Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<एका अट्टल दारुड्याला
<<एका अट्टल दारुड्याला आपल्यासारखे इतर दारुबाज लोक भेटल्यावर होतो तसला आनंद मला इथले रुद्रमप्रेमी माबोकर बघून होतोय. समव्यसनी >> सेम अगदी. जितकी मालिका बघताना मजा येतेय तितकीच या धाग्यावर वाचताना पण येते आहे. काही जास्तीचे न समजलेले मुद्दे सुद्धा समोर येताहेत.
आशिषने बॅक up नाही घेतलाय, तो
आशिषने बॅक up नाही घेतलाय, तो दुसऱ्या कुणी घेतलाय त्याच रात्री जेव्हा मानसी व आशीषने विवेकाचा कॉम्प्युटर उघडला. विवेकला प्रिंट कधी घेतला ते माहीत नाही पण कोणीतरी बॅकअप घेतला हे कळलंय.
रागिणी पत्ते उघडे करतेय पण हुशारीने, तिने विवेकला मानसीबद्दल नाही सांगितले तर आशिषचे नाव घेतले. तिने पत्ते उघड केले नाहीत तर माहिती तरी कशी मिळणार
OK सुजा, हे माहीत नव्हते.
OK सुजा, हे माहीत नव्हते.
तो पोनिवाला राजेश मूर्ती असावा. तो प्रत्येक वेळी आहे. आशिष लिस्ट मागायला येतो तेव्हा व नंतर राव सरांबरोबर येतो तेव्हाही.
आग लावायला त्याची मदत घेयली असणार व नंतर उडवले असणार.
धुरत काल खबऱ्याला शुद्ध
धुरत काल खबऱ्याला शुद्ध भाषेवरून बोलतो, त्याला संशय आला असेल तर बरं, नाहीतर मुलींना धोका आहे.
नवरा पण म्हणत होता काल कि किलरला पोलिसांची गाडी कशी इझिली मिळाली. मी म्हणाले काही कठीण नसेल अशा लोकांसाठी.
रागिणी पत्ते उघडे करतेय पण हुशारीने, तिने विवेकला मानसीबद्दल नाही सांगितले तर आशिषचे नाव घेतले. तिने पत्ते उघड केले नाहीत तर माहिती तरी कशी मिळणार >>> मम.
@ साधना, पुढील भागात मध्ये
@ साधना, पुढील भागात मध्ये दाखवल ना..आशिष म्हण्तो आग लावली तर काय..माझ्याकडे लॉपटॉप मध्ये आहे सगळं..
ए ही मलिका कुठ्ल्या वेळेत
ए ही मलिका कुठ्ल्या वेळेत असते? पूर्वी १२ की १२.३० ला असायची. आत्ता युवा लावलं की एकतर फुलपखारु किंवा गर्ल्स हॉस्टेल
ओहह.. विवेकला तो सांगतो ना की
ओहह.. विवेकला तो सांगतो ना की मी फक्त प्रिंट घेतला.
ओझीवर पुढच्या भागाची झलक फक्त काही सेकंद दाखवतात व तीही दुसऱ्या दिवशी.
सराचा रोल आता सुरू झाला म्हणजे.
पण त्याचा लॅपटॉप चोरीला गेला
पण त्याचा लॅपटॉप चोरीला गेला ना ?
अरे लॅपटॉप ज्या रात्री अपघात
अरे लॅपटॉप ज्या रात्री अपघात घडला त्या रात्री चोरीला गेला.
लोक किती गाढव आहेत ते पहा. एकतर दत्तक मुले कुठे गेलीत त्याचा पत्ता नाहीय, प्रकरण सिरीयस आहे हेही माहीत अशे. प्रकरणाची चर्चा करताच डेटा डिलीट, रात्री कॉम्प्युटर जळाला हे दिसतेय. तरी हा गाढव तिथे जाऊन माझ्या लॅपटॉप मध्ये डेटा आहे हे सांगतो. मारेकरी सोडून बाकी थंड डोके नाहीच का कुणाला?
लॅपटॉप चे ते फक्त मानसीला सांगतो बहुतेक.
तो दुसऱ्या कुणाला अर्थत कीर्तिकरांना हे सांगणार म्हणून फोन करतो,त्याच संध्याकाळी तो स्वतः एलिमीनेट होतो व रात्री लॅपटॉप उडतो.
अपघात होत असतानाच सिन बहुतेक 2दा दाखवलाय. त्यात सराची गाडी इकडे सुरू आहे व तो आणि बाजूच्या सीटवरची रागिणी पूर्ण मागे वळून मुलाकडे पाहताहेत. सासरा ओरडतो तोवर ट्रकने चेपले यांना. येडे पणा सगळा.
मग ती लिस्ट किंवा बॅकअप
मग ती लिस्ट किंवा बॅकअप असलेली युएसबी त्या आबामध्ये ठेवली असेल आणि मरता मरता ते रागिणीला सांगितलं असेल.
