Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सदाला संशय आला आहे. त्याने जर
सदाला संशय आला आहे. त्याने जर सातवचा फोन ऑन झाला त्या प्रत्येक वेळी रागिणीच्या मोबाईल चं लोकेशन ट्रेस केलं तर रागिणी नक्की सापडणार.
पण असं वाटतंय की आता त्याला accident case जास्त महत्त्वाची वाटते आहे.
माझा अंदाज - संदिप पाठक>> नसावा. कारण त्याने चंदुदादाच्या घरी जाऊन बाबूच्या बायकोला मारलं
खरंच इथे लोक डिटेक्टिव्ह
खरंच इथे लोक डिटेक्टिव्ह झालेत. काही शंका आणि निरिक्षणं त्या लेखकाला ही समजणार नाहीत अशी नोंदवली आहेत लोकांनी. मस्तच. माबोकर रॉक
संदिप पाठक बाबुच्या
संदिप पाठक बाबुच्या शेजारणीला धमकावतो पत्ता सांगावा म्हणुन तो प्रसंग परत पाहिला हवा. ती काय सांगते ? ते घर चंदुदादाचे आहे आणी ती बाबुची बायको आहे हा रेफर्न्स आला आहे का आधी संदिप पाठक पर्यत ?
ते घर चंदुदादाचे आहे आणी ती
ते घर चंदुदादाचे आहे आणी ती बाबुची बायको आहे हा रेफर्न्स आला आहे का आधी संदिप पाठक पर्यत ?>> दोन्ही आहे. चंदुदादा बद्दल (नावानिशी) तो त्या पान टपरीवाल्याला विचारतो आणि छायाशी बाबूबद्दल बोलणं होतं.
दोन्ही आहे. चंदुदादा बद्दल
दोन्ही आहे. चंदुदादा बद्दल (नावानिशी) तो त्या पान टपरीवाल्याला विचारतो आणि छायाशी बाबूबद्दल बोलणं होतं. >> मग संदिप डावा हा नवीन प्रकार असावा.
हम्मम.. मला सदाचे वागणे नाही
हम्मम.. मला सदाचे वागणे नाही पटले. त्याला थालिपीठाची थाप पचली असे मला वाटले.
मंदारने काल रागिणीला दिलखुलास टाळी दिली, आधी तो निगेटिव्ह वाटला पण तोही थक्क झाल्याचे दिसले. उद्या तिच्याच हातून सातव मेला हे कळल्यावर तो पडेलच...
खरंच इथे लोक डिटेक्टिव्ह
खरंच इथे लोक डिटेक्टिव्ह झालेत. काही शंका आणि निरिक्षणं त्या लेखकाला ही समजणार नाहीत अशी नोंदवली आहेत लोकांनी. Happy मस्तच. माबोकर रॉक ☺,~~~~~~ agreed + 1000000
छान वाटतेय एखाद्या
छान वाटतेय एखाद्या मालिकेबद्दल लोक एवढे इन्व्हॉल्व होऊन चर्चा करताना पाहून.
रागिणी आता मीठबावकारला कसा
रागिणी आता मीठबावकारला कसा कॉन्टॅक्ट करणार? तिने फोन सुरू केला की 5 मिनिटात सदा येऊन तिथे थडकणार.
आय होप तिने मिठबांवकरचा नंबर
आय होप तिने मिठबांवकरचा नंबर सेव्ह केला असेल आणि स्वतःच्या फोनवरून फोन करेल. पण आता तिला तिचा फोनसुद्धा ट्रेस झालाय हे कळलेय. पण शेवटी ती रागिणी आहे, रिस्क घेणारच ती चंदूदादाला कशी काँटॅक्ट करते हे सुद्धा बघायला हवे.
कालचा भाग खरच भारी होता.
कालचा भाग खरच भारी होता. वंदना गुप्तेची अॅक्टींग महान !! ह्या सिरीयलमध्ये सगळेच जण चांगली अॅक्टींग करतात त्यामुळे बघायला मजा येते.
