Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी नाही राम राम करणार
मी नाही राम राम करणार
मला व्यवस्थित वाटतंय
आजची एकूण गुंतागुंत मला आवडली
आजची एकूण गुंतागुंत मला आवडली. अनेक समांतर धागे आता एकत्र कसे आणणार हे बघण्यासारखे असेल.
हो आज काही घडामोडी घडल्यात
हो आज काही घडामोडी घडल्यात स्टोरी पुढे जाण्यासाठी, मुक्ताकडून आणि धुरत कडून. आत्ता नाही लिहीत. बघायचं असेल ना अजून काही जणांचं.
हो गं अन्जू थँक्यू .... आता
हो गं अन्जू थँक्यू .... आता ऑफिसमधून निघून घरी गेल्यावर पहिले काम तेच रुद्रम! :)))
मला तर ती कथाच खरी वाटली नाही
मला तर ती कथाच खरी वाटली नाही > मला आवडली कथा . माखिजा थोडक्यात रागीणीला सांगतो कि मी तुला का मारले नाहि. तीला हे समजते कि नाहि माहित नाहि.
माखिजा थोडक्यात रागिणीला
माखिजा थोडक्यात रागिणीला सांगतो की मी तुला का मारले नाही. >>> पॉईंट आहे! हे त्यातल्या त्यात जवळ जाणारं स्पष्टीकरण वाटतंय मला.
कालचं विवेकचं वागणंही त्याच लायनीवरचं आहे - तो रागिणीला गर्भित इशारा देतो, की तू कोण कुठली, तुला कानामागून येऊन तिखट होऊ देणार नाही!
@राहुल..येस. हा पण पाँईट असू
@राहुल..येस. हा पण पाँईट असू शकतो..
कालचा भाग छानच होता की.. मस्त गुंतागुंत दाखवली.
एक बरं पण सदावर काही आलं नाही. मला वाटलेलं त्याच्यावर प्रकरण शेकतं की काय.. आता तो अन आॅफिशियली तपास करेल.. त्याला केसची फाईलही बघू देत नाही, सीसीटीवी नेमके बंद होतात, वरिष्ठ अधिकारी म्हणतात अॅक्सीडेंट नेहमी होतात.. हे सगळं विचित्र आहे आणि कुणीतरी मोठी गॅँग आहे या सगळ्या मागे एवढं त्याला लक्षात आलयं..
हवालदार जरा जास्तच पैसे नाही मागत?
विवेक चोंबडेपणा करतोय.. रागिणी मस्त बोलते त्याला..
गुंतागुंत आणि सस्पेन्स मस्त टिकवला आहे.
रागिणीला तो मुर्ती भेटायला हवा. तेव्हाच तिला आबा बद्दल समजेल. आणि बर्याच गोष्टींचा उलगडा होईल.
धुरतचे बॉस involved आहेत असा
धुरतचे बॉस involved आहेत असा धुरतला आता संशय आला असेल, त्याच्याकडून काहीतरी जबरदस्त मूव आहे नवीन खबरी पकडून, नवीन खबरी दाखवलाय तो मकरंद सावंत नाव बहुतेक, तो माझे मन तुझे झाले मध्ये चहावाला होता, मोठा रोल होता त्याला तिथे.
रागिणी पैसे मंजूर करून देणार बहुतेक, रक्कम फार जास्त आहे पण खरंच black money पकडला गेला आणि सरकारजमा झाला तर काही रक्कम बहुतेक दहा टक्के वगैरे channel ला मिळेल बातमी दिल्याची. वर्थ आहेत पैसे खबर खरी असेल तर.
एक बरं पण सदावर काही आलं नाही
एक बरं पण सदावर काही आलं नाही. मला वाटलेलं त्याच्यावर प्रकरण शेकतं की काय >> हो. तो हुशार आहे. सर्व कागद आहेत त्याच्याकडे
आत्ता जास्त लिहित नाहि थोड्या वेळाने !
रागिणीची आई नाटक करतेय असं
रागिणीची आई नाटक करतेय असं मला वाटतंय.
आई वर परत संशय येतोय. ती
आई वर परत संशय येतोय. ती विसरल्याचं नाटक करतीये का खरच विसरतीये.
