Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेच्या खूप जणांचं लिहून
अरेच्या खूप जणांचं लिहून झालाय तरी मी लिहितेच
सातवचा मेहुणा जेव्हा त्याच्या वरिष्ठांशी केस संबंधी डिस्कशन करतो तेव्हा वरिष्ठ त्याला केस पासून मागे खेचायचा प्रयत्न करतो आहे त्यावरून त्याचा जो वरिष्ठ आहे तोच या रॅकेट मध्ये सामील असण्याची खूप शक्यता आहे असं वाटत त्यातून बाबूचा तुरुंगात खर तर खून झाला होता आणि ती आत्महत्या आहे असं जे काही भासवण्याचा प्रयत्न झाला त्यावरून तरी नक्कीच तो मोठा पोलीस अधिकारीच या केस मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असं वाटतय आणि त्याच्या जोडीला आश्रमाचा प्रमुख अर्थात विवेक लागू ज्याची आज एंट्री झाली . आश्रमाच्या प्रमुखाची परवानगी असल्याशिवाय किव्वा त्याचा काही तरी सहभाग असल्याशिवाय मुलांचं शोषण कस काय होईल ? इन्स्पेक्टर सदा खिडकीतून कोणाकडे बघत होता ? तो कोण ?
समन्वय चे दोन एम्प्लॉयी जे दाखवलेत मानसी आणि विवेक .मानसी म्हणजे सई रानडे आणि विवेक जो आहे तो जय मल्हार मध्ये "नारायण" "नारायण होता . त्याच तोंड बोलताना वाकड होत
ओह म्हणून नारद असा उल्लेख
ओह म्हणून नारद असा उल्लेख होता का, मला वाटलं कळी लावणारा नारद आणि तो मालिकेत उगाच उचकावतोय रागिणी ला अशा अर्थाने लिहिलयं
जे प्रकरण दाबताहेत ते सगळेच
जे प्रकरण दाबताहेत ते सगळेच यात असतील असे नाही. एखादा सत्ताधारी असू शकतो जो पोलिसांवर त्याची पॉवर वापरून दबाव घालू शकतो. त्यासाठी पोलिसांना त्याच्या काळ्या कृत्यात सहभागी व्हायची गरज नसते. जस्ट त्यांच्या वरिष्ठांकडून आदेश येतो की प्रकरण बंद करा व त्यांना झक मारत ते बंद करावे लागते. आता सदालाही तेच सांगितले गेलेय. तो पुढे जे करेल ते त्याच्या पर्सनल कॅअसिटीत. पोलीस म्हणून तो काही करू शकत नाही.
त्याच्या पर्सनल तपासात जे बाहेर येईल ते भयंकर मोठे असेल तर मात्र कोणाचाही कंट्रोल राहणार नाही. सगळे बुरखे फाटतील तेव्हा. सध्या जे बाहेर आलेय ते दाबणे सोपे झालेय संबंधितांना. ज्या मुली पकडल्या गेल्या त्यांना काहीही बोलायला भाग पाडून प्रकरण मिटवतील.
आशिषचा मृत्यू का झाला याचा
आशिषचा मृत्यू का झाला याचा उलगडा झाला असे रागिणी म्हणते त्यावर लागू म्हणतात की हो, आता असेच म्हणायचे. बोलल्यावर त्यांच्या लक्षात येते चूक केली ते, पण रागिणी गोंधळते, तुम्ही असे म्हणता म्हणजे मी समजते तसे नाहीय, अजून काही वेगळे आहे का हे विचारते. ते गडबडतात. ओझीवर तरी इतकेच दाखवले. ">>> ह्या प्रसंगात मुक्ताचं एक्सप्रेशन जबरदस्त होतं, असं वाटलं की ती त्यांच्या मनातले विचार वाचू शकते,आणि म्हणून ते गडबडतात.
एक शंका वाटली,की जर विवेक लागू ह्यात involve असतील तर ते मुक्ताला संस्थेत काम कर असं का म्हणत असावे,मे बी तीला आशिष ने काही सांगितलंय का ह्याची खात्री करणार असतील किंवा तिच्या थ्रू अजून कुणावर तरी अंकुश ठेवायचा असेल त्यांना
त्यांना माहितीय पण काही करणे
त्यांना माहितीय पण काही करणे त्यांना शक्य नसेल. ते सामील असतील तर ज्याचा काटा काढला त्याच्या बायकोला ते दूर ठेवतील. संस्थेतून दत्तक म्हणून मुले बाहेर काढून नंतर त्यांचा गैरवापर होत असणार. म्हणजे हे पटत नाही म्हणून संस्था सोडली तर उरलेली मुलेही उध्वस्त होणार. म्हणून ते संस्थेत राहून शक्य तितक्या मुलांना वाचवायचा प्रयत्न करत असावेत. अर्थात त्यांच्या देहबोलीवरून असे वाटते, प्रत्यक्ष काय ते कळेल. कदाचित मेन व्हिलन कधीही आपल्या समोर येणार नाही.
