लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या जयडीला तिनेच विष घातलेली खीर प्यायला लावत होते त्याचं काय झालं पुढे?? खरंच विष घातलं होतं की भैयाला बनवलं तिने??

जयडीने त्या खिरीत विष घातलेच नव्हते पण भय्याला जाऊन सांगितले.
भय्या धावत जात असतो. धावताना एका बाईला कट मारुन जाणे, दुधाच्या किटल्या पाडणे वगैरे करत धावत असतो.
तो पर्यंत शितल आणि परिवार ताटं मांडून टीपी करत असतो. शितल खीरीची वाटी तोंडाला लावणार तोच भैय्या घरात घुसुन ती वाटी फेकुन देतो.
खिरीत विष आहे असा सांगतो. घरातले लोक त्याला काहीबाही प्रश्न विचारत बसतात, तो पर्यंत जयडी आणि गाव शितलीच्या अंगणात जमा झालेला असतो.
जयडीला खिर प्यायला सांगतात, तीपण एक्प्रेशन देत टीपी करत बसते, पण शेवटी खिर पिते आणि तिला काही होत नाही. भैय्याचा सर्वांसमोर पोपट मात्र होतो.

हो. भैयाचा तो गावभर धावत जाण्याचा शीन मी बघितला होता. भैयाकडे इतक्या गाड्या असताना भैया बिनचपलाचा धावतपळत शीतलीकडे जातो त्याआधीच गाडीने पोचला असता की.
आणि म्हत्वाचं म्हंजी शीतलीच्या घरच्यांकडे मोबैल नि भैयाकडं बी मोबैल तरी काॅल करून काय सांगत नाय भैय्या जयडीनं खीरीत विष घातलंय ते. Uhoh

जयडी आणि भैया ची जोडी भारी जमेल.>>>>>>>>>>>>>>> +१

मालिकेतल्या मुख्य नायक अन नायिकेपेक्षा भारीच आहेत दोघं....
भैय्यासाहेबाचे पात्र असलेला अभिनेता त्याची भूमिका उत्तम करतोय .बऱ्याच शेड आहे त्याच्या भूमिकेला
यातला नायक तर नुसता फावड्या आहे .
भैय्यासाहेबाला दम देतांना तर तोच तंतरलेला दिसत होता .कॉमेडी सीन वाटत होता तो
लेखकाने पण असावा प्रसंग कशाला द्यावा त्याला नसेल सूट होत तर
नुसते फौजी फौजी शब्दाचे पारायण करून काही होत नसतंय
तसलं रांगडं दिसावं पण लागतय .
Rofl

यातला नायक तर नुसता फावड्या आहे . >>>>>>>>> हा हा हा ....... अगदि लाम्बुन सुदधा दात दिसतात. तोन्ड बन्द च नसते त्याचे.

एकदाच सांगतोय, परत सांगितल नाय म्हणून सांगायच न्हाय
हा डायलॉग भारी आहे.
पुष्पा मामींच काम भारी आहे. खासकरून फेडरेशन, गॉगल दाखवायची स्टाइल.

पुष्पा मामींसाठी आजचा भाग बघाच. भैय्यासाठी टॅलेंटनी कापून ठेवलेलं सफरचंद स्वतः खाती, आणि राहिलेल्याच्या बीया काढून दे म्हणती. एंड सीन पण भारी आहे.

मागे एका भागात पण काजू मारलेले दाखवलेत.

यातला नायक तर नुसता फावड्या आहे . >>>>>>>>> अगदी अगदी... त्याच्या दम मध्ये काहीच दम न्हवता...पण ऍटलिस्ट त्या शीतलच्या ओव्हर एकटिंग आणि इम्मॅचुरिटी पेक्षा फावड्या बरा म्हणायचा...

फावड्या, चणा, चपटी वैगेरे का बोलता कलाकारांना.
सिरीयलीच्या फालतुपणाला नावं ठेवणं, कलाकाराच्या भिनयाला नावं ठेवणं ठीक आहे पण एखाद्या दिसण्यावरुन फावड्या, चणा, चपटी म्हणणं
बरं वाटत नाही.

सस्मित + १

अज्या एक टिपीकल सातारी मुलगा म्हणून शोभुन दिसतो.

