Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28
लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अज्या सूर्यकांत/चंद्रकांत
अज्या सूर्यकांत/चंद्रकांत पैकी कोणासारखा तरी वाटतो. फारसा आवडत नाहीच. >>> विनोद म्हणुन ठीक आहे , पण सुर्यकांत , चंद्रकांत ची बरोबरी कुणी करु शकणार नाही , काय त्यांचा रुबाब होता.
शीतल ची आई किती नैसर्गिक
शीतल ची आई किती नैसर्गिक अभिनय करते! तिची खरीच आई आहे की काय असे वाटते...चेहेराही मिळताजुळताच आहे. तसेच अज्याची मामी, मामे बहिण, जीजी, शीतल च्या काकू सगळ्याच अगदी नॅचरल.
शीतल च जरा अवघडल्या सारखी वाटते. इव्हन ती पूजा का बीजा, ...त्या सैन्यात गेलेल्या विक्रम ची मैत्रिण.... तीही छान काम करते.
ओके आहे पण.. ताणविरहित मालिका
ओके आहे पण.. ताणविरहित मालिका..
पुढे कारस्थानं वाढु नये ही इच्छा
मामे बहिण >>> त्या सिरियल
मामे बहिण >>> त्या सिरियल मध्ये आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी मामाच्या मुलीला बहीण मानत नाहीत, त्या मुलीच ( जयडीचं ) अज्यावर प्रेम असतं.
कारस्थानं तर झाली सुरु.
कारस्थानं तर झाली सुरु. अज्याच्या भरतीचं काय तरी मामी लपवतेय आणि जयडीला पण तसंच करायला सांगते.
हि मालिका म्हणजे
हि मालिका म्हणजे देशप्रेमाच्या नावाखाली प्रेक्षकांची केलेली निव्वळ फसवणूक आहे. टायटल सॉंग पाहून असं वाटतं कि हि मालिका सैनिकांच्या जीवनावर आधारित आहे. पण प्रत्यक्षात सैनिक कमी आणि लफ़डीच जास्त दाखवलेत.
मी अजुन ११ वाच भाग बघत
मी अजुन ११ वाच भाग बघत असल्यामुळे खुप मागे आहे.
शितल शर्ट घ्यायला जाण्याचा सीन पण मस्त आहे , नगाला नग द्यायचा असल्यामुळे , ती दुकानदाराला म्हणते , ' खराब शर्ट दाखवा'
पण सुर्यकांत , चंद्रकांत ची
पण सुर्यकांत , चंद्रकांत ची बरोबरी कुणी करु शकणार नाही , काय त्यांचा रुबाब होता.>> त्या दोघांची बरोबरी वगैरे अजिबात नाही म्हणायचंय मला. मी काय त्यांचे सिनेमा पाहिलेले नाहीत. त्याच्या त्या चंद्रकोर लावण्यावरून तसं येतं मनात. थोडक्यात मला म्हणायचंय की जुन्या काळातला हिरो वाटतो आणि त्यातही तो डॅशिंग वगैरे अजिबात नाही वाटत.
मी अजुन ११ वाच भाग बघत असल्यामुळे खुप मागे आहे. >> भांडणाच्या काळात आहात होय.
शीतल ची आई किती नैसर्गिक
शीतल ची आई किती नैसर्गिक अभिनय करते! तिची खरीच आई आहे की काय असे वाटते...चेहेराही मिळताजुळताच आहे. >> शीतल ची आई म्हनजे माझी काकु आहे..दया एकसंबेकर असे त्यांचे नाव आहे..पहिलीच मालिका आहे त्यांची ही..त्यांना तुमची कमेंट नक्की पोचवेन.
येस स्मिता..
येस स्मिता..
अरे वा ! सही , खुप छान काम
अरे वा ! सही , खुप छान काम केलयं त्यांनी.
अजुन एक डायलॉग
मटकीला मोड नाय
अन शीतलीला तोड नाय
मटकीला मोड नाय
मटकीला मोड नाय
अन शीतलीला तोड नाय >> हा हा हा...
(No subject)
यांची नावे माहिती आहेत का
यांची नावे माहिती आहेत का कुणाला
कालचा दोरीऊडीचा भाग मस्त होता
अरे सही, मस्त फोटो !
अरे सही, मस्त फोटो !
तिचं नाव शिवानी बोरकर आहे
तिचं नाव शिवानी बोरकर आहे
अजिंक्य शिंदे( अज्या ) -
अजिंक्य शिंदे( अज्या ) - नितीश चव्हाण
शीतल पवार ( शीतली )- शिवानी बावकर
जयडी - किरण ढाणे
विक्या -निलेश चव्हाण
राहुल्या - विपीन बोराटे
भैयासाहेब - किरण गायकवाड
टॅलेंट - महेश जाधव
जम्या - अमरनाथ खराडे
शीतल ची आई - दया एकसंबेकर
कलाकारांची यादी वर हेड्रात
...
एक करेक्शन
एक करेक्शन
राहुल्या -
विपीन बोराटेऐवजी राहुल मगदुम आहेश्री, thanks
श्री, thanks
राहुल्या एकदम मस्त, त्या अज्यापेक्षा तर खुपचं छान आहे त्याने केलेले काम
कालचा एपिसोड मस्त होता...आता
कालचा एपिसोड मस्त होता...आता कथानक वेग घेतं आहे. सगळ्यांचाच अभिनय मस्त. शीतल, जीजी, मामा, जयडी..सगळेच बेस्ट आणि रोल ला परफेक्ट!
ती जयडी खोटं का बोलते??
ती जयडी खोटं का बोलते??
असंच.... स्वतःला अज्या च्या
असंच.... स्वतःला अज्या च्या नजरेतून न गिरवण्यासाठी!
तो अज्या DID मध्ये dancer
तो अज्या DID मध्ये dancer होता असं वाचलं कुठेतरी. मुंबईचा असून सातारी बेअरिंग चांगलं पकडलंय त्याने.
हा त्याचा फोटो
नजरेतून न गिरवण्यासाठी! >>>
नजरेतून न गिरवण्यासाठी! >>> अरे काय हे मराठी
मुंबईचा असून सातारी बेअरिंग चांगलं पकडलंय त्याने. >>> तो सातार्याचाच आहे तिथेच मोठा झालायं.
असंच.... स्वतःला अज्या च्या
असंच.... स्वतःला अज्या च्या नजरेतून न गिरवण्यासाठी!>> आई ग्गं! चिंचे, तू मला खुर्चीतून गिरवलंस.
श्री आणि निधी,
श्री आणि निधी,
हिंदी (किंवा नावापुरत्या मराठी पण ८०% हिंदी संवाद असलेल्या!) मालिका पाहण्याचा परिणाम!
ती जयडी खोटं का बोलते??
ती जयडी खोटं का बोलते??
Submitted by Nidhii on 23 August, 2017 - 12:35
असंच.... स्वतःला अज्या च्या नजरेतून न गिरवण्यासाठी! >>>> नाही स्वःताला वाचवायला आईलाच गिरवते अज्या च्या नजरेतून ती खोट बोलुन
सध्या ही सिरीयल बघायला मिळतेय
सध्या ही सिरीयल बघायला मिळतेय रात्री ११ वाजता. आवडतेय. अज्या आणि शितल मधलं प्रेम हळूहळू फुलायला लागलेय.
facebook varun sabhar :-
facebook varun sabhar :-
Pages