मग ती लिस्ट किंवा बॅकअप
मग ती लिस्ट किंवा बॅकअप असलेली युएसबी त्या आबामध्ये ठेवली असेल आणि मरता मरता ते रागिणीला सांगितलं असेल. >>> ग्रेट. मोस्टली असंच असेल.
काल किलरला पोलिसांची गाडी
काल किलरला पोलिसांची गाडी कशी इझिली मिळाली. >>> यासाठी आठवा, धुरत जेव्हा त्याच्या बॉसला या केससंबंधी सांगतो, तेव्हा तो धुरतला उडवून लावतो आणि या केसचा पाठपुरावा सोडून इतर केसेसकडे लक्ष वळवायला सांगतो. याचे एकमेव कारण हे असणार की या रॅकेटमधे जो कोण वरिष्ठ आहे त्याचे पोलिसांबरोबर लागेबांधे आहेत. असं असताना पोलिस ड्रेस आणि कार मिळवणे अवघड कसं असेल?
विवेक इतक्या सरळ सरळ खलनायकी
विवेक इतक्या सरळ सरळ खलनायकी आणि खवचट बोलणारा दाखवलाय त्याअर्थी त्याचा ह्या सगळ्याशी संबंध नसावा.
मानसी, विवेक सगळ्यांचेच वागणे संदिग्ध आहे. त्यांचा हात असेल वा नसेल अशा दोन्ही बाजूंकडे पारडं झुकायला वाव ठेवलाय.
विवेकचे खरेतर काहीही चुकलेले
विवेकचे खरेतर काहीही चुकलेले नाहीय. आशिष कॉन्फिडेनशियाल माहिती मागतो, का हवी याचे कारण सांगत नाही. आपण आपल्याकडची ऑफिशियल कॉन्फिडेनशियल माहिती आपल्या सहकार्याला अशी देऊ का? नंतर आशिष सरळ बॉसलाच घेऊन येतो व लिस्टमधली नावे अस्तित्वात नाही अशी शंका घेतो तेव्हा तो आपली लिस्ट आधी तपासतो आणि मग बोलतो. आशिष त्याच्यावर आरोप करतो तेव्हा तो भडकतो. कोणीही तिथे असते तरी असेच वागले असते. उलट मानसी खूप चुकीचे वागतेय. रागिणीला ती मुद्दाम माहिती देतेय, ती ऑफिस जॉईन करायच्या आधीच. तिला अनाथ मुलगी पकडलेल्या मुलीत आहे असे वाटले तर राव साहेबांना आधी सांगणे गरजेचे होते.
बरोबर साधना, हा मानसीचा ट्रॅप
बरोबर साधना, हा मानसीचा ट्रॅप असण्याची शक्यता आहे कारण टीव्हीवरचं रिपोर्टिंग पाहून तिला कळलेय की हिला षडयंत्राचा वास लागलाय.
सुहासच्या बाबांचे हात थरथरत
सुहासच्या बाबांचे हात थरथरत असतात नेहेमी बोलताना... स्पेशली पैसे मागायच्या आधी....
तो कोंबड्यांचा डायलॉग ऐकून अंगावर शहारेच आले. अमिता खोपकर परफेक्ट बाई आहे त्या रोलसाठी. त्या मुलींना कानाखाली खरंच मारल्या असं वाटते.
@अंजली..अगदी अगदी.. मी पण नोट
@अंजली..अगदी अगदी.. मी पण नोट केलयं ते.. हात हलतात सुहासच्या बाबांचे.. त्यांचं अल्कोहोलिक असणं आणि पैसे रागिणी व आई कडून उधार मागणं एवढं हायलाईट का केलयं काही समजत नाही..
मानसीचा कटात काही ना काही
मानसीचा कटात काही ना काही सहभाग असणार हा माझा गेस बहुदा खरा ठरणारसं दिसतं.
मानसीचा कटात काही ना काही
डबल पोस्ट
मला वाटत एक उपकथानक लागत
सुहासच्या बाबान्च अल्कोहोलिक असण मला वाटत एक उपकथानक लागत मुख्य कथा पुढे न्यायला फिलर टाइप, याचा कथानकाशी सबध नसावा काही.
किंवा रागिणी ते पैशासाठी
किंवा रागिणी ते पैशासाठी काहीही करायला तयार होतील म्हणुन कोणत्यातरी कामासाठी उपयोग करून घेईल.
आजचा भाग भारी होता. मानसी
आजचा भाग भारी होता. मानसी यात आहे हे नक्की. गाडीतून उतरताना तिला आपण कुठे उतरतोय हे चटकन लक्षात आले नाही.
त्या मुलींचे वाईट वाटतेय, पण इ. सबनीस बनून त्याने जे केले ते अंगलट येणार.