मलाही मालिका तामिळ वाटली. नट
मलाही मालिका तामिळ वाटली. नट उत्तम वापरलेले आहेत. कथा भिडली पाहिजे. अजून तरी कथा ठीक आहे.
त्यांनाही काही विचार करायला,
त्यांनाही काही विचार करायला, दाखवायला ठेवाल की नाही ग बायांनो
खुपच तर्क-वितर्क वाचले म्हणुन म्हण्तेय.
:).
:).
सस्मित..
सस्मित..
त्यांचे तर्क वितर्क झाले असतील करुन. शेवट काय.असणार हे तर अर्थातच ठरलेलं असेल..
त्यांनाही काही विचार करायला,
त्यांनाही काही विचार करायला, दाखवायला ठेवाल की नाही ग बायांनो >>>>> अनुमोदन !
साधना तर फुल टू घुसल्यात मालिकेत.
'वहिनीसाहेब' मध्ये होती सई
'वहिनीसाहेब' मध्ये होती सई रानडे..>>> भार्गवी चिरमुले हि होती त्यात. अतिशय भयन्कर मालिका होती ती विरेन प्रधानची.
मी बऱ्याच वर्षांनी टीव्ही
मी बऱ्याच वर्षांनी टीव्ही वरची मालिका बघतेय. शेवटची पाहिलेली दिया और बाती, तेही संध्या पोलीस व्हायच्या आधीची कथा पाहिलेली. त्यामुळे खूप एक्सईटमेंट आहे. काल पहिल्यांदा ओझीने 10.30 ला अपडेट केला नवा भाग. नैतर रोज 11.30 पर्यंत वाट पाहून झोपायचे आणि सकाळी आधी भाग पाहणे व नंतर बेडमधून बाहेर पडणे
खरेतर मुक्ताचा हल्ली कंटाळा येऊ लागलेला. पण या मालिकेत परत त्या जुन्या मुक्ताला पाहताना खूप बरे वाटतेय.
यात दोन संस्था आहेत एक
यात दोन संस्था आहेत एक अनाथालय जे actual मुलांना सांभाळते, दत्तक देते (जिथे मुक्ताने खेळणी डोनेट केली) आणि दुसरी समन्वय चेतना एनजीओ जी फक्त त्या संस्थेतून दत्तक दिलेल्या मुलांचे verification करते.
ती शोभाताई अनाथालयाची हेड असणारे आणि विवेक लागूंचे तिच्याशी छुपे डील असणार.
शोभाताई आणि ह्या संस्थेचा
शोभाताई आणि ह्या संस्थेचा काहीतरी संबंध असेल.
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे तर्क वितर्क चालूच आहेत. सध्या रूद्रम ने गारूड केलयं..
अरे त्या सईचं आणि आशिषचं
अरे त्या सईचं आणि आशिषचं अफेअर होतं दाखवू नये, मलाही डाऊट येतोय. ही असेल त्याच्यापाठीमागे. तो नसावा बहुतेक.
दिवसेंदिवस मालिका जबरदस्त इंटरेस्टींग होतेय. तो नारद आगाऊपणा करतोय. मुक्ताला एकंदरीत विवेक लागू आणि सदा धुरतमुळे पुढची दिशा दिसेल यात धुरत तिला मदत करेल. वि ला व्हिलन वाटतायेत आत्तातरी.
मस्त चालू आहे खरंच...
मस्त चालू आहे खरंच....सगळयांचे काम इतके सही होतेय. मला त्या सुहास च्या वडिलांचे पण काम आवडले. बोलण्याची स्टाईल वेगळी छान आहे. थोडा विजय चव्हाण चा भास होतो.
सातवचा मेहुणा आणि शिवा भाऊ भाऊ वाटतात दिसण्यात.
एका अट्टल दारुड्याला
एका अट्टल दारुड्याला आपल्यासारखे इतर दारुबाज लोक भेटल्यावर होतो तसला आनंद मला इथले रुद्रमप्रेमी माबोकर बघून होतोय. समव्यसनी
त्यांनाही काही विचार करायला,
त्यांनाही काही विचार करायला, दाखवायला ठेवाल की नाही ग बायांनो >>
त्यांचा विचार झालेला आहे बाई ग . आपण आपले असेच
हो, आपण आपले असेच शेरलॉक
हो, आपण आपले असेच शेरलॉक झालोत.. पण मजा येतेय..
आशिशच्या कामासंबंधी ऐकण्यात
आशिशच्या कामासंबंधी ऐकण्यात रागिणीला कधीच रस नसतो हे आपण पाहिलं आहे. तेव्हा आशिश मानसीशी त्यासंबंधी मोकळेपणाने बोलत असावा. तेव्हा तिचं एकतर्फी अफेअर असण्याची शक्यता मला जास्त वाटते, ती ज्या पद्धतीनी रागिणीकडे बघत असते त्यावरुन.
