लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीने असं मुलाला निवडणे.. ऐन लग्न/ साखर्पुडा ई. तत्सम सोहळ्यात ऐन वेळी नाही म्हणने.. आणि बाबांना त्यामुळे अटॅक येणे.. हे येवव्व्व्व्ढ नेहमीचं झालय की प्रेक्षक एखाद्या विधी सारखं गृहित धरतो त्याला...
नॉर्मल आयुष्यात त्याची शेकडेवारी बरिच कमी असेल..
बर्यापैकी बरी चालली होती सिरिअल..
आता आपल्याला नॉर्मल सिरिअल्स कधीच बघायला मिळणार नाहित का?
इंग्लिश आसतिल बर्याच .. पण मराठी हिंदीच काय?
:नॉस्टॅल्जिक बाहुली:

काय गंमत आहे ना! जयडी व तिची आई उर्फ मामी उर्फ पुष्पा, ह्या दोघी व्हिलन आहेत हे आपल्या सर्वांना कळते, पण भोळ्या भाबड्या नानांना, शितलीच्या चिडकुट आईला, तिच्या काकांना व तिच्या काकवांना कळ्ळतच नै, फार चावट लोक हायती बगा ह्ये. शितली तर नाव न ऐकताच गिरक्या मारती, हवेत उडतीया.

>>आता आपल्याला नॉर्मल सिरिअल्स कधीच बघायला मिळणार नाहित का?

वेबसिरीज बघा..... आपल्यातुपल्या आयुष्याच्या बऱ्याच जवळ जाणाऱ्या असतात त्या!

वेबसिरीज बघा..... आपल्यातुपल्या आयुष्याच्या बऱ्याच जवळ जाणाऱ्या असतात
>>>>>>>>>>>>>>>>
हो बरोबर

वेबसिरीज बघा..... आपल्यातुपल्या आयुष्याच्या बऱ्याच जवळ जाणाऱ्या असतात >>> हे कितीही खरे असले तरी लोकाना fantasy च आवडते. जे आपल्या आयुष्यात घडु शकत नाहि ते पडद्यावर घड्ताना पाहुन मनाच्या कोप्र्यात द्ड्लेल्या भावनाना वाट मिळते. तसेहि जास्त सत्याकडे झुकनार्या serials अन्गावर येतात. बाकी वेबसिरीज छानच असतात. (वर लिहिलेले हे मा़झ वयक्तिक मत आहे कुणाला नाहि पट्ले तर द्या सोडुन) Happy

जास्त लोक असले की पेढे तुकडे करूनच देतात. >> हे असलं काही साताऱ्यात नसत किंवा निदान आजपर्यंत नाही पाहिल, कारण पेढे तिथेच बनवतात. कमी पडले की आणायचे मोदींकडून(अशोक मोदी).
असो मामी आज्याला झापुन आली. ट्रेनिंगचे सगळे सीन्स सातारा सैनिक स्कुलचे आहेत, जिजी ट्विस्ट आणतील आता असं वाटतंय

नानादेखील शितल अज्याच्या लग्नाला तयार झाले.
भय्याला तसा नकार पण कळवला. बहुतेक दोघांचे लग्न लवकरच आटपतील.

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा >>>> आता लक्ष गेल ईथे . म्हणजे एक वर्श झाल की Happy

कोणी कोणी मिस केलं शीतली ला ... पुन्हा येत आहे नवीन मालिकेत "अल्टी पलटी" ७ ऑगस्ट पासून रात्रौ १० वाजता आपल्या झी मराठीवर.

Pages