नव्या पात्राची एन्ट्री झाली एकदाची. होप रागिणी सुखरूप राहील.
आईचा डायलॉग हसवून गेला, अगं तुला फसवलं ते ठीक, मलाही फसवलं म्हणजे बघ. रागिणी कसला कोल्ड लूक देते आईला.
सुहासच्या बाबांचे काम खूप छान आहे. हात कसले थरथरत असतात, अल्कोहॉलिक माणसे अशीच दिसतात व वागतात. देव करो व ते स्वतः अल्कोहॉलिक नसो.
मला नाही वाटत मानसीचा काही
मला नाही वाटत मानसीचा काही सहभाग असेल असं. पण लेखक खूप हुशार आहे . त्यांनी सगळ्यांच्या तोंडी असे संवाद टाकलेत किव्वा मुद्दामून असं काहीतरी वेगळंच वागणं दाखवलाय त्यामुळे प्रेक्षकांना याचा त्याचा संशय येऊ शकतो . आणि संशय आला तरच मालिकेतला प्रेक्षकांचा इंटरेस्ट टिकून राहील. मला का कोण जाणे मानसी खर बोलतेय असं वाटतंय. तिला खरंच काही माहिती नसावं
रागिणी विचारते तेव्हा आग
रागिणी विचारते तेव्हा आग लागल्याचं माहीत नाही म्हणते आणि फ्लॅशबॅक मध्ये बरे झाले ऑफिस जळाले, नवीन ऑफिस मिळाले त्यामुळे हे म्हणते व तेही जळालेल्या विभागासमोर उभे राहून. फ्लॅश ड्राइव्ह व लॅपटॉप बद्दल फक्त तिलाच माहिती आहे. आबा कोण याचा पत्ता मात्र नाहीय तिला.
दिवसा लावा ना ही मालिका :/
दिवसा लावा ना ही मालिका :/
वा. कालचा भाग फारच छान होता.
वा. कालचा भाग फारच छान होता. आशीषला मानसीवरही विश्वास नाही. तो सांगत नाही तिला की फोनवर मूर्तीशी बोलत होता. मूर्ती ह्यात सामील नसावा. उलट त्यालाच माहित आहे की फ्लॅश ड्राईव कुठे आहे..
मानसी चं बोलणं संदिग्ध वाटतं. एकदा म्हणते आग लागली हे माहित नव्हतं, एक महिना आऊट आॅफ होती.. आणि तीच माहिती देते की.. आशिषने आबा आणि लॅपटॉप मध्ये सगळा डेटा ठेवलाय.
मला तर त्या सदासाठी वाईट वाटतयं बिचारा प्रामाणिकपणे काम करतोय तर आता त्याचे एवढे सहकारी मारले गेले याचा ठपका त्याच्या वर येईल. पण मला कळत नाही मुलींच्या सुधारग्रूहात तो स्वतः का जात नाही. तोच तर तपास करत असतो ना या के चा.. आणि फोनवरही त्या अधिकार्याशी बोलत नाही की कोण आलं मुलींना न्यायला..
न्यूज चॅनेलचा मालक माखिजाच सगळ्यात वरचा माणूस असावा.. त्याला रागिणीला परत कामावर घेण्यात एवढा इंटरेस्ट का बरं?
रागिणी परत जॉईन होते बहुतेक न्यूज चैनल मध्ये..
किरण करमरकर सुद्धा व्हिलन, रा
किरण करमरकर सुद्धा व्हिलन, रा च्या बाजूने एकटा सदा च आहे का ? सदा स्वतः का नाही हलवत मुलींना ? त्याचा खबर्या गेल्याची बातमी अजून मिळालेली नाही दिसते.
आबा चा अंदाज खरा ठरला - कोणाचा ते आठवत नाहीये. रा च्या आईला कळून रा दुर्लक्ष करते. अर्थात आता आबा नाहीचे तिच्याकडे.
वरिष्ठांनी नाही सांगितल्याने
वरिष्ठांनी नाही सांगितल्याने सदाचा पोलीस तपास थंडावला होता पण आता एवढे सहकारी मारले गेले म्हटल्यावर तो पुन्हा एकदा जोमाने कामाला लागेल.
ज्याने कुणी पहिल्यांदा गेस केले. आशिष बाबा नाही आबा म्हणत होता त्याला.. __/\__
रागिणी जॉईन झाली की तिच्यावर
रागिणी जॉईन झाली की तिच्यावर अंकुश ठेवता येईल असा विचार असेल.
हो ना, ते पोलीस मारले गेल्याची बातमी कशी नाही पोचली सदा पर्यंत ?
पोहचेल पुढच्या भागात
पोहचेल पुढच्या भागात प्राजक्ता.
बायदवे त्या मारेकर्याचा कॉन्फिडेंस काय जबरदस्त आहे.. खतरनाक प्लॅनिंग.. काय धडाधड माणसं मारतोय
Pages