"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओझीवर तरी नाही दिसली.

अजून एक स्त्री आहे ना? डॉक्टर आगाशे दिसतात त्या आधी? ती सातवची बायको आहे का? ती दाखवतात त्या
बॅकग्राउंडला सातवची बायको व तिचा भाऊ यांचा हॉस्पिटलातला सिन आहे, जो आधी तिचा गळा कोणी दाबतोय असा सिन आहे असे वाटायचे.

सुहासच्या वडिलांचं अल्कोहॉलिक असणं इतकं का हायलाईट करताहेत अजून कळले नाही.
>>> काल वंदना गुप्ते सुहासला सांगते 'तू काळजी करू नकोस, मी अज्जिबात त्यांना पैसे देणार नाही' तेव्हाचं पार्श्वसंगीत एकदम वेगळं वाजवलं. कुणी नोट केलं का? त्यावरून क्लायमॅक्सला या पैसे न देण्याचं काही ना काहीतरी कनेक्शन असणार असं वाटलं!

सुहास येतो तेव्हा पासूनच वेगळेपण जाणवते.

एनी वेज, आजचा भाग खूप भारी आणि माहितीपूर्ण झाला. रागिणी बरीच सुधारलीय, सो, ती आता मॅनीयकपणा न करता शांत डोक्याने काम करेल असे वाटतेय.

राव सर नक्की कुठल्या बाजूला त्याचा अंदाज येत नाहीये.

ते विवेकला सामील आहेत असे वाटते. नाहीतर एवढी गंभीर घटना त्यांनी उडवून लावली नसती. ज्या परिस्थित त्या मुलींना ठेवलय ते भयंकर आहे. विवेकनेच कळवलं असेल वरती की आशिषला कळलय म्हणून.

कालचा भाग छानच होता. किरण आणि शोभा ह्यांच्या मधला सीन आणि संवाद..अजून दुकानं चालू आहेत, कोंबड्यांची फॅक्टरी.. हे सगळं फारच भयानक आहे..
राव सर आणि विवेक हे मिळालेले आहेत हे उघड आहे.
मानसीने सांगूनही की रावसर हुशार आहेत तरी रागिणी पहिल्याच भेटीत त्यांना बरच सांगून बसते.

रागिणीने काही पत्ते ओपन केले असे मला वाटले नाही, काल नीट पहिला नाही मी भाग. राव सर कुठल्या बाजूने आहेत ते कळत नाही यासाठी बोलले की ते तेव्हा आशीषला उडवून लावतात. पण आता रागिणी समोर आल्यावर तिला कितपत माहिती आहे, कुठून मिळालीय याचा अंदाज न घेता जी घटना मानसीला माहीत नाही, ती रागिणीला सांगून मोकळी होतात. या घटनेवरून विवेकला सगळे माहीत आहे व माहिती डिलीट करन तो गुन्हेगारांना मदत करतोय हे सिद्ध होते. रावसरानी ते रागिणीला सांगितले नसते तर विवेक यात आहे हा तिचा केवळ गेस राहिला असता. करण मानसीसमोर त्याचे व आशिषचे जे वाजते त्यात तो परवानगीशिवाय देणार नाही असे म्हणतो. म्हणजे परवानगी असती तर दिले असते असा तो बचाव करु शकतो. आशीषला परवानगी आणायची नव्हती म्हणून मानसी कॉम्पुटर उघडायला पासवर्ड देते.

पकडलेल्या मुलींमध्ये अनाथालयातली 1 मुलगी आहे हे मानसी कुठल्या आधारे बोलते? एकतर तिची संस्था अनाथालय चालवत नाही व त्याशी संबंधित कामे विवेक पाहतो. तिचा संबंधच येत नाही कुठेही.

शोभा व किरण संवाद खरेच भयावह आहेत. आणि हे प्रत्यक्ष घडतेय आज.