आणि हो,साधना, मी पण हे शेरलॉकपण एन्जॉय करतीय.
तेव्हा तिचं एकतर्फी अफेअर
तेव्हा तिचं एकतर्फी अफेअर असण्याची शक्यता मला जास्त वाटते, ती ज्या पद्धतीनी रागिणीकडे बघत असते त्यावरुन.>> +1
एक गूढ प्रश्नः ऊसगावामध्ये
एक गूढ प्रश्नः ऊसगावामध्ये कोणत्या लिन्क वर पहायला मिळेल ही मालिका ?
(एक मु.ब तैन्चा पन्खा )
त्या सुहासच्या वडिलांचं आज
त्या सुहासच्या वडिलांचं आज काहीतरी दाखवायला पाहिजे होतं. कुठे गेले ते पैसे घेऊन, सुहास ने वेळेत अडवलं का त्यांना वगैरे.
आज भाग पण भारी.
आजचा भाग ठीकठाक वाटला.
आजचा भाग ठीकठाक वाटला. मुलींना जिथे ठेवले ते शासकीय महिलाश्रम वगैरे काहीतरी वाटतंय... काय वागणूक मिळते अशा जागी.
धुरत व रागिणीची भेट का दाखवली नाही.
आज अजून एक नाव फुटलं. जबरीच!
आज अजून एक नाव फुटलं. जबरीच!
धुरत व रागिणीची भेट का दाखवली नाही >>> ते बहुतेक जनरलच प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी गेले होते आणि ती त्यांना रागिणीच्या आईने दिली. कदाचित नंतर पुन्हा दाखवतील त्यांची भेट.
आजचा भाग ठीकठाक वाटला.
आजचा भाग ठीकठाक वाटला. मुलींना जिथे ठेवले ते शासकीय महिलाश्रम वगैरे काहीतरी वाटतंय. >> त्या महिला श्रमाच्या संचलिकेच्या टेबलवर नेम प्लेट होती पण त्यावरच नाव दिसत नव्हतं,नेमका नावासमोर पाण्याचा ग्लास ठेवलेला,फक्त आडनाव दिसतं होतं, कदाचित तीच शोभा असेल
ती शोभा नाहीये बहुतेक. परवा
ती शोभा नाहीये बहुतेक. परवा दाखवली होती नेमप्लेट. काहीतरी वेगळंच नाव आहे तिचं. सुनंदा वगैरे.
रिपीट बघून झाला आणि लगेच ईकडे
रिपीट बघून झाला आणि लगेच ईकडे आले. मस्त एपि आजचापण. एखादी कथा ईतक्या पटापट पुढे सरकतेय यावर विश्वासच बसत नाही. राची आई समोरच्याला नको तीतकी माहिती देते नेहेमीच विशेषत: तिच्या मानसिक उपचारांबद्दल आणि यासाठी रागिणी तिला आधी ओरडलीही आहे. सदा सारखा आतल्या रूमकडे बघत होता याचा अर्थ त्याला रागिणी घरी नाही यावर विश्वास बसत नसेल किंवा अजून काही. शेवटी अचानक विवेकचा क्लू मिळाला तेपण मस्त दाखवलं. त्या मुलींचे हाल बघून जीव कासावीस होतो. आश्रमशाळांबद्दलच्या अशा बातम्या आताशा वर्तमानपत्रात सतत येत असतात. असाची मुलगी फार निरागस आहे व छान काम करते.
सदा सारखा आतल्या रूमकडे बघत
सदा सारखा आतल्या रूमकडे बघत होता याचा अर्थ त्याला रागिणी घरी नाही यावर विश्वास बसत नसेल किंवा अजून काही.>> माझ्या मते त्याला आतल्या रूम मध्ये पण धांडोळे पणा करायचा होता जसा बाहेरच्या रूम मध्ये करत होता तसाच पण रागिणीची आई मुद्दामून त्याला काही बाही सांगून त्याच लक्ष विचलित करत होती . तिचा उद्धेश त्याने जास्त शोधाशोध करू नये असाच असावा आणि एका अर्थी आत्ता तो बेडरूम मध्ये गेला नाही ते बरच झालं नाहीतर आताच जर का त्याला रागिणीने तिथल्या कपाटात ठेवलेल पिस्तूल /सातव चा फोन आणि विग मिळाला तर मग तो रागिणीच्या पाठी लागेल आणि बाकीची लोक बाजूलाच राहतील . आणि तो आधीचा शोभाताई चा एपिसोड मी बघितला नाही बहुतेक
आता रागिणीच त्या मुलींना
आता रागिणीच त्या मुलींना बोलते करेल की काय? आजच्या भागात वंदना गुप्तेंनी छान काम केले, इन्स्पेक्टरशी बोलताना.
Pages