अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाऊ द्या मंडळी किती किस काढायचा ... त्यापेक्षा नवीन काही किस्से येऊ द्यात>>तुमच्या किश्श्यांच्या प्रतिक्षेत..

गाडी चालवत असताना झोप लागून अपघात झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत.

चांगली गाडी बंद पडु शकते हे खरेच पण इतकीही नाही की मेकॅनिकला दाखवल्यानंतरही फौल्ट निघू नये.

असो, नवे किस्से येऊ द्या हे मीही बोलायला आले होते Happy Happy

हा किस्सा आधी सांगीतलाय का आठवत नाही

माझ्या आजोळी एक विहीर आहे गावाच्या एका टोकाला.

असे म्हणतात की त्यावर एक भुत बसते साधारण संध्याकाळी सहा नंतर. घोंगडी पांघरुन घेतलेली असते, एका हातात टोकाला घुंगरु बांधलेली काठी, दुसर्या हातात लाटण असते
बर्याच जणांनी त्याला बघीतलेय असे म्हणतात. आम्हाला कधीच त्या विहीरीकडे कुणी जाऊ दिले नाही.
लहान असताना सुट्टीत गावी गेल्यावर एक-दोनदा तीकडे जायचा प्रयत्न केलाही पण घरच्यांनी जरी पाहीले नाही तरी गावाकडचे कुणीतरी बघायचेच आणी घरी पोच करायचे आम्हाला
तसे त्याला कुणी छेडले नाही तर ते कुणालाच त्रास द्यायचे नाही पण विहीरीच्या ईतक्या कड्यावर बसते की थोडे जरी हलले तरी विहीरीत पडेल असे एकलेय

अजुन एक तीथे भुत बसते माहीत असुन सुद्धा बायका त्या विहीरीच् पाणी भरायच्या पुर्वी, आताचे माहीत नाही

गाड़ी कधी कधी इतकी वाईट रीतीने बंद पड़ते की मैकेनिकला सुद्धा फॉल्ट मिळत नाही --- हे असे खरोखर घडू शकत हे नक्की . आंबा घाटात सामुराई बाईक कुठलाही गिअर टाकला की रिवर्स जात होती (त्याच्या आधी सुद्धा बरीच कारणे घडली त्या विशिष्ट प्रसंग आणि ठिकाण आल्यानंतर ) अगदी त्याच प्रकारात मग उलट चालवत घाट पार पडून एका ठराविक वळणा नंतर तो प्रकार थांबला आणि बाईक पूर्ववत होती तशी सुरळीत चालु लागली...ह्याचा जीवघेणा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे अश्या घटनेत गाडीसोबत सुद्धा अनाकलनिय नक्कीच घडू शकते

वीबी ते घोंगडी वगैरे वाचून भीती वाटली हो मला... >>> मला खुप ऊत्सुकता होती पण चान्स नाही मिळाला बघायला.
अजुन एक अनुभव आहे माझ्या मम्मीचा वेळ मिळेल तसे लिहीन

आमच्या नगर ला आगडगाव म्हणून गाव आहे..शनी देवांचे गुरू काळभैरवनाथ यांच ठिकाण तर येथे चैत्रपौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी भुतांची जत्रा भरते..त्या दिवशी त्या मंदिर परिसरात कुणालाही थांबता येत नाही थांबू दिलं जात नाही.. खरंखोट्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न अजून केलेला नाही..कितीतरी म्हातारे लोकं त्यांनी त्यांच्या लहानपणी हे लांबून बघितल्याचं सांगतात