राव अर्थातचं गुन्हेगारांच्या बाजूने आहेत. त्यांनी इतक्या लगेचं विषय संपवला त्यावरून तरी.

पकडलेल्या मुलींमध्ये अनाथालयातली 1 मुलगी आहे हे मानसी कुठल्या आधारे बोलते? >>> माझाही गोंधळ झाला. राव जी NGO "समन्वय चेतना" चालवतात ते अनाथालय नाही ना ? कदाचित मानसीने एखाद्या मुलीला पाहीलं असेल दत्तक देण्याच्या प्रोसिजरच्या कामात मदत वगैरे करताना.

मानसीने पाहिले असेल असे वाटत नाही. मुळात जे काम विवेक करतोय त्यात आपली ढवळाढवळ नको असे तिला वाटते, त्याचे काम दाखवून त्याला का मोठे करायचे हा प्रश्न ती आशीषला विचारते. आणि दत्तक देऊन काही वर्षे लोटलीत अशा मुलांवर फिचर बनवले जात होते. अशा वेळी अमुक मुलगी तेव्हा दत्तक दिलेली पण आता ती सापडत नाहीये पण टीव्हीवर दिसली हे एवढे तेव्हा शक्य आहे जेव्हा तिला दत्तक देताना मानसीही त्या कामात लक्ष घालत होती.

राव गुन्हेगारांच्या बाजूने असते तर त्यांनी रागिणीला ती घटना सांगायला नको होती.

मला ते थोडेसे रागिणीच्या आईसारखे आजाराने ग्रस्त वाटले. आधी त्यांना आठवत नव्हते चटकन कोणता प्रोजेक्त ते, आणि नंतर सहज सांगून मोकळे झाले. खरेतर ती घटना सांगायची गरज नव्हती.

मानसीला अनाथाश्रमातील मुलगी माहित असण्यात काय गैर आहे. अनाथाश्रमातल्या मुलांचे अपडेट घेतच होती की ती. रागिणी छायाच्या मुलाला अनाथाश्रमात भरती करायला जाते. तेव्हा ती मुलांच्या अपडेटच्या कामासाठीच आलेली असते विवेकसोबत. त्यामुळे ती एखाद्या मुलीला ओळखू शकतेच की.

आशिष विवेककडे लिस्ट मागत असतो तेव्हा एक पोनी बांधलेला माणूस त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकताना दाखवलाय. अगदी आशिषला ब्लर करुन तो हायलाईट केलेला होता. नंतर विवेक, आशिष आणि राव सरांच बोलणं चालू असतं तेव्हा आशिषने त्याच्याकडे बघताच तो खूप घाबरलेला वाटतो.

मानसीला अनाथाश्रमातील मुलगी माहित असण्यात काय गैर आहे. अनाथाश्रमातल्या मुलांचे अपडेट घेतच होती की ती. रागिणी छायाच्या मुलाला अनाथाश्रमात भरती करायला जाते. तेव्हा ती मुलांच्या अपडेटच्या कामासाठीच आलेली असते विवेकसोबत. त्यामुळे ती एखाद्या मुलीला ओळखू शकतेच की.>>>>>>>>

बरोबर की... फ्लॅशबॅक मध्ये ती अनाथालय नको म्हणते त्यामुळे ती त्याच्याशी संबंधित नाहीय असे मला वाटले.

आजचा भाग बरा होता.

मला विवेक नाही तर मानसीचा जास्त संशय येतोय. आणि कालच्या एपिसोड मधल्या राजेश मूर्तीचाही. बाकीच्यांना बघूदे मग उद्या बोलू.