त्यातल्या त्यात तो एडीटरच जरा कच्चा आहे.
रागिणी आता मीठबावकारला कसा
रागिणी आता मीठबावकारला कसा कॉन्टॅक्ट करणार? तिने फोन सुरू केला की 5 मिनिटात सदा येऊन तिथे थडकणार.>>तीने एका नोट पॅड वर लिहून घेतलेले सातवच्या फोन मधले सगळे नंबर,ती पहिल्यांदा मीठबावकरला पब्लिक फोन वरून कॉल करते तेंव्हा.
कालच्या प्रसंगात सदाला माहीत झालं असावं की रागिणी खोटं बोलतेय,पण त्याला ही ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायला तिची मदत लागणार आहे,म्हणून तो वाट बघेल योग्य वेळ यायची.
आय होप तिने मिठबांवकरचा नंबर
आय होप तिने मिठबांवकरचा नंबर सेव्ह केला असेल आणि स्वतःच्या फोनवरून फोन करेल >>> हो ती मिठबावकराला सांगते की मी ह्या फोन वरुन फोन करणार नाहि म्हणुन आणी तु हि मला या फोनवर फोन करु नकोस. मी तुला नंतर दुसर्या नंबरने फोन करेन
एक शंका : रा ने चॅनेलला तर
एक शंका : रा ने चॅनेलला तर बातमी दिली, आता तिला मिठ्बावकर कडुन पैसे कशासाठि घ्यायचे आहेत? चॅनेलला तर आता पैसे परत द्यावे नाही लागणार, मग ती का रिस्क घेतेय?
ह्या सिरीयलमध्ये सगळेच जण
ह्या सिरीयलमध्ये सगळेच जण चांगली अॅक्टींग करतात त्यामुळे बघायला मजा येते. >> खरये. बातमी देउन झाल्यावरचे तीचे एक्प्रेश्न्स ग्रेट.
रा ने चॅनेलला तर बातमी दिली,
रा ने चॅनेलला तर बातमी दिली, आता तिला मिठ्बावकर कडुन पैसे कशासाठि घ्यायचे आहेत? चॅनेलला तर आता पैसे परत द्यावे नाही लागणार, मग ती का रिस्क घेतेय? >>> ती आधी चंदुदादांना सांगत असते की या पैशाचा उपयोग तीला माहित्या मिळवण्यासाठी तसेच दुसरी जागा घेण्यासाठी करता येइल.
एक शंका : रा ने चॅनेलला तर
एक शंका : रा ने चॅनेलला तर बातमी दिली, आता तिला मिठ्बावकर कडुन पैसे कशासाठि घ्यायचे आहेत? चॅनेलला तर आता पैसे परत द्यावे नाही लागणार, मग ती का रिस्क घेतेय? >> राजेश मूर्ती चा शोध घ्यायला हवे आहेत पैसे तिला.
वंदना गुप्तेनी कमाल केली त्या कालच्या सीन मधे.
वंदना गुप्तेनी कमाल केली त्या
वंदना गुप्तेनी कमाल केली त्या कालच्या सीन मधे. >>> अगदी अगदी.
आता मला अजून एक वाटतंय की कि क मेन असेल किंवा त्याच्याबाबतीत असं काहीतरी घडलंय त्याच्या बालपणी की त्याला त्यामुळे अशा लोकांचा बदला घ्यायचाय.
ही सिरीयल फक्त तीन महिने आहे, मुक्ताने सुरु होण्याआधीच्या मुलाखतीत सांगितलं आहे म्हणजे अजून दोन महिने असेल.
आता मला अजून एक वाटतंय की कि
आता मला अजून एक वाटतंय की कि क मेन असेल मला तर सुरवातीपासून त्याच्यावर संश्य आहे.म्हणजे पहिल्यांदा त्याला दाखवलयं तेव्हापासुन.
