काल आईचा फोन आला. अरे रुनम्या ते रिलायन्स फुकटात फोन वाटतेय. स्वस्तात ऑफर देतेय. ईथे त्यांच्या दुकानात लोकांची झुंबड उडालीय. बिल्डींगमधील पोरांनीही लाईन लावलीय. यांची (म्हणजे माझ्या वडीलांची) एक ओळख निघालीय. रांग न लावता आपले काम होईल. तुला काही घ्यायचेय का?
स्मार्टफोन नावालाच वापरणारया आणि ईंटरनेटचा ई सुद्धा ढुंकून न बघणारया माझ्या आईच्या तोंडची ही वाक्ये. रिलायन्स आणि मोदी सरकार काहीतरी स्वस्तात वाटतेय आणि आपला मुलगा त्या लाभापासून वंचित राहू नये ईतकाच प्रामाणिक हेतू.
मोदी सरकार म्हटले तर अच्छे दिन च हे तिचे मत.
तर त्या ऊलट रिलायन्स प्लस मोदी कॉम्बिनेशन काहीतरी स्वस्तात आणि फुकटात देतेय तर त्यात नक्कीच गडबड घोटाळा हे माझे मत.
दोघांची टोकाची मते पण सत्य काहीतरी वेगळे असणार. ते जाणून घ्यायला, या जिओ चे फायदे तोटे समजून घ्यायला, आणि आता या निमित्ताने जे युद्ध छेडले जाणार आहे त्याची चर्चा करायला हा धागा.
अरे बापरे, फारच मोठा मेसेज
अरे बापरे, फारच मोठा मेसेज आहे..
केवढी मोठी इंग्रजी
केवढी मोठी इंग्रजी पोस्ट!
मराठीत सारांश लिह बरं जरा.
ऋन्म्या तेवढं सगळं वाचलसं तु
ऋन्म्या तेवढं सगळं वाचलसं तु ? ४ ओळीत त्याचा सारांश सांग बघु.
अरे लोकहो मला एवढे ईंग्रजी
अरे लोकहो मला एवढे ईंग्रजी येत असते तर..... आज माझ्या दहा बारा गर्लफ्रेंड असत्या आणि ईथे धागे विणत बसलो नसतो. प्रत्येकीला एक जिओ घेऊन दिले असते..
मला हा मेसेज व्हॉटसपवर आला.. चार ओळी वाचल्या, ईंटरेस्टींग वाचल्या, आणि मोठ्या जागेत वाचायला सोपे जाईल किंवा न समजल्यास कोणी समजावेल म्हणून ईथे कंट्रोल ए सी वी केले.. मग मलाच साक्षात्कार झाला किती मोठा आहे ते.. काही हरकत नाही, पुढच्या आठवड्यात सुट्टी टाकून वाचेन पुर्ण.. तो पर्यंत जिओ पासून सावध राहा..
जरा, टग्या यांनी दिलेली लिंक
जरा, टग्या यांनी दिलेली लिंक उघड बघू.
कृपया मराठीत थोडक्यात सारांश
कृपया मराठीत थोडक्यात सारांश सांगा! इंग्रजांपेक्षा इंग्रजीवर आमचा राग आहे पुलंच्या नारायणा सारखाच!
मानवजी, हा आठवडा मी मोबाईलवर
मानवजी, हा आठवडा मी मोबाईलवर आहे आणि त्यात तांत्रिक अडचणीमुळे मी बरेच लिंक उघडू शकत नाहीये. काय आहे त्यात? मराठीत किंवा सुटसुटीत भाषेत माहीती आहे का? असल्यास प्लीज कॉपीपेस्ट ईकडे
(No subject)
ऋन्मेष तिच टग्यांची लिंक आहे.
ऋन्मेष तिच टग्यांची लिंक आहे. इथे इतके मोठे टाकुन जागा व्यापली नाही तर बरे. हरकत नसेल तर काढुन टाकणे.