नुकताच आई कडून एक किस्सा कळाला.
नारायण पेठेमधून घराच्या दिशेने आम्ह्नी येत होतो. अलकाच्या चौकाच्या जरा अलीकडे एक ईमारत आहे. त्या ईमारतीवर पुराच्या पाण्याची पातळी दर्शवणारी एक रेषा काढली आहे आणि त्या खाली वर्ष लिहल आहे. मी माझ्या मुलाला ती पुर रेषा दाखवली आणि त्या भयानक ऐकलेल्या पुरा बद्दल सांगू लागले. माझ बोलण झाल्यावर आईने तिच्या मावशीच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगीतला.
आईची मावशी 'सकाळ'च्या ऑफिस जवळ रहायची. पुर आला तेव्हा तिच्या वड्यातील बायका पुराचे पाणी बघायला गेल्या. ती सुध्दा त्यांच्या बरोबर गेली. बर्‍याच वस्तू, प्रेत अस काय काय त्या पाण्यातून वाहून जात होत. ते सगळ बघून घरी आल्यावर ती खुप वेड्या सारख करयला लागली. सारखी नळा खाली जाऊन पाणी अंगावर घेत बसायची. तिथन उठवल की घरातील घागर अंगावर ओतून घ्यायची, मधेच काहीतरी बरळायची. अस ती खुप दिवस करत होती.
मग कुणीतरी सांगीतल की पुराच पाणी पहायला गेली तेव्हा काहीतरी बाधा झाली असेल. त्या पाण्यात बरीच प्रेत होती. त्यातल्याच कुणीतरी तिला धरल असेल.
ती बरी कशी झाली त्या बद्दल जास्त कळाल नाही.

आपले सैनिक प्राण तळहातावर घेऊन आपले रक्षण करत आहेत हि कथा अशाच एका सैनिकाची जो आपल्या शेवटच्या श्वासानंतरहि देशाच्या सीमेच रक्षण करतोय . एक सत्य कथा आर्मीतुन ... आजही आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहू शकतो

हरभजन सिंह यांचा जन्म 30 ऑगस्ट 1946 मधे जिल्हा गुजरांवाला येथे झाला जो आज पकिस्तान स्थित आहे येथे ते 1966 मधे आर्मीमधे भर्ती झाले .बाबा हरभजन सिंह 24 व्या पंजाब रेजिमेंटचे जवान होते त्यांची ड्यूटी भारत चीन सीमेवर होती . त्या नंतर दोन वर्षातच म्हणजे 1968 मधे ड्यूटीवर असताना त्यांचा म्रुत्यू झाला त्या दिवशी ते मुख्यालयात जाताना खेचरावर बसून नदी पार करत होते पण पाण्याची गति इतकी होती की ते खेचर टिकाव धरू शकल नाही त्या पाण्याबरोबर ते वाहून गेले वाहत वाहत त्यांच शव फार पुढे निघून गेले .दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांचा काही शोध लागला नाही पण एके दिवशी त्यांनी आपल्या सहकार्याच्या स्वप्नात येऊन आपले शव असलेली जागा सांगितली त्या जागेत शोध घेतल्यावर खरोखरच त्यांचे शव सापडले त्यावर विधिवत अत्यंसंस्कार केले गेले .पण या घटनेनंतर एका पाठोपाठ एक चमत्कार घडू लागले बाबा हरभजन सिंह आपल्या सहकाऱ्यांच्या स्वप्नात येऊन चीनकडून होणाऱ्या अतिरेकी कारवायांची जाणीव करून द्यायचे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी काही दिवसांतच सत्यरूपाने समोर यायच्या .हळूहळू सैनिकांच्या मनात त्यांच्या बद्दल श्रध्दा वाढू लागली आणि त्यांनी त्यांच्या बंकरचे रुपांतर एका मंदिरात केले.आजही भारत चीन दरम्यान होणाऱ्या फ्लैग मीटिंगमधे बाबा हरभजन सिंह च्या नावाने एक रिकामी खुर्ची ठेवली जाते जेणेकरून ते मीटिंगमधे उपस्थित होऊ शकतील .सैन्यात त्यांचा रैंक आहे नियमानुसार त्यांचे प्रमोशनही केले जाते इतकच नाही तर काही वर्षांपूर्वी पर्यंत त्यांना दोन महिन्याची सुट्टीही मंजूर केली जात होती तीन सैनिक त्यांचे सामान ट्रेनमधे ठेऊन गावी पोचवत आणि दोन महिन्यांनंतर पुन्हा आणत .लोकांची त्यांच्या प्रति वाढलेली आस्था पाहून त्यांच अजून एक भव्य मंदिर बनवले जे गंगटोकमधे आहे जुनं मंदिर या पासून 1000 फिट उंचावर आहे .अस म्हणतात या मंदिरात एक खोली आहे जी बाबांसाठी ठेवलेली आहे त्यात त्यांचे बूट ,कपडे स्वच्छ करून ठेवले जातात पण संध्याकाळी ते मळलेल्या अवस्थेत सापडतात जस कोणीतरी ते घालून फिरुन आलय .

