेव्हा ती त्याच वेषात असल्याने धुरतला रागिणी पत्रकार आहे आणि ती बातम्या मिळवण्यासाठी काहीही करते एवढंच माहिती आहे. त्याने कधीही रागिणीला प्रत्यक्ष तो बॉबकट वाला विग घालून पाहिले नाहीये.
पियु करेक्ट... आता लक्षात आलं
पियु करेक्ट... आता लक्षात आलं माझ्या.. सॉरी..
कालच्या भागात वंदना गुप्ते
कालच्या भागात वंदना गुप्ते आणि मुक्ता चा अभिनय उत्कृष्ट होता . वांगू ने रात्री रागिणीला उठवून मला नर्सिंग होम मध्ये ठेव म्हणून सांगितलं आणि डॉक्टरने हि तेच सांगितलं त्यामुळे शेवटी रागिणीला तसा निर्णय घ्यावा लागला त्यानंतर रागिणी कॅमेरासमोर जे काही बोलते ते उत्कृष्ट होत . रागिणी म्हणते माझं आणि आईच कॉम्बिनेशन इतकं जब्राट आहे "तिने कितीही आठवायचा प्रयत्न केला तरी तिला गोष्टी आठवत नाहीयेत आणि मी कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी गोष्टी विसरू शकत नाहीये. " मस्त होत मुक्ता चा अभिनय. आता ती तो भाड्याचा फ्लॅट ठेवेल का ? ठेवेल असं वाटत
आणखीन एक मिठबावकर कडून पैसा मिळवण्यासाठी ती चंदू दादाच्या सांगण्यावरून डाव्याला भेटते तेव्हा ती गावरान वेषात भेटते आणि "मिठबावकरकडून पैसे पाहिजेत' असं त्याला सांगते पण ते "का पाहिजेत" याच कारण काय सांगते? किंवा सांगते का ? आणि ती चंदू दादाने तुमचा रेफरन्स दिलाय असं सांगत नाही का ? काही आठवत नाहीये .
आईचा कारस्थानात काही हात असेल
आईचा कारस्थानात काही हात असेल असं मला वाटत नाही. रागिणीच्या आयुष्यातला आणखी एक दु:खदायक कोपरा म्हणून तो ट्रॅक असावा असं मला वाटतं>>हो मला पण सेम असच वाटतंय .रागिणी च्या कुटुंबाचा काही जास्त सहभाग नसावा. स्टोरी फक्त रागिणी बदला किंवा आपल्या नवर्याच्या मारेकऱ्यांचा शोध कसा घेते यावर जास्त फोकस्ड आहे ..सो हळू हळू आता त्यांनी तिच्या आईलाही सीन मधून बाजूला केलं असावं .कदाचित अधेमधे दाखवतील तिच्या आई ला पण जास्त नाही .
पण ते "का पाहिजेत" याच कारण काय सांगते? किंवा सांगते का ? >>कारण मला वाटतंय खोटं सांगते कि नवऱ्याचे पैशे ठेवलेत का त्याच्याकडून पैशे येणे बाकी आहेत असं काहीतरी .. मिठबावकर च नाव पण स्वतःच्या तोंडाने नाही घेत .."नाव बघा तिखट मीठ का असं काहीतरी आहे "
आणि ती चंदू दादाने तुमचा रेफरन्स दिलाय असं सांगत नाही का ?>> हो तर चंदू दादांचा ref सांगते ना. ती म्हणते ना कि तुम्ही तर सगळं उजव्या हाताने करताय मग डावा असा नाव का etc ..तेव्हा तो म्हणतो अच्छा तुम्हाला ते पण नाव कळलं का ..ती स्टोरी नंतर सांगतो etc.. शिवाय डावा म्हणतो हो चंदुदादा म्हणालेत तुम्हाला लागेल ती मदत करा असं
अजून किती महिने चालणारे मालिका २ नच ना ?
एकंदर तीन महिने आहे असं
एकंदर तीन महिने आहे असं मुक्ता म्हणाली होती सुरु व्हायच्या आधी. आता महिनाभर असेल म्हणजे.
Pages