सुनिधी मला वाटतं ऋन्मेषची
सुनिधी मला वाटतं ऋन्मेषची वरील पोस्ट ही जस्ट ती लिंक पाहिल्यानंतरची आहे.
संपादली पोस्ट! एवढी मोठी होती
संपादली पोस्ट!
एवढी मोठी होती मला कल्पनाही नव्हती.
टग्या यांनी ती लिंक स्वरुपात टाकल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद ऋन्मेश. अंगठा वर
धन्यवाद ऋन्मेश. अंगठा वर वाले चिन्ह उपलब्ध करुन द्या अॅड्मिन. .... चला स्पर्धेमुळे बीएसेनेल आलय तर ग्राहकांना बरं झालं की. आणि ते खरे आहे असे सुत्रांकडुन समजले. नाहीतर हल्ली वात्सप म्हणजे खोटे असंच वाटते.
बीएसएनल मोबाईल फोन सर्व्हिस
बीएसएनल मोबाईल फोन सर्व्हिस वापरत असाल कोणी तर अनुभव शेअर कराल का?
डाटा स्पीड चांगला मिळतो का, अेरिया कव्हरेज ठीक आहे का (रिमोट ठिकाणी इतरांच्या तुलनेत).
आम्हाला कंपनीच्या टूरवर असणाऱ्या लोकांसाठी, डाटा सर्व्हिस चांगली, आणि एरिया कव्हरेज चांगला असणारा सर्व्हिस प्रोव्हायडर हवाय.
कितीही शिव्या दिल्या तरि
कितीही शिव्या दिल्या तरि बिएसएनएल बेस्टच, असं माझं मत आहे. लपवाछपवि नसते. बाकि रिलायन्सचे शेअर्स डिसेंबर पर्यन्तच वाढतील का? नंतर भुईसपाट ???
बिएसएनएलने पण आॅप्टिकल
बिएसएनएलने पण आॅप्टिकल फायबर्सचं नेटवर्क उभारलंय का?
काय गोंधळ घालायचा तो घाला, पण
काय गोंधळ घालायचा तो घाला, पण दया करा, व्हॉइस फुक्ट करु नका रे!
उलट व्हॉइसचे दर भरपूर वाढवा, लोकांनी दहावेळा विचार केला पाहिजे हा कॉल करु की नको, आणि केला तर थोडक्यात बोलून कॉल कसा आवरता येईल याचा.
उठसुट कोणीही फोन करतं आणि बोलणं आवरता आवरत नाही आजकाल. >>> +११११११११११११११११११११११११
Reliance Jio
Reliance Jio घेताय...????
सावधान .. सावधान .. सावधान
31.12.2016 पर्यंत फुकट वापरून घेऊ...
नंतर Sim फेकून देऊ ...
असाच विचार केला असेल ना ?
काय तुम्ही स्वतःला मुकेश अंबानी पेक्षा हुशार समजता ??
Reliance Jio चे simcard मिळविण्यासाठी सध्या अनेकांची धडपड सुरू आहे.
कारण...
Outgoing एकदम फ्री...
(Incoming चं काय. ??)
त्याबद्दलची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
4G internet 31.12.2016 पर्यंत एकदम फ्री...
(त्यानंतर चे काय. ??)
Rs.50/- ला 1 GB ...
हा हिशोब कसा आहे ?
Rs.5000/- per month- 10 GB
म्हणजे Rs.50/- ला 1 GB..
कळले का ?????
मग भरताय दरमहा 5000/- ?
----------------------------------------------
Reliance Jio च्या फॅार्मवर तुमच्या Handset चा E.M.I.E नंबर विचारून लिहिला जातो.
जो इतर कोणीही विचारत नाही. ( Airtel, BSNL, idea, vodafone इ. इतर कोणतीही कंपनी )
येथेच खरी मेख आहे...
3 महिने त्यांची सेवा वापरून तुम्ही बाहेर पडू शकत नाहीत.
कारण Reliance ने हा ग्राहकाशी केलेला एक करार असणार आहे, जो Reliance ला हा कायदेशीर अधिकार देतो, की ते तुमचा फोन E.M.I.E नंबरच्या आधारे (Handset) LOCK करु शकतात.