असे साधे चेहरे चांगले वाटतात अशा गावच्या कथांमधे.
ह्या सिरीयलीतले सगळेच आपापल्या रोलमधे शोभतात.
शीतली, तिची आई, बाबा, दोन्ही काका-काकु, तिची मुस्लिम मैत्रीण
अज्या, त्याचा मामा-मामी, जयडी, भाउ आणि जीजी तर खासच

मुर्खपणा सुरु आहे नुसता. शीतली अज्याशी लग्न होणार असं समजतेय.
ह्या लोकांमधे स्पष्ट काही बोलणं नसतच का कधी?
गैरसमज ठीके पण अज्याबरोबर तरी काही बोलणं होतंय का नाही नवरीचं?

काहिही.. जाता येता घरात.. इकडे तिकडे फिरताना कुणी भय्या हा शब्द पण उच्चारत नाही?
येवढे हिरोइनचे बाबा म्हणत होते की मी तिला न विचारता काही ठरवणार नाही लग्न वगैरे.. ते स्प्ष्ट एकदाही विचारत नाहित..
सातार कडचचं दाखवायचय तर .. सुपारी दिवशी ह्या पोरी खिदळत फिरतात इकडे तिकडे.. ज्यांच लग्न आहे त्याच..इथे शितली गावाला वळसा घालते आणि आत्ता अगदी पदर डोक्या डोळ्यावरुन?
आपल्या कडे काय यु पी वाल्यांसारखं येवढा मोठा पदर घेत नाहित..
या फालतुगिरी मुळे मजाच नाही राहात काही.. हे सगळ बळंच कथानकात बसवताना.. एरव्ही हुशार कॅरॅक्टर असलेली शितली मुर्ख ठरली.. बावळटं दाखवली..
Angry
एक सिन दाखवला त्यात जयडी शितलीला पढवत असते की मुलगा जवळचाच ओळखिचाच आहे .. आणि काय काय भरवुन शेवटी म्हणते .. मग आता घरातल्यानी विचारल्यावर तु काय म्हणशिल..
तर शितलीचा चेहरा एक्दम कॅमेरावर असताना म्हणाली "मी व्हय म्हणेन" काय बावळट ध्यान वाटली अगदी..
येवढं करुन सगळं पार पडेल तेव्हाही कोणाला जयडीचा मामी चा कणभर संशय येणार नाही.. ढागातुन पडले आहेत हे लोक..

_आनंदी_ >>>. अगदी खरे. तो डोक्यावर पदर घेवुन बसलेलि शित्लि बघुन डोक्यावर हात घेतला. महान आहेत सगळे.

उद्या बर्‍याच घडामोडी होणार आहेत असे वाटतेय. नानांना बहुतेक हार्टअ‍ॅटॅक येणार. शितलचे अज्यावर प्रेम आहे हे शितल सुमनकाकीला सांगताना तिची आई ऐकते त्यावरुन राडा होणार आहे असे प्रोमोत दाखवले.

हो आजच्या भागात मजा येईल, कालच्या भागात सातारचे कंदी पेढे सांडले यास्मिनच्या हातून ते खूप वाईट झाले. ☺️ असंही साताऱ्याला आक्खे पेढे देतात, तुकडे करून नाही.

असंही साताऱ्याला आक्खे पेढे देतात, तुकडे करून नाही. >>> ओ ! आमच्या मुम्बईला ही अख्खेच पेढे वाटतात हां . Wink हे असे देवळात प्रसादाच्या भांड्यात असतात तसे तुकडे का होते कळले नाही

परवडत नसतील ओ.
नैतर त्या याअल्लावालीला पेढ्यांचे तुकडे करायला बसवली असेल तिचं भैयुड्याकडे लक्ष जाउ नये म्हणुन.
ह्या सगळ्यात अज्या कुठे होता /आहे म्हणे?

ऑ?? मग ह्या मैनेला माहित नाही का?
तो सुपारीला कसा येईल हे कळत नाही का?
आणि एकंदर एकमेकांशी लग्नाबद्दल, लग्न ठरल्याबद्दल काही बोलणं झालेलं दाखवलं नाही का?
काय एकेक कविकल्पना! घुंघट घेताहेत Angry

बिच्चारा भैय्या, मेन व्हिलन असूनही फारच सहनशील आहे. काही न बोलता गेला. राहुलकडे अज्याचा नंबर असूनही त्याला ट्यालेंटने भारी गंडवले.
इतकं सगळं होऊन पण शीतल, मामी व जयडी वर संशय न घेता घरातल्यांशी भांडेल पुढील भागात, अस वाटतंय

Pages