लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे दोघेही छान आहेत दिसायला, एकत्रही शोभतात.

त्या अज्याच्या डोक्यावरच्या चंद्रकोरीचे लॉजिक काय आहे? पूर्वीच्या सिनेमात जयश्री गडकर वगैरेही वापरत ना?

प्रतिपदेच्या दिवशी कोर लावून रोज वाढवत न्यायची आणि पौर्णिमेपर्यंत पूर्ण गोल, असे का? Happy

त्या अज्याच्या डोक्यावरच्या चंद्रकोरीचे लॉजिक काय आहे?>> तो शिवाजी महाराजांचा भक्त दाखवलाय. शिवाजी महाराजांच्या कपाळी कायम चंद्रकोर म्हणून अज्याही लावतो.
आता तर चंद्रकोरीच्या टिकलीची फॅशन इन आहे. Happy

प्रतिपदेच्या दिवशी कोर लावून रोज वाढवत न्यायची आणि पौर्णिमेपर्यंत पूर्ण गोल, असे का? Happy>> Lol नि अमावस्येला काय कपाळ मोकळं?? Wink
अशी खरचं पद्धत होती का?? मला माहित नाही असेल तर. Happy

प्रतिपदेच्या दिवशी कोर लावून रोज वाढवत न्यायची आणि पौर्णिमेपर्यंत पूर्ण गोल, असे का? Happy>> Lol नि अमावस्येला काय कपाळ मोकळं?? Wink >>> Rofl

प्रतिपदेच्या दिवशी कोर लावून रोज वाढवत न्यायची आणि पौर्णिमेपर्यंत पूर्ण गोल, असे का? Happy>> Lol नि अमावस्येला काय कपाळ मोकळं?? Wink >>> Lol

झी वरच्या मालिकांमध्ये त्यातल्या त्यात ही मालिका बरी आहे.
राहुल्याला जेव्हा अज्या आणि शितलच्या प्रेमाविषयी कळते तो एपिसोड आवडला.
राहुल्या आणि अज्या दोघांची अ‍ॅक्टिंग मस्त झाली होती.

निधी>> Lol

राहुल्याला जेव्हा अज्या आणि शितलच्या प्रेमाविषयी कळते तो एपिसोड आवडला.>> कधी झाला तो एपिसोड? तारीख सांगा. मी बघेन ओझी वर.

आता बघतय का कुणी? फारच मेलोड्रामा चालला आहे.
सर्व साधारण चेहेर्‍यांचे अति क्लोज अप्स फार बेकार दिसतात!

ह्यांना आर्मीतला माणूस काय असतो याची खरच कल्पना आहे का?

प्रहारच्या वेळेस नाना पाटेकरनी स्वत: ट्रेनिंग घेतलं होत तसच इतर कलाकरांनाही घ्यायला लागलं होतं.
इथे सगळाच आनंद आहे.
परवा जो भाग बघण्यात आला तो अत्यंत चिड आणणारा आहे.

च्रप्स, तुम्ही ही शिरेल पण बघता

मी एकदा चुकुन एखाद मिनीट बघितली, बापरे कैच्या काय भयानक आहे

काहिही म्हणजे अगदी काहिही दाखवितात , बिन्डोक कुठचे

व्ही बी... Biggrin इतके काय भयानक वाटले त्यात तुम्हाला?

आज्या, शितली, राहुल्या व त्यांचे मित्र, मामा - मामी, शीतल ची फॅमिली.... सगळेच तर किती रिअलिस्टीक आहे!

किती रिअलिस्टीक आहे! >>> नाही ओ, ती शितली, मिलिट्रि युनिफॉर्म मध्ये आज्याची परेड घेत होती .... तेही लाडात, प्रेमाने

नाही सहन झाले मला

झीच्या सगळ्याच सिरेली बिन्डोक पणाच्या कळस आहेत.
त्यात राधाक्का ची १ नंबरवर आहे.
२ नंबर जीव रंगला
बाकी सगळ्या कमी अधिक फरकाने पुढच्या नंबरवर

Happy सस्मित... आपण फक्त चांगले गुण बघायचे!
व्ही बी... मी हा पर्टीक्युलर प्रसंग नाही बघितला.... पण ओव्हर-ऑल ठीक आहे पात्र योजना..... !

व्ही बी... मी हा पर्टीक्युलर प्रसंग नाही बघितला.. >>> आणी मी नेमके नको तेच पाहिले, पुढे काही बघायची इच्छाच उरली नाही

VB - फिक्शन आहे, लाईट घ्या☺️
मला सुद्धा शितली आवडत नाही. मला जयडी, भैया, टॅलेंट, मामी यांचे काम आवडते.
स्पेशली जयडी आणि भैया जेंव्हा भेटून प्लॅन्स करतात, एक नंबर डायलॉगस असतात.
@सस्मित - सहमत. पाहिले 2 नंबर बरोबर. ही शिरेल त्या शनाया आणि त्या रात्रभर भिजून फुगलेल्या चण्याच्या शिरेल पेक्षा बरीच चांगली आहे. ती धारकका एक मूर्ख आहे आणि तिला शिव्या घालायला दुसरा धागा कमी पडतोय लोकांना ☺️

<<< झीच्या सगळ्याच सिरेली बिन्डोक पणाच्या कळस आहेत. >>

नाय नाय, ती मोहन्या आणि भानूची सिरीयल (जागो मोहन प्यारे) टाईमपास आहे एकदम.

भैय्या सायको आहे....हल्ली जरा जास्तीच दाखवताहेत त्याचा माथे फिरु पणा. आई ला कोंडून ठेवलंय. आणि टॅलंट ला पण हनुवटी धरुन वर उचलतो. शीतलीचं कठीण आहे अशा माणसा समोर. !!

ya serial chi ek khasiyat aahe ki yaat hero evdhach villain la pan sarkhach scope thevlay. Sadhyache je kathanak aahe jyat te Ajya aani shitli prem- prem kheltaayet tyapekshya jaydi, mame (mami) aani bhaiyya anche metkut je kaahi karamati davtaat te chaltay ki.

काल त्या भैयाने टॅलेंटला चोपचोप चोपला, वर जखमेवर रॉकेलचा बोळापण फिरवला. पण त्या टॅलेंटच्या चेहर्‍यावर ना जखमेचे निशाण ना खुप बदडून काढल्यावरचे भाव पण नव्हते. Uhoh

बाकी इतर सिरीयलपेक्षा कॅरेक्टर नीट मांडलेत, कथानकात पाणी पण कमी घातलेय. गेले काही दिवस कथानक गोलगोल फिरतेय असे वाटत होते, पण आता पुढे जाईल असे वाटतेय.

अज्या आणि शीतल पेक्षा भैया, जयडी व राहुल्याचे सीन्स भारी आहेत. अज्या शीतल चे सीन्स बोर होतात.

जे सातारचे आहेत त्यांना अजून मजा येत असेल मालिका बघताना

शितल आणि अजाचे सीन बोर असतात. राहुलला पण शितल हवी असते का, त्याचंही काही कारस्थान चालू असते का की तसे काही नाही. जयडीसाठी भैय्याचा विचार का नाही करत.

Pages