रा विग घालुन कोणाला दर्शन देणारे? प्रोमो मधे दाखवतायत.
हवालदार जरा जास्तच पैसे नाही
हवालदार जरा जास्तच पैसे नाही मागत? >>> हो . फक्त बातमीचे ५ लाख ??
रागिणीची आई नाटक करत असेल तर
रागिणीची आई नाटक करत असेल तर खर तर एवढ्यापुरताच मर्यादित असेल कि ती परत विग आणि पिस्तूल शोधतेय पण रागिणी आल्यानंतर तिला काय शोधतेय ते समजू नये म्हणून ती माझे दागिने शोधतेय असं सांगत असावी आणि काही आठवत नाही असं नाटक करत असावी . तिला कळून चुकलंय रागिणी काही तरी विचीत्र वागतेय .पूर्वी विग ,मोबाईल आणि पिस्तूल मिळालं होतच त्यामुळे तिच्या परीने ती त्या गोष्टी परत शोधायचा प्रयत्न करतेय . त्यात थोडासा विसराळू पणा आहेच पण ती या सगळ्या केस मध्ये इन्व्हॉल्व्ह नसेल नक्कीच
आई वर परत संशय येतोय. ती
आई वर परत संशय येतोय. ती विसरल्याचं नाटक करतीये का खरच विसरतीये. >> आई खतरनाकच. मुद्दाम संशय याव म्हणुन दाखवता आहेत का ?
इन्व्हॉल्व्ह नसेल सुजा पण
इन्व्हॉल्व्ह नसेल सुजा पण अल्झायमर पेशंट पण नाहीये ती.
माखिजा थोडक्यात रागिणीला
माखिजा थोडक्यात रागिणीला सांगतो की मी तुला का मारले नाही. >>> पॉईंट आहे पण तरी बिबट्याने निष्कारण मुलाला मारण्याची तुलना रागिणीने सकारण ह्यांच्या मागावर जाण्याशी करणे हे बघून गंमत वाटलीच.
आजचा भाग अजून पाहिला नाही. जरावेळाने बघेन.
आई खतरनाकच. मुद्दाम संशय याव
आई खतरनाकच. मुद्दाम संशय याव म्हणुन दाखवता आहेत का ? हो मलाही तसच वाटलं.. कारण ती ती विसरल्याचं नाटक करतीये का खरच विसरतीये हा प्रश्न आहेच..
म्हणूनच म्हणते गुंतागुंत आणि सस्पेन्स मस्त टिकवला आहे..!
पण तरी बिबट्याने निष्कारण
पण तरी बिबट्याने निष्कारण मुलाला मारण्याची तुलना रागिणीने सकारण ह्यांच्या मागावर जाण्याशी करणे हे बघून गंमत वाटलीच. >>> हो मला ही तुलना काही पटली नाही.
रागिणीला परत बोलावलं ह्याचं समर्थन करतानाची गोष्ट मला अजूनही पटत नाहीये पण ज्याअर्थी ती सांगितली त्यात मतितार्थ असणारच, ह्यातल्या प्रत्येक डायलॉग ला महत्व आहे पण अजूनही मी रिलेट करू शकले नाहीये ती गोष्ट.
मला कालचे काहीच पटले नाही.
मला कालचे काहीच पटले नाही. सदाचा बॉस अकॅसिडेंट झाला हा निष्कर्ष काढायची खूपच घाई करतो, पोस्ट मार्टेम मध्ये पोलीस गोळ्या लागून मेले हे बाहेर येणार. तो अशाने संशय ओढवून घेणार. किती लोकांना मॅनेज करणार. पोलीस असे मेले तर पोलीस dept गप्प बसत नाही. इथे बॉस ला विचारणारा कुणीच नाही.
दरी आली कुठून हा प्रश्न आहेच, पण जाऊदे. मरेकऱ्याचे परत मत परिवर्तन कसे झाले देव जाणे.
विवेक ती नसताना कॉम्प्युटर बघतो. 2 दिवसात ती काय पर्सनल ठेवणार आहे त्यावर? त्यापेक्षा संशय न येता तो तिच्यावर नजर ठेऊन राहु शकला असता. तिनेही मूर्तीचे नाव घ्यायची गरज नव्हती. तीही तिला किती माहिती आहे हे जाहीर न करता त्याच्यावर नजर ठेवून राहू शकली असती. दोघांनीही एकमेकांशी थेट भिडून आपापली बाजू कमकुवत केली. या आधी उघड दोघेही काही बोलले नव्हते.