अर्थातच तुमचा महागडा 4G supported फोन कायमचा बाद होणार.
Reliance Jio चे simcard दुसर्या slot मध्ये टाकू दिले जात नाही. ( dual Sim फोन असल्यास)
ते मेन (पहिल्या) slot मध्येच टाकायचा आग्रह का धरला जातो ?
जरा विचार करा...
घेणारच असाल Reliance Jio तर घ्या...
परंतु आपल्या ( ग्राहकाच्या ) अटींवर
१) E.M.I.E नंबर अजिबात देणाऱ नाही.
२) Simcard पहिल्या slot मध्ये घालणार नाही.
----------------------------
हे होऊ शकत का ?
आज एक व्हॉट्सॅप मेसेज वाचनात
आज एक व्हॉट्सॅप मेसेज वाचनात आला याच्यावर. तो जसाच्या तसा टाकतोय:
-----------------------------------------------------------------------------
प्रति,
*अखिल भारतीय Jio चे sim card न मिळाल्याने जळणारी संघटना*
1. EMIE नाही तर IMEI म्हणतात.
2. IMEI नसल्यास कोणतेही sim card activate होत नाही. Sim mobile मधे टाकल्यानंतर IMEI आपोआप mobile service provider (Idea, vodafone, BSNL, Airtel) कंपनी कडे register होतो.
(शंका असल्यास Google वर जाऊन GSM Architecture शोधणे व त्यात *HLR* section वाचणे)
3. Jio चे network नवीन असल्याने त्यांना commercial launch करणे आधी network optimization, capacity, failure analysis करणे गरजेचे असले कारणाने सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. (डोक्यावरुन गेल्यास जास्त विचार करू नये)
4. भारतीयांना *फूकट तेच पौष्टिक* ही सवय असल्याने december पर्यंत free data देण्यात येऊन Jio नवीन customer base तयार करत आहे.
5. 80% mobiles चा फक्त 1 slot 4G support करत असल्याने त्यात 4G sim टाकणे गरजेचे आहे.
6. TRAI (Google वर शोधा) नियमांनूसार service provider कोणताही करार customer बरोबर करु शकत नाही.
7. Handset bill (IMEI असलेले) घेऊन पोलिसात complaint register केली तरच handset block करता येतो. (पुन्हा शंका असल्यास Google वर जाऊन GSM Architecture शोधणे व त्यात *AUC* section वाचणे किंवा पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी करणे)
*Handset चे bill धिरूभाईच्या नावावर नसल्याने JIO ला handset block करणे शक्य नाही...!*
--------------------------------------------------------------------------------------
काय पण चाललंय!
अमेरिकेतले फोन इथे
अमेरिकेतले फोन इथे अॅक्टिव्हेट होत नाही ते का? माझ्याकडे हुवेईचे एक एअरटेल हॉटस्पॉट आणि एक एअरटेल राऊटर आहे. त्यात एअरटेलशिवाय इतर कोणतेही सिमकार्ड टाकले तर ते अॅक्टिव्हेट होत नाही. असे का असावे?
सर्विस प्रोवायडरला प्रत्येक
सर्विस प्रोवायडरला प्रत्येक देशात विशिष्ट फ्रेक्वेन्सी बँड ऑपरेशनसाठी अॅलॉट केलेले असतात .१८००मे ह वगैरे. त्यातला एखाद्याचा योगायोगाने मॅच झाल्यास कार्ड चालते अन्यथा त्या देशातलाच्कॉम्पॅटिबल फ्रेक्वेन्सीचा हॅण्ड्सेट वापरावा लागतो.
जिओची सेवा सुरु होऊन आज एक
जिओची सेवा सुरु होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले!!!
माझ्याकडे वा आमच्या घरात
माझ्याकडे वा आमच्या घरात अजूनही कोणाकडे नाही
मी एक घेतलंय सिम. इथे पुण्यात
मी एक घेतलंय सिम. इथे पुण्यात काही ठिकाणी १ ते २ एमबीपीएस स्पीड तर काही ठिकाणी तब्बल २०/ २२!