रागीणि, पटकन सगळे सिक्रेट का सान्गत सुटते? इन्स्पेक्टर ला अभय सातव मरतो तेव्हा घटना स्थळि आलेली रिपोर्टर आणि बातम्या देणारी एकच हे आठवत नाही का? तो रागिणि ची चौकशी वरवरच करतोय बघायला गेल तर तिने सातव च्या घरात येवुन झाडाझडती केली होति

आता मी एका लग्नाची दुसरी गोष्ट चा एक एपिसोड बघितला दिग्दर्शक विनोद लव्हेकर आणि निर्माता निखिल शेठ होते . रुद्रम चे जे तीन निर्माते आहेत ते हे दोघे आणि तिसरा सोनाली कुलकर्णीचा भाऊ संदेश कुलकर्णी जो एक लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये काम करत होता . मग बरोबर. त्यांचे आवडते कलाकार किंवा ज्यांच्या बरोबर त्यांनी काम केलाय तीच लोक घेतात हि लोक Happy

लग्नाची गोष्ट पण झी चे निर्माण होते त्यामुळे निर्माते तेच असणार. ती मालिकाही सुंदर होती. अधून मधून जरा ढेपळायची तरी. मुख्य दिग्दर्शक स रा होता, त्यामुळे काळजी वाटायची, शेवटाला माती तर खाणार नाही ना.. स रा ची ती खासियत आहे.

असो, इथे स रा फक्त कलाकाराच्या भूमीकेत आहे.

सदाला तो ज्या दिशेने तपास करतोस ते चुकीचे आहे, पोलिसांकडे अजून भरपूर कामे पडलीत, ती पाहा म्हणून तंबी मिळाली. त्या ओर्डरप्रमाणे तो काल टाइमपासाचे काम करत होता इतर पोलिसांसोबत.

मानसी आणि राव सर ज्या सहजतेनं सगळी माहिती देताहेत त्यावरून मला हा त्यांचाच ट्रॅप वाटतोय.. म्हणजे रागिणीची दिशाभूल करून विवेकचा संबंध आहे या सगळ्यात असं चित्र उभं करत असावेत

लग्नाची गोष्ट पण झी चे निर्माण होते त्यामुळे निर्माते तेच असणार >> असं नसत झी निर्माते हे कार्यकारी निर्माते असतात आणि प्रत्यक्ष फिनान्स पुरवणारे निर्माते वेगळेच असतात . पण आजकाल झी मधले दिग्दर्शक / निर्माते प्रत्यक्ष फायनान्स पुरवणारे निर्माते झाले आहेत . कारण त्यांच्या हाताशी भरपूर पैसे आले आहेत असं मला म्हणायचं आहे . आता " कच्चा लिंबू" जो सिनेमा आला होता त्याचा निर्माता हा " होणार सून मी या घराची " चा दिग्दर्शक मंदार देवस्थळी आहे Happy

रागिणी पटकन कुणालाही काहीही सांगून मोकळी होते.
मानसी, विवेक, रावसर, मूर्ती या सगळ्यांवर संशयाला वाव आहे.. बॅक अप आशिष कडे होता?
त्या मारेकर्याची स्टाईल भारी आहे पण.. काय खतरनाक प्लॅनिंग करतो तो.. मलाही प्लॅन समजला नाहीच अजून की.. तो सदाला पहिलेच अलर्ट का करतो... अशी कुणालाही पोलिसांची गाडी सहज मिळते का पण?

आशिष विवेककडे लिस्ट मागत असतो तेव्हा एक पोनी बांधलेला माणूस त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकताना दाखवलाय. अगदी आशिषला ब्लर करुन तो हायलाईट केलेला होता. नंतर विवेक, आशिष आणि राव सरांच बोलणं चालू असतं तेव्हा आशिषने त्याच्याकडे बघताच तो खूप घाबरलेला वाटतो. >>>>> आत्ता वाचल्यावर आठवलं खरं. मानसी मुद्दाम माहीती देत्ये का रागिणी ला ?

सुहास वडीलांना कारण विचारतो दारू पिण्यामागचं त्यात काही सिक्रेट असेल का ?

सदा दिसला नाही २-३ एपिसोड, मजा नाही येते Happy

Pages