अशाप्रकारे हा जवान आज इतक्या वर्षानंतरही म्रुत्यूपश्चात देशसेवेसाठी तत्पर आहे ...

" व्हास व्हिला "
अस म्हणतात पैसा ,सोन ,आणि जमिनीसाठी कोणत्या व्यक्तीची हत्या केली जाते तेव्हा त्याची आत्मा मुक्त होतं नाही तीचा वास त्या गोष्टीच्या आसपास असतोच .आजही अश्याच एका जागे बद्दल माहिती देत आहोत .
व्हास व्हीला हा बंगलोरमधील सेंट मार्क रोडवरील एक बंगला .शहराच्या मध्यभागी श्रीमंत लोकांच्या वस्तीतील एक घर... आजुबाजुला वर्दळ लोकांच्या वस्त्या ,इमारती असूनही हा बंगला अगदी सुनसान अवस्थेत आहे .याला कारणही तसेच आहे .अनेकांच्या मते या घरात अमानवीय शक्तींचा वास आहे .या घरच्या मालकीनीचा आत्मा या घरात आणि घरा समोरील गाडीत जाणवतो .त्यांना या घरात इतर कोणाचे वास्तव्य मान्य नाही .
1943 मधे " इ.जे.व्हास " यांनी ही वास्तु बांधली या नंतर या घरात डलसी आणि वेरा व्हास या बहिणी राहत होत्या .ही जागा शहराच्या मध्यभागी अगदी मोक्याची जागा होती त्यामुळे अनेकांचा या जागेवर डोळा होता ते जमीन हडपण्यासाठी त्या दोघीवर दबावही टाकत होते .पण त्यांनी ते घर सोडले नाही 2002 साली डलसी व्हास यांची हत्या झाली आणि त्यानंतर वेरा व्हासही तेथून निघून गेली काही लोकांच्या मते ती बेपत्ता झाली आणि या सर्वांमागे त्या जमीन बळकावर्याँचा हात होता .या नंतर ते घर अनेकांना विकण्याचा प्रयत्न झाला पण ज्यानी ते विकत घेतले त्यांना काही ना काही त्रास झालाच .त्या नंतर ते घर अगदी सुनसान अवस्थेत पडले आहे .या घरा समोर एक गाडी दिसते कधी कधी रात्री ती स्टार्ट होण्याचाही आवाज येतो .लोकांना अजूनही तिथे भयंकर अनुभव येतात .

आजही ही जागा बंगलोरमधील भयाणक जागांपैकी एक आहे .IMG_5973.JPG

@ र।हुल - बघा प्रयत्न करून कदाचित तुम्हाला घाबरून भुतं जातील आणि तुमचा फायदा होईल ... बाकी बंगलोर मध्ये मोक्याची जागा पडून आहे हे पचायला जरा जड जाते

भुत्याभाउ, इंटरेस्टिंग स्टोरी. थोडे गुगल केले. या व्हिला मध्ये डलसी व्हासच्या हत्येशी संबंधित बातम्या इथे आणि इथे वाचायला मिळतात अजूनही.

पण हा व्हिला २०१४ साली उध्वस्त करण्यात आलाय.

हा माझ्या मामाचा आणि बहिणीचा अनुभव

आम्ही गावी गेलेलो तेव्हाची गोष्ट ..
एकदा संध्याकाळी आम्ही समुद्र किनाऱ्यावरून घरी परतेपर्यंत अंधार पडला. घरी आल्यावर आजी ओरडलीच. तर त्या रात्री माझ्या मामाला आणि बहिणीला असा भास कि स्वप्न (?) पङलं कि त्यांच्या आजूबाजूला पांढऱ्या कपङ्यातील आकृत्या गोल करून बसल्या आहेत. दोघांनाही सेम भास/स्वप्न. पण माझ्या मामेभावाला आणि मला काहीच जाणवल नाही. आम्ही सगळे हाॕलमध्ये एकत्रच झोपलेलो.

