Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/37134
चला भुतं संपली म्हणायची आता .
चला भुतं संपली म्हणायची आता ...
संपली नाहीत पण आळशी झाली
संपली नाहीत पण आळशी झाली असावीत...
https://suhasgokhale
https://suhasgokhale.wordpress.com/2016/03/02/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B...
इथे एक अनुभव वाचला. त्यानंतर मला काल रात्री स्वप्न पडले त्यात एक मुलगी भूत म्हणून त्या झाडीत लपलेली दिसली. मी तिला विचारल तू भूत आहेस का? ती हो म्हणाली.
मी तिला विचारल तू भूत आहेस का
मी तिला विचारल तू भूत आहेस का? ती हो म्हणाली. >>>

बस एवढच झालं का??? नंतर तिने काय केलं???
मी तिला विचारल तू भूत आहेस का
मी तिला विचारल तू भूत आहेस का? ती हो म्हणाली. >>>
बस एवढच झालं का??? नंतर तिने काय केलं??? >>>>
लव्हस्टोरी लिहायला भारी विषय आहे...
@ गुगु
@ गुगु
मी गेली ४ वर्षे इथे काम करत आहे. असा कसलाही अनुभव नाही अन कुणाला आलेला ऐकिवात हि नाही. ऑफिस ची रचना फारच सुंदर आहे पण तळमजल्यावर १-२ ठिकाणी कोंदट आहे. तुम्हाला तसे कदाचित कोंदट वातावरणाने वाटले असेल
https://suhasgokhale
https://suhasgokhale.wordpress.com/2016/03/02/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B...
कथा वाचताना सातव्या मितीत जाऊन आलो. काय कथा आहे. आणि ती पण सत्य कथा. 3 भाग तर नादखुळा.
भारी साईट सापडली अजून अमानवीय
भारी साईट सापडली अजून अमानवीय वाचायला
माळावरचा खेळ हि कथा मी वाचली
माळावरचा खेळ हि कथा मी वाचली पण ती काहीशी अर्धवट वाटली ... अनुभव जर खरा मानला तर मात्र जे कोणी यातून गेले असतील त्यांची अवस्था भयानक असणार यात शंका नाही
माळावरचा खेळ भारी कथा .
माळावरचा खेळ भारी कथा . विश्वास ठेवणे कठीण आहे कि खरंच असे घडले असू शकते
ह्या बीबीवर फक्त स्वतःचे
ह्या बीबीवर फक्त स्वतःचे अनुभव लिहायचे आहेत माहित आहे. पण वर उल्लेख केलेली कथा वाचली आणि काही प्रश्न पडले. मूळ साईटवर विचारणार होते पण तिथे इमेल वगैरे द्यायची भानगड असल्याने ते टाळलं. तुम्ही ती कथा वाचली नसेल तर कृपया ही पोस्ट वाचू नका.
.
.
.
.
.
१. ह्या लोकांना अनुभव आला तो नेमका कसला? दुसर्या मितीतून काही आलं का? तसं असेल तर त्यासाठी काही विशिष्ट गोष्टी जुळून याव्या लागतात असं लेखकच म्हणतो ना? मग नेहमी तिथे तो अनुभव कसा येतो?
२. 'संभालो' आणि 'जाने दो' हे शब्द उच्चारण्यामागे अब्दुलचा काय हेतू?
३. हा अनुभव येऊन अनेक वर्षं होऊनही त्या देवीचं नाव काढलं की ह्या लोकांना बरं वाटेनासं का होतं?
मी पण वाचली ती कथा अन अपुर्ण
मी पण वाचली ती कथा अन अपुर्ण वाटली.
स्वप्ना_राज .. १ला अन ३रा
स्वप्ना_राज .. १ला अन ३रा प्रश्न मलाही पडला, पण मुळात ती कथाच अर्धवट वाटली.
२. 'संभालो' आणि 'जाने दो' हे शब्द उच्चारण्यामागे अब्दुलचा काय हेतू? >>> मला असे वाटले की कदाचित अब्दुल ला ती जागा ओलांदुन जाई पर्यंत शांतता अपेक्षीत होती म्हणुन त्याने त्यांना तसे सांगीतले.
कारण त्यांचा त्रास तेव्हाच वाढला जेव्हा ते तीघे ओरडतात. अर्थात तेही अर्धवटच वाटले कारण मग अब्दुलने त्यांना हे ही सांगायले हवे होते की त्याना एखादा भास होऊ शकतो किंवा कोणीतरी मायावी येऊन आपल्या जवळच्या माणसाचा आभास निर्माण करतो.
