"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही एकता कपूरची मालिका नाहीय हो लोक, असले काही नाही होणार.

वर ललिताने लिहिल्या प्रमाणे 2 संस्था आहेत, 1 जिथे अनाथ मुले राहतात व 1 समन्वय, जी त्यांच्या इतर कामांसोबत अनाथ मुलांचे दत्तक देऊन पुनर्वसन करण्याचे काम करते. परवा विवेक लागुन्च्या तोंडी याचा उल्लेख आलाय. शोभाताई अनाथ मुलांच्या संस्थेशी संबंधित असाव्यात.

मुली सध्या शासकीय महिला गृहात असणार. तिथे असणारा स्टाफ असाच असायचा.

मानसीला आशिषच्या शेवटच्या प्रोजेक्त बद्दल काही सांगायचंय, होप ती त्या अनुराधा बारच्या मॅनेजर सारखी फुसका बार नाही मारणार. बिचारा धुरत किती आशेने बसतो, काही माहिती मिळेल म्हणून, पोपट करतो तो मॅनेजर त्याचा.

खेळणी घेते त्या बाईचं नाव काय, पण तिथे अति लहान मुलं असतील. त्या विवेकचं नाव आलंय आता. तो अति आगाऊ आहे आणि इन्वॉल्वड आहे. इन्स्पेक्टर धुरत आणि मुक्ता एकत्र आले तर केस छान उलगडेल. मुक्ताचा संशय आला तरी त्यांनी आधी पकडू नये तिला.

पोपट करतो तो मॅनेजर त्याचा.>>> Lol

अरे त्याची एन्ट्री झाल्यावर मी नवऱ्याला म्हणाले, हा काय सांगणार. त्याला एकच डायलॉग दिलाय 'मला काही माहीती नाही'.

शनिवारी रुद्रमची जाम आठवण येत असते मला, शनिवारी पण हवी होती ही सिरीयल.

मीपण मिस करतेय मालिका. गंमत म्हणजे शनिवार रविवार 'रुद्रम' नसतं तरी धागा दोन्ही दिवशी जोरात पळतोय. काही दिवसातच 2000 चा टप्पा ओलांडणार नक्की. Happy

आज ठीक ठाक होता भाग. सुहासचया वडिलांचं अल्कोहॉलिक असणं इतकं का हायलाईट करताहेत अजून कळले नाही. न्युज चॅनेलचा मालक रागिणीला का परत घ्यायला उत्सुक आहे देव जाणे. रागिणी आता इतकी सावरलीय की मानसी अस्वस्थ आहे हे तिच्या लक्षातही येत नाही. बघू मानसी काय म्हणतेय ती.

न्युज चॅनेलचा मालक रागिणीला का परत घ्यायला उत्सुक >>> तो म्हणाला ना कुठल्याश्या साहेबांच्या सांगण्यावरून परत बोलावतोय तिला. कदाचित त्या मुली प्रकरणात गुंतलेल्या कोणाचातरी हात असेल त्यात.

सुहासचया वडिलांचं अल्कोहॉलिक असणं इतकं का हायलाईट करताहेत अजून कळले नाही >>> हो, हा मात्र मलाही पडलेला प्रश्न आहे.

@साधना
सांगू नका लगेच. बाकी लोकांना बघायची आहे अजून.

हो.

तुम्ही लोक मालिकांना फार नावे ठेवता असे म्हणणार्‍या लोकांनी इथे येऊन वाचायची गरज आहे.

मस्त चालु आहे. २ दिवस चैन पडत नाही. झी चे खरच अभिनंदन. अशा मालिका लोकांना आवडतात हे कळुन तरी काहीतरी धडा घ्यावा व चक्रम मालिका बंद करुन दर्जा सुधारावा. आपल्याकडे चांगले कलाकार खुप आहेत.

हो, तो शोभा अशी हाक मारत होता. वाटलं की शोभा दाखवणार पण संपवला एपिसोड.
तो संपादक "दिग्या काका" मोडमधून बाहेर येत नाही मात्र. Happy

दिग्याकाकाने काम छान केलं पण फक्त बोलताना थातुरमातुर शब्द अगदीच चुकला, थूतरमातर म्हणाला. फार कसंतरी झालं ऐकताना.

त्या माणसाचे अजून कसले कसले धंदे आहेत देव जाणे. त्या पार्लरच्या आत तो शोभाला शोधत होता. तो तोच आहे ना ज्याने कीर्तिकरांची ओर्डर निघाल्याचे सातवला सांगितलेले?
मला आधी वाटले कॉफीशॉपमध्ये रागिणीच्या मागेच लागलाय तो. पर्वा रागिणी व आई समारंभावरून आल्यानंतर रागिणी घरात एकेक अंधाऱ्या खोलीत लाईट लावत फिरते तेव्हा वाटायला लागले कोणी अंधारात तिची वाट तर पाहत बसले नाहीय ना..

गेल्या बुधवार पासून ते काल दुपार पर्यंत मी या मालिकेचे सगळे भाग ozee वर पाहिले. एकदम भन्नाट मालिका आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा छान ऊभी केली आहे, प्रत्येक कलाकार योग्य निवडला आहे असं वाटतं. एखाद्या मालिकेवर इतकी मेहनत कित्येक वर्षात घेतली नसावी बहुतेक. फक्त मला सुहास आणि त्याच्या वडिलांच्या भुमिकेचं प्रयोजन कळलं नाही, पण पुढे काहीतरी उलघडा होईल हे नक्की. इतका विश्वास या मालिकेने दिला आहे.