डिसूझा चाळ माहीम हि जागा मुंबई मधिल सर्वात शापित म्हणून प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की एक स्त्री विहिरीत बुडाली होती आणि लोक म्हणतात की त्यांना ती आता विहिरीजवळ आणि चाळीत सगळीकडे दिसते .... कोणाला काही अधिक माहिती आहे का?

शनिवार पेठेत त्या ब्रिजच्या खाली नदीजवळ एक बिल्डींग आहे (नाव आठवत नाही) पण शनिवारवाड्याकडुन कॉर्पोरेशन ला जाय्ला लागलो की डावीकडे एक बोळ होता तिथे टोकाला ही बिल्डींग....त्यात माझा काका भाड्याने काही महिने राहिला होता. त्यात बरेच वाईट अनुभव आले. जसं सतत घरी कोणी ना कोणी आजारी, रात्री कामावरून तो उशीरा कधी यायचा तर कसले आवाज यायचे मागे, घरात एकदा अचानक साप दिसला, बेडरूमच्या खिडकीत कोणाचा तरी भास व्हायचा. गुरूजींना विचारले असता त्यांनी सांगितलं की त्या नदीत दशक्रिया विधीचं काही, किंवा लोकं गेल्यावर जे हार किंवा तत्सम सामान नदीत विसर्जन करतात त्याजवळ राहणे चांगले नाही. पुढे सोडली काकाने ती जागा.

