लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 11 April, 2017 - 12:28

लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण धाकल्या सुनबाईंच्या साड्या, त्यांची खोली, त्यांचा मेकप इ. मला ग्रामीण वातावरणाजवळ जाणारं नाही वाटलं. उलट अंजली बाई इतक्या शिकलेल्या असून त्या गावात रहात होत्या (लग्ना आधी तेव्हा) त्यांचे ड्रेस गाव खेड्यात खपतील असेच होते. +१

नायक आणि नायिका सारखेच दिसतात. भावा बहिणी सारखे. Happy>>>...अगदी मनातलं ......फर्स्ट प्रोमो बघून टूथपेस्ट जाहिरातीसारखे वाटले होते मला पण मुलगी पटकन म्हणाली हे भाऊ बहीण वाटतात ....हे हे हे ....

लागिरं झालं जी… मध्ये अजिंक्यच्या भूमिकेत नितीश चव्हाण आणि शीतलच्या भूमिकेत शिवानी बोरकर हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. श्वेता शिंदे आणि संजय कांबळे यांच्या वज्रा प्रॉडकशन्स निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन संजय कांबळे यांनीच केले आहे. तेजपाल वाघ यानी ही मालिका लिहिली असून पूर्ण मालिका साताऱ्यात चित्रित करण्यात येणार आहे. या मालिकेत बहुतेक सर्व कलाकार याच भागातले स्थानिक कलाकार आहेत.

बरी वाटतिये मालिका! न खुललेल्या कळ्या आणी अजिर्ण खोड बघण्यापेक्षा तरी नक्किच बरय

हीरोचा मित्र म्हणजे माझे पती सौभाग्यवती मधल्या रमेश भाटकर च्या बायकोचा भाऊ आहे का? जो वैभवलक्शष्मी वर मरत असतो......

सध्या बाई अन राणादा बोर करत्तायेत म्हणुन ही छान टाईमपास वाटली.

हिरो-हिरवीणीची ओव्हरअ‍ॅक्टींग सोडली तर छान, बर्यापैकी गावाकडचे वातावरण जमलेय अन भाषासुद्धा

हीरोचा मित्र म्हणजे माझे पती सौभाग्यवती मधल्या रमेश भाटकर च्या बायकोचा भाऊ आहे का? जो वैभवलक्शष्मी वर मरत असतो...... >>> नाही पण सारखेच दिसतात तो मंद सारखा नेहमी हसायचा हा दुसर्याची री ओढतो

हीरो महा भंगार आहे....... मोस्ट ऑर्डिनरी लुक्स!
मोस्ट ऑर्डीनरी अ‍ॅक्टींग.............सदा आपलं कुर्र्यात आणि भांडायच्या पावित्र्यात!

मी बघतंच नाही, फार काही बघावी असं वाटलं नाही. हिरो आधी प्रोमोत बरा वाटला. पण का कुणास ठाऊक मालिकाच बघाविशी वाटत नाहीये. डी ३ नंतर असतो रिपीट भाग, तेव्हा टीव्ही बंदच करते पहीला. दुसरा भाग थोडासा बघितला त्यावरुन ठरवलं, नको बघुया.

सध्या हीरो अगदी त्वांड पाडून फिरतोय...आणि त्या गावातल्या दादा कडे बॉडीगार्ड ची नोकरी करायलाय! त्यामुळे तो अजूनच बेकार दिसतो. हिरॉईन छान आहे तशी.......आणी उगाच लाडे लाडे नाही

हिरॉईन छान आहे तशी.......आणी उगाच लाडे लाडे नाही >>>>>> बाप्रे मलातर ती त्याच्यापेक्षा जास्त भयानक वाटली

ही सेरियल चांगली वाटते. अ‍ॅक्टरही सहज नैसर्गिक अभिनय करत आहेत.
शिवाय भाषा, उच्चारण वगैरे अगदीच सहजगत्या होतय. कदाचित मी सातार्‍यात काही वर्षे राहिलेलो असल्याने मला ती अधिक जवळचि/ओळखीची वाटत असेल.
सैन्यात भरती होण्याची या पश्चिम महाराष्ट्रीयांची ओढ मी जवळून बघितली आहे. त्यामुळे ते सर्वही परिचित वाटते.
काही किरकोळ तृटी असतील, पण निर्मितीमुल्य चांगले असल्याने व उगाचच कुठेही ओढाताण्/उपदेशाचे डोस वगैरे नसल्याने अंगावर येत नाही.
ठेवत ठेवत बोलणारा मित्र, सरळ मित्र, अज्या स्वतः, सर्व पात्रे त्यांचे जगणे , अगदी ओळखीचे जवळचे वाटत रहाते, हेच या मालिकेचे यश आहे.
ती हिरॉईनही चांगली आहे, पण ती मात्र ओळखीची वाटत नाही, कारण आमच्या सातार्‍यातील वास्तव्यात, त्याऽऽ काळी मुलाने मुलिबरोबर बोलणे हेच निषिद्ध होते , त्यामुळे तो अनुभव नाही. पण ती जशा उचापत्या करते, तशा करणार्‍या बोल्ड स्त्री कॅरेक्टर तेव्हाही बघितल्यात. Happy

मला तर खूप आवडली मालिका. सगळेच कलाकार अगदी नैसर्गिक अभिनय करतायेत. कुठेही मोठे मोठे सेट्स नाहीत, भरजरी साड्या नेसलेल्या, अंगभर दागदागिने मिरवणाऱ्या बायका नाहीत. साधी माणसं त्यांचे साधेशे घरं सगळंच आवडतंय सध्या तरी.
अज्या, शितली, विक्या, राहुल्या सगळेच मस्त काम करतायेत.
जीजी सुद्धा खूपच गोड आहेत. Happy

जीजी सुद्धा खूपच गोड आहेत. >>>> हो या शिरेलीत्ल मला सगळ्यात जास्त आवडलेल एकमेव पात्र आहे ते. त्या आज्जींनी खुप सुंदर काम केलेय अगदी छान

मी पण पाहत नाही मालिका पण वरची लिंक पहिली... फोटो छान आहेत की हिरोचे... डान्सर पण दिसतोय आणि स्वतःची डान्स इन्स्टिट्यूट पण काढलीये.... या फोटोंमध्ये मस्त स्टायलिश वाटला... मालिकेतचा लूक नाही आवडला ...

आत्ता पर्यंत एखाद दुसराच एपिसोड पाहिला असेल या सिरियलचा. कालचा भाग धरुन ...
Zootopia मधल्या sloths सारखा बोलणारा तो राहुल्या जाम आवडला आपल्याला !

सिरियल बघायला चालु केलीय , अगदी सैराट सारखीच ह्या सिरीयलने पण जादू केलीय , अज्या , शीतल , राहुल्या , जिजा ह्यांची कामं विशेष आवडली . ग्रामीण बाज पुरेपुर उतरला आहे .
राहुल्या तुज इंग्लिश बास कर न्हाइतर म्हस दूध देण बंद करल Proud
सही डायलोग्ज आहेत , कुठेहि ओव्हर एक्टिंग नाही कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही .

मला तर शीतलीच कृत्रिम वाटते. Happy ती हसते तेव्हा तर जास्तच कृत्रिम वाटते. सहज हसणं नाही वाटत ते.

राहुल्या नि जीजी मस्त आहेत. अज्याची मामी नि शीतलीची आई? बोलतात मस्त. ऐकायला जाम आवडतं मला.
अज्या सूर्यकांत/चंद्रकांत पैकी कोणासारखा तरी वाटतो. फारसा आवडत नाहीच.

Pages