सगळे भाग पाहून झाल्यावर इथले प्रतिसाद वाचले. स रा बाबा नाही तर आबा म्हणत आहे हे ओळखणार्याला _/\_.

पण कालचा भाग पाहताना मजा नाही आली. बहुतेक टिव्हीवर ओझीप्रमाणे सलग पहाण्याची मजा नाही, ब्रेक मुळे लिंक तुटते असं वाटलं.

कालच्या भागाबद्दल काही लिहीत नाही अजून.. पण सुहास आणि त्याच्या बाबांचा काहीतरी संबंध असावा नक्की..
काल तो माणूस पार्लर मध्ये येतो तेव्हा क्षणभर असे वाटले की तो रागिणी च्या मागेच येतो की काय कॉफी हाऊस मध्ये..
सलग भाग बघायला मजा येते ओझी वर टीवी पेक्षा..

@कापो..संपूर्ण पोस्ट शी सहमत..

बघितला ओझी वर कालचा एपिसोड
माझ्या मते सुहास त्याच्या वडिलांचा अल्कोहोलिक असण्याचा प्रॉब्लेम ते जे काही या मालिकेत हायलाईट करताहेत ते कदाचित अल्कोहोलिक लोक कशी क्रिमिनल वागू शकतात ( चोऱ्यामाऱ्या / फसवणूक/ पैशाची लुबाडणूक आणि बऱ्याच गुन्ह्यामध्ये दारू करता पैसे देऊन हे मोठे गुन्हेगार पण त्यांचा वापर करून घेऊ शकतात ) असं त्यांना मालिकेच्या निमित्ताने काही तरी सांगायचं असेल . अल्कोहोलिक असण्याचा धोक्याचा सिग्नल . कदाचित सुहास च्या वडिलांचा दारू पिण्याचा वीक पाईंट लक्षात घेऊन त्यांना पैशांची लालूच दाखवून अनुराधा चा बार मालक अभय सातव याने पण त्यांना गुन्हे करायला प्रवूत्त केलं असेल. काय माहित

तेव्हा या मालिकेच्या निमित्ताने सुहास च्या वडिलांचं पात्र दाखवून अति दारू पिणं किंवा दारूच्या आहारी जाणं ( सुहास च्या वडिलांप्रमाणे ) किती डेंजरस आहे हे त्यांना दाखवायचं असेल कारण आजकाल मराठी सिनेमात तर जाऊच दे पण मालिकांमध्ये पण असं एक दारू पिणार पात्र घालायला लागलेत ( नकटीच्या लग्नाला ) आणि त्याच थोड्या फार प्रमाणात उदात्तीकरण केलं जातंय किव्वा त्या पात्राचा विनोदासाठी वापर केला जातोय आणि दारू पिणं म्हणजे काही विशेष नाही असं भासवलं जातंय

मला काही प्रॉब्लेम नाही सिनेमात तो हिरो तर सतत दारू प्यायलेला दाखवत आहेतच पण त्याच्या बरोबरीने सिनेमाची हिरोईन पण दारू पीत बसते असं दाखवलाय. मुलं लहान पणापासून बघताहेत आई वडील दोघेही दारू पिताना . हे आजकाल सर्रास दाखवताहेत . " ती सध्या काय करते " या सिनेमात पण गच्चीवर जाऊन त्या कॉलेजमधल्या मित्रांना हिरोईन वडिलांच्या दारूच्या बाटल्या चोरून पुरवते आहेच आणि त्याचा विनोद निर्मितीसाठी वापर करत आहेत Happy

काहीतरी असणार सुहास आहे त्याचे वडील सारखे दाखवतात म्हणजे.

मलाही तो माणूस मुक्ताच्या मागे कॅफेत आला असचं वाटलं. आज शोभाताई कोण हा उलगडा होईल तर. शीर्षक गीतात दाखवलेली सगळी माणसं येऊन गेली किरण करमरकर वगळता. म्हणजे शोभाताई दाखवलेल्या पात्रांपैकीच असणार तर. वं गु नसू देत.

अमिता खोपकर दाखवली ना काल पुढील भागात किंवा जाहीरातीमध्ये शोभा म्हणून. राची भूमिका अगदीच वेगळी होती राजवाडे आणि मानसीच्या नात्याबद्दल. मानसीला सुखद धक्का बसला आणि ती कंम्फरर्टेबल झाली. रागिणी वेगळी आहे आणि मालिकाही नाहीतर मालिकेचं नाव, माझ्या गेलेल्या नव-याची बायको असं ठेवावंं लागलं असतं.

अमिता खोपकर दाखवली ना काल पुढील भागात किंवा जाहीरातीमध्ये शोभा म्हणून. >>> हो का. मला नाही दिसली.

सुहासच्या बाबांबद्दल सुजाने point मांडलाय तो पटतोय मला. मुलगा पैसे देत नाही म्हणून दारूच्या पैशासाठी कदाचित काहीही करत असावेत.

कालचा एपिसोड एकदम कुल वाटला मला, मुक्ता केवढी कुल मस्त सर्वांसमोर.

Pages