पण घरामध्ये मात्र २/३ च्या पुढे नाहीच.
व्होडाफोन कन्सिटंट ७/८ एमबीपीएस देतोय. कुठल्याही लोकेशन वर. आणि आता ते महिन्याला भरपूर डेटा + फ्री व्हॉईसपण देतायत सो सध्यातरी व्होडाफोन झिंदाबाद. आणि फोनही एक सिम वाला असल्यानी ते जिओ चं कार्ड पडून आहे.
अजून एक - मी तरी असं पाहिलंय बहुतेक ठिकाणी की जिओ चे नंबर्स ज्यांनी घेतलेय ते बहुतेक सगळे जणं (प्रीपेड यूजर्स सकट) जिओ हे सेकंडरी नं. म्हणूनच वापरात (भलेही डेटा करता तेच प्रायमरी असेल) ठेवतात. तो नंबर प्रायमरी नंबर म्हणून नाही वापरत.
शेवटी नेटवर्क चांगले मिळणे
शेवटी नेटवर्क चांगले मिळणे आणि कॉल व्यवस्थित लागणे हीच मोबाईलची प्राथमिक गरज आहे
फुकट ते पौष्टिक.
फुकट ते पौष्टिक.
वोडाफोन चांगलं नेटवर्क वगैरे देत असेल तर काय उपकार नाहीच करत.
जिओ फुकटात सगळं देतंय तर घोड्याचे दात मोजणे योग्य नाही..
जिओ फुकटात नसेल देत, कमी
जिओ फुकटात नसेल देत, कमी पैश्यात जास्त देत असेल ना? मला आयड्या नाही त्यांच्या प्लानसची कारण मी स्वतः आयड्या वापरतो
फुकट ते पौष्टिक.....
फुकट ते पौष्टिक.....
भारतातील बहुतांश जनता या तत्वावर जगत असली तरी साऱ्यांनाच एकाच तराजूत तोलणे योग्य नाही. अगदी माझ्याच बाबतीत सांगायचे तर ११ वर्षांहून अधिक काळ एकाच कंपनीचा एकच क्रमांक वापरत होतो. इतर कोणत्याही कंपनीने कितीही चांगली ऑफर देऊ केली तरीही त्याकडे ढुंकूनही पाहत नव्हतो. (उलट व्होडाफोनने माझ्या DND registered क्रमांकावर मार्केटिंग करण्यासाठी कॉल केल्यामुळे त्यांना आयुष्यभरासाठी blacklist केले आहे.) असे असतानाही मी गेल्या वर्षी अगदी रांग लावून जिओचे सिम घेतले कारण त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञान!
इतर कंपन्या जरी 4G सेवा पुरवत असल्या तरीही त्यांची 4G सेवा ही केवळ data साठी आहे. त्यांचे कॉल्स मात्र जुन्या-पुराण्या GSM तंत्रज्ञानावरच (2G) चालतात. याउलट जिओचे कॉल्स आणि data दोन्ही 4G तंत्रज्ञानावर आहे. कॉल्ससाठी जिओ VoLTE (Voice over LTE {Long Term Evolution}) तंत्रज्ञानावर चालतात. म्हणूनच जे फोन्स फक्त 4G support करतात पण VoLTE support करत नाहीत, त्यांना JIO 4G Voice नावाचे अॅप इंस्टाॅल करावे लागते. मी तरी जिओच्या सेवेने संतुष्ट आहे!