By Avinash Pataskar

हि अगदी १००% सत्यकथा आहे आणि मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. भूत म्हणजे सडलेले, रक्तबंबाळ, असे काही असतेच असे नाही असे मला वाटू लागले. मी स्वतः स्ट्रक्चरल इंजिनिअर आहे आणि गेली १२ वर्षे परदेशात मध्य पूर्वेत कुवेत दुबई मध्ये राहत आलो आहे. इथे
वास्तुदोष भरपूर असतात कारण परदेशी नागरिकांसाठी घरे बांधताना मालक कसलाही विचार करत नाही. मला इकडे बरेच अनुभव आले
त्यातलाच हा दुबईतील एक अनुभव.
मला नवीन नोकरी पगारवाढ मिळून दुबईत लागली. मला त्यामुळे अजमान वरून दुबईला राहायला जाणे भाग होते. दुबईत जागा मिळणे फार अवघड झाले आहे. जाहिराती बघून फोन करत होतो जागा पाहत होतो. जवळ आणि सोयीस्कर अशी जागा मिळत नव्हती. असली तर भाडे जास्त
किवा जागा गेलेली असे. शेवटी मला व मुलांना जवळ अशी जागा आहे हे कळले आणि पाहायला गेलो तर ती कोणी घेतली नव्हती फक्त एक
प्रोब्लेम होता कि प्लॉट चे तोंड दक्षिणेला होते. अशा वास्तूत दुष्ट आत्मे सहज राहतात. नशीब चांगले कि फ्लाटचे तोंड पश्चिमेला होते, घेण्याशिवाय
पर्यायच नव्हता, कारण १-२ दिवस राहिले होते जुनी जागा सोडायला. म्हणून ती घेतली. ते झाले आणि मी, बायको, आणि मुलगा, मुलगी असे चौघे तिथे राहायला गेलो. नवीन प्रमोशन ची नोकरी होती. पण खाजगी नोकरीत कटकटी फार. तेच सुरु झाले. त्यातच आजारपणाची भर पडली. असे ८-९ महिने चालू होते. मी स्वत कुंडली वगैरे बघत visit my site as avinashpataskar.in असल्याने एकदा प्रश्नकुंडली मांडली तर त्या वस्तुत
३ अतृप्त आत्म्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले. माझाही फार विश्वास नसल्याने मी फार विचार केला नाही. पण त्या बिल्डींग ला सगळेच लोक नावे ठेवत असत. कारण नंतर कळले. पुढच्याच वर्षी मुलीची १० वी असल्याने बायको व मुले पुण्याला निघाली. आता मी एकटाच राहत होतो. मधून अधून खाणे पिणे बार वगैरे चालायचे. ३ महिन्यापूर्वी इराकला असताना मी आजारी पडलो व दुबईत आल्यावर पित्ताशायाची शस्त्रक्रिया झाली. त्याचे सगळे परिणाम हळू हळू ओसरू लागले होते. बरेच त्रास होत होते. मी एकटाच असल्याने हॉटेलात राहण्याच्या विचारात होतो. अजून घर सोडायचे पक्के झाले नव्हते कारण पुढे मिळणे अवघड असल्याने अजून सोडले नव्हते. आता सुट्टीच्या दिवशी घर खायला उठे. दुबईमध्ये ३०-४०% वेश्या राहतात. माझ्या समोरच्या घरात सुमारे १० जनी राहत होत्या. सगळ्या सिरीया इराण, युक्रेन, रशिया आणि युरोपिअन.
मला याविषयाची थोडीफार माहिती होती. त्या दिवसभर आराम व रात्री काम करत. सुट्टीच्या दिवशी रात्री झोपयला उशीर झाला कि त्यांचे काय चालते याची उत्सुकता वाटे. बाहेरून आवाजही येत. थोडेफार कळत असे. म्हणून घराच्या पीपहोल मधून बाहेर पहायचा मोह आवरत नसे. त्यावेळी अमावास्येला २-३ दिवस होते आणि मी असाच बाहेर पाहत होतो. बाहेर पसेज मध्ये मला २-३ साडी घातलेल्या बायका काहीतरी धुणे धूत असलेया किवा काहीतरी काम करत असलेल्या दिसल्या. त्यानंतर २ मुले पळताना दिसली. त्या बायका एकच हालचाल एकसारख्या करत होत्या. मुलेही पळत होती. असे ३-४ वेळा झाले, म्हणून मी दरवाजा उघडला तर समोर काहीच नाही. अगदी शांत! परत झोपलो. थोड्या वेळाने काही आवाज आला म्हणून परत बाहेर पहिले तर तेच दृश्य! आता डोके आउट झाले. असे त्या रात्री ४-५ वेळा मला दिसले. ती रात्र कशीतरी गेली. दुसर्या दिवशी सुट्टी होती म्हणून जागरणाचे काही वाटले नाही. झोपताना मी घरात देवीच्या फोटोखाली झोपत असे. दुसर्या दिवशी रात्री तोच प्रकार दिसत होता. त्यात पासेजच्या कडेला १-२ पुरुष व स्त्रिया बसलेल्या दिसत होत्या. नंतर एक उंचापुरा माणूस दरवाज्याच्या बाहेर घरात येण्याच्या तयारीत उभे
असलेला दिसत होता. मी काही ऑर्डर दिलेली नव्हती. बेलसुद्धा वाजली नव्हती मग हा माणूस आला कुठून? म्हणून मी एकदम दार उघडले.