पोलिसाने पैसे जरा जास्तच मागितले. मंदारला माहिती आहे हे असे त्याच्या बोलण्यावरून वाटते.
आई अशी का वागली कळत नाही. तिला एकतर जोरदार अटॅक आला असावा, म्हणजे असा येतो का हे माहीत नाही मला, नाहीतर ती विग वगैरे शोधत असावी व पकडली गेल्यावर रागिणी ओरडेल ही भीती.
दुसरा एक मुद्दा आहे. माखिजा
दुसरा एक मुद्दा आहे. माखिजा म्हणतो की त्याच्या भावाला बिबट्याने मारल्यावर त्याला बिबट्याचा फार राग आला, मारायची इच्छा झाली पण त्याला पिंजर्यात पाहिल्यावर मग त्याचे मत बदलले. म्हणुन रागिणीला नोकरी दिली असेल - पिंजर्यात ठेवण्यासाठी.
दरी आली कुठून हा प्रश्न आहेच,
दरी आली कुठून हा प्रश्न आहेच, पण जाऊदे. मरेकऱ्याचे परत मत परिवर्तन कसे झाले देव जाणे. सस्पेन्स.
मंदारला माहिती आहे हे असे त्याच्या बोलण्यावरून वाटते. त्याला ईतकी रक्क्म देऊन माहिती घेण्यात काही ईंटरेस्ट नसेल.
कालच्या भागात टाईम्लाईन कळत
कालच्या भागात टाईम्लाईन कळत नव्हती -
१. मुली दरीत कशा काय पडल्या ? मुंबई मधून त्यांना अज्ञात स्थळी हलवत होते असं का ?
२. ती बाई इन्स्पेक्टर चं नाव का नाही सांगत ? अर्थात उपयोग नाहीचं पण सदाला एवढं तरी कळलं असतं की वेगळा माणूस आला होता.
३. लिहिता लिहिता आठवलं मारेकर्याने मारलेले पोलिसही त्या गाडीत होते म्हणजे ते मारले गेलेत हेही कळणार नाही.
४. सदाला बातमी कळते कधी, तो फाईल बघायला जातो कधी , वेळेचा अंदाजचं येत नव्हता.
५. रा ची आई संशयास्पद वागत्ये का खरचं विसरल्ये सगळं ?
3. मुली मेल्या हे कसे
3. मुली मेल्या हे कसे कन्फर्म झाले, गाडी दरीत कोसळून सुद्धा लोक वाचलेल्या घटना आहेत. गाडी दरीत कोसळली हे मुळात कळले कसे? कळले तेव्हा रेस्क्यू प्रयत्न झाला असणार, निदान बॉडीज बाहेर काढायचा प्रयत्न झाला असणार. त्या काढल्यावर कळणार कोण कसे मेले ते. इथे टीव्ही वर न्यूज येते आणि लगेच बॉस अपघात झाला, आता करा फाईल बंद म्हणतो. बरे मुली इतक्या जवळ आहेत की सदा धावत तिथे पोचू शकतो, पण गाडी मात्र दरीत कोसळते. काहीतरी पटेल असे दाखवावे.
रागिणी पण कुठून कुठे का व कशी फिरते पत्ता लागत नाही. दोन्ही ठिकाणी अर्धा अर्धा दिवस काम करणारे का? विवेक शी बोलून घरी परतते तेव्हा 4 वाजले म्हणून सांगते आईला. तिचे ड्रेस पण तेच ते दाखवलेत. त्यावरून 1 पूर्ण दिवस दाखवला म्हणून अंदाज मारायला गेले तरी वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळे कपडे दिसतात.
मारेकरी इ. सबनीस ही पट्टी लावतो. ती बया ते वाचून त्याला म्हणते काहीतरी. नंतर धुरतला मात्र नाव माहीत नाही म्हणून सांगते.