किंवा अब्दुलला हे माहितच नसेल
धाग्याचे चौदावे शतक पुर्ण
धाग्याचे चौदावे शतक पुर्ण झाल्याबद्दल मायबोलीवरील सगळ्या भुतांच अभिनंदन
भूत -बित खरं असत का हो ? मला
भूत -बित खरं असत का हो ? मला तर फार भीती वाटते
"३. हा अनुभव येऊन अनेक वर्षं
"३. हा अनुभव येऊन अनेक वर्षं होऊनही त्या देवीचं नाव काढलं की ह्या लोकांना बरं वाटेनासं का होतं?"
हा मानवी स्वभावाचा स्थाई भाव असावा, जसे अपघातातुन वाचलेले लोक इ. कथा सलग एक ते सहा भाग वाचले कि ती अर्धवट नाहि वाटली, असो हे अनुभव प्रत्येकाला येतिलच असे नाहि
"२. 'संभालो' आणि 'जाने दो' हे शब्द उच्चारण्यामागे अब्दुलचा काय हेतू?"
हे त्या कथेत वाचल्या प्रमाणे अब्दुल ला त्याच्या वडिलानी असे म्हणण्यास सान्गितले होते, तसेच अब्दुलचा ह अनुभव पहिलाच असावा.
अनिरुद्ध
भुते आहेत कि नाहीत हा विषय
भुते आहेत कि नाहीत हा विषय जरा बाजूला ठेवू. पण भीतीरस हा कधीकधी दोन चार वाक्यातच जबरी दणका देतो:
"ती घरी एकटीच होती. बाहेरच्या खोलीत बसली होती. दिवेलागणीची वेळ झालेली. तिची नजर सहजपणे स्वयंपाकखोलीकडे वळली. अंधुक प्रकाशात किचनकट्ट्याशी एक बाई पाठमोरी उभी असलेली दिसली"
केवळ इतक्याने जो झटका बसतो तो अनेकदा परिच्छेदच्या परिच्छेद वाचूनही बसत नाही. माळावरचा खेळ मध्ये लेखकाने घाबरवायचा आटोकाट प्रयत्न केलाय. "निदान आता तरी घाबरा" असे काहीसे वाटावे इतका. पण भीती निर्माण करण्यात कथा अपयशी ठरली आहे. वातावरणनिर्मिती हि एकच या कथेची जमेची बाजू म्हणता येईल. असो हे माझे वैयक्तिक मत.
खूप काही चुकीचे आहे त्या
खूप काही चुकीचे आहे त्या माळवरच्या खेळात. मुळात मुल होण्यासाठी लोक देव देव करायला लागले की कुलदैवताचे पाय धरण्याचा सल्ला दिला जातो, मग ते दैवत कुठे आडगावि नेऊन ठेवले की पुढची कथा बरोबर भुताच्या तावडीत सापडते. इथे यांचा काही ही संबंध नसलेल्या देवीच्या पाया पडायला पाठवले, लेखकही तेच काम करायला गेलेला म्हणजे देवी फेमस, मग ती गुगल वर सापडू नये म्हणजे नवल. भारतात अशा ठिकाणी बाजार भरायला वेळ लागत नाही.
दुसरा मुद्दा गाडीचा, सुधाकर राव नोकरीत भरपूर कमावून होते, पोरेही आईटीत आणि तरीही एक चांगली गाडी नाही??
सगळ्यात कमकुवत मुद्दा म्हणजे तीच अष्टमी पाहिजे होती याचा. पुढची अष्टमी यायच्या आत, जी 15 दिवसांनीही येते व महिन्यानेही येते दोघेही on साईट जाणार होते, मग गर्भारपण व बाळंतपण काय तिकडे ऑन साईट करणार होते?
आल्यानंतर निवांत ओटी भरून नंतर करता आला असता की कार्यक्रम.
दोघेही धडधाकट असूनही मूल होत नाही म्हणून घरात सतत रडारड, चिडचिड होते असे दाखवणाऱ्या कथा मला अजिबात आवडत नाहीत. आयुष्यात हे एकच साध्य आहे का? आणि नसेल ते मिळत तर रडारड व चिडचिड करून मिळणार आहे का? स्वतःला आधुनिक समजणाऱ्या लोकांनी गोष्टीसाठी म्हणूनही हे असले आधार घेऊ नयेत.
मलातर नुसती गोष्टच नाही तर ती
मलातर नुसती गोष्टच नाही तर ती साईट नाही पटली. नुसता पैस्यांचा बाजार मांडलाय असे वाटते तीथल्या काही अनुभव वाचनानंतर
त्यांची दुसरी कथा आवडली. आपण
त्यांची दुसरी कथा आवडली. आपण समजतो त्या मिती समजून इतर मिती असणे शक्य आहे व त्याचे अनुभव ज्यांना आलेत ते सोडून इतरांना ते अनुभव व अशा मिती असणे हे अचाट वाटण्याची शक्यता आहे.
मी मानींनी सहमत.
मी मानींनी सहमत.
