लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्या सूर्यकांत/चंद्रकांत पैकी कोणासारखा तरी वाटतो. फारसा आवडत नाहीच. >>> Lol विनोद म्हणुन ठीक आहे , पण सुर्यकांत , चंद्रकांत ची बरोबरी कुणी करु शकणार नाही , काय त्यांचा रुबाब होता.

शीतल ची आई किती नैसर्गिक अभिनय करते! तिची खरीच आई आहे की काय असे वाटते...चेहेराही मिळताजुळताच आहे. तसेच अज्याची मामी, मामे बहिण, जीजी, शीतल च्या काकू सगळ्याच अगदी नॅचरल.

शीतल च जरा अवघडल्या सारखी वाटते. इव्हन ती पूजा का बीजा, ...त्या सैन्यात गेलेल्या विक्रम ची मैत्रिण.... तीही छान काम करते.

मामे बहिण >>> त्या सिरियल मध्ये आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी मामाच्या मुलीला बहीण मानत नाहीत, त्या मुलीच ( जयडीचं ) अज्यावर प्रेम असतं.

कारस्थानं तर झाली सुरु. अज्याच्या भरतीचं काय तरी मामी लपवतेय आणि जयडीला पण तसंच करायला सांगते.

हि मालिका म्हणजे देशप्रेमाच्या नावाखाली प्रेक्षकांची केलेली निव्वळ फसवणूक आहे. टायटल सॉंग पाहून असं वाटतं कि हि मालिका सैनिकांच्या जीवनावर आधारित आहे. पण प्रत्यक्षात सैनिक कमी आणि लफ़डीच जास्त दाखवलेत.

मी अजुन ११ वाच भाग बघत असल्यामुळे खुप मागे आहे.
शितल शर्ट घ्यायला जाण्याचा सीन पण मस्त आहे , नगाला नग द्यायचा असल्यामुळे , ती दुकानदाराला म्हणते , ' खराब शर्ट दाखवा' Lol

पण सुर्यकांत , चंद्रकांत ची बरोबरी कुणी करु शकणार नाही , काय त्यांचा रुबाब होता.>> त्या दोघांची बरोबरी वगैरे अजिबात नाही म्हणायचंय मला. मी काय त्यांचे सिनेमा पाहिलेले नाहीत. Happy त्याच्या त्या चंद्रकोर लावण्यावरून तसं येतं मनात. थोडक्यात मला म्हणायचंय की जुन्या काळातला हिरो वाटतो आणि त्यातही तो डॅशिंग वगैरे अजिबात नाही वाटत.

मी अजुन ११ वाच भाग बघत असल्यामुळे खुप मागे आहे. >> भांडणाच्या काळात आहात होय.

शीतल ची आई किती नैसर्गिक अभिनय करते! तिची खरीच आई आहे की काय असे वाटते...चेहेराही मिळताजुळताच आहे. >> शीतल ची आई म्हनजे माझी काकु आहे..दया एकसंबेकर असे त्यांचे नाव आहे..पहिलीच मालिका आहे त्यांची ही..त्यांना तुमची कमेंट नक्की पोचवेन.

अरे वा ! सही , खुप छान काम केलयं त्यांनी.

अजुन एक डायलॉग
मटकीला मोड नाय
अन शीतलीला तोड नाय Lol

मटकीला मोड नाय
अन शीतलीला तोड नाय >> हा हा हा...

अजिंक्य शिंदे( अज्या ) - नितीश चव्हाण
शीतल पवार ( शीतली )- शिवानी बावकर
जयडी - किरण ढाणे
विक्या -निलेश चव्हाण
राहुल्या - विपीन बोराटे
भैयासाहेब - किरण गायकवाड
टॅलेंट - महेश जाधव
जम्या - अमरनाथ खराडे
शीतल ची आई - दया एकसंबेकर

एक करेक्शन
राहुल्या - विपीन बोराटे ऐवजी राहुल मगदुम आहे

श्री, thanks
राहुल्या एकदम मस्त, त्या अज्यापेक्षा तर खुपचं छान आहे त्याने केलेले काम

कालचा एपिसोड मस्त होता...आता कथानक वेग घेतं आहे. सगळ्यांचाच अभिनय मस्त. शीतल, जीजी, मामा, जयडी..सगळेच बेस्ट आणि रोल ला परफेक्ट!

तो अज्या DID मध्ये dancer होता असं वाचलं कुठेतरी. मुंबईचा असून सातारी बेअरिंग चांगलं पकडलंय त्याने.
हा त्याचा फोटो
Nitish-Chavan-HD-Photos.jpg

नजरेतून न गिरवण्यासाठी! >>> Lol अरे काय हे मराठी
मुंबईचा असून सातारी बेअरिंग चांगलं पकडलंय त्याने. >>> तो सातार्‍याचाच आहे तिथेच मोठा झालायं.

श्री आणि निधी,
Biggrin

हिंदी (किंवा नावापुरत्या मराठी पण ८०% हिंदी संवाद असलेल्या!) मालिका पाहण्याचा परिणाम!

ती जयडी खोटं का बोलते??
Submitted by Nidhii on 23 August, 2017 - 12:35
असंच.... स्वतःला अज्या च्या नजरेतून न गिरवण्यासाठी! >>>> नाही स्वःताला वाचवायला आईलाच गिरवते अज्या च्या नजरेतून ती खोट बोलुन

Pages