वंदना गुप्तेनी कमाल केली त्या कालच्या सीन मधे...खरचं. खूपच छान अभिनय..!
चंदूदादांना ती थेट फोन करत
चंदूदादांना ती थेट फोन करत नाही, निरोप ठेवते. सुरवातीलाच त्यांनी फोन करू नको सांगितले. तिला अनुराधाचे रेकॉर्डिंग मिळाल्याचे ते निरोप्याकडे सांगते, थेट फोन नाही करत.
आता मला अजून एक वाटतंय की कि
आता मला अजून एक वाटतंय की कि क मेन असेल मला तर सुरवातीपासून त्याच्यावर संश्य आहे.म्हणजे पहिल्यांदा त्याला दाखवलयं तेव्हापासुन. >>> हो तो इथे ब-याच जणांनी व्यक्तही केलाय त्याच्या एंट्री आधीपासून पण मला कदाचित मी दुसरा मुद्दा लिहीलाय तसंही असू शकेल असं वाटतंय. मिन्स मला त्याच्या स्वतःवर लहानपणी कोणी अत्याचार केलाय की काय आणि त्यामुळे चीड आहे त्याला अशा लोकांबद्दल मिन्स सातव सारख्या.
राजेश मूर्ती कदाचित चंदू
राजेश मूर्ती कदाचित चंदू दादांच्या गॅंगमधला डावा हात असेल
ही सिरीयल फक्त तीन महिने आहे, मुक्ताने सुरु होण्याआधीच्या मुलाखतीत सांगितलं आहे म्हणजे अजून दोन महिने असेल.>> झाला दीड महिना अग . अशाच छोट्या छोट्या मालिका काढाव्यात . म्हणजे बऱ्याच मालिकांना चान्स मिळेल
हो सुजा. बरोबर.. थोडक्यात गोड
हो सुजा. बरोबर.. थोडक्यात गोड. आता लवकर रहस्य भेद करावा असं वाटतं.!
माझा अंदाज - संदिप पाठक>>
माझा अंदाज - संदिप पाठक>> नसावा. कारण त्याने चंदुदादाच्या घरी जाऊन बाबूच्या बायकोला मारलं
Submitted by प्राचीस on 26 September, 2017 - 11:36
पैशासाठी काही पण.
चंदुदादा कधी बोलले हे वाक्य!
चंदुदादा कधी बोलले हे वाक्य! मला पण वाटतेय ऑनलाईन भाग काटछाट करून दाखवतात का काय?
चंदुदादा कधी बोलले हे वाक्य!
चंदुदादा कधी बोलले हे वाक्य! मला पण वाटतेय ऑनलाईन भाग काटछाट करून दाखवतात का काय? >>> +१. मलाही आठवत नाहीये हे वाक्य. 'उद्याच्या भागात' मधे दाखवलं का हे?
वेगळा आहे डावा. इथे काही
वेगळा आहे डावा. इथे काही जणांनी बघितलं नाही म्हणून नाव लिहित नाही. उद्या एन्ट्री आहे त्याची. न्यू एन्ट्री.
ऊद्याच्या भागात मु.ब
ऊद्याच्या भागात मु.ब.ज्याच्याशी बोलताना दाखवली तो नाही का संदीप डावा?
आता सातवची बायको मिठबावकरला फोन करणार..तो जर 'हो आपण,काल परवाच बोललो' असं काही म्हणाला की संपलं..धुरतचा संशय वाढणार..रा आधीच बोलुन बसलीये त्याच्याशी सातवची बायको म्हणुन..आता रा व सातवची टक्कर..
मला प्रोमो दिसत नाही सांग
मला प्रोमो दिसत नाही सांग ना अंजू
सातवचा फोन सुरु झाला तेव्हा
सातवचा फोन सुरु झाला तेव्हा धुरत 'त्या फोनवरून कोणाला फोन केला गेला' हे कसे पहात नाही?
Pages