तर तिथे काहीच नाही. त्या दिवशी रात्री २-३ पेग लावून मी झोपलो होतो कदाचित त्यामुळे डोक्यातील विचार जातील असे वाटत होते. पण मध्येच जाग आली. तसा मी जमिनीवर चटई टाकून झोपतो. बाजूला रिकामी खाट पडली होती. तिच्याखाली मला हालचाल जाणवली. म्हणून पहिले तर मांजरासारखे पिल्लाच्या आकाराचे डोळे चमकत होते. ते माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होते. म्हणून त्याला हुसकावण्यासाठी हातात काहीतरी आले ते फेकले. तेव्हा ते मांजर खाटेवर चढून बसले. मी उठून लाईट लावून बघतो तर काहीच नाही. खिडक्या चेक केल्या तर सगळ्या बंद. त्याही मोठमोठाल्या अलुमिनिअम च्या स्लाईड खिडक्या त्यातून ते येन शक्यच नव्हते. घरात सगळे असताना असे कधीच झाले नव्हते. माझा मनुष्य गण
असल्याने आणखीनच भीती वाटत होती. परत आलो आणि झोपलो. थोड्यावेळाने माझ्या खांद्याला कोणीतरी जोरात ओढते आहे असा भास झाला. उठून अंधारात पहिले तर माझ्या जवळ एक पुरुष पूर्ण उघडा माझ्याकडे पाठ करून बसलेला होता. लाईट लावल्या तर काहीच नव्हते. परत झोपलो. पण झोप येत नव्हती. छताकडे बघत बसलो. तर सिलिंगवर एक मुस्लिम पुरुष व काही बायका बोलत असल्याचे चित्रपटासारखे दिसत होते. असे ३-४ वेळा झाले. मी देवीच्या फोटोसमोर झोपत असे त्यामुळे मला काही होणार नाही याची खात्री होती. थोडा वेळ गेला आणि एक चमकणारा पांढरा उंदीर भिंतीवर पळत होता. मी दुबईमध्ये उंदीर कधिच पहिला नव्हता. शेवटी वैतागून बेडरूम मधून हॉल मध्ये येउन बसलो.
हॉलला पूर्ण काचेचा दरवाजा होता व त्याला गोगल ग्लास होती. त्यात आतले प्रतिबिंब स्पष्ट दिसत असे. त्या काचेत बघितले तर एक तरुण व एक वयस्कर बाई उभ्या राहून बोलताना दिसत होत्या. ते प्रतिबिंब माझ्याच घरातले होते. पण घरात तर माझ्याशिवाय या बायका आल्या कुठून? परत पीप होल मधून पहिले तर तेच लोक, स्त्रिया, मुले बाहेर खेळत होती. आता परत काचेत बघितले तरी तेच चित्र दिसत होते. मग पलीकडे बघायचा प्रयत्न केला तर एक पांढरे कपडे घातलेला माणूस खुर्च्चीवर बसावा असा बसला होता. खरे तर बाहेर मोकळे मैदान आहे तिथे कुठे आला माणूस?
सगळेच अघटीत घडत होते. शेवटी येवून झोपलो. काय होईल तो होवो असा विचार केला. आणि कधी डोळा लागला ते कळलाच नाही. दुसर्या दिवशी मित्राला फोन केला आणि माझ्याकडे राहायला ये तब्येत बरी नाही अशी विनंती केली. त्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर तो आला. त्याला मी काहीच सांगितले नाही. पण जशी जशी रात्र होऊ लागली तसे ते चक्र पुन्हा सुरु झाले. मला जे दिसत होते त्यातले त्याला काहीही दिसत नव्हते.
सगळे तेच भास होत होते. त्याने मला वेहम आहे म्हणून सोडून दे असे सांगितले. पण मला ते सगळे सहन होत नव्हते शेवटी १ आठवड्याची रजा घेऊन मी पुण्याला निघालो. जेवढे समान भरून घेता येईल ते घेतले. बाकीचे पाठवून दिले आणि मोठी कपाटे तशीच सोडून दिली. मित्र बरोबर होता म्हणून सगळे करू शकलो. पुण्यात पोचलो आणि घरमालकाला घर सोडणार असल्याचे कळवले. तसेही माझे अग्रिमेण्ट संपलेच होते. अजून १५ दिवस राहिले होते. पुण्यात जर रीलाक्स झालो आणि परत जायचे ठरले. अजून मोठे समान विकायचे होते त्यासाठी परत त्याच घरात राहायचा निर्णय घेतला आणि तिथे पोचलो. यावेळी देवीचा अंगारा घेऊन गेलो होतो. पण दरवाजातच बिल्डींग मनेजरने अडवले. आता तुम्ही इथे राहू शकत
नाही असे सांगितले. मला हॉटेलमध्ये जाने भाग होते. कदाचित नशीब चांगले असावे. मी रात्री १२ वाजता हॉटेलला गेलो. नंतर येजा करून समान विकले. नोकरी करत होतो. पण आता तसला अनुभव काही येत नव्हता. पण आत्ताही त्या घराची आठवण झाली कि अंगावर शहारा येतो. इकडे
अरबी लोक त्यांच्या नोकरांना कसेही वागवतात, इतकेच काय जनावरासारखे जीवही घेतात. त्यामुळे कदाचित असे आत्मे भटकत असावेत.

Pages