ती गोष्ट काहीही आहे. तू
ती गोष्ट काहीही आहे. तू आम्हा सगळ्यावर तशी नजर ठेवायला आम्हाला हवियेस हे तो म्हणतो तर मला पत्रकारिता माहीत नाही व त्यात रस सुध्दा नाही हे ती म्हणते. जिला रस नाही ती अशा बातम्या शोधून चॅनेलवर दाखवणारे का? त्याला तिच्यात रस असावा, कारण तिलाच तो टीव्हीवर पाहत होता, हेच एकमेव कारण असावे. बाकी ती पैसे मागायला गेल्यावर त्याची प्रतिक्रिया पाहून कळेल त्याला कशात रस आहे ते.
सगळ्यांना धडाधड मारणारे लोक नेमके हिरो हिरविणीला मोकाट सोडतात आणि त्यापायी आपले बलिदान देतात ही हिंदी चित्रपटाची जुनाट परंपरा इथेही आहेच. बाबूच्या बायकोला मारायचे तसे काही ठोस कारण नव्हते. तिला फारसे काही माहीत नव्हते. तिला उडवले आणि रागिणी अजून फिरतेय.
इथे टीव्ही वर न्यूज येते आणि
इथे टीव्ही वर न्यूज येते आणि लगेच बॉस अपघात झाला, आता करा फाईल बंद म्हणतो >> बॉस फाइल बंद करा नाहि म्हणत - धुरत ला फाइल द्यायला नकार देतो. त्याच्या हद्दित येत नाहि म्हणुन. पोलिस तपास संपलेला नाहि दाखवला पण धुरत ने नसत्या चौकशा बंद कराव्या असे बॉस त्याला सांगतो.
मारेकरी इ. सबनीस ही पट्टी
मारेकरी इ. सबनीस ही पट्टी लावतो. ती बया ते वाचून त्याला म्हणते काहीतरी. नंतर धुरतला मात्र नाव माहीत नाही म्हणून सांगते. >> नावाबद्द्ल काहि बोलणे झालेले मी पाहिले नाहि. धुरत तिला फोटो दाखवतो तेव्हा आलेला पोलिस तो नव्हता असे ती म्हणते (धुरत सर्व पोलिसांचे फोटो दाखवतो)
तू आम्हा सगळ्यावर तशी नजर
तू आम्हा सगळ्यावर तशी नजर ठेवायला आम्हाला हवियेस हे तो म्हणतो तर मला पत्रकारिता माहीत नाही व त्यात रस सुध्दा नाही हे ती म्हणते. जिला रस नाही ती अशा बातम्या शोधून चॅनेलवर दाखवणारे का? त्याला तिच्यात रस असावा, कारण तिलाच तो टीव्हीवर पाहत होता, हेच एकमेव कारण असावे. >>> बरोबर. रागिणी त्याला हेच प्रश्न विचारते. ती त्याला विचारते की मी जोइन करण्यात एवढा रस का तुम्हाला ? तेव्हा तो म्हणतो की हे थोडे complicated आहे. मग ती गोष्ट सांगतो.
बाकी ती पैसे मागायला गेल्यावर त्याची प्रतिक्रिया पाहून कळेल त्याला कशात रस आहे ते. >>> हे कधी झाले ? रागिणी कशाला किका कडे पैसे मागायला जाते ??
अजुन कि.क. कडे नाही गेली.
अजुन कि.क. कडे नाही गेली. संपादका कडे मगितलेत. पण त्याला कि.क ला कळवावच लागेल. रक्क्म मोठी आहे.
पण आधीही त्या दुसर्या
पण आधीही त्या दुसर्या रिपोर्टरला बातमी मिळत होती ती पैसे देऊनचं, असा उल्लेख पण आल्याचं आठवतयं, रा ला आठवत नसेल किंवा ती सोंग आणत होती. मोरेंना कसं कळलं पैसा कुठे लपवला आहे ? आता रा ला कळेल का त्या बिट्कॉइन वाल्याबद्दल ? तिने त्याला फोन केलेला असतो ना सातव च्या फोनमधून नंबर घेऊन.
पुभामध्ये असे काही दाखवतात की
पुभामध्ये असे काही दाखवतात की आपल्याला चैन पडू नये. राचं काय होणार हे समजायला साडेनवाची वाट पहावी लागेल.
Pages