पुण्यातील कथा नक्कीच छान तर्क
पुण्यातील कथा नक्कीच छान तर्क सुसंगत वाटते पण त्या माळा वरच्या कथेत पुण्यासारखे लोकेशन मैप का नाही हे न उलगडलेले कोड़े आहे आणि त्यामुळेच ती पूर्णपणे काल्पनिक वाटते. बाकी कोकणाच्या नावावर भुताटकीचे अजुन एक बिल मात्र फाडले त्या कथेने ....
ह्याउप्पर काही नाही माळा वर
हो बोअर होती ती कथा.
हो बोअर होती ती कथा.
ओवरॉल ब्लॉग मी कसा शहाणा भोवती फिरताना दिसला.
ओवरॉल ब्लॉग मी कसा शहाणा
ओवरॉल ब्लॉग मी कसा शहाणा भोवती फिरताना दिसला.>>

त्यांची पुण्यातली कथा कथा
त्यांची पुण्यातली कथा कथा म्हणून वाचायला थरारक अनुभव नक्कीच आहे. पण त्याचे "दुसरी मिती" वगैरे शब्द वापरून वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलेले अजिबात पटले नाही. बहुतांशी बाह्य जगात प्रत्यक्षात काय घडले यापेक्षा अनुभव घेणाऱ्याला काय जाणवले याचे ते वर्णन आहे. त्यांच्या कथनावरून मला हा स्लीप पॅरालिसिस सदृश्य प्रकार वाटतो. मी स्वत: स्लीप पॅरालिसिसचा अनेकदा अनुभव घेतला आहे. इथे इतरांनी पण घेतला असेल. अतिशय भयंकर अनुभव असतो. आपण जागच्या जागी जखडून जातो. कधीकधी अर्धे अंग थोडे हलवता येत असते. पण बाकी काहीही हालचाल करता येत नाही, आपण ओरडत असतो पण आवाज फुटत नाही. आणि अशा अवस्थेत सभोवती भयंकर अमानवी घटना घडत असल्याचे भास व्हायला सुरु होतात. ते खूप वास्तववादी वाटत असतात.
स्लीप पॅरालिसिस बहुतांशी झोपेतच होतो. पण झोप अपुरी झाली असेल तर जागे असताना सुद्धा केवळ झोपेची तीव्र तार आल्याने सुद्धा होऊ शकतो. हा प्रकार कसा घडवून आणायचा याचे तंत्र मी माझ्यापुरते अवगत करून घेतले आहे. इतरांना ते लागू पडेलच असे नाही. पण कधी चेंज म्हणून (
) अमानवी अनुभव घ्यायचा झाल्यास तर मी त्या तंत्राचा अवलंब करतो. अर्थात त्यात धोका असतो. कुणाला इंटरेस्ट असेल तर सांगेन. ट्राय जरूर करून पहा. 
"दुसरा मुद्दा गाडीचा, सुधाकर
"दुसरा मुद्दा गाडीचा, सुधाकर राव नोकरीत भरपूर कमावून होते, पोरेही आईटीत आणि तरीही एक चांगली गाडी नाही??"
चान्गलि गाडी बन्द पडु शकत नाहि का? तिसर्या मितितल्या कथेत आधि त्यान्ची गाडी बन्द पडते असा अनुभव तुम्हला पटतो तर हा का नाही? असो तशी ती कथा उत्कन्ठा वाढ्वण्याच्या नादात थोडी नव्हे जास्तच गन्ड्लेली आहे, किवा जर खरेच सत्य घट्ना असेल तर ती कथा विस्तार कर्ताना लेखक गन्ड्ला आहे, असो अद्रुश्य स्रुश्टी बाबत आपण काहि भाष्य करु शकत नाही एव्हडेच खरे आहे.
अनिरुद्ध
"त्यांच्या कथनावरून मला हा
"त्यांच्या कथनावरून मला हा स्लीप पॅरालिसिस सदृश्य प्रकार वाटतो. "
समजले नाहि कसे ते कारण एक तर ते जागे होते तसेच गाडी सुद्धा चालवत होते.
अनिरुद्ध
>> समजले नाहि कसे ते कारण एक
>> समजले नाहि कसे ते कारण एक तर ते जागे होते तसेच गाडी सुद्धा चालवत होते.
"मी काही क्षण तसाच उभारलो असेन .. इतक्यात काय झाले कोण जाणे कोणी तरी मला चक्क ढकलले असे वाटले.."
त्यांच्या वरील वाक्यावरून मला तशी शंका आली. कारण जागे असतानाच पण झोपेची प्रचंड तार आलेली असेल तरी स्लीप पॅरालिसिस होऊ शकतो.
जाऊ द्या मंडळी किती किस
जाऊ द्या मंडळी किती किस काढायचा ... त्यापेक्षा नवीन काही किस्से येऊ द्यात
Pages