Submitted by दत्तात्रय साळुंके on 9 September, 2017 - 01:34
गोकुळ
दान मोतीयाचं अस रानात सांडलं
भेगाळलं मन चिंब चिंब झालं
गाणं पावसाचं रिमझिम कानात वाजलं
एक झिम्माड सपान डोळ्यात साठलं
चारा मिळता हिरवा, गाय कपिला तुष्टली
राजा, सर्जानेही समाधानी डरकाळी दिली
कुस धर्तीची उजवे , पीक तरारुन आलं
झिम्मा फुगडी खेळत रान वाऱ्यावर डुलं
चांदण लेवून कणसं आभाळी गेली
दौलत कुबेराने रिती मळयावर केली
मोती पवळयाची रास अशी खळयात सांडली
चिंतातुर चेहऱ्यावर हास्य लकेर हिरवी ओली
घर गोकुळ अवघे
यशोदा ताक घुसळीती
लोणी श्रीधर चाखती
नंद कौतुके पाहती
दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर......
सुंदर......
वा फार सुंदर.
वा फार सुंदर.
सुंदर !!
सुंदर !!
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
छान!
छान!
यशोधा ऐवजी यशोदा हवं होतं .
अप्रतिम शब्द खुप आवडले
अप्रतिम शब्द खुप आवडले
अनंतजी खूप खूप धन्यवाद ! Typo
अनंतजी खूप खूप धन्यवाद ! Typo सुधारला आहे .
शशांकजी , मनीमोहोरजी ,
शशांकजी , मनीमोहोरजी , सायुरीजी, अक्षयजी, पंडितजी खूप खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादासाठी !!!
सुंदर रचना...
सुंदर रचना...
मेघाजी खूप धन्यवाद
मेघाजी खूप धन्यवाद प्रतिसादासाठी !
सुंदर!...
सुंदर!...
राहुल खूप खूप धन्यवाद !
राहुल खूप खूप धन्यवाद !
मस्तं! येवू द्या अजून...
मस्तं! येवू द्या अजून...
सत्यजितजी उत्साहवर्धक
सत्यजितजी उत्साहवर्धक प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद !
खूप सुंदर कविता सरजी...
खूप सुंदर कविता सरजी...
शिवाजी खूप खूप आभार !
शिवाजी खूप खूप आभार !