जिओच्या बाबतीत आणखी एक चांगली गोष्ट पाहावयास मिळाली, ती म्हणजे एखाद्या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी जास्त युजर्स असण्याची शक्यता आहे तिथे जिओ तात्पुरते मोबाईल टॉवर उभारते. (अधिकचा लोड सांभाळण्यासाठी) अशा प्रकारचा तात्पुरता टॉवर मी आझाद मैदान, मुंबई येथे 'मराठा क्रांती (मुक) मोर्चा'च्या वेळेस पाहिला होता. आताही 'अंधेरीचा राजा' या गणपतीच्या मंडपाशेजारी असा तात्पुरता टॉवर उभारलेला आपल्याला पाहावयास मिळेल. (अंधेरीच्या राजाचे विसर्जन ९ सप्टेंबरला आहे) (आता हे टॉवर जिओ स्वतःहून उभारते की संबंधित कार्यक्रमाचे आयोजक तशी मागणी करतात, हे माहित नाही.)
मी तरी असं पाहिलंय बहुतेक ठिकाणी की जिओ चे नंबर्स ज्यांनी घेतलेय ते बहुतेक सगळे जणं (प्रीपेड यूजर्स सकट) जिओ हे सेकंडरी नं. म्हणूनच वापरात (भलेही डेटा करता तेच प्रायमरी असेल) ठेवतात. तो नंबर प्रायमरी नंबर म्हणून नाही वापरत........
हे खरे आहे, कारण जिओला येउन आत्ताच वर्ष झाले, आणि अनेकजण पहिल्यापासून मोबाईल वापरत आहेत. असे असतांना सर्वच ठिकाणी मोबाईल क्रमांक बदलणे थोडे त्रासदायक होऊ शकते. म्हणून असेल कदाचित.
(मी तरी आता माझा गेल्या १२ वर्षांपासून असलेला Reliance चा क्रमांक जिओमध्ये port करून घ्यायचा विचार करतो आहे. कारण गेल्यावर्षी घेतलेला जिओ क्रमांक बंद करून एकच (जुना) क्रमांक ठेवायचा विचार आहे. कारण मी 'One Person, One Mobile Number' या तत्वाचा पुरस्कर्ता आहे!)
जिओने 'अंधेरीचा राजा' या
जिओने 'अंधेरीचा राजा' या गणपतीच्या मंडपाशेजारी उभारलेला तात्पुरता मोबाईल टॉवर
विमु, अगदी खरंय. जिओ लेटेस्ट
विमु, अगदी खरंय. जिओ लेटेस्ट टेक आणि डीप पॉकेट्स घेऊन संपूर्ण तयारी करूनच आलंय बाजारात.
पण अजून पूर्ण स्टेबल नाहीय. सिटी एरिया आणि गावांगावात नेटवर्क आणि नेट स्पीडही चांगला देतायत पण हायवे आणि रेलवेज कव्हर व्हायचेत अजून. रोड ट्रॅवल करतांना शहर सोडलं की जिओ सरळ मान टाकतं (याचा अनुभव घेतलाय). त्यावेळेला बाकी प्रोव्हायडर्स नाही ४जी तर २/३ जीवर तरी जिवंत राहातात. एकदा का जिओ स्टेबलाईज झाले की मग खरा कस असेल...
आणि आय क्नो, ते संपूर्ण फायबर आणि सिमलेस ४जी देतीलच.
फक्त प्री-पेड आणि मुख्यतः पोस्ट-पेड सर्वीसेस च्या बिलिंग मध्ये अॅबसोल्यूट ट्रान्सपरंट राहायला हवंय. नाही तर आर-कॉम सारखं व्हायचं...
जिओ फुकट देण्याचं कारण तेच
जिओ फुकट देण्याचं कारण तेच आहे योकु... एकूण लोड टेस्टींग + लोकांची खरी गरज + मार्केट डायनॅमिक्स हे सर्व पडताळून पाहायला जिओ ला एक वर्ष हवंच होतं. त्यांचे प्लान्स धुमाकूळ घालणारे आहेत. सगळ्या सेक्टरला गुडघे टेकायला लावलंय त्यांनी... जिओ तोट्यात जाणार नाहीच, युजर्स पण जाणार नाहीत. निदान टेलिकॉममध्ये तरी ग्राहकांसाठी अच्छे दिन आले आहेत असे म्हणूया. माझा दोन हजार रुपये महिन्याचा खर्च दोनशे रुपयांवर आलाय. और क्या चाहिये?
Pages